✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Fri, 10/16/2009 - 06:49  ·  लेख
लेख

Book traversal links for पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

  • ‹ पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग पहिला.
  • Up
  • पंढरीचा विठोबा...ओबामा. माझा प्रेसिडेन्ट .भाग तिसरा. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4693 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

ओबामा

विकास
Fri, 10/16/2009 - 06:53 नवीन
  • Log in or register to post comments

वाह!

सहज
Fri, 10/16/2009 - 07:06 नवीन
क्या बात है! एकदम प्रवीण दवणे स्टाईल लेख!!! काडेपेटी, आइक्रीम स्टिक्स वगैरे मधे विठ्ठल मुर्ती करुन त्याचा चेहरा ओबामाचा करुन पाठवावासा वाटतोय हो पांढरपूरला आपलं व्हाईट हाउस हो! आणी हो, ओबामाला लाडू आवडला की करंजी?
  • Log in or register to post comments

पांढरपूर

मिसळभोक्ता
Fri, 10/16/2009 - 22:44 नवीन
सहजराव, हे तुमचं पांढरपूर लय आवडलं बघा. (सामंत आजोबांची मालिका सहजरावांना समर्पित करण्यात यावी, ही विठोबाला प्रार्थना.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काय पण

मदनबाण
Fri, 10/16/2009 - 07:23 नवीन
काय पण ओबामा सरकारचे हिंदुस्थान प्रेम आहे ते तर पहा ना... आपल्या विरुद्ध सतत कारस्थाने करणार्‍यांना तो मदत वाटतच सुटला आहे !!! ही मदत या दिवाळी साजरी करणार्‍या माणसाला थांबवता आली नसती काय ??? http://www.pegasusnews.com/news/2009/oct/14/lockheed-martin-gives-first-new-f-16-pakistan-offi/ चीन आणि अमेरिका दोघेही आपापल्या पद्धतीने पाकड्यांना मदतच करत राहणार आहेत आणि आपण फक्त बघतच बसणार !!! मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
  • Log in or register to post comments

उल्लेख

चिरोटा
Fri, 10/16/2009 - 10:03 नवीन
सत्तरी ओलांडलेला बुड्डा
हा उल्लेख खटकला.ओबामांना मखरात बसवताना दुसर्‍या व्यक्तीला बुढ्ढा वगैरे विशेषण लावणे खटकले.आणखी वीस वर्षानी ओबामा ७० वर्षाचा बुढ्ढा होणारच आहेत.!!
आज ओबामाने स्वतः मेणबत्ती घेऊन समई उज्वलीत केली.भटजींशी हस्तान्दोलन केलं.आणि भारतीय पाहूण्यात मिसळून लाडू,करंज्याचा आस्वाद घेत होता
ह्यात विशेष ते काय्?उद्या ईद आली तर शेरवानी घालुन तो शीर कुर्माही खाऊन दाखवेल.ह्याचा अर्थ ओबामा भारताला मदत करेल आणि पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे.समोर गोड गोड बोलायचे आणी मागून खंजीर खुपसायचा ही जुनी अमेरिकन चाल आहे. भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

जगाचाच नियम

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/16/2009 - 17:56 नवीन
जो तो आपलंच बघत असतो. कुणीही ह्याला अपवाद नाही.मग तो भारत असो,पाकिस्तान असो वा अमेरिका असो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मॅकेन हा अतीशय सज्जन व न्याय्य स्वभावाचा माणूस आहे

सुधीर काळे
Fri, 10/16/2009 - 13:09 नवीन
खरं तर मॅकेन हा अतीशय सज्जन व न्याय्य स्वभावाचा (fair-minded) माणूस आहे. निवडणुकीचा दिवस जवळ आल्यावर ओबामाला पाण्यात पहाणार्‍या गोर्‍या सनातनी मतदारसंघांत जेंव्हा मॅकेनने घेतलेल्या सभांमध्ये लोक ओबामाविरुद्ध खोटे-नाटे आरोप करायचे तेंव्हा हा पठ्ठ्या आपल्या मतपेटीकडे न पहाता "ओबामा तसा नाहींय" असे सांगायला मागे-पुढे पहायचा नाहीं. तो हरला कारण बुश-४३ च्या ८ वर्षांच्या कारकीर्दीनंतर प्रत्यक्ष भगवान परमेश्वरही रिपब्लिकन पार्टीच्या तिकिटावर उभा राहिला असता तरी हरला असता. तरी ओबामाची भलावण करताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवायच्या आधी सत्यता पडताळून पाहावी. ओबामाचा खरा विजय त्याने हिलरीला हरवले तिथे झाला, कारण माझ्या एका अमेरिकन मित्राने म्हटल्याप्रमाणे "This election is for democrats to lose" अशीच होती. पूर्वी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांबद्दल होते तसे. तरी "आहिस्ते कदम, सरकार"! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

