मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दीप रंग..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
धूसर झाल्या नभी तारका आसमंती बेहोष हिवाळी, मेहंदी रंगल्या सोनपाऊली पहाट घेऊन येई दिवाळी.. मंद तेवते दीप अंगणी जणू नक्षत्रे उतरून आली, रंग माखूनी अंगावरती, जमीन सारी भरून गेली.. मंद सुगंधी अभ्यंगातून, धुंद काया होत सकाळी चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी यौवनास या नवी झळाळी.. रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन् सुवर्णमाला गळा ल्यायली, निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी वस्त्रांकित ही तनू बावरी.. बिंदी रेखूनी भाळावरती, काजळरेखा नयनी आली साज सोवळा लेऊन दर्पणी लज्जित बाला रूप न्याहाळी.. क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. - प्राजु

वाचने 3381 वाचनखूण प्रतिक्रिया 15

अवलिया Mon, 10/19/2009 - 09:12
मस्त :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by shweta

लवंगीमिरची Tue, 10/20/2009 - 02:39
प्रयत्न चांगला आहे.. परंतु बरेच जागा " प्राची ला गच्ची " सारख्या वाटत आहेत. "मंद तेवते दीप अंगणी" मधला दीप तो दीप असायला हवा .. किंवा अनेक वचनी मंद तेवतात दीप अंगणी हे कसे वाटते..

In reply to by लवंगीमिरची

सुबक ठेंगणी Tue, 10/20/2009 - 04:04
"मंद तेवते दीप अंगणी" मधलं तेवते हे "तेवत असलेले" याअर्थी वापरलेलं आहे. तेवती आणि तेवेते दोन्ही बरोबर आहेत असं वाटतं.

क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती या चार ओळी भारी आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन Mon, 10/19/2009 - 19:30
असेच म्हणतो... :) छान आहे कविता... * सकाळी प्रतिसाद दिला होता व अवांतर पण नव्हता कुठे गायब झाला :? देवा.. काय चमत्कार आहे हा ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

प्राजु Mon, 10/19/2009 - 19:27
धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार. - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे Mon, 10/19/2009 - 20:04
>> क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. क्या बात है प्राजु ! कविता आवडली !!

मदनबाण Mon, 10/19/2009 - 21:53
क्षणैक नजरानजर होऊनी शृंगाराची मिळे पावती, लाजलाजली रूपगर्विता दिपोत्सवाचे रंग हासती.. मस्तच... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |