स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य
मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं !
अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू? कित्येकांना "बघणं" आमच्या नशीबात नव्हतं पण आजही क्रीडाक्षेत्रात असे कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही आमच्या नातवंडांना सांगू 'अरे आमचा सौरव गांगुली सात-सात फील्डर असताना कव्हर्समधून फोर मारायचा'...'अरे आमच्या अक्रम-वकार पुढे तुमचे आजचे बोलर्स बच्चे आहेत बच्चे... ' अरे तो बेकर बघशील तर ६ फूट ४ इंच उंच..... पण काय चित्त्यासारखा डाईव्ह मारायचा कोर्टवर' ! आणि आमची नातवंडं डोळे मोठ्ठे करून (मनातून हसत) आम्हाला विचारतील "आजोबा खरंच???"
तुम्हाला अश्याच काही "कलाकृतींची" आठवण (आणि अजाणत्यांसाठी ओळख) करून द्यायची आहे !
पहिला मान अर्थातच आमच्या साहेबांचा ! किती आणि काय बोलावं साहेबांबद्दल? मिसरूड फुटायच्या वयात साहेब भल्या भल्या गोलंदाजांना 'फोडत' होते. उणीपुरी २ दशकं झाली साहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर... पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनंदेखील जगातला कोणताही संघ त्यांना "सॉर्ट आऊट" करू शकला नाही. साहेबांनी काळानुरूप आणि संघाच्या गरजेनुसार स्वतःला असं काही बदललं की घडी घडी रूपं बदलणारा नेताजी पालकरच जणू. म्हणूनच घणाघाती हल्ला चढवून प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीची शकलं उडवणारे साहेबच कधी कधी आपले फटके म्यान करून बचावाचा असा अभेद्य किल्ला उभारतात !
त्यांचीच ही एक कलाकृती.
साहेबांचा 'स्टान्स'च असा की वाटावं आपण डोळे मिटून आण्णांचा खर्जातला षडज ऐकतोय. अतोनात स्थिरता.... बोलरवर रोखलेली नजर.... दोन्ही पायांचा 'बॅलन्स' असा की वादळ आलं तरी माणूस हलणार नाही - "रॉक सॉलिड"...... गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली - पण आवेश मात्र तो अजिबात नाही .... ब्रेट ली समोरून धावत येतोय... फलंदाजांचा कर्दनकाळ.... वेगाचा बादशहा... 'हा - ये' अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल.....अंपायरच्या जवळून झेप घेऊन ताशी १५० कि मी वेगाने ली चेंडू फेकतो.... "शॉर्ट ऑफ गुडलेग्थ" - ऑफस्टंपच्या किंचित बाहेर टप्पा....पुन्हा टप्प्यानंतर स्लिप्सच्या दिशेनी जाणारा ऑटस्विंगर.... त्यात पर्थच्या खेळपट्टीची ती जास्त उसळी.... अनप्लेयेबल - खेळायला केवळ अशक्य !
पण त्या निमिषार्धात साहेबांचा उजवा पाय किंचित मागे सरकतो.... डावा पाय ऑफस्टंपच्या बाहेर येतो...... गरुडासारखी धारदार नजर चेंडूच्या दिशा आणि टप्प्याचा अचूक अंदाज घेते... पूर्ण संतुलन राखत साहेब चेंडूच्या रेषेत येतात..... बॅट किंचित वर उचलली जाते..... आणि पापणी लवण्याच्या तलवारीच्या पात्यासारखी खाली येते.... डोकं बरोब्बर चेंडूच्या वर येतं.... आणि .... आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.
![broken image]()

From Pictures " alt="" />
लाँगऑन आणि लाँगऑफचे क्षेत्ररक्षक एकमेकांकडे असहायपणे बघतात...... चूक ना बोलरची असते.... ना कप्तानाची... ना क्षेत्ररक्षकांची.... पण "साहेब" जेव्हा स्ट्रेटड्राईव्ह मारतात तेव्हा ती देवाची एक योजना असते आपलं अस्तित्त्व दाखवून द्यायची ! देवाचीच ही अजून एक कलाकृती... आणि ह्या कलाकृतीखाली देवाची सही असते....
"सचिन रमेश तेंडूलकर" !

![]() |
| From Pictures |
वाचने
13567
वाचनखूण
प्रतिक्रिया
30

लेख ठिक
दडपण...
In reply to दडपण... by प्रशान्त पुरकर
कसोटी व
In reply to दडपण... by प्रशान्त पुरकर
हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा.....
In reply to हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा..... by भारद्वाज
अप्रतिम
In reply to हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा..... by भारद्वाज
हाण तिच्या
In reply to हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा..... by भारद्वाज
जबर्या वेबसाईट आहे
In reply to जबर्या वेबसाईट आहे by जे.पी.मॉर्गन
सचिनपंथाच
क्या बात है !
खल्लास!
In reply to खल्लास! by ब्रिटिश टिंग्या
हॅ हॅ
'साहेब'च!
वा हे दोन स्ट्रेटड्राईव्ज मी इतक्या वेळेला बघितलेत की बस!
वा जे. पी.
मस्त
क्या बात है!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सचिनचा स्ट्रेटड्राईव्ह
आमचे "साहेब" एकच !
In reply to आमचे "साहेब" एकच ! by जे.पी.मॉर्गन
खुलाश्याब
तेंडल्या
नुस्त सचिन म्हटल तर ???
भन्नाट
"लेट-कट"चं वर्णन फारच "सही"
काय
द्वारकाना
In reply to द्वारकाना by जयंत कुलकर्णी
खरेच जेपी..
In reply to द्वारकाना by जयंत कुलकर्णी
ब्रॅडमन, ट्रंपर, हॉब्ज, गावसकर.. इत्यादी !
In reply to ब्रॅडमन, ट्रंपर, हॉब्ज, गावसकर.. इत्यादी ! by जे.पी.मॉर्गन
धन्स, वाट
मास्टर ब्लास्टर
In reply to मास्टर ब्लास्टर by इंटरनेटस्नेही
...