ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम
लेखनप्रकार
# सनातनी मनुवादी लेखन
# स्वान्तःसुखाय
__________________________________________
"प्रसाद भाई , अरे भाई मैने अभी अभी पढा कि हर हिंदु जन्मसेही ३ कर्जे मे होता है , देव रिण, ऋषी रिण और पितृ रिण . क्या है भै ये ?"
"भाई तु क्या पढ रहा है और कहां से पढ रहा है ? ती जिस स्पीडसे पढ रहा है, समझ रहा है , तु तो एक दिन मुझसेभी जादा सनातनी हो जायेगा !"
"ख्या ख्या ख्या "
"ख्या ख्या ख्या "
गेल्या गुरुवारी एका अहिंदु मित्राशी झालेला हा संवाद ! १००% सत्य प्रसंग आहे हा !
तिथुन मनात विचार आला की ह्या विषयावर एकदा लिहुन काढायला हवं ! तस्मात् हा लेखनप्रपंच ! ( बाकी संवाद हिंदी इंग्रजी मध्ये झाला , तो मराठीत अनुवादित करुन लिहित बसण्याऐवजी तदनुषंगाने झालेले चिंतन लिहुन काढत आहे.)
नेहमी प्रमाणेच स्वान्तःसुखाय !
__________________________________________________________
ऋणत्रय आणि चातुर्वर्णाश्रम
एकदा का तुम्ही शांतपणे चिंतन करायला लागलात की वैदिक औपनिषदिक तत्वज्ञान , अध्यात्म , समाजव्यवस्था , धर्मशास्त्र , ह्यातील धागे आपोआप जुळत जातात अन एकामागुन एकेक गोष्टी उलगडत जातात . हा सगळा प्रवास म्हणजे एखादे रहस्यमय पुस्तक वाचण्यासरखा असतो कि ज्यात प्रत्येक पानांवर "ओह्ह , असा अर्थ , असा विचार होता होय ह्याच्यामागे ! " असे voila क्षण मिळत जातात !
सनातन धर्मानुसार प्रत्येक द्विज हा जन्मतःच तीन ऋणां मध्ये बांधलेला असतो. द्विज म्हणजे द्वि + ज अर्थात ज्याचा दोनदा जन्म झाला आहे तो . मौजिबंधन अर्थात मुंज हा सोळा संस्कारातील एक मुख्य संस्कार . त्याचे महत्व इतके आहे की त्याला दुसरा जन्म मानलेले आहे. द्विज अर्थात ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ज्यांचा ज्यांचा मौजिबंधन संस्कार झालेला आहे तो प्रत्येक जण !
आता ही तीन ऋण कोणती आणि ती कशी फेडायची ?
१. पितृ ऋण
२. ऋषी ऋण
३. देव ऋण
१. पितृ ऋण अर्थात आपल्या पिता आणि पितरांप्रती असलेले ऋण . त्यांच्या मुळे आपल्याला ह्या कुळात ह्या गोत्र प्रवरात जन्म मिळाला म्हणुन आपण त्यांचे ऋणी आहोत. मग त्यांचे हे ऋण फेडायचे कसे ? तर ह्या प्रश्नाचे उत्तर सोप्पे आहे, ते गोत्र प्रवर, बोली भाषेत आपले आडनाव पुढे चालु ठेऊन . पुत्रप्राप्ती करुन . पुत्र ह्या शब्दाची व्युतप्त्ती पु: नाम त्रायते इति पुत्रः अर्थात ज्यांना पुत्र होत नाही ते निपुत्रिक लोकं पु: नामक नरकात पडतात अशी धारणा आहे , अशा नरकात पडण्यापासुन जो वाचवतो , तारतो तो म्हणजे पुत्र . पण नुसतेच पुत्र प्राप्ती झाली म्हणजे कर्ज फिटले असे नाही. त्या पुत्राचे देखील मौजिबंधन व्हायला हवे , त्यालाही ही ३ ऋणे कळायला हवीत , आणि त्याला जेव्हा पुत्र प्राप्ती होईल अन त्याच्या पुत्राची अर्थात आपल्या पौत्राची मुंज , मौजिबंधन आपण पाहु तेव्हा आपण आपल्या वडीलांच्या , पितरांच्या पितृऋणातुन मुक्त होऊ.
२. ऋषी ऋण अर्थात ऋषी आणि गुरुंप्रती असलेले ऋण. हे कसे फेडायचे तर आपण स्वतः गुरुंकडुन जे अध्ययन करु , ते ज्ञान , व्यवस्थितपणे पुढील पिढीला सोपावणे आणि त्यांच्याकडुन त्या ज्ञानाचे सात्यत्य राखले जाईल ह्याची शाश्वती करुन ऋषी ऋण फेडले जाईल !
३. देव ऋण अर्थात देवां प्रति असलेले ऋण . सनातन धर्मातील देव ही संकल्पना ही वाळवंटी विचारधारांमधील देव ह्या संकल्पनांपेक्षा पुर्ण भिन्न आहे हेच बहुतांश हिंदुंना , द्विजांना ठाऊक नाही. ज्यांना ज्यांना आपण देव म्हणतो ते ते शिव , शक्ती , गणेश , विष्णु , सुर्य , इंद्र , अग्नि , यम , निऋती ,वरुण , वायु , चंद्र , ईशान हे सर्व च अव्यक्त निर्गुण परब्रह्माची आपण आपल्या आकलना करिता केलेली अभिव्यक्ती आहे. मुळ उद्देश हा अव्यक्त परब्रह्मात विलीन होऊन जाणे , तादात्म्य पावणे हे आहे . ते झाले की देवऋण फिटले !
"हां पण हे झालं पुरुषांच्यासाठी. स्त्रीयांसाठी काय ? "
स्त्रियांसाठी इतकं काही उपद्व्याप करायची गरजच नाहीये . सनातन धर्मानुसार स्त्रियांसाठी विवाह हाच मोक्षाचा मार्ग आहे आहे आणि तोच मोक्ष आहे ! विवाहसंस्कारात भटजी नक्की काय मंत्र हणतोय हेच कित्येकांना माहीती नसते . नवरा मुलगा मुलगी चार बोटे हवेत तरंगत असतात , त्यांचे आई वडील, इतर नातेवाईक ह्यांचे संगीत मानापमान चालु असतात . इतरांचा फॅशन शो चालु असतो आणि काही लोकांची मंगलाष्टके म्हणताना भटजी च्या तोंडात अक्षता कशा टाकता येतील ह्यावर गहन चिंतन चालु असते . त्यामुळे मुळे मुळ संस्कारातील अर्थच लोप पावत चाललाय . रादर लोप पावलाय .
सनातन संस्कृतीत विवाह हा इतका अन ब्रेकेबल बॉन्ड आहे कि द्विजांसाठी डायव्होर्स ही संकल्पनाच नव्हती सनातन धर्मात. मुळात मराठी शब्द जो आहे तो आहे - घटस्फोट ! घट अर्थात मातीचा घडा स्फोट अर्थात फोडणे . माणुस मयत झाल्यावर त्याच्या शवाला चितेवर चढवुन अग्नि द्यायच्या आधी करतात तसा विधी . घट स्फोट . इतका भयंकर शब्द वापरला आहे ! असो ह्या विषयावर नंतर लिहु सविस्तर .
"ओह. ठीक आहे. पण ऋषी ऋण , देव ऋण समजु शकतो ,, पितृ ऋण फेडलेच पाहिजे असं का ? मला नाय लग्न करायची इच्छा . काय फरक पडतो माझा वंश चालला काय कि न चालला काय ! मोक्ष प्राप्त झाल्यावर हे सगळं निरर्थकच नव्हे का ? " ( हा प्रश्न मित्राने खरेच विचारला. एकुणच अशी चांगली माणसे लग्न करण्यापासुन परावृत्त होत आहेत हे फार निराशाजनक आहे :( )
"भाई , सिरियसली , तू नक्की काय वाचत आहेस ? अष्टावक्रगीता ? योगवसिष्ठ ? " मी सखेदाश्चर्याने विचारले .
असो . फरक काय पडतो ते सांग .
तुम्हा सारखे असा विचार करणारे लोकं जर पुत्रप्राप्ति न करता मेले तर हा विचार , ही संस्कृतीच नष्ट होऊन जाईल. म्हणुन आपल्या पुर्वजांनी करुन ठेवलेली रीतसर व्यवस्था करुन ठेवली आहे ती म्हणजे आश्रमव्यवस्था - तुम्ही आधी ब्रह्मचर्य आश्रम करा, ज्ञान प्राप्ति करा, नंतर गृहस्थ आश्रम करा , रितसर उपभोग ह्या सर्व प्रापंचिक सुखांचा . मग कन्यापुत्र झाले की हळु हळु मन काढुन घेत वानप्रस्थ आश्रमाकडे प्रयाण करा . आणि एकदा नातवाची मुंज पाहिली की विधीवत संन्यास घेऊन ह्यातुन बाहेर पडा . तुम्हाला संसार नसेल करायचा तर तुम्ही थेट ब्रह्मचर्यातुन थेट संन्यास घेऊ शकता . पण संन्यास घेणे आवश्यक आहे. रादर संन्यास घेतलात तरच तुम्म्ही "मोक्ष" ह्या अवस्थे प्रत पोहोचणार आहात , संन्यास न घेता , नुसतेच निपुत्रिक मेलात तर , भले मग तुम्हाला कितीही ज्ञान असो, तो मोक्ष नाहीच , रादर ती जी व्हॉईड ची अवस्था आहे त्यालाच पु: नाम नरक म्हणले आहे. निपुत्रिक अज्ञानाच्या अवस्थेत अविवाहित मेला तर त्याला मुंज्या म्हणातात , ज्ञान असलेल्या अवस्थेत मेला तर ब्रह्मपिशाच्च ! लोकांना ही भुतं वाटतात पण भुत बित काही नसतं ही बस त्या व्हॉईड अवस्थेला दिलेली दुसरी नामाभिधाने आहेत .
"आणि समजा एखाद्याला लग्न परुन पुत्र झालाच नाही तर ? "
का नाही , पुत्राचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल आठ - ८ - प्रकार सांगितले आहेत सनातन धर्माने ह्यातील एक तरी नक्कीच होऊ शकतो . व्ह्यायला हवा ! पण हाही विषय नंतर बोलु कारण त्या आठ चे वर्णन करत बसलो तर तासभर लागेल. कन्या ह्या शब्दाचा अर्थच अविवाहित मुलगी असा आहे , एकदा का तिचे कन्यादान केले कि तिच्या पतीसोबत त्यांच्या परस्परांच्या मोक्षाप्रत जाणार आहेत. तुमचा काय संबंध ? तुम्ही चित्रांगदाने अर्जुनाकडुन चित्रांगदे पासुन उत्पन्न झालेला बभ्रुवाहन स्वतःचा पुत्र मागुन घेतला तसे तुम्ही तिचा पुत्र मागुन घेणार असला तर विषय वेगळा . अन्यथा कन्येचा काहीच संबंध नाही . (बाप मेल्यावर त्याच्या विवाहित मुलीला सुतक तरी लागतं का हाच मुळात प्रश्ण आहे, शोधुन पहावे लागेल ! )
" बरं . पण मग सगळेच असे देव ऋण ऋषीऋण फेडण्यासाठी अध्यात्माचा मार्गाला लागले तर समाज व्यवस्थाच कोलमडुन पडेल ना ! समाजाचं रहाटागाडगं चालणार कसं ? "
एक्झॅक्टली ! आणि म्हणुनच सनातन धर्माने नुसती आश्रम व्यवस्था केलीली नाहीये तर वर्णाश्रम अशी ४*४ व्यवस्था केलेली आहे . सर्वांनीच ज्ञानाच्या मागे धावायचे नाहीये . ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास अशी ४ * ४ मॅट्रिक्स केलीली आहे, त्यात प्रत्येक रकान्यात असलेल्या प्रत्येकाला आपपली कर्मे आखुन दिलेली आहेत .
आणि कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः अर्थात कर्मानेही नैष्कर्म्य सिध्दी प्राप्त होते जशी की जनकादिकांनी प्राप्त केली होती असे स्पष्ट आश्वासनही दिलेले आहे !
व्यवस्था केली म्हणजे कोणी केली ? मनू ने ? मनू तर नुसतं सांगतोय , तो फक्त नॅरेटर आहे . निर्माता नव्हे .
"चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। ४.१३ ।।"आतां याचिपरी जाण । चाऱ्ही हे वर्ण । सृजिलें म्यां गुण- । कर्मविभागें ॥७७॥
एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं । ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥७९॥आहेत सर्वजण चारी वर्ण , चारी आश्रमातील लोकं , मुळात एकच ! फक्त स्वभावधर्माच्या आणि गुणांच्या मुळे ही केवळ वरवर केलेली विभागणी आहे बस.
मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित । तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥जो आपापली वर्णाश्रम धर्मानुसार आलेली कर्तव्य कर्मे , विहितकर्मे रीतसर करेल त्याला ज्ञान प्राप्ती अणि तदनुषंगाने मोक्ष प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. मग तो कोणीही का असेना . एकनाथ असो कि नामदेव असो कि गोरा कुंभार असो कि सावतामाळी असो, चोखामेळा असो कि तुकाराम असो ! अरे पण हे ज्ञान जर ब्राह्मणांच्यापुरते सीमीत असेल तर अन्य वर्णाश्रमातील लोकांना ज्ञान व्हावे तरी कसे , त्यांची ऋणे फिटणार तरी कशी ? त्यांना वर्णाश्र्रम व्यवस्थेचा काय उपयोग अन् त्यांना साधन तरी काय ? आणि ह्याचेही उत्तर आधीच देऊन ठेवले आहे तुकोबांनी ! नामस्मरण !
ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि रीती सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥इतकं सोप्पं आहे हे !! ?? मग ह्या वर्णाश्रम व्यवस्थेची गरजच काय ? हा हा हा . ह्याला ही उत्तर देऊन ठेवलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी .
विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध । नाहीं भेदाभेद स्वस्वरुपीं ॥१॥ अविधि आचरण परम दूषण । वेदोनारायण बोलियेला ॥२॥ स्वधर्म अधिकार जातीपरत्व भेद । उचित तें शुद्ध ज्याचें तया ॥३॥ म्हणोनियां संती अवश्य आचरावे । जनां दाखवावें वर्तेनियां ॥४॥ कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा । सर्वथा न करावा अनाचार ॥५॥ प्रत्यवाय आहे अशास्त्री चालतां । पावन अवस्था जरी जाली ॥६॥ ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ति । बोलिली पद्धती धर्मशास्त्रीं ॥७॥अगदी जीवनमुक्त पावन अवस्था प्राप्त झाली तरीही कुळीचा कुळधर्म आचार पाळावाच , अनाचार करु नयेच ! असो. ज्याला कळलं तो नामस्मरणात मार्ग शोधेल ! आणि जमेल तितके वर्णाश्रमधर्माचे आचरण करीत आपल्या ऋणत्रयातुन मुक्त होईल ! चरैवति चरैवति || ||राम कृष्ण हरि|| ||श्रीराम जय राम जय जय राम || ______________________________________________ संदर्भ : १. https://www.santsahitya.in/namdev/shridyaneshwaranchi-samadhi/ २. https://satsangdhara.net/dn/A04.htm राम
वाचने
8243
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
श्री० गोडबोले,
In reply to श्री० गोडबोले, by युयुत्सु
तेव्हा या संदर्भात काय करता
In reply to श्री० गोडबोले, by युयुत्सु
वेगळी समस्या
In reply to वेगळी समस्या by चंद्रसूर्यकुमार
बापरे... कुठे फेडायची ही पापं
In reply to बापरे... कुठे फेडायची ही पापं by युयुत्सु
मला खरेच उत्सुकता आहे की
In reply to वेगळी समस्या by चंद्रसूर्यकुमार
1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह
In reply to 1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह by प्रसाद गोडबोले
:)
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
प्रांजळ प्रत्युत्तराबद्दल
In reply to 1.तुम्ही तुमचे पूर्वग्रह by प्रसाद गोडबोले
चुकीची दुरुस्ती
In reply to चुकीची दुरुस्ती by प्रसाद गोडबोले
अष्टादश पुराणेषु व्यासस्य
In reply to चुकीची दुरुस्ती by प्रसाद गोडबोले
झुमरीतलय्या
एक बेसिक शंका
In reply to एक बेसिक शंका by युयुत्सु
स्त्रियांचा मोक्षाचा मार्ग
अवांतर
In reply to अवांतर by युयुत्सु
मस्तच !
In reply to अवांतर by युयुत्सु
मस्तच !
आम्हा अतीसामान्य जनांस समजेल
In reply to आम्हा अतीसामान्य जनांस समजेल by विजुभाऊ
श्री० विजुभाऊ
In reply to श्री० विजुभाऊ by युयुत्सु
=))
In reply to =)) by सोत्रि
तुकोबारायांची, ज्यांनी
In reply to तुकोबारायांची, ज्यांनी by प्रसाद गोडबोले
सदर धागा
In reply to तुकोबारायांची, ज्यांनी by प्रसाद गोडबोले
अरे देवा.
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to =)) by सोत्रि
तुकोबारायांची साक्ष
In reply to =)) by सोत्रि
कुठे मुर्खांच्या नादी लागता ?
स्वांतसुखाय प्रतिसाद आहे.
In reply to स्वांतसुखाय प्रतिसाद आहे. by भृशुंडी
चपखल!
In reply to स्वांतसुखाय प्रतिसाद आहे. by भृशुंडी
नाही, तसं नाही
स्वांतसुखाय प्रतिसाद -२
In reply to स्वांतसुखाय प्रतिसाद -२ by भृशुंडी
+१
आक्षेप
श्री० गोडबोले आणि भगव्या
In reply to श्री० गोडबोले आणि भगव्या by युयुत्सु
मी उतरंड नाकारत नाही, उतरंडी
मॅट्रिक्स
In reply to मॅट्रिक्स by चंद्रसूर्यकुमार
+१
In reply to मॅट्रिक्स by चंद्रसूर्यकुमार
मूळ स्वभाव
In reply to मूळ स्वभाव by स्वधर्म
चुकीची दुरूस्ती
In reply to मूळ स्वभाव by स्वधर्म
फरक
सगळ्यांना ज्ञानाच्या मागे
ज्ञानोपासना
In reply to ज्ञानोपासना by चंद्रसूर्यकुमार
मुख्य आक्षेप त्याला आहे.
In reply to ज्ञानोपासना by चंद्रसूर्यकुमार
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो.
In reply to म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो. by अप्पा जोगळेकर
यापेक्षा धर्मभोळे,
In reply to म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो. by अप्पा जोगळेकर
पण विज्ञाननिष्ठ हिंदूंना
In reply to म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो. by अप्पा जोगळेकर
उलटे
गोडबोले यांचे मनःपूर्वक आभार
In reply to गोडबोले यांचे मनःपूर्वक आभार by स्वधर्म
नक्की लिहित राहीन.
लेख आवडला
In reply to लेख आवडला by अर्धवटराव
=))
In reply to =)) by सोत्रि
:)