समलिंगी संबंध हा गुन्हा नाही: दिल्ली उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
प्रतिक्रिया
In reply to चांगले आहे by सहज
In reply to समलिंगी by विसोबा खेचर
In reply to तात्यांच्या शंका by नितिन थत्ते
म्हणजे अगोदर तुमचे आणि माझे असे संबंध असताना इतरांनी तक्रार केली असतीऑ?? वरील वाक्यात 'समजा' हा शब्द मस्ट हवा होता..! :) तात्या.
In reply to म्हणजे by विसोबा खेचर
In reply to तुमचे by नितिन थत्ते
In reply to सध्या by नितिन थत्ते
In reply to अरे वा !! by टारझन
In reply to सच्चिदानंद! सच्चिदानंद!! by धमाल मुलगा
In reply to विकृती by नितिन थत्ते
... त्यादृष्टीने समलैंगिकता प्रचंड वाढून लोकांमधील पुनरुत्पादनाची इच्छा कमी होते आहे आणि त्यामुळे मानवजातीचे भवितव्य धोक्यात आहे असे दिसले तर कायद्याने त्यात ढवळाढवळ करायची गरज पडू शकेल...तसं असेल तर काही पंथ किंवा समाजगट ब्रह्मचर्य आणि स्त्री-पुरुष संबंधानांच (धर्माचं(?) आवरण लावून) मनाई करतात. आणि हे काम गेले काही दशकं सुरू आहे. त्यांनाही कायद्याचा बडगा दाखवावा. लोकं परस्परसंमतीने आपापल्या बेडरूममधे काय करतात हा माझा प्रश्न नाही. खरंतर घटनेच्या या कलमामुळे अनेक (लग्न केलेल्या / न केलेल्या) भिन्नलिंगी जोडप्यांनाही, परस्परसंमती असूनही, काही विशिष्ट प्रकार केल्याबद्दल शिक्षा करता येऊ शकते. मुद्दा हा सुद्धा मांडता येऊ शकतो की कायद्याने लोकांच्या व्यक्तीगत आयुष्यात किती ढवळाढवळ करावी. किंवा एखादा कायदा केला तरी त्याची अंमलबजावणी करणं शक्य आहे का? जर कलम ३७७चे उल्लंघन अगदी "व्यवस्थित" किंवा "सुसंस्कृत" म्हणता येतील अशा लग्न झालेल्या जोडप्याच्या बेडरूममधेही होत असेल, तर हे कलम खरंच योग्य आहे का? ख्रिश्चन धर्मावर आधारीत बनवलेला हा कायदा, जिथून मुळात आपल्याकडे आला, त्या देशानेही तो मोडीत काढला आहे, तर आपण धर्मनिरपेक्ष असूनही का एवढे ख्रिश्चन (वा मुसलमान) बनत आहोत?
In reply to ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>तसं असेल by नितिन थत्ते
In reply to आता by चिरोटा
आता पर्यंत समलिंगी संबंध श्रीमंती चाळे समजले जात्.फॅशन्,बॉलिवूड,पेज ३ अश्या लोकांत ह्या मंडळींचा जास्त वावर असायचा.ही माहीती चुकीची आहे.. या लोकांचे संबंध चार्चौघात चर्चिले जातात म्हणून पसिद्धी मिळते इतकंच.. अगदी चहुकडे अश्या व्यक्ती पसरलेल्या आहेत त्याला रंग, धर्म, जात, आर्थिक स्तर कथाचीही बंधने नाहित नक्की निर्णयाचे स्वरूप समजले नसले तरी हा व्यक्तीगत पर्याय निवडायला मुभा दिल्याबद्द्ल कोर्टाचे अभिनंदन ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
In reply to अभिनंदन by ऋषिकेश
In reply to >>त्यावर by नितिन थत्ते
आम्ही फक्त इतकेच म्हणु, "जो जे वांछिल तो ते लाहो....प्राणिजात!"ह्याकडे दुर्लक्ष झालं का साहेब? :) बाकी, अवांतरात लिहिलेलं हे आमचं स्वत:चं वैयक्तिक मत आहे. आणि..... After all, we all agree to disagree on certain points... नाही का? :) असो, -(वैचारिक मतभेद असलेला खराट्यांचा मित्र) ध मा ल कुंचा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
In reply to सर्वोच्च by अवलिया
In reply to सर्वोच्च by अवलिया
In reply to परस्पर by अभिज्ञ
In reply to परस्पर by अभिज्ञ
In reply to परस्पर by अभिज्ञ
१. जर परस्पर संमतीने "समलिंगी संबंध" जर कायद्याला मान्य असतील तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?हो. कायद्याला मान्य आहेत असे वाटते. जर दोघेही जण सज्ञान असतील तर असे संबंध मान्य आहेत, इथे ते "लग्नाचे जोडपेच" असावे असा काही नियम नाही. अवांतर : इथे दोघेही सज्ञान असणे, स्त्री ही विवाहीत नसणे, शोषण अथवा जोरजबरदस्ती नसणे वगैरे बाबी महत्वाच्या ठरतात. समजा कुठल्या "क्ष" पुरुषाला "य" ही विवाहीत स्त्री काही सेंटिंग लाऊन पटली, त्यांनी संबंध ठेवले तर तो गुन्हा आहे. पहिल्यंदा इथे फक्त पुरुषाला शिक्षा व्हायची आता दोघेही समान दोषी आहेत असे कायदा म्हणतो ...
