उखाणे
उखाणे, म्हटंलं की मला पु. ल. चा 'समोरच्या कोनाड्यात उभी हींदमाता, बेंबटेरावाचं नाव घेते माझा नंबर पहिला' हा उखाणा आठवतो.तसं उखाण्याचं वेड आजकाल थोडं कमीच झालं आहे. तरीही वाचायला गोड वाटतात. असे म्हणतात की चारोळ्या हा कवितेतला नवा प्रकार. पण मी म्हणेन हे उखाणे म्हणजे आपल्या जुन्या चारोळ्याच (की दोनओळ्या)की! जोडीदाराने पहिला उखाणा घेतल्यावर आपलं नाव ऍकून ज्या भावना मनात आयुष्यभर रेंगाळतात,त्याच्या जोरावर तर आयुष्यभर संसार सुरळीत चालतात किंवा चालायचे.
यातले काही उखाणे धमालसारख्या भावी वरांना(इतर कोणाचे लग्न ठरलेले असल्यास कल्पना नाही) उपयोगी ठरावेत,म्हणून हा काथ्याकूट.
बाकी विनोदी उखाणे कुणी प्रत्यक्ष घेत नसलं तरी वाचायला मजा येते. तेव्हा जरूर असे उखाणे पाठवावेत.बायकोला/नवर्याला विचारून सांगितले तरी चालतील, तेव्हढीच स्वतःचे नाव (प्रेमाने )त्याच्या तोंडी ऍकण्याची संधी. आपल्याकडे कित्येक कवी आहेत. पांरंपारीक नसतील तरी स्वरचित उखाणे सुध्दा चालतील. प्राजुताई आणि सर्व कविजन लागा कामाला :)
असो तर असेच काही उखाणे माझ्याकडून.
सागराला मिळते अव्खळ सरीता
---- चे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
रामसीतेचे गुणी लव-कुश पुत्र
---- च्या नावाने आज बांधले मी मंगळ्सूत्र
अंगावरच्या शेलारीला बांधून त्यांचा शेला
----चे नाव घेण्यास मी आज शुभारभ केला
पाच बोटातून होते कलेची निर्मिती
---- ची व माझी जडली प्रिती
क्रुष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास
---- ला भरवतो लाडवाचा घास
पुणं तिथ काय उणं म्हणतात सारी जणं
---- ने जोडीदार होऊन सार्थ केलं माझं जिणं
चंद्र आहे चांदणीचा सांगाती
--- आहे माझी जीवनसाथी
काही विनोदी.....
पुणे तेथे काही नाही उणे
---- गावाला गेल्यावर घर होते सूनेसूने
भूगोलाच्या पुस्तकाला ईतिहासाचं कव्हर
बाळ्याचं नाव घेते काळ्याची लव्हर
औंधमध्ये आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो ---- राव आहेत आय. टी. त
चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या थोबाड कर इकडे.
समस्त जश्न-ए-बहार करणार्या मडळींच्या सौं उखाणा घेईल तेव्हा
सुंदर सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
--- अजून नाही आले पिऊन पडले की काय
खास मि. पा. च्या मालकिण (सौ.अनुष्का) उखाणा घेईल तेव्हा
तात्याबा करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ
राजमुद्रा :)
वाचने
48022
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
:)
हाण तिच्यामारी....
In reply to हाण तिच्यामारी.... by धमाल मुलगा
वा !
In reply to हाण तिच्यामारी.... by धमाल मुलगा
दादानू
माझ्या कडून २
बशीत बशी
ऑ॑ !!!
आणखी एक
वा !
काल
आणि एक
आता एक चांगला
In reply to आता एक चांगला by वरदा
असाच
तात्या...... लाजले................................उप्फ्फ्फ्फ्फ्फ
जोरदार..
काही चावट उखाणे
कुत्र्यात
अजून एक,
आमचा आवडता उखाणा
ऊखाणा
ऍलुमिनीयम
अरेच्या!
उखाणा ऐश्वर्या राय चा !!!!!
वा!!
In reply to वा!! by किशोरी
शुभेच्छा! :)
In reply to शुभेच्छा! :) by विसोबा खेचर
उत्तम प्रतिसाद
अविवाहित
In reply to अविवाहित by विजुभाऊ
हो चालतो ना
In reply to हो चालतो ना by आनंदयात्री
फुकट ?
In reply to फुकट ? by इनोबा म्हणे
पहा तात्या...
In reply to पहा तात्या... by सृष्टीलावण्या
छ्या!
In reply to छ्या! by विसोबा खेचर
कोण कुठे
In reply to छ्या! by विसोबा खेचर
हाहाहा हाहाहा हाहाहा!
In reply to छ्या! by विसोबा खेचर
अहो,
आणखी काही विनोदी!
धन्यवाद!! :)
जबरदस्त!!
उखाणे +++++
सहज
In reply to सहज by उदय सप्रे
:)
लोणच्याची बरणी....
विड्याच्य
अजुन
आपल्याला एकच येतो ...
द्रौपदीचा उखाणा..?
द्रौपदीचा
फार छान आहेत्..माझाही एक...
अजुन
१ नंबर आहे
सध्या अच्चीत गच्चीचा उखाणा
In reply to सध्या अच्चीत गच्चीचा उखाणा by मदनबाण
>>बाकीत गच्चीत झाड हे किती
छान