(ताज्या घडामोडी~ एप्रिल फूल २०२५)

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
15 Apr 2025 - 1:28 pm

चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू

भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची

राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या

ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे

संस्कृतीमुक्तकविडंबनसमाजजीवनमानराजकारणमौजमजा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

15 Apr 2025 - 1:54 pm | चित्रगुप्त

संस्कृती - मुक्तक - विडंबन
समाज - मौजमजा - जीवनमान
पेक्षा ठरले राजकारण -
लई भारी.

पळा पळा रसिकजन
करा तलवारी म्यान
ऑन करा फ्यान
डाराडूर झोपा.
.

माहितगार's picture

15 Apr 2025 - 3:57 pm | माहितगार

बहुतेक या कवितेमुळे मिपाकर मित्राने हा धागा वर काढला आहे. बारावर्षापूर्वी मला वाटते इतर धागे काढणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या लेखकांची काही तरी संख्या असेल. आता एकुणच मिपाकरांची संख्या पुर्वीपेक्षा रोडावली आहे.
ताज्या घडामोडी शिवाय इतर राजकारण विषयक धाग्यांची लिंक सहसा मेनबोर्डावर राहू न देण्याची प्रथा असावी असा माझा गेल्या काही काळातला अनुभव आहे. कदाचित त्यामुळे असेल मंडळी ताज्या घडामोडी धाग्यावर उच्छाद करत असतील तर करूदेत. हा. का. ना. का.

प्रॉडक्ट सायकल नावाची संकल्पना आहे, काळाच्या ओघात पर्यायी प्रॉडक्ट आले की जुने प्रॉडक्ट मागे पडत जाते तसे मिपा मागे पडण्यास सुरवात केव्हाच झाली आहे का काय असे खेदाने म्हणावे वाटते पण ते कालाय तस्मै नमः असा काही एक वाक्प्रचार आहे.

अथांग आकाश's picture

15 Apr 2025 - 4:44 pm | अथांग आकाश

बुद्धिमान समजुनी
भिडू स्वतःला
काढुनी घेती
आपुली लाज

बुद्धिहीन मानुनी
वाचक तयांना
पृच्छती शमणार
कधी ही खाज

विजुभाऊ's picture

16 Apr 2025 - 9:33 am | विजुभाऊ

सुपर एप्रील फुल्ल बातम्या
१)संजय राऊताना जस्टीस ऑफ पीस हे अवार्ड असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थिरीत देण्यात आले.
२)उबाठा नी आज मुद्देसूद भाषण केले
३) श प नी पेशव्यांमुळे मराठी हिंदवी स्वराज्य टिकले असे सांगितले.