ह्याचाच अर्थ "भिन्नलिंगी संबंधांवर आधारित वेश्याव्यवसाय" हा कायद्याने मान्य केला आहे असे मानावयाचे का?गल्लत होते आहे. वेश्याव्यवसाय आणि संबंधांची परवानगी ह्यात गल्लत होते आहे. ज्या ठिकाणी "पैसा, जोर-जबरदस्ती, लालसा,अपेक्षा, लालुच" आदी मार्गांनी समोरच्याचे "शोषण" होते अशा सर्वांना कायद्याची मान्यता नाही. माझ्यामते अजुन कायदा वेश्याव्यवसायाला "शोषणच" समजतो त्यामुळे ह्याला परवानगी नाही ... मुळात वरील विधानच मला पटले नाही, २ विधानांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही ...
२. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का?१०० %, कायदा तो रोखु शकतो. स्पष्टिकरण वर दिले आहे ...
३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का?भारतात आजकाल प्रत्येक गोष्टीलाच कायदा वगैरे करण्याची आवश्यकता अगर बंधन असण्याची आवश्यकता आहे काय ? हे परस्परांच्या समजुतदारपणावर अवलंबुन असते, उगाच आकाशपाताळ एक करण्याला काय अर्थ आहे ? असो, आपल्याला मी "नाही" असे उत्तर देतो ... >>४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? हो, ठेऊ शकते ... >>उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय? प्रॅक्टिकली शक्य आहे असे वाटते. अहो इथे लैंगिकदॄष्ट्या नामर्द असलेले लोक स्त्री शी लग्न करतात हे सत्य आहे ना ? >> त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय? उत्तर पुन्हा तेच. समजुतदारपणा ...!!! आपण नक्की कुणाबरोबर सुखी आहोत हे ठरवावे व मगच लग्न करावे. समजा एखाद्या स्त्रीची फसवणुक झाली तर कायदा त्या स्त्री ला त्वरित "घटस्फोट" घेण्याचे स्वातंत्र्य देतो व त्या पुरुषाला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली शिक्षाही होऊ शकतो ... थोडक्यात समजुतदारपणा महत्वाचा नाही का ? अवांतर : मिपाकरांची आक्रस्ताळी, आकाशपाताळ एक करणारी मते वाचुन मज्जा वाटली ( असे माझे वैयक्तीक मत आहे ). "समलैंगिक संबंध" हे एवढे नविन आणि प्रथमच ऐकतो आहे असे असावेत हे पाहुन अंमळ गंमतही वाटली ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
In reply to @ नी. by अभिज्ञ
In reply to @ नी. by अभिज्ञ
एखादा गे मनुष्य ४ ते ५ जणांशी लग्न करू शकेल ना. हाय काय अन नाय काय. सगळेच संमत असतील तर मग काय?एकावेळेला एक लग्न हा भिन्नलिंगी लोकांसाठी असणारा न्याय समलिंगी लोकांना लागू का होऊ नये? भिन्नलिंगी लोकांमधेही वेगवेगळ्या वेळेला पण तरीही अनेक लग्नं करणारे लोकं आहेतच ना? विधवा-विवाह हे त्याचं अतिशय पॉझिटीव्ह उदाहरण असावं. माझ्या मतानुसार, पूर्वी पोलिस समलिंगी संबंध ठेवणार्या लोकांना "फौजदारी" कलमं लावून अटक करू शकत होते. आता परस्परसंमती असल्यास पोलिस कुणालाही अडवू शकणार नाहीत. लग्न हा वेगळा मामला आहे. आत्तापर्यंत समलिंगी संबंध कार्पेटखाली सारण्यामुळे अशा जोडप्यांचा विचार करण्याची गरज नव्हती. पण जसंजसे कायदे, त्यांचे अर्थ आणि मुख्य म्हणजे समाज बदलत जाईल तेव्हा अशा जोडप्यांच्या लग्नांचा आणि त्यांच्या मिळकतीच्या संदर्भात कायदेही बनवावेच लागतील. अगदी अलिकडपर्यंत लिव्ह-इनला मान्यता न देणार्या युनायटेड किंगडमनेही "आता लिव्हवाली जोडपी, त्यांची मुलं आणि घटस्फोट यांचं प्रमाण लक्षणीय असल्यामुळे" लिव्ह-इन जोडप्यांसाठी कायदे बनवले. या गोष्टी बदलायला वेळ लागतात पण बदलतात. आज कायदा नाही, नियम नाही याचा अर्थ पुढे असणारच नाही असं नाही; त्यामुळे समलिंगी जोडप्यांमुळे प्रॉब्लेम्सच वाढणार असंही समजण्याची गरज नाही. काल कुठे न्यायसंस्थेने त्यांना पहिली मान्यता दिली आहे, अजूनही समाज या लोकांना आपल्यातले समजत नाही आहे. वेळ लागेल, पण सर्व बाजू लक्षात घेऊन समलिंगी जोडप्यांसाठीही कायदे अस्तित्त्वात येऊ शकतात. आणि समाजात अमान्य आहे किंवा कायद्याने गुन्हा आहे म्हणून समलिंगी जोडपी आत्तापर्यंत भारतात नव्हतीच का? नक्कीच होती आणि आहेत. त्यांचे व्यवहार (बहुतांशी) व्यवस्थित सुरू असणार. त्यामुळे या अशा जोडप्यांसाठी कायदे, नियम बनवता येणारच नाही असं नाही. प्रश्न आहे तो थोड्या कालावधीचाच.
In reply to दोघेहि by अभिज्ञ
In reply to सर्व प्रकारची जबरदस्ती ३७६ च्या कक्षेत येत नाही by प्रसन्न केसकर
In reply to पण सर्व by श्रावण मोडक
In reply to कलम ३७७ by प्रसन्न केसकर
काहि प्रश्न मला इथे पडले आहेत ते असे, १. जर परस्पर संमतीने "समलिंगी संबंध" जर कायद्याला मान्य असतील तर मग परस्पर संमतीने केलेले भिन्नलिंगी संबंध कायद्याला मान्य आहेत काय?होय. पूर्वीसुद्धा मान्य होते.
ह्याचाच अर्थ "भिन्नलिंगी संबंधांवर आधारित वेश्याव्यवसाय" हा कायद्याने मान्य केला आहे असे मानावयाचे का?नाही. येथे प्रश्नकर्त्याचा काहीतरी घोटाळा होत असला पाहिजे. भिन्नलिंगी वेश्याव्यवसायामध्येसुद्धा परस्परसंमती नसली तर हल्लीचाच बलात्कार कायदा लागू होतो. जेव्हा परस्परसंमती असते तेव्हा हल्लीचा बलात्कार कायदा लागू होत नाही. (हे ठीकच आहे.) वेश्याव्यवसायात पैशाची देवाणघेवाण होते. वेश्याव्यसायाच्या विरोधात वेगळा कायदा आहे. तो कायदा पूर्वीसारखाच कार्यरत आहे. (काही विशिष्ट कृती स्वतंत्र म्हणून लोक करू शकतात, पण खरेदी-विक्री करण्यावर बंदी असते. उदाहरणार्थ संमती असल्यास मूत्रपिंड-वगैरे शरिराचे अवयव एका व्यक्तीचे काढून दुसर्याचा देणे कायदेशीर आहे, पण संमती असली तरी अवयवांची खरेदी-विक्री करणे बेकायदा आहे. हे ठीकच आहे.)
२. समलिंगी संबंधांवर आधारीत उद्या कोणी व्यवसाय चालु केला तर त्याला हा कायदा रोखु शकतो का?होय. येथे "हा कायदा" म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय वेश्याव्यसायाविषयी नाही, आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल ढवळाढवळही करत नाही. त्यामुळे असा व्यापार वेश्याव्यवसायविरोधी कायदा रोखेल.
३. समलिंगी संबंध ठेवण्यावर,म्हणजेच एखाद्याने किती लोकांशी संबंध ठेवावे ह्याबाबत काहि बंधने आहेत का?नाही. भिन्नलिंगी संबंधही किती लोकांशी ठेवावे याबद्दल कायद्याचे बंधन नाही. अभिज्ञ स्पष्टीकरण देतात की त्यांचा प्रश्नाचा संबंध विवाह/विवाहबाह्यतेशी आहे. त्या संदर्भात उत्तर येथेच खाली दिले आहे.
४. एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते का? उदा. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि लग्न करू शकतो काय?एकच व्यक्ती भिन्नलिंगी व समलिंगी संबंध ठेवू शकते - होय. लग्नाच्या बाबतीत मात्र हल्लीच्या कायद्याखाली भारतात फक्त पुरुष आणि स्त्री यांच्यातच विवाह होऊ शकतात. पैकी हिंदू, ख्रिस्ती, विशेष कायद्यांच्या तहत एक पुरुष आणि एक स्त्री असेच एकमेकांशीच लग्न करू शकतात. ज्या देशांमध्ये दोन समलिंगी व्यक्ती एकमेकांशी लग्न करू शकतात, त्यांच्या विषयी तुमच्या उदाहरणातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. एक पुरुष आयुष्यातल्या वेगवेगळ्या काळांत पुरुषाशी किंवा स्त्रीशी विवाहित असू शकतो. समजा एखादी स्त्री आज एका पुरुषाशी विवाहित असेल. पुढे कधी घटस्फोट झाल्यानंतर कायद्याने तिच्यावर "पुरुषाशीच विवाह कर" असे बंधन नसते. पुढे ती स्त्रीशी सुद्धा विवाह करू शकते. असे बघितल्यास "होय. एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि आयुष्यभरात कधीतरी लग्न करू शकतो." मात्र कुठल्याही एका काळात एकच विवाहसंबंध चालू असतो. "नाही -एकच मनुष्य स्त्री व पुरुष ह्या दोघांशीहि एकाच वेळी लग्न करू शकत नाही."
