✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चहाची पाने आणि वाफप्रक्रीया

अ
अजय भागवत यांनी
Sat, 08/01/2009 - 00:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3989 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

ह्म्म्म.

पक्या
Tue, 08/04/2009 - 01:11 नवीन
ह्म्म्म. बघितले तर किती सोपे वाटते सोल्युशन पण सर्वांना सुचेलच असे नाहि. लेख मोठा असता आणि असेच चहा संदर्भात अजुन ३-४ किस्से असते तर वाचायला मजा आली असति.
  • Log in or register to post comments

चहा आणि

अजय भागवत
Tue, 08/04/2009 - 08:21 नवीन
चहा आणि कॉफी हे दोन्ही पेये सध्याच्या त्याच्या प्रगतीच्या टप्प्यावर येण्यासाठी अनेक सुधारणा मुद्दम केल्या गेल्या व काही अचानक गवसल्या. त्याबद्दल इतके लिहीता येईल की बस! मिपासारख्या खवय्यांच्या पाककला अनेकदा वाच्ल्या पण चहा बद्दल काहीही वाचण्यात न आल्यामुळे मी हा एक छोटेखानी लेख टाकायचे ठरवले. चहा करतांना मी वेळ मिळाला की, अनेक छोटे-छोटे प्रयोग घरी करतो. मजा येते. पण आई जितका फक्क्ड चहा बनवते की, तसा यायला जन्म जाईल. चहापुराण/महात्म्य मोठे आहे, त्यावर बरेच लिहीता येईल हे मात्र खरे.
  • Log in or register to post comments

घ्या चहापुराण..

भाग्यश्री
Tue, 08/04/2009 - 09:42 नवीन
शोध मारा की हो जरा! http://www.misalpav.com/node/1354 प्रतिसादात बरीच माहीती आहे.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments

नक्की

अजय भागवत
Tue, 08/04/2009 - 13:15 नवीन
नक्की वाचेन, आभार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

प्रतवारी

सुनील
Tue, 08/04/2009 - 13:56 नवीन
चहाची प्रत ओळखण्यासाठी निष्णात मंडळींची नेमणूक केलेली असते. ही मंडळी दिवसभरात अनेक प्रकारच्या चहाची (चहाची पाने टाकून उकळलेल्या पाण्याची) प्रतवारी ठरवितात. त्यासाठी ते चहाचे पाणी पीत मात्र नाहीत, नुसतेच जिभेवर घेऊन तोंडातून फिरवतात आणि नंतर थुकून टाकतात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आहे खरे हे

अजय भागवत
Tue, 08/04/2009 - 19:16 नवीन
आहे खरे हे कौशल्याचे काम! त्यांना Tasters म्हणायचे की, Testers? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

असलं काम...

दशानन
Tue, 08/04/2009 - 19:18 नवीन
असलं काम... दारुच्या फॅक्टरीमध्ये पण असतं का ओ सुनील भाउ :? निरागस (राजे) +++++++++++++++++++++++++++++ अवांतर - छान माहीत ! आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हो...

सुनील
Tue, 08/04/2009 - 22:04 नवीन
असतं बरं का राजे, तिथेही वाईन टेस्टर असतात. पण त्यांनादेखिल वाईन फक्त तोंडात घेऊन, थोडी फिरवून, थुंकून टाकावी लागते! पीता येत नाही!! (पोचलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अमूल डेअरीचे

रामदास
Tue, 08/04/2009 - 19:27 नवीन
कुरीयन साहेब त्यांच्या सुरुवातीच्या काळात टेस्टर व्हायला शिकणार होते असे वाचलेले आठवते.तसे झाले असते तर आपल्याला चहा चांगला मिळाला असता अमूलचे बटर मात्र मिळाले नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

