✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कधी निसटले धागे

ब — बिपीन सुरेश सांगळे, Sat, 11/29/2025 - 21:41
कधी निसटले धागे मज कळलेच नाही कशी उसवली वीण मज कळलेच नाही त्या निवांत भेटी त्या एकांत गाठी डोळ्यांत हर्षाचे झरे अन देहांची मिठी क्षण ते सरले जरी मन ते भरलेच नाही ती मधाहूनी गोड कुठे हरवली ओढ ? अशी कशी मुक्याने मोडली माझी खोड माणसाचे मन ते मज उमगलेच नाही येते रात सजुनी येतो पाऊस अजुनी शालीन थंडी गुलाबी मारते मिठी बाजूनी मग कसा प्रेमाचा ग्रीष्म गेला विझुनी ? काय खरं नि खोटं तू मज वरलेच नाही ?

प्रतिक्रिया द्या
737 वाचन

💬 प्रतिसाद (3)

हाय काय नाय काय...

कर्नलतपस्वी
Mon, 12/01/2025 - 19:29 नवीन
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी..... सखी मंद झाल्या तारका..... तरूण आहे रात्र अजूनी.... किंवा..... दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा.....
  • Log in or register to post comments

विरहीणी आवडली . . .

सुक्या
Mon, 12/01/2025 - 23:29 नवीन
प्रत्येकाच्या आयुष्याचा एक हळवा कोपरा . . . पुलेशु.
  • Log in or register to post comments

या कवितेचा संदर्भ ही एक

बिपीन सुरेश सांगळे
Sun, 12/07/2025 - 23:28 नवीन
या कवितेचा संदर्भ ही एक चर्चेतील , ताजी आणि दुर्दैवी गोष्ट आहे . असो . सर्व वाचकांचे आभार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा