बदल
कालच घरी आलो दसर्यासाठी. सकाळी सातला घरी पोहोचलो...मस्त एक-दोन तास झोप काढावी म्हणून लोळत पडलो...
साधारण सकाळी नऊ च्या सुमारास जाग आली....ती पण कशी तर पिपाणीच्या आवाजाने...
एक नंदीबैल वाला फक्त पिपाणी वाजवून लोकांकडून देणग्या (कोणता शब्द वापरावा याबद्दल थोडी चलबिचल झालिय माझी...म्हणून हा वापरलाय) मागत होता.
दिवसाची सुरुवात तर मस्तच झाली होती..पण नंतर विचार करता करता वाटलं की आपण नेकरी, शिक्षणापायी बरचं काही गमावलयं.
मला लहानपणीचे दिवस आठवले...जेंव्हा नंदीबैल वाला 'गुबुगुबु' करत यायचा तेंव्हा आधी भिती वाटायची...नंतर अप्रुप...
त्याच्याबरोबरच मला बाकी असे न सांगता भेट देणारे आठवले....दारावर येणार्या बोहारिणी, कंगवे-पिना विकायला येणार्या पारधीणी, गळ्यात देवीचे फोटो अडकवून पैसे मागायला येणारे, भविष्य सांगणारे भोपे, जोगवे मागायला येणार्या बाया (ओळखीतल्या आणी अनोळखी),परडीला येणार्या बाया.......बरीच मोठी होईल ना लिस्ट.
प्रत्येकाची वागण्याची तर्हा वेगळी...मॉल मधे घेतलेल्या डिनर सेट ला बोहारिणी बरोबर घासाघीस करून घेतलेल्या वाडग्याची पण सर नाही येणार..
अशातच एक दिवस ईंजिनियरींग करायला पुण्याला आलो....सोलापूरचा बंगला सोडून भाड्याच्या फ्लॅटमधे रहायला.... :(
तेण्व्हा या सगण्या गोष्टी फार मिस करायचो मी....
हॉस्टेल वर तर एकदा आम्ही बोहारिणी ला जुने शर्ट देऊन सहा काचेचे ग्लास घेतले होते... (समजून घ्या :)) ..पण तो तेवढा एकच प्रसंग.
तर मंडळी सांगायचा मुद्दा असा की ...आजकालच्या आपल्या राहणीमानात झालेल्या बदलाने आपण ह्या सगळ्या आनंदाला मुकत आहोत असे मला वाटते..आपल्या काँक्रीटच्या जंगलात "फेरीवाल्यांना प्रवेश नाही" असे आढळते...
यात तुम्ही आणी मी किती चेंज आणू शकू ते माहीत नाही...पण मला एवढचं सांगायचं ...आय मिस ऑल धिस.....आय रियली मिस ऑल धिस...
वाचने
2730
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
होतं रे..
ह्म्म
चलता है...
नियतीचं
मी कोळीणीकडून घासाघीस करुन घेतलेले ताजे मासे मिस करते
प्रभो,
तुझं स्फुट