एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास
लेखनप्रकार
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला.
लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअॅलिटी शो"...
मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.....
खूप मजेदार आहे.
लेखातले काही मुद्दे असे,
१.स्टेज शो करणार्या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा.... मात्र त्यात निवेदक आणि दिग्दर्शक यांचा दोष नाही, असेही ते आवर्जून नमूद करतात.)मात्र चॅनेलने आश्वासने पाळली नाहीत वगैरे गोड तक्रारी केल्या आहेत.
२. एखादे गाणे बेसूर झाले असे चॆनल म्हणू देत नाही म्हणे.... सूर कमी लागला असे म्हणावे असे सुचवले जाते.. ( :)) .. बेसूर शब्दाने मुले दु:खी होतात असे समजते. ;)
३.कवितेचा अर्थ कसा वेगळा होतो याबद्दल त्यांना अधिक बोलायचे असताना देखील एक दोन भागांनंतर त्यांचे बोलणे चॆनलने एडिट करायला सुरुवात केली.....
त्यामुळे व्यथित हो ऊन त्यांना " मामा-भांजे" ...भांज्याचे प्रेमप्रकरण वगैरे वगैरे फ़ाल्तु ( परंतु लोकप्रिय) बडबड करावी लागे....
४. लेखात लिहिले आहे की काही लोकांनी त्यांचे निरूपण ऐकून त्यांना ह.भ.प. अशी पदवी द्यावी असे म्हटले किंवा त्यांना इतिहासकार मंगेशकर म्हटले .... याची त्यांना गंमत आणि वैषम्य वाटले...किती हे अज्ञानी प्रेक्षक, वगैरे वगैरे.. ( आता कोणीतरी गमतीने म्हटलेले हे वाक्य त्यांनी जास्तीच सीरियसली घेतले आहे असे वाटले, ते असो..)
५. कोसंबी आणि अभिजित सावंतला त्यांनी आवर्जून एकही स्टेजशो न करण्याच्या पात्रतेचा असे काहीतरी म्हटले आहे, हेही मजेदार..
( मंगेशकर रिअॅलिटी शो , एसेमेस वोटिंगला आवर्जून शिव्याशाप देतात आणि बर्याचदा त्यात परीक्षक म्हणून आवर्जून उपस्थिती लावतात, ही एक मजेदार गोष्ट.)
सध्या आठवतील ते मुद्दे हेच.. यावर इतकेच म्हणावेसे वाटते की चॆनल आर्थिक गणित बसले तरच आश्वासन पाळते, आणि कोणालाही सोडत नाही .....
जसा सामान्य प्रेक्षक चॆनलच्या नावाने बोटे मोडतो तसेच हेही .... एकूण भ्रमनिरास जोरात झालाय...
या पर्वात परीक्षक म्हणून यायची शक्यता दिसत नाही.
वाचने
20144
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
मुद्दे
In reply to मुद्दे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मटाचा
In reply to मटाचा by भडकमकर मास्तर
मटा..
In reply to मटा.. by योगी९००
हा घ्या दुवा
In reply to हा घ्या दुवा by भडकमकर मास्तर
मास्तर, हा
ह्मम्म...
ते काहीही
In reply to ते काहीही by विसोबा खेचर
१००% सहमत!
याच
In reply to याच by अमोल केळकर
राधा मंगेशकर.
In reply to राधा मंगेशकर. by योगी९००
राधा...
या लेखाची
इति'हास'कार!
एक सूचना
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
+१. सहमत
In reply to +१. सहमत by llपुण्याचे पेशवेll
पेशव्यांच
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
+++
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
हे
In reply to हे by टारझन
जियो !
In reply to जियो ! by अवलिया
+++
In reply to +++ by मदनबाण
का रे
In reply to हे by टारझन
याला
In reply to हे by टारझन
एक्स्ट्रि
In reply to एक्स्ट्रि by विसोबा खेचर
खुलाश्याब
In reply to एक्स्ट्रि by विसोबा खेचर
सहमत आहे!
In reply to एक सूचना by विसोबा खेचर
+१
याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिच
In reply to याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिच by चिंतामणराव
राधा तिचं
In reply to याच मंगेशकरांनी टि.व्ही माध्यमातूनच आपल्या कन्येचे ( काय बरे तिच by चिंतामणराव
राधाला गायिका व्हायचंच नव्हतं!
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
संदर्भ
In reply to संदर्भ by ३_१४ विक्षिप्त अदिती
सगळ्याच गोष्टींचा संदर्भ देणे शक्य नसतं.!
In reply to संदर्भ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदितीजी,
In reply to अदितीजी, by निमीत्त मात्र
साक्षात अवांतर
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
हे वाचल्याचे आठवत नाही
In reply to राधाला गायिका व्हायचंच नव्हतं! by प्रमोद देव
पोटची पोर
In reply to पोटची पोर by नंदा
पण
दिदीबद्दल कुणी वेडंवाकडं लिहिलेलं या धाग्यात दिसलं नाहीं!
In reply to दिदीबद्दल कुणी वेडंवाकडं लिहिलेलं या धाग्यात दिसलं नाहीं! by सुधीर काळे
आपण ते मिस
मायानगरीत