विकृत बुद्धिवादाची इस्त्री
मला असं वाटतं की ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते
असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक
सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल. विज्ञानाने भले कितीही
प्रगती केलेली असो माझ्या जीवनातील अनिश्चितता झेलण्यास ते जितके उपयोगी पडेल,
तितकेच माझ्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व असेल. माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही. म्हणून ज्या प्रगतीचा
एखाद्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही उपयोग नाही, ती त्याला असून नसल्या
सारखीच...किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दूग्धदा (जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय)?
तात्पर्य, ज्या विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिवादाचा फारसा उपयोग नाही त्याची कास
सरसकट धरण्याचा आग्रह धरणे म्हणजे एक प्रकारचा आततायीपणा आहे असे मला वाटते.
आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते. ज्योतिषाकडे बघायचा
आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी (त्या आता हयात
नाही) मला दिला. त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग. त्यांच्या मते ज्योतिष हे
मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे (Astrology is model of
circular reality in human life). हे चक्रीय वास्तव सुख आणि दू:ख,
अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती, अशा ध्रुवांमध्ये
आंदोलित होत असते.
माझ्या दृष्टीने मॅरी डाउनिंगच्या व्याख्येतील प्रतिकृती हा शब्द मला अतिशय
महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही रचनेचे रूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी
प्रतिकृती उपयोगी पडतात. आपण प्रतिकृती अथवा प्रतिक (प्रतिकृती अमूर्त होत जाते
तेव्हा त्याचे प्रतिक बनते) याचे सोपे उदाहरण म्हणून आपण वास्तूविशारदाने
बनवलेल्या घराच्या प्रतिकृतीचे घेऊ. या प्रतिकृतीमुळे आपल्याला वास्तूची कल्पना
करण्यास मदत होते. या प्रतिकृतीमध्ये वास्तूरचनेची सर्व तत्त्वे अमलात आणली जात
नाहीत. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, वास्तूची प्रतिकृती बनवताना आपण खर्या
दगड विटांचा आणी इतर बांधकाम सामानाचा उपयोग करीत नाही. संगणकावर बनवलेल्या
प्रतिकृती मध्ये तर ० आणी १ एवढाच कच्चा माल वापरला जातो. आणि म्हणून ती
प्रतिकृती बनवण्याचा आणी वापरण्याचा उद्योग अशास्त्रीय ठरत नाही किंवा तयार
झालेली प्रतिकृती अंधश्रद्धा होत नाही.
प्रतिकृतीला, ती ज्या उद्देशाने बनवली गेली आहे त्यानुसार, मर्यादा येतात.
पुठ्ठ्याचा वापर करून तयार केलेल्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाश किती
खेळेल किंवा याचा अंदाज बाधणे कठीण असते. शिवाय अशी प्रतिकृती बर्याचदा
वास्तूच्या बाह्य रुपाचाच अंदाज येण्यास उपयोगी ठरते. अंतर्भागाची तसेच हालचाल,
चलनवलन यांची कल्पना करण्यासाठी, संगणकीय प्रतिकृती उपयोगी पडतात.
हे सर्व सांगायचा खटाटोप एवढयाचसाठी की ज्योतिषाच्या मर्यादा आपण जर समजावून
घेतल्या तर ज्योतिषाचा योग्य उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. माझे आयुष्य
एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक
व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. एखादे सूत्र ही त्यातील विशिष्ट घटकांच्या
परस्पर संबंधांची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी
बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्या
वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?
ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.
याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक महत्त्वाचे मत येथे मांडावेसे वाटते. आधुनिक
ज्योतिषी ग्रहांचे परिणाम अजिबात मानत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणांचे किंवा
आकाशात तयार होणार्या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड
घालायचा प्रयत्न करतात. अशी सांगड घालण्याचा उद्योग अतिसुरक्षित आयुष्य
जगणार्या व्यक्तीच्या बाबत बर्याचवेळा फसतो. कारण त्यांच्या आयुष्यात नवे
काही घडायची शक्यता फारच थोडी असते. भरभराटीचे योग असणार्या सर्वच व्यक्तींची
भरभराट होताना दिसत नाही याचे कारण या स्पष्टीकरणात सापडेल. म्हणूनच ज्योतिष
अनिश्चितता असेल तेव्हाच पहावे.
ज्योतिषाचे निंदक विकृत बुद्धिवादाची इस्त्री सर्वसामान्य माणसाच्या मनावरून
फिरवून परिटघडीचा समाज बनवू इच्छितात काय़? बरं, हा बुद्धिवाद शाश्वत समाधानाची
हमी प्रत्येक प्रयत्नवादी व्यक्तीला देइल याची खात्री कोणीच देत नाही. तसे
असल्यास दूसरा एक प्रश्न उपस्थित होतो. निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे
'समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या
किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.
मूळ स्रोत - http://rajeev-upadhye.blogspot.com/2008/11/blog-post_26.html
वाचने
10908
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
गल्लत
In reply to गल्लत by नितिन थत्ते
मूळ मुद्दयाला बगल
विकृत
In reply to विकृत by दशानन
खोडसाळ
In reply to खोडसाळ by युयुत्सु
>>खोडसाळ
विज्ञानाची प्रगती....
In reply to विज्ञानाची प्रगती.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to +१ by दशानन
करमणूक...
In reply to करमणूक... by प्रभाकर पेठकर
जगण्याचे बळ
In reply to जगण्याचे बळ by बिपिन कार्यकर्ते
नाही योग्यच..
In reply to नाही योग्यच.. by प्रभाकर पेठकर
इथे
In reply to इथे by बिपिन कार्यकर्ते
सर्वात मोठी सुरक्षितता...
In reply to इथे by बिपिन कार्यकर्ते
बिपीनदाशी
In reply to इथे by बिपिन कार्यकर्ते
मान्य...
In reply to इथे by बिपिन कार्यकर्ते
चतुरंग,
In reply to चतुरंग, by युयुत्सु
कळलेच नाही...
In reply to करमणूक... by प्रभाकर पेठकर
सहमत ----------------
In reply to सहमत ---------------- by अमोल केळकर
कुणाशी
In reply to विज्ञानाची प्रगती.... by प्रभाकर पेठकर
आज वैद्यक
In reply to आज वैद्यक by युयुत्सु
टोकाची उदाहरणे...
In reply to विज्ञानाची प्रगती.... by प्रभाकर पेठकर
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिक
In reply to मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिक by युयुत्सु
काही बदल इथल्या इथे....
विज्ञानाचा फायदा....
असे कसे काहीतरी बद्दल नक्की घडला असेल.
In reply to असे कसे काहीतरी बद्दल नक्की घडला असेल. by वेताळ
पण विज्ञान व त्याचे शोध नसतील जगणे मुश्किल होईल
In reply to पण विज्ञान व त्याचे शोध नसतील जगणे मुश्किल होईल by युयुत्सु
बाबा आमटे,
In reply to पण विज्ञान व त्याचे शोध नसतील जगणे मुश्किल होईल by युयुत्सु
वैज्ञानिक
In reply to वैज्ञानिक by नितिन थत्ते
+१ असला सरसकट क्लेम धोकादायक आहे!
In reply to वैज्ञानिक by नितिन थत्ते
वैज्ञानिक
In reply to वैज्ञानिक by नितिन थत्ते
वैज्ञानिक
In reply to वैज्ञानिक by नितिन थत्ते
मान्य
In reply to वैज्ञानिक by नितिन थत्ते
हा क्लेम भयानक म्हणावा लागेल.
In reply to हा क्लेम भयानक म्हणावा लागेल. by युयुत्सु
एखाद्या
पू अ
"विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही"
>>आधुनिक
In reply to >>आधुनिक by नितिन थत्ते
अर्धवट माहीतीवर केलेली विधाने
In reply to अर्धवट माहीतीवर केलेली विधाने by युयुत्सु
अज्ञान
In reply to अज्ञान by नितिन थत्ते
या
सुभाषीत
In reply to सुभाषीत by तेन्नालीराम
ज्योतिष
प्रत्येक
चिकित्सा कशाची?
In reply to चिकित्सा कशाची? by नितिन थत्ते
ज्योतिष
कमाल आहे
विज्ञाननिष्ठा म्हणजे विकृत बुद्धिवाद?
In reply to विज्ञाननिष्ठा म्हणजे विकृत बुद्धिवाद? by आनंद घारे
तर्कशुद्ध रीतीने सिद्ध झाले आहेत त्यांना मानणे म्हणजे विकृती?वा!
In reply to तर्कशुद्ध रीतीने सिद्ध झाले आहेत त्यांना मानणे म्हणजे विकृती?वा! by युयुत्सु
>>तर्कशुद्ध
फायदा काय होतो?
In reply to फायदा काय होतो? by विसुनाना
घडू शकणार्या भविष्यकाळातील वाईट घटना बदलता येतील काय?
In reply to घडू शकणार्या भविष्यकाळातील वाईट घटना बदलता येतील काय? by युयुत्सु
याला ज्योतिषाची गरज काय?
ज्यांच्या
ज्योतिषाची उपयुक्तता
<<<<<<<<<<ज्यांच
इमोशनल ब्लॅकमेलिन्ग
पृथ्वीचा, इतर ग्रहांचा आकार, ग्रहांचा संभाव्य परिणाम व जन्मदर
In reply to पृथ्वीचा, इतर ग्रहांचा आकार, ग्रहांचा संभाव्य परिणाम व जन्मदर by अमृतांजन
भारतातील ह्या ५२ बालकांचे भविष्य सारखेच असते का?