व त्यातून निर्माण होणा-या समस्यांचे काय?या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असल्यास अधिक तपशील लागतील. म्हणजे कुठल्या समस्या, वगैरे. विवाहबाह्य संबंधांबद्दल समस्या असतील, तर त्या आजही आहेत. त्या समस्या आजकाल गुप्त असतात, त्या तितक्या गुप्त राहाणार नाहीत. समस्याग्रस्त लोक मदत मागायला येऊ शकतील - पूर्वी उघड मदत मागितली असती तर अटक होऊ शकली असती. ... पुढे अभिज्ञ स्पष्टीकरण देतात :
नवीन कायद्याच्या धर्तीवर जर का एखादी व्यक्ती भिन्नलिंगी विवाहबाह्य संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा होऊ शकणार नाहि.कारण ह्यात दोघांची परस्पर संमती गृहित धरलेली आहे व पहिल्या जोडिदाराच्या मताला ह्यात काहि किंमत नाहि कारण हि इतर दोघांचि परस्पर संमती आहे."नवीन कायद्याच्या धर्तीवर" हे शब्द असंदर्भ आहे. जुन्या कायद्याच्या धर्तीवरही तुमचे म्हणणे काही प्रमाणात खरे आहे. "काहीच किंमत नाही" हे तितकेसे खरे नाही. पहिला जोडीदार (ज्याच्या मताला किंमत द्यायची आहे तो) जर विवाहकायद्याच्या संरक्षणाखाली असेल तर घटस्फोट घेऊ शकतो. घटस्फोटामध्ये सामायिक संपत्तीचा वाटा घेऊ शकतो. या व्यवस्थेला नवा कायदा धक्का देत नाही.
तुम्हि म्हणताय कि संबंधांना संमती व व्यवसायाला संमती ह्या दोन्ही बाबी वेगळ्या आहेत. मला वाटते ह्यातली सीमारेषा फारच धुसर आहे.नाही समजले. "कृती" आणि "विक्री" यांच्यात धूसर काय आहे ते समजले नाही. या दोन इतक्या वेगळ्या गोष्टी आहे, की त्यांच्या धूसर असण्यासाठी कुठली सीमारेषा आहे, ते मला माहीत नाही. "मी रोज पोळी-भाजी करतो" आणि "पोळी-भाजी विक्री केंदाचा माझा धंदा आहे" या वाक्यांत धूसरपणा तपासायला मला सीमारेषाच सापडत नाही.
ह्याचे (समलिंगी) व्यवसायात परिवर्तन कधी होईल हे सांगता येत नाहि.समलिंगी वेश्याव्यवसाय सध्याच मोठ्या प्रमाणात चालतो. परिवर्तन वगैरे नव्याने व्हायचा प्रश्न नाही. (कुठल्या गावात राहाता :-) ? मोठ्या शहरांत आणि लहान गावांतही समलिंगी वेश्याव्यवसाय आढळतो.) जोवर कायद्याच्या भीतीमुळे गुप्तता पाळणे आवश्यक असते, तोवर वेश्याव्यवसायाचे खूपच फावते. आता पूर्वीइतकी गुप्ततेची गरज नाही. म्हणून गुप्ततेचे शुल्क द्यायची गरज नाही. खरेदी-विक्री न करता जोडीदार सापडण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे या कायद्यामुळे समलिंगी वेश्याव्यवसायाची काही गिर्हाइके कमी होतील.
समलिंगी संबंधात अपत्य होण्याचा धोका नसल्याने ह्या प्रकाराकडे अनेक लोक आकर्षित होणार नाहित कशावरून?तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारून बघूनच सुटण्यासारखा आहे. आकर्षण नसणार्या व्यक्तीबरोबर केवळ "अपत्य होणार नाही" म्हणून उद्युक्त होणारे लोक तुमच्या ओळखीत आहेत का? नसल्यास माझ्या "असे लोक फारसे नसतात" या माझ्या अनुभवाचा सशर्त स्वीकार करावा. "सशर्त" म्हणजे तुमचे स्वतःचे सर्वेक्षण पुरे होईस्तोवर. माझ्या ओळखीमध्ये अपत्य न होण्यासाठी लोक प्रतिबंधक गोळ्या-काँडोम वगैरे वापरतात, मात्र लैंगिक संबंध आकर्षण असले तरच ठेवतात.
बरेच बेकार ह्या प्रकाराला आपला उपजीविकेचा व्यवसाय बनवणार नाहीत कशावरून?लोक उपजीविकेसाठी काय व्यवसाय करील कोणास ठाऊक. काही लोक मूत्रपिंड विकून पैसे मिळवतात असे आपण ऐकतो. रक्त"दान"विक्री तर फारच मोठ्या प्रमाणात होते. शक्यतोवर मूत्रपिंड शस्त्रक्रिया किंवा रक्तदान बेकायदा न करता फक्त खरेदी-विक्री बेकायदा केलेली बरी. कोर्टाच्या निकालात अधोरेखित केलेले तत्त्व असे काही आहे - व्यक्तीचे खाजगीतले स्वातंत्र्य मर्यादित करायची अपवादात्मक मुभा शासनापाशी आहे. पण त्यासाठी अपरिहार्य (कंपेलिंग) कारण शासनाला दाखवावे लागते. याचा भार शासनावर आहे. (ते अपरिहार्य कारण नाही असे सिद्ध करायचा भार स्वातंत्र्य हिरावलेल्या प्रतिपक्षावर नसतो.) तो हेतू फक्त अपरिहार्यच पुरत नाही, तर तशी स्वातंत्र्यावर घातलेली मर्यादा हेतू साधण्यात कार्यक्षम आहे हे सिद्ध करण्याचा भार शासनावर आहे. (ज्याच्यावर मर्यादा लादणार आहे, त्या व्यक्तीवर पुरावे देण्याचा भार नाही.) अशा प्रकारे अभिज्ञ यांचे प्रश्न "आता अधिक लोक वेश्याव्यवसायाला लागणार नाहीत ते कशावरून? वैवाहिक समस्या उद्भवणार नाहीत ते कशावरून" हे प्रश्न शासन नुसते उभारू शकत नव्हते. पुराव्यासहित "बेकार तरुण वेश्याव्यवसायाला लागतील", "वैवाहिक समस्या उद्भवेल" "हे कारण अपरिहार्य आहे, म्हणजे वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी दुसरा उपाय नाही, आणि वैवाहिक समस्यांना सोडवण्यासाठी दुसरा पर्याय नाही" या सर्व गोष्टी शासनाला सिद्ध करणे भाग होते. शासनाने जो काही युक्तिवाद केला तो या सर्व बाबतीत पुरेसा नव्हता. (आता शासनाचा वकील बेकार होता, तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला युक्तिवाद करता आला असता, असे म्हणण्यापूर्वी माननीय अॅडिशनल सोलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद स्वतः तपासून बघावा. माझ्या मते तसा दृष्टिकोन असणार्यासाठी जितपत चांगला असू शकेल तितपत चांगला युक्तिवाद होता. पुरावे कमी पडले ते पडलेच, आणि कित्येक पुरावे शासनाच्या युक्तिवादाच्या विरुद्धही गेले.) केवळ बहुतांशांना घृणा वाटते, या कारणास्तव मात्र शासन आणि न्यायालये स्वातंत्र्य सीमित करू शकत नाहीत. - - - तुम्ही-आम्ही म्हणजे शासन नाही की न्यायालये नाही. कारण कोणाला उचलून तुरुंगात टाकायची आपल्याला मुभा नाही. अर्थातच "पुराव्याचा भार" ही मर्यादा अशा बलाढ्य संस्थांवर असणे जितके महत्त्वाचे (नाहीतर जुलूम फार होईल) तितके तुमच्या-आमच्यावर नाही. त्यामुळे असे प्रश्न अभिज्ञ यांच्या मनात येऊ नयेत, जरूर. त्यांच्यावर पुराव्यांचा भार आहे, असेही मी म्हणत नाही. उलट कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये असे प्रश्न चर्चिले जावेत, अशा शंका उघड व्हाव्यात, हेच योग्य आहे. श्रावण मोडक यांनी म्हटल्याप्रमाणे या विषयाबद्दल समाजातील विचार घडायला खूप वेळ लागू शकेल. परंतु कोर्टाचा निर्णय "ताजा खबर" असेस्तोवर आपल्याला समजायचे कुतूहल असू शकते. मग मात्र घटनात्मक तत्त्वे, शासन-विरुद्ध-व्यक्तिस्वातंत्र्य, आणि "पुराव्याचा भार कोणावर" या मुद्द्यांच्या बाबतीत विचार करणे उपयुक्त ठरते.
In reply to निर्णय वाचला - बरे वाटले by धनंजय
In reply to अहो हेच by नीधप
In reply to निर्णय वाचला - बरे वाटले by धनंजय
In reply to माझ्या by अभिज्ञ
प्रश्न २: एकावेळी किती लोकांनी एकमेकाशी संबंध ठेवावेत ह्याबाबत न्यायालय काहि मत व्यक्त करतेय का? बहुधा नसावे. किंवा असे काहि बंधन असावे का? त्यालाहि उत्तर नसावेच. उदा.५-६ जण एकाच वेळी असे संबंध ठेवू इच्छित असतील तर त्याला न्यायालयाची आडकाठी आहे का? नसावि.हे प्रश्न न्यायालयासमोर नव्हते. त्याच प्रमाणे "कॉपर-टी वापरावी का?" "लग्नात कलह उद्भवल्यास समुपदेशन घ्यावे का?"... लैंगिक संबंधाबाबत आणि एकनिष्ठतेबाबत लाखोनी महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे न्यायालयाच्या निर्णयात सापडणार नाहीत. त्याच प्रमाणे तुमचा प्रश्न :
उदा.काही रुपयांच्या मोबदल्यात "परस्पर संमती"ने इथेही "संबंध" ठेवले जात असतील तर त्याला कायद्याची आडकाठी का? वेश्याव्यवसायाला अधिकृत मान्यता का दिली जात नाही?या प्रश्नाचे थेट उत्तर निर्णयाच्या दस्त ऐवजात सापडणार नाही. कारण हा मुद्दा विचाराधीन नव्हता. मात्र :
का ह्या निर्णयामुळे वेश्याव्यवसायाला मान्यता मिळायचा मार्ग अजून मोकळा झाला आहे?बहुधा नाही. कोणाचेही स्वातंत्र्य मर्यादित करण्यासाठी शासनाला काय सिद्ध करावे लागेल त्याची प्रक्रिया न्यायालयाने दिली आहे. (ही प्रक्रिया पूर्ण केल्यास स्वातंत्र्य मर्यादित करता येते, असे न्यायालय सांगते.) वेश्याव्यवसायाच्या बाबतीत शासन ही प्रक्रिया पूर्ण करू शकेल असे मला वाटते. तुम्ही ती प्रक्रिया वाचून बघा. तुमचे स्वतःचे मत बनवा. तुम्हाला जर तरीही असे वाटत असेल की वेश्याव्यवसायाची वाट मोकळी झाली आहे, तर ठीकच आहे. मात्र कोर्टाने सांगितलेली प्रक्रिया शासनाला वेश्याव्यवसायाबाबत पूर्ण करणे शक्यच नाही असे कोर्टात सिद्ध करण्यासाठी अचाट तर्कचातुर्य लागेल, असे माझे तरी वाचन आहे.
समलिंगी जोडप्यां(???)चा परस्पर समाधानाचा मुद्दा सोडला तर न्यायालयाने हा निर्णय देताना सामाजिक रचनेचा विचार केला आहे का?होय. केला आहे. न्यायालयाचा त्या मुद्द्याबद्दल विचार तुम्ही निर्णयात वाचू शकाल.
बहुतांशांना घृणा वाटते, या कारणास्तव मात्र शासन आणि न्यायालये स्वातंत्र्य सीमित करू शकत नाहीत. मग हि व्याख्या वेश्याव्यवसायाला का लागू होत नाहि?येथे तर्क नीट बघावा. घृणा+दुसरे बलवान कारण असे दोन्ही शासनापाशी असल्यास फक्त दुसरे बलवान कारणच स्वातंत्र्य सीमित करण्यास शासन वापरू शकते. घृणा हे कारण वापरू शकत नाही. वेश्याव्यवसायप्रतिबंधक कायद्याचा माझा अभ्यास नाही. आणि सध्या तो हुडकून देण्यासाठी वेळ नाही. पण भारतातल्या कायद्याच्या सुरुवातीला "कायदा बनवण्याचे कारण" असे एक कलम असते. ते तुम्ही शोधून बघावे. बहुधा "समाजाला घृणा वाटते" हे कारण सरकारने कायदा करताना दिलेले नाही, पण दुसरे कुठले बलवान कारण दिलेले आहे. हा शोध आणि अभ्यास मात्र तुम्हालाच करावा लागेल.
असेल एखाद्या व्यक्तीला शारिरिक गरज अन जर का कोणि ती पैश्याच्या मोबदल्यात करत असेल पुरी तर ह्यात न्यायालयाचा हस्तक्षेप का असावा?या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, पण शासन स्वातंत्र्याबाबत कधी हस्तक्षेप करू शकते त्याची तत्त्वे मांडली आहेत. निर्णय जरूर वाचावा. जर हस्तक्षेप करण्याच्या तत्त्वांत शरीरविक्रय बसत असेल असे तुम्हाला वाटले, तर शासन हस्तक्षेप करू शकेल अशी कोर्टाच्या निर्णयाची दिशा तुम्हाला दिसेल. जर कोर्टाने सांगितलेल्या तत्त्वांत शरीरविक्रय बसत नाही, असे तुम्हाला वाटेल तर तुमचे वरील वाक्य कोर्टाच्या निर्णयाशी सुसंगत आहे असे तुम्ही म्हणाल. (माझ्या मते तुमचे वरील वाक्य कोर्टाच्या निर्णयाशी सुसंगत नाही. पण विचार करून तुम्हालाच पटणे महत्त्वाचे.)
इथे उदारमतवादीत्वाचा झेंडा घेउन ह्या प्रकाराचे समर्थन करणारे कितीजण वेश्यावस्तीत घर घेतात? तिथे का बरे आठवत नाही कि समाजात हा प्रकार सर्रासपणे चालतोच भले मग तो बेकायदेशिर का असेना.हा वेगळा प्रश्न आहे. स्वतःला उदारमतवादी म्हणवणारे लोक ढोंगी असतात हा तुमचा मुद्दा बराच मोठ्या आवाक्याचा आहे, आणि कोर्टाच्या या मर्यादित निर्णयाच्या संदर्भात त्याची चर्चा करणे फारच अवांतर होईल. माझ्या मते मात्र तुमचे विचार या ठिकाणी तार्किक नाहीत. (वेश्याव्यवसायाबद्दल मी उत्तर देणार नाही. कारण कोर्टाच्या या निर्णयाने वेश्याव्यवसाय कायदेशीर होतो, असे तुमचे म्हणणे मला पटत नाही.) मी राहातो त्या बिल्डिंगमध्ये अनेक समलिंगी लोक राहातात, आणि माझ्या राहात्या फ्लॅटमध्येही समलिंगी माणूस राहातो, हे तर आहेच. तसेच बिल्डिंगमध्ये अनेक समलिंगी-नसलेले (भिन्नलिंगी) लोक राहातात. म्हणजे लग्न झालेले, लहान मुले असलेले, डॉक्टर-वकील वगैरे व्यावसायिक, म्हातार्या सेवानिवृत्त आज्या-आजे. (माझ्या बिल्डिंगमध्ये >२०० फ्लॅट आहेत, त्यामुळे बरेच वेगवेगळे लोक राहातात.) येथील घरांना मागणी भरपूर आहे, आणि घरांच्या किमती शेजारच्या "बिन-समलिंगी" वस्तीपेक्षा पुष्कळ अधिक आहेत. त्यामुळे अशा "समलिंगी व्यक्ती असलेल्या वस्तीत अन्य लोक राहाणार नाहीत" अशी तुमची अपेक्षा माझ्या अनुभवाशी विसंगत आहे. आता ढोंगाबद्दल. पूर्वी मी एका हॉस्पिटलाच्या जवळ राहात असे. मला रुग्णवाहिन्यांच्या भोंग्यांचा आणि रात्री-अपरात्री माझ्या खिडकीच्या जवळून जाणार्या हेलिकॉप्टरांच्या आवाजाचा फार त्रास होई. एका वर्षातच मी फ्लॅट बदलला, आणि बहुधा पुन्हा कुठल्या हॉस्पिटलाच्या अगदी जवळ राहायला जाणार नाही. तरी शहरात हॉस्पिटले असावीत, रुग्णवाहिन्या असाव्यात, हेलिकॉप्टरे असावीत, या सर्व गोष्टी कायदेशीर आहेत, असे माझे मत आहे. "कायदेशीर म्हणतोस तर तिथे जवळ का नाही राहायला जात?" या निकषावर हे माझे ढोंग ठरेल, पण ते ढोंग नाही असे माझे मत आहे. "हॉस्पिटले कायदेशीर आहेत" हे माझे मत प्रामाणिकच आहे. ढोंग दाखवण्यासाठी "तिथे राहायला का नाही जात" हा निकष मला ठीक वाटत नाही.
In reply to दीर्घ आणि तपशीलवार निर्णय by धनंजय
In reply to धनंजय यांचे सर्वच प्रतिसाद आवडले. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बहुतांशां by अभिज्ञ
जेव्हा समलिंगी संबंध हे लग्नाशिवाय ठेवले जाताहेत वा त्याच्यावर कसलाही धरबंध नाही आहे त्यावेळी हि तुलना प्रस्तुतच आहे.धरबंध का नाही, कारण (म्हणे) कायदे नाहीत! कायदे केले तर धरबंध अगदी कायदेशीरपणे राहिल. आत्तासुद्धा समाजात समलिंगी जोडपी, आपखुशीने, प्रेमाने आणि नीतीमत्तेने रहात नाहीतच किंवा नसतीलच अशी काही आकडेवारी, पुरावा आहे का? याही प्रकारच्या लग्नाला कायद्याने मान्यता दिल्यास अनेक सुजाण, सज्ञान समलिंगी जोडपी लग्नं करून सामान्य आयुष्य जगू शकतील. उलट मान्यता नाही म्हणून समाजातल्या एका घटकाला माझ्या देशात लपून छपून प्रेम करावं लागतं याचं मला वाईट वाटतं. कायदे आहेत तरीही काही भिन्नलिंगी लोकं अनैतिक संबंध ठेवत नाहीत का? (आकडेवारी, माझ्यापेक्षा जास्त विप्र किंवा तात्या देऊ शकतील.)
समाजात ह्या संबंधांना सर्वसंमती नाही आहे तेंव्हा अशा संबंधांकडे कोणताही सु़जाण नागरीक फक्त सहानुभुतीने पाहू शकत नाही.मी सुजाण आहे आणि नागरिकही आहे असा माझा दावा आहे. मी समलिंगी लोकांकडे सहानुभूतीने पहात नाही. (तरीही वरचं विधान थोडा व्यक्तीगत हल्ला वाटला. असो.) माझ्यासारख्याच दुसर्या धडधाकट, कमावत्या माणसांकडे मी सहानुभूतीने बघत नाही, समतेने बघते. समता अशासाठी, की हे सगळे माझ्याचसारखे आहेत. (दोघांचं जमत असेल आणि मुलगा चांगला असेल तर) माझ्या मैत्रिणीने कोणत्या मुलाशी लग्नं केलं हा जसा माझा प्रश्न नाही, तसंच (दोघींचं जमत असेल आणि मुलगी चांगली असेल तर) माझ्या मैत्रिणीने कोणत्या मुलीबरोबर तिचं आयुष्य व्यतीत करायचं हाही माझा प्रश्न नाही. सर्वसंमती नाही म्हणून कोणी समलिंगी स्त्री/पुरूषाला भिन्नलिंगी माणसाशी लग्नं करावे लागले (जे या लोकांच्या बाबतीत होत असणार) तर त्या (दोन, कमीतकमी) माणसांच्या आयुष्याची होळी होईल, याची नैतिक जबाबदारी कोण घेणार? आपण (आणि बहुसंख्य) लोक भिन्नलिंगी संबंध ठेवणारे आहोत म्हणून समाजाचा एक घटक, जो समलिंगी आहे, तो विकृत आहे हे ठरवणारे आपण कोण? जरी ते विकृत असतील (असं आपण ठरवलं) तरीही त्यांचा इतरांना काहीही त्रास नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर बंदी घालणारे आपण कोण? भिन्नलिंगी लोकांप्रमाणेच समलिंगी लोक लग्नं करून आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ रहाण्यास तयार असतील तर त्यांना नाही म्हणणारे आपण कोण? उलट अशा लग्नांमधून संततीचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे घटस्फोटाचे कायदेही बनवणं सोपं होईल. अनेकदा (भिन्नलिंगी लग्नांच्या) घटस्फोटांमुळे मुलांवर नकळत्या वयात क्रूर मानसिक आघात होतात, तो प्रकार तरी या परिस्थितीत उद्भवणार नाही. समलिंगी लोकांचा विरोध करणार्यांनी अजूनही या चर्चेत एका प्रश्नाचं उत्तर दिल्याचं मलातरी लक्षात आलेलं नाही, ते असं: परस्परसंमती, लग्न करण्याची आणि आयुष्यभर एकमेकांना सोबत करण्याची तयारी, कायद्याने सज्ञान असणे, हे सर्व असताना इतर लोकांच्या बेडरूममधे डोकावून बघण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला?
In reply to बहुतांशां by अभिज्ञ
In reply to काही प्रश्न by विकास
In reply to वेल... by श्रावण मोडक
In reply to इब्राहिमी धर्मांपेक्षा बराच सौम्य निषेध by धनंजय
In reply to इब्राहिमी धर्मांपेक्षा बराच सौम्य निषेध by धनंजय
In reply to दंड आणि इतर... by श्रावण मोडक
In reply to नक्की माहीत नाही पण.. by नीधप
In reply to नेहमीप्रम by नितिन थत्ते
In reply to घटना दुरूस्ती by विकास
In reply to नेहमीप्रम by नितिन थत्ते
In reply to काही शंका by हुप्प्या
In reply to >>५. ह्या by शाहरुख
In reply to >>व्यक्ती by नितिन थत्ते
In reply to जन्मजात वा आवड्/निवड by हुप्प्या
In reply to जाणिवपूर्वक समलिंगी by नितिन थत्ते
In reply to जन्मजात वा आवड्/निवड by हुप्प्या
In reply to >>५. ह्या by शाहरुख
In reply to किळस वाटते by Nile
In reply to सर्वप्रथम by शाहरुख
In reply to किळस वाटते by Nile
In reply to अस्प्रुश्यतेचे उदाहरण गैरलागू वाटते by हुप्प्या
पण समलैंगिकता ही अशी नाही असे मला वाटते. एखादा(दी) जाणीवपूर्वक तसे संबंध करतो(ते)वरील बर्याच प्रतिसादात हे / असल्याप्रकारची वाक्ये आल्याने हे स्पष्टीकरणः समलैंगिकता ही जाणीवपूर्वक स्वीकारलेली नसते. जसे स्ट्रेट म्हणवणारे लोक आपोआप एखाद्या/अनेक भिन्नीलिंगी व्यक्ती(क्तीं)कडे शारिरिकदृष्ट्या आणि/किंवा मानसिक दृष्ट्या आकर्षित होतात तितक्यास सहजतेने, नैसर्गिकरित्या गे व्यक्ती देखील समलिंगीव्यक्तीकडे आकर्षित होतात एखादी (कंडा) मुलगी पाहून मुलाच्या तोंडून सहजतेने शिटी बाहेर पडावी ही तितकी सहज घडणारी क्रिया आहे. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
In reply to समज-गैरसमज by ऋषिकेश
In reply to हुप्प्यांच्या शंकांना माझ्या काही शंक.. by कालिन्दि मुधोळ्कर
चांगले आहे