Skip to main content

मुखपृष्ठ

लेखक गवि यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
Mukhprushth

वर्ष पंधरावे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 501
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

सुबक दिसतंय मुख्यपृष्ठ!

पुलंची बटाट्याची चाळ की वास्तव सिनेमातील रघुची चाळ की वसंत सरवटेंचं विश्व की अजून काही...

काहीही असो; मिपाकरांचे उत्सवी कल्पनाचित्र अगदी वास्तवदर्शी वाटतंय!

 

- (उत्सवी मिपाकर) कांदा लिंबू 


अतिशय छान आहे मुखपृष्ठ. बारकावे रेखाटलेले आहे. 

 

डालडाच्या डब्यातील फुलझाड गॅलरीत टांगलेले आहे तेवढे राहीले.

 

गिरगावातील चाळीतील वास्तव्य आठवले. 


मिपा दिवाळी अंक & मुखपृष्ठाचं हार्दिक स्वागत ! 

मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि लोभस आहे. चाळीतील दिवाळी अतिशय संस्मरणीय असते .... ते दिवस आठवले. 

 

किती माणसं, रहिवासी, कुटूंब आहेत या चित्रात आणि आकाशदिव्याचे तपशिल किती सुरेख ! 

क्षितीजावर टॉवर्स, पुल, समुद्र ... वेगळाच कॉन्ट्ऱास्ट !

किती गोष्टी पाहू  अन किती नको असे झाले ! 

 

मुखपृष्ठकाराचे मन:पुर्वक अभिनंदन ! 

 


बहारदार मुखपृष्ठ.

या प्रकारची चित्रे जनरेटवण्यासाठी प्रॉम्प्ट कसा असावा, अशी पृच्छा करता चत्ग्प्त ने खालील उत्तर दिले आहे:

WHIMSICAL INDIAN ARCHITECTURAL STORYBOOK ILLUSTRATION

Create a richly detailed, colourful Indian storybook illustration with a charming hand-drawn, digitally painted gouache aesthetic.

Use an elevated bird's-eye or isometric perspective, intricate architecture, expressive miniature human figures and beautifully detailed everyday surroundings.

Employ fine ink-like outlines, slightly textured brushwork, warm earthy colours, vibrant festive accents, soft atmospheric lighting and glowing lamps.

Include abundant visual details, lively human activities, plants, rooftops, balconies, windows and traditional Indian decorative elements.

तुम्ही काय केले होते ?


In reply to by चित्रगुप्त

एका प्रॉम्प्टने माझ्या इमेजेस कधीच बनत नाहीत. एकामागून एक एडिट करणारे प्रॉम्प्ट्स देत देत शेवटी हवं तसं येतं. आता बरीच टूल्स एडिट आणि बदल करण्याचे ऑप्शन देतात. मी चाळीतला दिवाळी सोहळा आणि पार्श्वभूमीवर उंच आधुनिक इमारती, प्रत्येक घराची एक कहाणी असते हे चाळीला आणि मोठ्या बिल्डिंग दोन्हीला लागू होतं. पण सणाला सगळे कमीजास्त साजरे करतात. मिसळपाव ही एकत्र येण्याची जागा, म्हणून सामूहिक दिवाळीचं वातावरण. मारिओ मिरांडा जसे बारीकसारीक बारकावे रेखाटतात तशी अनेक व्यक्तिमत्वं अस्पष्ट दिसणारी पण वेगवेगळ्या कृतीत मग्न, ज्यामुळे चित्राकडे खूप वेळ निरखत बसावे असे वाटते. ती सर्व एलिमेंट्स आणली होती. मूळ चित्र अधिक high resolution आहे. पण काही मर्यादेमुळे ते साईझ कमी करून थोडे कमी स्पष्ट दिसत आहे.