"पाय" दिवस
लेखनप्रकार
आज २२ जुलै, २२/७. शाळेत आपली वर्तुळाच्या परिघाशी ओळख याच अपूर्णांकामुळे होते, २२/७, "पाय". याच "पाय"चा आणखी एक दिवस मानता येईल, १४ मार्च. पायची किंमत आहे ३.१४१५९२६५.... पहिले तीनच आकडे घेतले आणि अमेरीकन पद्धतीने तारीख लिहीली तर १४ मार्च होते ३/१४ ... झाला आणखी एक पाय दिवस.
तर या पायचं महत्व प्राचीन भारतीय गणितज्ञानांही समजलं होतं. वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचं गुणोत्तर असतं पाय आणि प्राचीन भारतीयांनीही, कोणत्याही संगणक, गणकयंत्राच्या मदतीशिवाय पायची किंमत अनेक स्थानांपर्यंत लिहून ठेवली आहे. प्राचीन इजिप्शियन, बॅबिलोनियन आणि ग्रीकांनाही पायची महती आणि किंमत माहीत होती. अर्थात, भारतामधे केलेलं काम लिहून ठेवण्याची परंपरा (अजूनपर्यंत तरी माहित नाही) नसल्यामुळे याचे पुरावे, पायची किंमत कशी काढली हे माहित नाही. सर्वप्रथम आर्किमिडीजने पायची किंमत कशी काढली याची नोंद केल्याचं आढळून येतं. आता "पाय"ची किंमत खूपच जास्त अचूक माहित आहे, >१.२ X १०^१२ यापेक्षा जास्त आकडे माहित आहे. पण आपल्यासाठी व्यवहारात बर्याचदा ३.१४ किंवा २२/७ एवढंच पुरेसं असतं.
असा आहे "पाय" (विकीपिडीयावरून वरीचशी माहिती आणि चित्रं घेतलं आहे):
तुम्हालाही काही असे विचित्र, विवक्षित, विक्षिप्त दिनांक आठवत असतील तर जरूर लिहा.
आता मूळ पदावरः आज जवळजवळ "पाय" दिवस आहे. घरी आल्यावर पाय धुवावेत असं आई सांगते. तसं आई बरंच काही सांगते, पण मी पाय मागितला की फक्त मार किंवा बोलणी मिळतात. शाळेतल्या बाईंनाही आई नाव सांगते. बाई "पाय"चा वापर करून वर्तुळाचा परीघ आणि क्षेत्रफळ काढायला सांगतात. वर त्रिज्जा ७ने भाग जाईल अशी मुद्दामच देत नाहीत. बाई फार खाष्ट आहेत. शेजारच्या वैभवची आईसुद्धा तशीच खाष्ट आहे. वैभव माझा बेस्ट फ्रेंड आहे, वैभव मला रोज त्याची सायकल चालवू देतो. वैभवची काकूही खूप चांगली आहे, ती मला अॅपल पायही खायला देते. मला पाय खूप आवडतो.
वाचने
9175
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
छान माहिती...
दिनांक
विचित्र
या शतकातलं
In reply to या शतकातलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या
हे काय,
अनेक
In reply to अनेक by रेवती
माझा
In reply to माझा by पर्नल नेने मराठे
१०/१० + ७/७
वा छान
हा महिना जुलाई आणि सन २००९
In reply to हा महिना जुलाई आणि सन २००९ by रामदास
हाच प्रश्न
In reply to हा महिना जुलाई आणि सन २००९ by रामदास
अगदी बरोब्बर शंका!
In reply to हा महिना जुलाई आणि सन २००९ by रामदास
2's Complement
माझे
In reply to माझे by विनायक प्रभू
प्रभू,
व्हय
पाय ची
स्वर्ण-गुणोत्तर १३/८
छान माहीती
पाय हा एक अद्भूत आकडा आहे
In reply to पाय हा एक अद्भूत आकडा आहे by हुप्प्या
वेगळेच आणि मजेदार
चांगली माहीती
In reply to चांगली माहीती by विकास
थोडा फरक करून
In reply to थोडा फरक करून by धनंजय
वा! मस्त
In reply to वा! मस्त by Nile
"हू सेझ" मध्ये दुवा दिलेला आहे
In reply to "हू सेझ" मध्ये दुवा दिलेला आहे by धनंजय
मला चांदणी हवी आहे! :)
In reply to मला चांदणी हवी आहे! :) by विकास
प्रतिसाद नाईल यांच्या खरडवहीत हलवला आहे
In reply to प्रतिसाद नाईल यांच्या खरडवहीत हलवला आहे by धनंजय
मला वाटते
In reply to "हू सेझ" मध्ये दुवा दिलेला आहे by धनंजय
खालील
वा!
पाय
'पाय'च्या काय सही!
In reply to 'पाय'च्या काय सही! by सुबक ठेंगणी
म्हणजे
In reply to म्हणजे by चतुरंग
"पाय"
आमचे एक
In reply to आमचे एक by नितिन थत्ते
ही आय्डिआ
वाचनीय
मजेशीर
In reply to मजेशीर by स्वाती दिनेश
link वरची
"पाय "
माहिती आवडली.
३.१४१५९२६५३५................................
हिन्दुत्ववादी पाय