^^ अजय भागवत, ^^ सुनील

आशिष सुर्वे
Wed, 08/05/2009 - 10:52 नवीन
खरंय! मलाही थोडी माहिती द्यायची हुक्की आलिय.. माहिती आवडली तर नक्की कळवा!! चहाचे प्रकार चहाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु, खालील चार प्रकार हे प्रमु़ख म्हणून गणले जातात आणि सार्वत्र सहज उपलब्ध आहेतः १) ब्लॅक टी २) ग्रीन टी ३) व्हाईट टी ४) ओलोंग (Oolong) टी (आणि एक प्रकार जो काही विशेष वर्गात लोकप्रिय आहे, त्याला 'हर्बल टी' म्हणतात. मजेची गोष्ट अशी की, हा 'हर्बल चहा' मुळात 'चहा' नसतोच! काही विशेष ओषधी वनस्पतींची (herbs) सुकी पाने आणि/किंवा फुले - ह्यांचा अर्क काढला जातो आणि त्यालाच देतात नाव ठोकून..'हर्बल टी' म्हणून! 'ब्लॅक टी ' चे ही खाली दिल्याप्रमाणे दोन प्रकारात ढोबळ वर्गिकरण केले जाते: अ) 'लिफ टी' (उत्तर भारतात विशेष लोकप्रिय) ब) 'डस्ट टी' (दक्षिण भारतात विशेष लोकप्रिय) 'टी टेस्टींग' आमच्या कंपनीमध्ये (टाटा टी) आम्हालाही अधूनमधून 'टी टेस्टींग' ची संधी मिळते.. 'टी टेस्टींग' ची 'एस. ओ. पी.' ही थोड्याफार फरकाने 'सुनील'भाऊंनी सांगितल्यासारखीच असते.. आणि 'अजय'भाऊंनी म्हटल्याप्रमाणे हे खरे कौशल्याचे काम आहेच. आणि त्यासाठी विशेष टीम असते आणि त्यांना 'Tea Tasters' म्हणतात ( Testers नव्हे!). आणि हेच 'Tea Tasters' चहाची प्रतवारी ठरवितात. एकदा चहाची प्रतवारी आणि वर्गिकरण झाले की, तो चहा 'ब्लेंडींग' प्रक्रियेसाठी पाठविला जातो. 'ब्लेंडींग' ची प्रक्रिया अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायची झाली तर ती अशी: 'ब्लेंडींग' म्हणजे, एक विशिष्ट प्रतिची चव (taste), गंध (aroma ) प्राप्त करण्यासाठी, एकाहून अधिक चहाच्या प्रति- गुणवारीनुसार आणि विशिष्ट प्रमाणात एकत्र करणे. 'ब्लेंडींग' नंतर हा 'चहा' 'पॅकॅजिंग' करून मग मार्केट मध्ये पाठविला जातो.. हे चहापुराण आपल्याला आवडल्यास.. एक झक्कास 'कटींग चाय' होऊन जाऊदे!! - Mind-blasting, Mind-blowing, Chaiwalla . . कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

माहीती

अजय भागवत
Wed, 08/05/2009 - 14:16 नवीन
माहीती मोलाची भर घातल्याबद्दल आभारी! सी टी सी ही काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

सी टी सी

आशिष सुर्वे
Wed, 08/05/2009 - 18:02 नवीन
चहा दोन प्रकारांनी बनविला जातो. १) ऑर्थोडॉक्स (Orthodox) २) सी टी सी (C.T.C.) सी टी सी चे संपूर्ण नाव आहे... 'कट ट्विस्ट कर्ल' ( Cut Twist & Curl ) ह्या प्रक्रियेमध्ये चहाची पाने मशीनच्या 'ईन-फिड' मध्ये टाकली जातात. ह्या मशीनमध्ये ३ रोलर्स असतात जे ह्या पानांना अनुक्रमे 'कट', 'ट्विस्ट' आणि 'कर्ल' करतात. ह्या ३ प्रक्रियेंमुळे चहाला एक विशिष्ट आकार येतो. ह्या प्रक्रियेनंतर ह्या चहाचे 'फरमेंटेंशन' केले जाते. नंतर हा चहा सुकविला जातो. शेवटी हा चहा 'सॉर्ट' केला जातो.. ह्या सॉर्टींगमध्ये मुख्यत्वे २ प्रकार हातात येतात: अ) सी टी सी लिफ ब) सी टी सी डस्ट - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा