आपण भ्रष्टाचारात सहभागी होतो का?
राजे साहेबांच्या आपण देशासाठी काय करतो या संदर्भातील चर्चा वाचताना, एक बर्यापैकी समान धागाअसा आहे की आपण कर भरत असलो, आपले काम नीट करत असलो वगैरे, तर नागरीक म्हणून आपण आपले काम करतच असतो. हा १००% पटणाराच मुद्दा आहे.
आता भारताची सद्यस्थिती पहाता कोणीही मान्य करेल की त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे. आर्यचाणक्याच्या नितीत म्हणल्याप्रमाणे, पाण्यात रहाणारा मासा पाणी कधी पितो ते कळत नाही, जिभेच्या अग्रावर जर विष असले तर त्याची चव घेण्याचा मोह पण टाळता येणार नाही (आता ही उपमा आहे, त्यावर चर्चा नको!) तसेच राजाचा अधिकारी, कोषागार पैसे कधी खातो ते कळणार नाही.
थोडक्यात भ्रष्टाचार हा पुरातन कालापासून आहे. तो जसा भारतात आहे तसाच अगदी अमेरिकेतही आहे. तरी त्यातील फरक काय आहे? भ्रष्टाचाराची लागण ही येथे (अमेरिकेत) संपुर्ण राष्ट्राला अंतर्बाह्य झालेली नाही... सामान्य माणसाला पासपोर्ट पोस्टात अर्ज केल्यावर ठरलेल्या वेळेत मिळतो इथपासून ते कुठलीही परमिटे वगैरे मिळवणे हे कुणालाही सहजसाध्य काम आहे. त्यात मेजावरती/मेजाखाली पैसे द्यावे लागत नाहीत...
आता बहुतांशी मी ऐकलेली तक्रार आणि कदाचीत तुम्हीपण ऐकलेली/अनुभवलेली असेलः कुठेही लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. तर या चर्चेचा विषय असा आहे की: स्वतःला जागृक नागरीक म्हणत असताना तुम्ही लाच देणे अथवा घेणे यात प्रत्यक्ष सहभाग करता का? आशा आहे घेत नसाल, तेंव्हा तो मुद्दा सोडूनः लाच देण्यासंबंधी तुम्ही कधी कुठले महत्वाचे काम लाच न देता केले आहे का? घरे घेताना तुम्ही कधी सगळे पैसे हे चेकने अर्थात काळे पैसे न देण्याचा किमान विचार केला आहे का?
कदाचीत प्रत्येक गोष्ट आत्ताच्या घडीला जमत नसली तरी कधीतरी सरकारी, नीमसरकारी अधिकार्यांशी/कर्मचार्यांशी कामानिमित्त संबंध आले असताना, लाचे शिवाय काम झाले आहे, अडवणूक झाली नाही असे झाले आहे का? तसे अनुभव येथे अवश्य लिहा. खात्री आहे सगळेच काही वाईट नसते. (उ.दा.: मला मुंबई कस्टम्समधे कायम चांगला अनुभव आला आहे. विस्तार हवा असल्यास नंतर प्रतिसादात)
थोडक्यात जो पर्यंत आपण "सिस्टीमचा" भाग म्हणत भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खतपाणी घालतो, "चलता है" असे म्हणतो, तेंव्हा बाकी नागरीक म्हणून कितीही चांगले वागत असलो तरी त्याचा फायदा होण्याची शक्यता नाही असे वाटते. तुम्हाला काय वाटते?
वाचने
17583
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
मला सहभागी व्हावेच लागते, नाहीतर ..
काही कामे
हो होतो.
In reply to हो होतो. by ढ
एव्हढंच
लाच खाणे व
*आमच्या
In reply to *आमच्या by नितिन थत्ते
मार खायला जोडीदार आहे ना!
चर्चेचे कारण + अनुभव
माझे पासपोर्टस मी एका पैशाचीही लाच न देता करुन घेतले.
In reply to माझे पासपोर्टस मी एका पैशाचीही लाच न देता करुन घेतले. by चतुरंग
पासपोर्ट
In reply to पासपोर्ट by विकास
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by llपुण्याचे पेशवेll
आता समजले ना? ;)
In reply to आता समजले ना? ;) by रेवती
खरे आहे..
पुण्याच्य
लाच
आत्तापर्यंत
माझ्या सुदैवाने
आपण भ्रष्टाचारात सहभागी होतो का? ---> होतो
माझे अनुभव ...
In reply to माझे अनुभव ... by छोटा डॉन
नावात सर्व आहे...
In reply to नावात सर्व आहे... by विकास
हा हा हा ...
मी भ्रष्ट तु भ्रष्ट सारेच भ्रष्ट नतद्रष्ट
In reply to मी भ्रष्ट तु भ्रष्ट सारेच भ्रष्ट नतद्रष्ट by हर्षद आनंदी
हे बाकी
नशीब
तो जसा
असहाय
एक अनुभव..
विकास साहेब
थोडक्यात
>>रेनीगुंटा
In reply to >>रेनीगुंटा by नितिन थत्ते
तमिळ
मला
पारपत्र
In reply to पारपत्र by मैत्र
लातुर
In reply to पारपत्र by मैत्र
रजिस्ट्रेशन
वाचतो आहे..
भ्रष्टाचार
In reply to भ्रष्टाचार by प्रकाश घाटपांडे
घाटपांडे
In reply to घाटपांडे by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रकाश घाटपांडे
तरीही
पैसा आणि