Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 19:50
  • Log in or register to post comments
  • 6543 views

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on Wed, 10/28/2009 - 19:51

Permalink

छान

छान माहीती... अजुन येवु द्या तुमच्या पोतडीतुन. :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 20:44

In reply to छान by अवलिया

Permalink

नक्की!

नक्की! आहेत असे बरेच विषय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 10/28/2009 - 19:54

Permalink

छान माहीती...

येऊद्या..वाचतोय... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Wed, 10/28/2009 - 19:56

Permalink

व्वा.

व्वा. अतिशय उत्तम लेख... असेच इतर विषय आपल्या जवळ असतील तर त्यावर जरुर लिहा. :) मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 20:44

In reply to व्वा. by मदनबाण

Permalink

धन्यवाद.

धन्यवाद. नक्की लिहीन!
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Wed, 10/28/2009 - 19:56

Permalink

+१

माहीती आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Wed, 10/28/2009 - 20:11

Permalink

उपयुक्त माहिती

छान लेख. फोटू आणि आक्रुत्यां मुळे समजायला सोपा. मी ही साधारण ह्याच क्षेत्रात ( ट्युब टु ट्युब वेल्डींग मशीनस बनवतो.)आहे. >>हलक्या दर्जाच्या व कमी स्ट्रेस असलेल्या वापरासाठी वेल्डेड ट्युब वापरतात- जसे पाणी वाहून नेण्यासाठी. >> हे थोडे पटले नाही, कारण फार्मा , फुडस & बेवरेजेस ह्या साठी लागणारी पाइप लाइन ह्या वेल्डेड ट्युबस असतात. अधीक माहीती समजावुन घ्यायला आवडेल. ---- आनंद
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 20:22

In reply to उपयुक्त माहिती by आनंद

Permalink

रॅडीयल

रॅडीयल स्ट्रेसेस किंवा आतून वाहून नेण्याच्या द्रवाचा दाब एका ठराविक रेषेच्या बाहेर गेला की, सीमलेस ट्युबशिवाय पर्याय राहत नाही कारण त्या कमी वजनात अधिक क्षमता देतात. वेल्डेड ट्युबही सीमलेस ट्युब एव्हढी सक्षम करता येईल पण त्यासाठी तिची थिकनेस अनेक पटींनी वाढेल व एकंदरीतच सीमलेस ट्युब विकत घेणे परवडेल. काही केमिकल प्रकल्पात आवर्जून सीमलेस ट्युब वापरली जाते. अवांतर- संपृक्त सल्फ्युरील ऍसिड सारखे द्रव वाहून नेण्यासाठी दगड वितळवून लाव्हा करतात व तो साच्यात घालून त्याच्या नळ्या करतात. लोखंडी नळ्या अशा ठिकाणी वापरतातच येत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Wed, 10/28/2009 - 21:00

In reply to रॅडीयल by अजय भागवत

Permalink

वर उल्लेख

वर उल्लेख केलेल्य क्षेत्रात वेल्डेड ट्युबसच वापरतात कारण समजाउन घेतले पाहीजे, सिमलेस ट्युबस आल्या तर माझ्या मशीन्सची गरज च राहणार नाही. (नविन काही बनवण्याच्या मागे लागल पाहिजे अस दिसतय......) ----आनंद
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 21:20

In reply to वर उल्लेख by आनंद

Permalink

वेल्डेड

वेल्डेड ट्युबचा वापर ज्याठिकाणी आज होतोय तो होतच राहणार. बाकी चर्चा आपण खरडीतून करु शकू. सीमलेस् ट्युबही वेल्डींगने जोडतात (काही वापरात) पण ओसीटीजी साठी टेपर थ्रेडींग करावे लागते- ज्यामुळे ऑईल रीगवर एक-एक ट्युब आत सोडतांना ती आधी आत गेलेल्या ट्युबला थ्रेडेड कपलिंगने जोडतात- ऑईल रीग वर ट्युब फिरत असलेल्या तुम्ही पाहिल्या असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on Fri, 10/30/2009 - 06:59

In reply to उपयुक्त माहिती by आनंद

Permalink

ट्यूब वेल्डींग!

आनंदभाऊ, तुम्ही ट्यूब टू ट्यूब वेल्डींग मशिन्स बनवता त्या बद्दल जास्त माहिती हवी आहे. जेथे जागा कमी असते (किंवा वाचवायची असते) अथवा हाय प्रेशर कपलिंग्स महाग पडतात, तेथे तुमच्या मशिन्स वापरल्या जात असाव्यात. माझ्या मते, तुमची यंत्रे वेल्डेड किंवा सिमलेस ट्यूब, दोन्ही ठिकाणी वापरता येऊ शकतात. मला वाटते, तुमची यंत्रे स्पेस अप्लीकेशन, विमान निर्मीती अथवा जेथे पोचून दुरुस्ती कठीण असते तेथे जास्त उपयोगी आहेत. स्पेस अप्लीकेशन मध्ये ट्यूब्ज व सुटेभाग जोडणे बरेचदा अत्यावश्यक असते, परंतु, उच्च वेगावर हे जोड तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे, नट-बोल्टस वापरता येत नाहीत. Electron Beam Welding (EBW), ज्यामध्ये Laser किंवा HF तंत्र वापरून दोन भाग जोडाच्या जागीच वितळवून जोडले जातात. ह्या जोडाला मजबूती असते, तसेच जागा ही वाचते. एरोस्पेस मध्ये जागा वाचवण्याला अनन्य साधारण महत्व आहे. यंत्रे जितकी कमी जागा घेतील तितके पे लोड वाढवता येते. ISRO ने अती उंचावर, प्रचंड थरथराट (vibrations) व तापमानातील अतीरेकी बदल ह्या परीस्थीत टिकाव धरणार्‍या वेल्डींग तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित केले आहे. (आपण विमानाच्या पंखांजवळ बसतो, तेव्हा आपल्याला पंखांवर रोव्हेटेड जोड दिसतात). परंतू लढाऊ विमाने व रॉकेटस सारख्या स्वनातित वेगाने पळणार्‍या वाहनात वेल्डीगला पर्याय नाही). तुम्ही तुमची यंत्रे ह्या उद्योगांना देता का? आपल्या कंपनीची वेबसाईट असल्यास, कृपया लींक द्या. तसेच आपण एरोस्पेस किंवा विमान उद्योगाला यंत्रे देता का ह्याची शक्य असल्यास माहीती द्या. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Wed, 10/28/2009 - 20:12

Permalink

+२

माहिती आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Wed, 10/28/2009 - 20:13

Permalink

नवीन आणि

नवीन आणि रंजक माहिती आहे. अजुन वाचायला आवडेल. :)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 10/29/2009 - 15:23

In reply to नवीन आणि by गणपा

Permalink

+१

नवीन आणि रंजक माहिती आहे. अजुन वाचायला आवडेल. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 10/28/2009 - 20:22

Permalink

चांगली माहिती

श्री भागवत, चांगली माहिती. How it is made या मालिकेतही असेच काहीतरी दाखवत असतात. श्री अधीर लोखंडेंचा मार्केटशेअर खाताय की तुम्ही.;)
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on Wed, 10/28/2009 - 20:45

In reply to चांगली माहिती by अक्षय पुर्णपात्रे

Permalink

स्पर्धेतू

स्पर्धेतूनच गुणवत्ता वाढते असे अनुभवत आलो आहे. ती मालिका कोणत्या वाहिनीवर दाखवतात?
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Wed, 10/28/2009 - 20:49

In reply to स्पर्धेतू by अजय भागवत

Permalink

खरे आहे

श्री भागवत, स्पर्धेतून वाढीस लागते आणि ईर्ष्येने धुळीस मिळते. ही मालिका डिस्कवरी चॅनेलवर दाखवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेंद्र गोळे on Wed, 10/28/2009 - 20:45

Permalink

बिनशिवणीच्या नळ्या निर्मितीची सुंदर हकिकत! आवडली!!

बिनशिवणीच्या नळ्या निर्मितीची सुंदर हकिकत! आवडली!! ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते.>> उत्तम. अगदी सविस्तर माहिती दिलीत तरीही ती अधिकच आवडेल. तुमच्या माहितीचे तंत्र, आम्हालाही अवगत करून द्या. किमान ओळख तरी घडवा. या लेखाखातर हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Wed, 10/28/2009 - 23:01

Permalink

छान माहिती.

छान माहिती.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 10/28/2009 - 23:15

Permalink

सोप्या

सोप्या भाषेतील माहिती आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on गुरुवार, 10/29/2009 - 00:02

Permalink

प्यांटीतल

प्यांटीतले लिंग ओळखणारे टारझन महाराज अजून ह्य 'वेल्डेड ट्यूब' आणि 'सिमलेस ट्यूब' प्रकाराकडे कसे काय वळले नाहीत? :)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 10/29/2009 - 13:33

In reply to प्यांटीतल by निमीत्त मात्र

Permalink

हॅहॅहॅ ...

हॅहॅहॅ ... काय हो निमित्त मात्र ... आपले छंद दुसर्‍यांवर सोपवताय ? असो .. अतिशय हस्यास्पद प्रतिसाद आहे हा !! टिप : वरील प्रतिसादातही "हॅहॅहॅ" आहे .. ह्यातही आपल्याला काही दिसतंय का ? -- निवृत्त कुत्र
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 10/29/2009 - 06:42

Permalink

लेख आवडला

खूपच माहिती आणि चित्रांसहित लेख. आवडला, आणि असेच अधिक येऊ देत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 10/29/2009 - 06:54

Permalink

मस्त

का़ळे साहेबांनंतर आता तुम्हीही! अश्याच निरनिराळ्या तांत्रीक विषयांवरील लेख येऊदेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on गुरुवार, 10/29/2009 - 08:08

In reply to मस्त by सुनील

Permalink

काळे

काळे साहेबांनी लिहिलेला लेख वाचला होता व तेव्हा पासूनच वाटायला लागले होते की, ह्याबद्दल लिहावे. असे लिखाण संवादस्थाळांवर कितपत रुचेल असे वाटत असे व किती खोलवर लिहावे ही मर्यादा एकदोनदा बुडी मारल्याशिवाय समजत नाही. त्यामुळे वरील लेख ५०००० फूटावरुन पहावे असा आहे. काळे साहेबांचे कित्येक वर्षे स्टील क्षेत्रात गेले आहे तरीही त्यांची लिहिण्याची उर्मी शाबूत आहे हे पाहून बरे वाटते. स्टील मिल मधील अतिशय खडतर काम माणसाच्या मनातील तो सॉफ्ट टच-पॉइंट काढून टाकू शकत नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on गुरुवार, 10/29/2009 - 16:07

In reply to काळे by अजय भागवत

Permalink

लिहा अशा विषयावर. कांहीं लोकांना ही 'स्पर्धा' का वाटते कळत नाहीं

मी 'ISSAL'मध्ये काम करत असतांना ISMT ला त्यांचे रॉ मटेरियल पुरवायचो. त्यामुळे मी तो कारखानाही खूपदा पाहिला आहे. तुमचा लेख वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद लुटला. तसेच जमशेदपूरचा कारखानाही पाहिला आहे. बारामतीचा कारखाना मात्र पहायची संधी नाहीं मिळाली! लिहा या व अशा विषयावर. कांहीं लोकांना ही 'स्पर्धा' का वाटते कळत नाहीं. पण आयुष्यात अशा लोकांशी गाठ तर पडतेच ना! मला तुम्ही आणखी असेच लिहिलेले खूप आवडेल. खरं तर माझ्याकडे आता या विषयावर लिहायला आणखी कांहीं नाहीं. कांहीं video काढून एकाकडे "You-Tube-able" करायला दिले आहेत ते मिळाले कीं मी ते चढवीन. तरी अगदी अनमान न करता लिहा! आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे आहात कीं प्रोजेक्टकडे? मॅन्युफॅक्चरिंगकडे असाल तर कधीतरी नोटस compare करायला मजा येईल. आपण कधी भेटलो होतो का? आपले नाव परिचित वाटले म्हणून विचारतोय. 'मराठी शब्द' नावाच्या एका संस्थेशी आपला संबध आहे काय? कारण त्या विषयावर आपला कांहीं पत्रव्यवहार झाला असावा असे वाटते. सुधीर काळे ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 10/29/2009 - 08:07

Permalink

मस्त

लेख छान आहे. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 10/29/2009 - 09:50

Permalink

सीमलेस

सीमलेस ट्यूब्ज बनवण्यासाठी प्लास्टीक पाईप साठी वापरतात तशी एक्स्ट्रुजन सारखी प्रोसेस वापरतात का? पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on गुरुवार, 10/29/2009 - 10:23

In reply to सीमलेस by विजुभाऊ

Permalink

एक्स्ट्रु

एक्स्ट्रुजन प्रोसेस पुर्वी - तिसेक वर्षांआधी- वापरत पण त्यास अनेक गुणवत्ता मर्यादा असत. ट्युबच्या लांबीवरही खूप मर्यादा येत. ऑइल काढण्यासाठी ट्युबची लांबी १५ मीटर असावी लागते त्यामुळे अशा कामांसाठी एक्स्ट्रुजन सारखी प्रोसेस वापरता येत नाही. मला वाटते आजही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी एक्स्ट्रुजन प्रोसेस वापरुन कार्बन स्टीलची सीमलेस ट्युब तयार करत असावेत. अर्थात तांब्याच्या सीमलेस ट्युब करण्यासाठी आजही एक्स्ट्रुजन प्रोसेस वापरली जाते- ह्या तांब्याच्या सीमलेस ट्युबचा आपण एसी, फ्रिज, अनेक ठिकाणी हायड्रॉलिक ऑईल, ग्रीज वाहून नेण्यासाठी वापर करतात. आणि हो, स्टेनलेस स्टील रोलेबल नसल्याने, एक्स्ट्रुजन प्रोसेस हाच पर्याय आहे. मी स्वतः स्टेनलेस स्टीलची सीमलेस ट्युब रोलींग करुन तयार करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण यिल्ड फार कमी यायचे व ते परवडत नसे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 10/29/2009 - 12:45

Permalink

मँड्रेलबद्दल अधिक माहिती द्यावी.

१. पिअर्सिंग किंवा विंधण प्रक्रिया नक्की डोळ्यासमोर उभी रहात नाही. कृपया मँड्रेलबद्दल अधिक माहिती द्यावी. (आकृती दिल्यास उत्तम) २. बारामतीच्या प्रकल्पात जास्तीत जास्त किती लांबीच्या ट्यूब बनतात? ३. स्टेनलेस स्टील रोलेबल नसेल तर बॉल बेअरिंगसाठी एसेस सीमलेस ट्यूब कशी तयार करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by अजय भागवत on गुरुवार, 10/29/2009 - 13:05

In reply to मँड्रेलबद्दल अधिक माहिती द्यावी. by विसुनाना

Permalink

तुम्हाला

तुम्हाला नक्कीच बरीच माहिती आहे ह्या प्रोसेसची. :-) पिअर्सिंग बद्दल येथे वाचा बॉल बेअरिंगसाठी एसेस सीमलेस ट्यूब वापरत नाहीत. SAE 52100 वापरतात. बारामतीच्या प्रकल्पात जास्तीत जास्त किती लांबीच्या ट्यूब बनतात?- १५ मीटर. आता माझे ते प्रोफेशन नाही- प्रोजेक्ट व्यवस्थापन केल्यानंतर काही महीने उत्पादन विभाग प्रमुख म्हणून काम पाहीले तेव्हा बराच रिसर्च करावा लागला होता त्याकाळातील माहिती मी एस-एस ट्युब बद्दल दिली.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 10/29/2009 - 14:43

In reply to तुम्हाला by अजय भागवत

Permalink

आभारी आहे.

प्रकाटाआ - दोनदा आल्यामुळे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 10/29/2009 - 14:37

In reply to तुम्हाला by अजय भागवत

Permalink

आभारी आहे.

उत्तराबद्दल आभार. दुव्यावरील आकृती आणि स्पष्टीकरणामुळे समजले.
तुम्हाला नक्कीच बरीच माहिती आहे ह्या प्रोसेसची.
नाही. माझे कार्यक्षेत्र ते नाही.पण कुतुहल आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com