काहीतरीच काका तुमचं

सहज
Fri, 10/16/2009 - 13:17 नवीन
गोष्ट ऐका तर खरं याआधी कधी ऐकले नव्हते का तुम्ही? एक कृष्ण तर दुसरा कंसच असतो, एक राम तर दुसरा रावणं.... छ्या क्लासीक्स वाचत जा हो नुस्ते कॉमिक्स असते तुमचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

हीहीही

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/16/2009 - 22:48 नवीन
सहजकाका, फारच हिंदी पिच्चर पहाता ब्वॉ तुम्ही! आपले संत बिपिनमहाराज सांगून गेले आहेत ना, संपूर्ण काळं किंवा पांढरं काहीच नसतं, असतात त्या करड्याच्या विविध छटा! आणि चुकली असेल एखाद्याची एखाद दुसरी गाडी, काय फरक पडतो? इष्टस्थळी पोहोचल्याशी मतलब की नाही? तुम्हीतर लगेच करीयर गायडन्सचा क्लास सुरू केलात! ;-) असो. सहजकाकांशी एका बाबतीत एकदम सहमत. लेख अगदी दवणे स्टाईल आहे या अजिबात शंका नाही. किती वेचावं (अजाणतेपणी झालेले विनोद) आणि किती सोडावं प्रश्नच पडला! अदिती (चावणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सज्जन मेकेन

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/16/2009 - 17:49 नवीन
"तरी ओबामाची भलावण करताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवायच्या आधी सत्यता पडताळून पाहावी" अमेरिकन जनतेने ह्यावेळी प्रतिस्पर्ध्याची सत्यता पडताळून पाहिलीच की. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

अमेरिकन

स्वाती२
Fri, 10/16/2009 - 18:12 नवीन
अमेरिकन जनतेने फक्त इकॉनॉमी पाहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

मॅकेनला बुश-४३ने हरवले!

सुधीर काळे
Fri, 10/16/2009 - 22:10 नवीन
खरं तर अमेरिकन मतदात्यांनी बुश-४३च्या विरुद्ध मतं दिली. त्याची लोकप्रियता इतकी रसातळाला गेली होती कीं बुश-४३ला कुणीही रिपब्लिकन उमेदवार स्वतःच्या प्रचारालाही बोलावत नव्हते. तरी या निवडणुकीत मॅकेनला ओबामाने हरवले नाहीं तर बुश-४३ने! ओबामाचा खरा विजय होता हिलरीवर प्रायमरीजमध्ये! ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

खरं "खरं"

श्रीकृष्ण सामंत
Fri, 10/16/2009 - 23:38 नवीन
अहो काळेसाहेब, "खरं तर अमेरिकन मतदात्यांनी बुश-४३च्या विरुद्ध मतं दिली." हे "खरं तर" प्रत्येकाच्या विचारान्वये दाखवता येतं.खरं "खरं" त्या जनताजनार्दनालाच माहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

+१

स्वाती२
Fri, 10/16/2009 - 18:09 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

रावण-बिभीषण यांना एकाच मापाने तोलू नये

सुधीर काळे
Fri, 10/16/2009 - 13:46 नवीन
ते अगदी खरं हो! पण दुर्योधन-कर्ण, रावण-बिभीषण यांना एकाच मापाने तोलू नये! आणि अलीकडे आम्ही क्लासिक्स "लिहितो". "वाचायचं" वय नाहीं राहिलं आता! सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
  • Log in or register to post comments

ओबामा

सखाराम_गटणे™
Fri, 10/16/2009 - 18:12 नवीन
ओबामा डावखुरा आहे काय? ---- नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
  • Log in or register to post comments

यस वीई क्यान

विश्वजीत
Sat, 10/17/2009 - 00:22 नवीन
दवणा झकास आहे. हहपुवा अगदी.
  • Log in or register to post comments

काका...

वाटाड्या...
Sat, 10/17/2009 - 02:41 नवीन
माफ करा.. कार्यबाहुल्याने मागच्या भागात नंतर प्रतिक्रिया देऊ शकलो नाही. तुम्ही (आणि कोणी कोणी) म्हणतात की आमचे पेपर्स नीट असतील तर आम्हाला त्रास होणार नाही..हा विनोदाचा अतिरेक आहे... एक गंमत सांगतो..नुकतीच आम्ही एक नविन गाडी घेतली.(होंडा अथवा टोयोटा नाही ;) ) योगायोगानं आमच्या एका अस्सल गोर्‍या मित्रानही घेतली. बिचार्‍या अमेरिकनचं क्रेडिट रेटींग कमी असावं..त्याला ७.५% व्याजानं कर्ज घ्यावं लागलं तर आम्हाला ३.२४% टक्क्यांन मिळालं. आता बोला हे तुमचे जे ओबामा सरकार आहे ना ते असं आहे की जी तुम्ही लोकं त्याच तुणतुणं कधीपासुन वाजवुन राहिला आहात ना, ते खोटं आणि ढोंगी आहे. त्यांच्या स्वता:च्या लोकांविषयी जर इतका पुळका आहे तर मग आम्हाला ३.२४% टक्के आणि त्यांच्या जन्मानं, खानदानानं आणि कशाकशानं अमेरीकन असलेल्या नागरीकाला जास्त व्याजदरानं असं कसं? भलेही त्याचं क्रेडिट रेटींग कमी असु दे पण अमेरीकन म्हणुन त्याला आमच्यापेक्षा सहज आणि स्वस्त कर्ज मिळायला हवं होतं. शितावरुन भाताची परिक्षा... तुमच्या ह्या विठुरायाला त्याच्यामागे काय चालतं हे तरी कळतं का? तो काढ्तो एक एक नियम आणि बाकीची नकोनकोती जनता हात धुवुन घेतेय आणि मरतय आम आदमी, काका... ह्यांच्या लुटालुटीच्या एक एक कथा सांगायला सुरुवात केली तर....दिवसरात्र पुरणार नाहीत...राहता राहीली दिवाळी आणि दिव्यांची गोष्ट...हा चक्क डिप्लोमसी आणि पॉलिटीकल स्टंट आहे ...त्यांच्या ख्रिस्तमस साजरा करण्यामधे तुम्हाला किती आनंद मिळतो...?? समजा तुमच्या जवळच्या मित्रांमधे एखादा ख्रिस्ती आहे तर त्याच्याशी सलोख्याचे संबध राहावेत म्हणुन तुम्ही जे कराल तेवढच...एक नक्कीच आहे की तो कोणावर वैयक्तीक टीका करत नाही. रि.प. वाले तसे नाहीत...पण ते इतर ठीकाणी मार खातात.. बाकीचे लोक म्हणतात तसे आपणही एककल्ली न होता व अमेरीकेत राहुन रंग-वर्ण द्वेष पसरेल अथवा आपलं चिंतन असं आहे असे चुकुनसुद्धा दाखवणारे शब्द लिहु नयेत ही विनंती. असो...आपल्यावर (कोणावरच) वैयक्तीक राग नाही, नव्हता आणि नसणार... धन्यवाद... - वा
  • Log in or register to post comments

काय राव,

लंबूटांग
Sat, 10/17/2009 - 08:50 नवीन
=)) =)) =)) काय राव, विनोदाचा अतिरेक तर तुम्हीच करता आहात. कुठून कुठे नेता गोष्ट.. कार लोन कुठे आणि एच १ कुठे आणि सगळ्यात महत्वाचे ह्यात ओबामाचा संबंध कुठे... ओबामा लोन sanction करायला बसणार आहे का. काहीच्या काही. सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी काही कट्टर ओबामा समर्थक नाही अथवा त्याचा तिरस्कारही करत नाही. उगाच च्या उगाच त्याला विठ्ठल म्हणणे जसे खटकते त्याहून कैक पटीने अधिक कार लोन च्या interest rate अथवा APR साठी ओबामा ला जबाबदार ठरवणे प्रचंड म्हणजे प्रचंड हास्यास्पद वाटते. बाकी बिचार्‍या अमेरिकनचं क्रेडिट रेटींग कमी असावं ह्यात तुम्ही स्वत:च उत्तर दिले आहे व्याजदरामधील तफावतीचे. आता व्याजदरात अमेरिकन्स ना सवलत देऊन अर्थव्यवस्था सुधारेल असे म्हणणे असेल तर मग घरासाठी अव्वाच्या सव्वा कर्जे देऊनच आज ही अर्थव्यवस्थेची स्थिती झाली आहे हे आपणास माहित असेलच. बाकीचे लोक म्हणतात तसे आपणही एककल्ली न होता व अमेरीकेत राहुन रंग-वर्ण द्वेष पसरेल अथवा आपलं चिंतन असं आहे असे चुकुनसुद्धा दाखवणारे शब्द लिहु नयेत ही विनंती. हे देखील तुम्हीच लिहीता आणि होंडा अथवा टोयोटा नाही ;) आणि एका अस्सल गोर्‍या मित्रान हे देखील तुम्हीच लिहीता. असो. गाडीबद्दल (कुठलीही असू देत) आणि चांगला APR मिळाल्याबद्दल अभिनंदन. माझाही कोणावरच वैयक्तीक राग नाही, नव्हता आणि नसणार... -(Used Toyota वर ७.९९ % व्याजदराने कर्ज मिळालेला गरीब बापडा) लंबूटांग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

अतिअवांतर

एकलव्य
Sun, 10/18/2009 - 20:16 नवीन
-(Used Toyota वर ७.९९ % व्याजदराने कर्ज मिळालेला गरीब बापडा) लंबूटांग आम्हाला तर Used Toyota वर १४.४९ % व्याजदराने कर्ज मिळाले होते... आम्ही ते झीरो % बॅलन्स ट्रान्सफर मिळवून एका महिन्यात फिटवले ती गोष्ट वेगळी... चीअर्स!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा