गाभा:
वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल.
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली.
आपल्याला काय वाटते याबद्दल?
प्रतिक्रिया
3 Apr 2025 - 1:29 pm | वामन देशमुख
भाजप हिंदुहितैषी पक्ष कधी होता का?
--
याआधीही लिहीलेले पुन्हा लिहीतो -
अकरा वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने -
१. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केली आहे का?
२. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का?
माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही.
---
केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.
याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती.
---
संघही फारसा वेगळा नाही. "डीएनए एकच आहे" असा गोंधळ उडवून दिला होता त्यांनी तर!
3 Apr 2025 - 6:26 pm | उपयोजक
संघाचं हे गांधीछाप हिंदुत्त्व 'भोंदुत्व' वाटतंय खरं.
3 Apr 2025 - 1:36 pm | आग्या१९९०
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
बदल नक्कीच होणार. वक्फ जमिनी आता मित्रांच्या उद्योगांना मिळणार. वक्फने दावा केला तरी वर्षानुवर्षे निकाल लागणार नाही. सरकार वक्फ बोर्डाला अधिक भ्रष्ट करेल. मुस्लिम समाजाला काडीचा फायदा होणार नाही.
3 Apr 2025 - 1:46 pm | श्रीगुरुजी
टाळ्या. असे होणार असेल तर खूप आनंद वाटेल व त्यासाठी मोदी सरकार अभिनंदनास पात्र असेल
3 Apr 2025 - 1:59 pm | आग्या१९९०
खूप नाचा आता. तुम्हालाही काडीचा फायदा होणार नाही आणि सरकारलाही फूटी कवडी मिळणार नाही. आता हा भ्रष्ट पैसा नष्ट करण्याकरात परत देशाला वेठीस धरा.
3 Apr 2025 - 2:13 pm | श्रीगुरुजी
जसा काही या विधेयकापूर्वी आमच्या व तुमच्या घरात धनाचा झरा खळखळून वाहत होता आणि आता तो झरा आटणार. अदानीकडे जमीन जाऊ दे वा अंबानीकडे, वफ्फकडून जमीन सुटणार असेल तर यापेक्षा अधिक आनंद दुसरा तो काय.
3 Apr 2025 - 2:39 pm | आग्या१९९०
माझे तरी आर्थिक झरे कायम खळखळून वाहत होते आणि वाहत आहेत, तुमचे तुम्हालाच ठाऊक. ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की. परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?
3 Apr 2025 - 2:51 pm | श्रीगुरुजी
ह्या विधेयकामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसणार हे नक्की.
काय सांगताय काय. असेल बोवा. माझ्यासारख्या हिंदुत्ववादी भाजप समर्थकाला आर्थिक फटका बसणार असेल तर तुमच्यासारख्या मुस्लिमप्रेमींनी आनंदाने नाचत शिरकुर्मा आणि खजूर वाटले पाहिजे.
परंतू शेटने दिलेल्या अफूच्या गोळीमुळे तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि तुम्हाला जाणवले तरी कुठल्या तोंडाने बोंब मारणार?
ही अफूची गोळी इतकी प्रभावी आहे की हिंदूंना आर्थिक फटका बसणार असूनही मुस्लिमप्रेमीच रडत बसलेत.
3 Apr 2025 - 3:08 pm | आग्या१९९०
रडत नाही हो, तुमच्या बालबुद्धीला हसत आहोत.
3 Apr 2025 - 3:16 pm | श्रीगुरुजी
अजून हसा. आम्हाला बघायला आवडेल.
3 Apr 2025 - 6:30 pm | उपयोजक
ही शांतिप्रिय समाजाच्या पूर्वजांची सदाचारी कृत्ये बघता ही शिक्षा कमीच वाटते. शिवाय उद्योगांना जमीनी दिल्या तर काही लोकांना रोजगार तरी नक्की मिळेल. दहशतवादी कृत्यांसाठी त्या जमीनींचा वापर होणार नाही इतकं नक्की.
3 Apr 2025 - 3:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"While addressing the Lok Sabha over the Waqf Amendment Bill, ..Amit Shah clarified that the non-Muslim members will be included in the council and Waqf Board, but would only look after the administration of property donated by someone under Waqf Law."
मर्जीतले निवृत्त होयबा आ ए एस अधिकारी नेमायचे आणि जी व्यक्ती/संस्था जमीन देणार आहे, त्याची माहिती राजकीय बॉसना द्यायची. हे कामाचे स्वरूप असणार आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/why-will-non-muslims-be-part-o...
3 Apr 2025 - 3:20 pm | श्रीगुरुजी
उत्तम निर्णय. आवडला.
3 Apr 2025 - 3:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
जमीन दान देणार्यानी मग ई.डी.ची नोटीस आल्यावर सत्ताधारी पक्षाला देणगी दिली की ते देशप्रेमी अन्यथा ते मुस्लिमधार्जिणे.
3 Apr 2025 - 4:10 pm | आग्या१९९०
ह्या देणगीतून गुंड, भ्रष्ट, नेते विकत घ्यायचे आणि पक्ष मजबूत करायचा. आमचा पक्ष पूर्वीचा राहिला नाही असे म्हणत अंधभक्त बसतात विव्हळत .
3 Apr 2025 - 6:32 pm | उपयोजक
आणि आमच्याच जमिनी. कुणा परदेशातून आलरल्या धर्माच्या नव्हेत.
3 Apr 2025 - 7:08 pm | आग्या१९९०
आदिवासी हे इथले मूळचे नागरिक. त्यांच्या जमिनी शाबुत आहेत. अर्थात वक्फ ही सुरुवात आहे, पुढचा घाला आदिवासींच्या जमिनींवर आहे.
3 Apr 2025 - 7:27 pm | श्रीगुरुजी
आधी वफ्फच्या हातातली लाखो एकर जमिनीची व्यवस्था लागू दे. नंतर आदिवासींसाठी गळे काढा. दरम्यान अलिबागमध्ये १९० घरे होतील आणि मातोश्री-१०० होईलच.
3 Apr 2025 - 8:16 pm | आग्या१९९०
प्रथम आदिवासींचा गळा घोटला जाईल. वक्फ जमिनी बळकावण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो, तसे आदिवासींच्या बाबतीत होणार नाही. अर्थात तुम्हाला सांगण्यात अर्थ नाही. तेव्हडा तुमचा अभ्यासही नाही.
3 Apr 2025 - 8:27 pm | श्रीगुरुजी
वचने किं दरिद्रता ।
3 Apr 2025 - 8:30 pm | श्रीगुरुजी
बाकी अभ्यासाचं म्हणाल तर नेपाळ्यांना बेड्या न घालता अमेरिकेने परत पाठविले या गुप्त बातमीतून तुमचा सखोल अभ्यास सर्वांना समजला होता.
3 Apr 2025 - 8:51 pm | आग्या१९९०
खरड फळ्यावर तुमचा अभ्यास दिसला. माझ्यामुळे तेथून पळ काढावा लागला तुम्हाला. इथूनही लवकरच पळाल.
3 Apr 2025 - 9:28 pm | श्रीगुरुजी
मी कोठूनही पळ काढत नसतो. मी तुमच्या आणि काही इतरांच्या पुड्या उघडकीला आणून त्यांचघ थापेबाजी उघडकीस आणतो. तुमची नेपाळ्यांची थाप मीच उघडकीस आणली होती याचे सोयिस्कर विस्मरण झालेलं दिसतंय.
3 Apr 2025 - 10:37 pm | टीपीके
या आरोपामागे काही आधार की फक्त नेहमीप्रमाणे फक्त हिंदू द्वेष?
3 Apr 2025 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली
सर तुम्हाला मनुवादी द्वेष म्हणायचंय का? कारण आदिवासी देखील हिंदू असतात!
3 Apr 2025 - 10:48 pm | आग्या१९९०
आदिवासी नव्हे वनवासी म्हणा, लगेच त्यांना कळेल अर्थ.
3 Apr 2025 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! काळी टोपी नी तसेच विचार! :)
3 Apr 2025 - 10:50 pm | टीपीके
शब्दच्छल नंतर करा आधी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या
3 Apr 2025 - 10:57 pm | श्रीगुरुजी
ते येणार नाही.
असत्यातुराणाम् ना भयम् न लज्जा ।
3 Apr 2025 - 11:04 pm | आग्या१९९०
शब्दच्छल नाही. ह्यातच उत्तर दडले आहे.
3 Apr 2025 - 11:09 pm | टीपीके
काहीही, जरा सविस्तर उत्तर द्या
3 Apr 2025 - 11:18 pm | आग्या१९९०
वेड पांघरूण पेडगावला जाऊ नका.
4 Apr 2025 - 12:15 am | टीपीके
अहो खरंच माहीत नाही. जे माहीत नाही ते महती आहे हे दाखवायला मी पुढारी नाही.
एकूण ही नक्षलवाद्यांची नवीन लोणकढी थाप दिसते आहे, म्हणून तुम्ही काहीच सांगू शकत नाहीये.
द्वेष द्वेष आणि द्वेष
या द्वेषापायी घर संसार उघडे पडतात, राज्य / राष्ट्र नेस्तनाबूत होतात, इतकेच काय समाज आणि संस्कृतीही लयाला जाऊ शकते. अर्थात तुम्ही यशस्वी होउ शकता.
4 Apr 2025 - 12:36 am | आग्या१९९०
अहो खरंच माहीत नाही.
ओके.
The Forest Rights Act (FRA), 2006 ला सौम्य करण्याचे प्रयत्न कोण आणि कधीपासून आणि का करत आहेt ह्याचा अभ्यास करा. आदिवासी ते वनवासी मागील षडयंत्र काय आहे हे समजून घ्या.
4 Apr 2025 - 8:29 am | टीपीके
या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही. विरोधी पक्षही आवाज उठवताना दिसत नाही. पडद्यामागे काही घडतंय का? नक्की काय बदल होणार आहेत? त्या मुळे कोणाचा कोणता फायदा आणि कोणाचे कोणते नुकसान होणार आहे? तुम्ही फार सविस्तर नाही पण संक्षिप्त मधे सांगितलं तरी चालेल. माहितीचा स्त्रोत काय आहे?
3 Apr 2025 - 11:30 pm | श्रीगुरुजी
उत्तर नसल्यावर देणार कसे?
3 Apr 2025 - 10:50 pm | रामचंद्र
<मातोश्री...>
या बाबतीत मुख्यमंत्र्यांची एरवीची कार्यक्षमता अजून तरी दिसली नाही. काहीतरी दीर्घसूत्री कार्यक्रम दिसतोय. की छुपी हातमिळवणी?
3 Apr 2025 - 10:56 pm | श्रीगुरुजी
छुपी कसली, उघड हातमिळवणी आहे.
4 Apr 2025 - 8:45 am | आग्या१९९०
या बद्दल एकही बातमी, लेख वाचल्याचे स्मरत नाही
त्याला मी काहीही करू शकत नाही. सध्या विरोधकांच्या बातम्या माध्यमांनी दाखवणे जवळजवळ बंद केले आहेत. शोधले तर सापडेल.
4 Apr 2025 - 9:57 am | वामन देशमुख
आत्ताच मीही संबंधित बातम्या शोधून काढायचा प्रयत्न केला पण काही सापडले नाही. तुमच्याकडे काही sources असतील तर ते पाहायला आवडतील.
3 Apr 2025 - 4:37 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
अहो, आज भाजीपाला ताजा राहिला नाही,
माणसात माणुसकी राहिली नाही,
जमिनीत पोत राहिली नाही,
पाण्यात गोडवा राहिला नाही,
शब्दात धार राहिली नाही,
राजकारणात निष्ठा राहिली नाही,
भाषणात खरेपना राहिला नाही,
सत्तेत पवार राहिले नाहीत
पुण्यात संस्कृती राहिली नाही,
मिपावर डूआयड्या राहिल्या नाहीत!
आणी तुम्ही भाजपचे घेऊन बसलात? ख्या ख्या! ख्या ख्या!
3 Apr 2025 - 5:34 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
कधी होता?
Ans to this questions like that भाजप 'पुरेसा' हिंदुहितैषी पक्ष राहिलाय का?
-ताजमहाल मध्ये पुन्हा नमाज पठनाला परवानगी कुणी दिली?
- कंदाहार ला जाऊन अतिरेकी कुणी सोडले?
- लाख सैन्य मेले तरीही चालतील पण सीमा ओलांडायची नाही, असा ताठर बना ठेवून कारगिलवेळी सैन्याला सीमा कुणी ओलांडू दिली नाही?
- कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना फोडून संपवायचा प्रयत्न कुणी केला?
- वक्फ बोर्डाला लोकसभा निवडणुकीनंतर १० कोटी देऊन दौलतजादा कुणी केली?
- कितीही सैनिक मेले तरीही “कडी निंदा” म्हणून थंड पडणारे नेते कोणत्या पक्षात आहेत?
- हिंदूंच्या अपूर्ण राममंदिराच्या उद्घाटनाचा इवेंट करून मते खायचं प्रयत्न कुणी केला?
- काश्मिरी ब्राह्मणांचा प्रश्न सोडवला का?
- सौगात ए मोदी किट वाटून कूरवाळण्याचा प्रयत्न कुणी केला?
ह्या प्रश्नांचे उत्तरे मिळवायचा प्रयत्न करा, हिंदुत्वाशी ० संबंध असलेल्या भाजप सारख्या पक्षांना हिंदूहीतैशी म्हणणे थांबवा!
4 Apr 2025 - 10:53 am | चंद्रसूर्यकुमार
नाही झाली असे वाटत आहे का? मग पुढच्या वेळेस मतदान करताना पुढील पैकी एका पर्यायाला मत द्या-

मोदी सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात पुरेसा बदल केला नाही म्हणून हिंदुत्ववादी नाराज झाले आणि मोदींना धडा शिकवायचा या उद्देशाने वक्फ बोर्डाला कोणाच्याही जमिनी आणि घरे हडप करायची अमर्याद ताकद देणार्यांनाच मते देऊन परत आले.
आपल्या लोकांकडे सारासार विचार करायची कुवत का नसते समजत नाही. मोदींना अजिबात सोने लागलेले नाही. जर मोदी अपेक्षेइतके काम करत नसतील तर ते काम करायची अधिक शक्यता असेल त्याला मत द्यायचे सोडून मोदींपेक्षा हजार पटींनी वाईट पर्यायांना मते देऊन आपल्याच पायावर धोंडा पाडून का घेतात समजत नाही. पर्याय शोधायचा असेल तर आता उपलब्ध असलेल्यांपेक्षा तो पर्याय अधिक चांगला हवा- वाईट नाही एवढी अक्कल आपल्या लोकांना नसते? मागच्या वर्षी आपल्या लोकांनी तोच गाढवपणा केला. ४ जूनला थोडक्यात बचावलो. जर ओरिसा, आंध्र प्रदेश अशा काही राज्यांनी पण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अशा राज्यातील मतदारांप्रमाणे गाढवपणा केला असता तर काय झाले असते त्याचा विचार करूनही जीवाचा थरकाप होतो. अगदी आताआतापर्यंत उबाठाचे लोक 'आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली? त्याच मतदारांनी २०२४ मध्ये केवळ आणि केवळ मोदींच्या विरोधात म्हणून उबाठाला एकगठ्ठा मते दिली- आणि आपले बिनडोक मतदार- मोदींनी हिंदूंसाठी पाहिजे तितके केले नाही म्हणून, किंवा स्थानिक उमेदवार आवडला नाही म्हणून किंवा अजित पवार बरोबर आलेले आवडले नाही म्हणून किंवा अन्य काही कारणांनी त्याच हिरव्यांबरोबर मत देऊन परत आले. एवढी साधी गोष्ट आपल्या लोकांना का कळत नाही हे न उलगडलेले कोडे आहे.
असो.
4 Apr 2025 - 11:18 am | टीपीके
+1
4 Apr 2025 - 11:52 am | वामन देशमुख
साधी गोष्ट आहे. मोदी-संघ-भाजप यांनी कितीही गुंढण आपटून घेतले तरी त्यांना हिंदवेतर मते मिळणार नाहीतच. त्याउलट, सबका साथ सबका विकास, एकच डीएनए, एक हाथ में कुराण एक हाथ में कम्पूटर, वक्फ कायद्यात केवळ धूळफेक करण्याचे बदल, आम्ही काही बाबरी पाडली नाही, कोण पाडली माहित नाही अशी डांगू भूमिका, नुपूर शर्मा प्रकरणात जीव गमावलेले असंख्य हिंदू, पाठ्यपुस्तकात अजूनही होत असलेला मोघलांचा गौरव, श्रीमंत हिंदू मंदिरे अजूनही सरकारी ताब्यात, शिक्षण हक्क कायद्याखाली होणारी हिंदू संस्थांची गळचेपी, सिनेमासारख्या माध्यमांतून वाढत्या प्रमाणात होत असलेली हिंदू श्रद्धेची विटंबना...
या सगळ्यामुळे हिंदुंची मते मात्र दुरावली आहेत. "मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" अशी हिंदूंची मनोधारणा झालेली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती काही अंशी प्रतिबिंबित झालेली आहे.
ज्याप्रमाणे केजरीवालांनी मध्यमवर्गीयांना भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे खोटे स्वप्न दाखवून स्वतः मात्र त्यातच अभूतपूर्व कामगिरी केली त्याप्रमाणे संघप्रणीत मोदींनी हिंदूंना "अच्छे दिन आने वाले हैं" असे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात मात्र "सौगात-ए-मोदी" दिली आहे.
---
मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे.
मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?
---
केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.
याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती.
4 Apr 2025 - 12:02 pm | चंद्रसूर्यकुमार
समजा मोदी मतदारांना मूर्खात काढत असतील तर त्यांना शिक्षा करायला म्हणून हे मतदार ज्यांना मत देतात ते दहापटींनी अधिक मूर्खात काढतात एवढेही समजू नये?
या बाबतीत हिरव्यांना मानले. १९९८ पासून सहा वेळा बंगालमध्ये अधीररंजन चौधरी लोकसभेवर निवडून गेले होते. पण २०२४ मध्ये युसूफ पठाण हा उमेदवार तृणमूलने दिल्यावर हिरव्यांनी अधीररंजन चौधरींना दिले सोडून आणि युसूफ पठाणला भरभरून मते दिली. अधीररंजन चौधरी हिरव्यांसाठी जे काही करत होते ते त्यांची अपेक्षा पूर्ण करणारे असेल असे वाटत नाही. मात्र चौधरी आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत म्हणून ते मतदार त्याच्याविरूध्द बाजूला म्हणजे भाजपला मत द्यालला नाही लागले. आपल्याला अधिक चांगला उमेदवार मिळायची वाट बघत राहिले आणि तो मिळाल्यावर दिले चौधरींना ढकलून.
वाजपेयींच्या काळात जे प्रकार चालू होते त्यापेक्षा नक्कीच परिस्थिती अधिक चांगली आहे असे म्हणायला जागा आहे. २००४ मध्ये वाजपेयींनी हिंदूंसाठी पुरेसे केले नाही म्हणून आपल्याच लोकांनी युपीए सरकार नावाचा कलंक दहा वर्षे देशावर आणला. तो अनुभव पुरेसा झाला नाही का? वाजपेयींनंतर अधिक कडक असे मोदी आले तसे भविष्यात आणखी कोणी येईलही. तसे झाल्यास देऊ मोदींना ढकलून आणि देऊ त्या दुसर्या नेत्याला भरभरून मते. पण मोदी पाहिजे तितके कडक नाहीत म्हणून उध्दव ठाकरे, रागा असल्या दुर्गंधीला मत द्यायचा विचारही मी तरी करणार नाही.
4 Apr 2025 - 12:09 pm | वामन देशमुख
मोदी व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे पूर्ण करत नाहीत म्हणून हिंदूंनी ममता-अखिलेश यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असे नव्हे. मोदींनीच त्यांनी स्वतः दिलेली वचने, दाखविलेली स्वप्ने, ठेवलेली उद्दिष्टे पूर्ण करावीत ही हिंदूंची अपेक्षा आहे.
मतदात्या हिंदूंना मुर्खात काढून काय साध्य होणार आहे?
4 Apr 2025 - 1:01 pm | श्रीगुरुजी
आम्ही १९९२-९३ मध्ये मुंबई वाचवली' असा दावा करत असतात. वाचवली असा दावा असेल तर तो किती खराखोटा हा पुढचा प्रश्न झाला पण वाचवली ती कोणापासून वाचवली?
सगळ्या थापा. बाबरी पाडताना, त्यापूर्वी कारसेवा करताना, मुंबई दंगलीत हे सर्व घरात लपले होते व मुंबई वाचवली ती श्रीकांत बापटांसारख्या शूर पोलिस आयुक्ताने, पोलिसांनी आणि लष्कराने.
4 Apr 2025 - 12:07 pm | वामन देशमुख
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कदाचीत या माहीतीचा उपयोग होईल -
महामार्ग ४४, महामार्ग ६५, महामारी ४८ यांवर मी अनेकदा प्रवास करतो. मागच्या दहा-अकरा वर्षांत जवळजवळ प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी, वळणावर, उंचावर, वगैरे रस्त्याला खेटून नव्या-कोऱ्या मशिदी उभ्या राहिल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गावर, अजून पुरेसा बांधूनही झालेला नाही तर अनेक मशिदीची बांधकामे सुरु झाली आहेत. हे सौगात ए मोदी आहे, नाही का?
(सिद्धीविनायकसारखी प्रचंड संपत्ती असलेली मंदिरे मात्र अजूनही सेक्युलर सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत.)
4 Apr 2025 - 12:26 pm | उपयोजक
सहमत
4 Apr 2025 - 12:39 pm | उपयोजक
मतांचा जोगवा मागताना हिंदुत्ववादी खुश होतील अशीच आश्वासने देऊन मते मागतात ना? पहिल्या खेपेला म्हणजे २०१४ ला हिंदुत्ववादी मतदारांनी भरमसाठ मतांनी भाजपला मतदान केले ना? मग अशाच प्रकारे पुढच्या निवडणूकांमधे विजय हवा असेल तर आपण हिंदुत्ववादी मतदारांच्या अपेक्षांना बांधील राहिले पाहिजे. नव्हे हिंदुत्ववादी मते अजून वाढण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे हे मोदी , भाजप , संघ यांना कळत नाही? ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच फाट्यावर मारायचे? मग अशाने मतांची संख्यस घटेल नाहीतर अजून काय होईल?
सबका साथ सबका विकास , वक्फच्या जमिनी परत मुसलमानांकडेच , सगळ्या भारतीयांचा DNA एकच आहे. ही असली मुक्ताफळं ऐकण्यासाठी आणि हिंदूंच्याच देशात सो कॉल्ड हिंदुत्ववादी पक्षाकडून मानहानी करुन घेण्यासाठी हिंदुत्ववादी मतदारांनी भाजपला मतदान केले होते का? १०० कोटी हिंदू भाजपला मतदान करतील यासाठी प्रयत्न करायचे , कंबर कसायची , कष्ट घ्यायचे की ज्यांच्यामुळे आख्खं जग त्रासलंय त्या हिरव्यांच्या दाढ्या कुरवाळत बसायचं?
२०१९ आणि २०२४ या वेळच्या निवडणूकांपूर्वी हिंदुत्ववादी मते वाढावीत म्हणून भाजप आणि संघाने काय प्रयत्न केले ते सांगावे.
4 Apr 2025 - 12:46 pm | चंद्रसूर्यकुमार
हे सगळं ठीक आहे पण यावर उपाय काय ते सांगा. मोदींपेक्षा कट्टर नेता येईपर्यंत मोदींना साथ देणे की मोदी पुरेसे कट्टर नाहीत म्हणून मुस्लिम लीगला मत देणे?मी तरी नक्की पहिला पर्याय निवडेन. त्यातही पक्षाला स्थानिक निवडणुकांमध्ये शिक्षा जरूर करेन कारण त्या निवडणुका राष्ट्रीय निवडणुकांइतक्या महत्वाच्या नसतात. एकीकडे सगळे जग हिरव्यांमुळे त्रासले आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे परत त्याच हिरव्यांना डोक्यावर घेणार्या उध्दव ठाकरे, ममता, अखिलेश वगैरेंना मते द्यायची? मोदी पाहिजे तितके कट्टर नसतील तरी त्यांनीच ३७०, अर्धामुर्धा का होईना वक्फ बोर्ड दुरूस्ती कायदा, सी.ए.ए हे सगळे केले आहे हे कसे विसरून चालेल? मोदी आपल्याला पाहिजे तितके कट्टर नाहीत असे म्हणत असल्या ठाकरे, केजरू, ममता, अखिलेश, रागा वगैरे दुर्गंधीला मते द्यायची आणि जेवढी केवढी प्रगती केली आहे ती पण रद्द करून घ्यायची आहे का? हे सगळे लोक सत्तेवर आल्यावर लगेच ३७० परत आणतील, वक्फ बोर्ड कायदा परत जुन्याप्रमाणे करतील, सी.ए.ए काढतील हे कळत नाहीये का?
4 Apr 2025 - 12:57 pm | श्रीगुरुजी
मी अनेकदा लिहिले आहे. मोदींनी फार मोठी अपेक्षापूर्ती केली नसली तरी (खरं तर बराचसा अपेक्षाभंगच केलाय) उपलब्ध पर्याय मोदींपेक्षा शतपटीने वाईट आहेत.
4 Apr 2025 - 1:07 pm | वामन देशमुख
"मोदींना यापुढे मते देऊ नका, त्याऐवजी ममता-रागा-उठा-अखिलेश-केजरू हेच चांगले आहेत" असे इथे (आता आणि यापूर्वीही) कुणी म्हटले आहे का?
चर्चेला भलतेच वळण देऊन हिंदूंनी न मांडलेल्या मताचा प्रतिवाद काय करताय?
"'मोदींनी हिंदूंना दिलेली वचने पूर्ण केली नाहीत, त्याउलट भलत्याच दिशेने (मो का गांधींसारखी) वाटचाल सुरु ठेवली आहे' हे सत्य आहे व त्यात त्यांनी तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे" हे मान्य करण्यात कसला कमीपणा आहे? की रागा-मोदी सगळा डीएनए एकच आहे?
4 Apr 2025 - 1:15 pm | श्रीगुरुजी
सहमत आहे. पर्याय उपलब्धच नाही. मोदींनीच सुधारणा करणे आवश्यक आहे.
4 Apr 2025 - 1:22 pm | चंद्रसूर्यकुमार
बरं मग करायचे काय हे तरी सांगा. मोदी आपल्यासाठी आपल्याला पाहिजे तितके करत नाहीत हा दावा असेल तर तो योग्यच आहे. मात्र विविध मार्गांनी हा असंतोष दाखवून दिला तर त्याची दखल घेतली जाते असे म्हणायलाही जागा आहे. निर्मलाकाकूंनी कर वाढविले त्याविरोधात इंटरनेटवर कितीतरी मीम्स आणि तिखट प्रतिक्रिया आल्या होत्या. त्याची दखल यावर्षीच्या अर्थसंकल्पात घेतली गेली. त्याप्रमाणे दखल घेतली जाऊन काहीतरी होईल या अपेक्षेन असा असंतोष व्यक्त करत राहिल्यास काहीही वाईट नाही. मात्र यापुढे हिंदूंनी भाजपला मते द्यावी की नाहीत हा पण विचार करावा असेही मधून मधून म्हटले जात असते. माझा मुद्दा त्यावर आहे.
काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत त्यांनाही रागा कसा आहे हे कळले नसेल असे वाटत नाही- वरकरणी ते काहीही बोलत असले तरी. तरीही त्यांचे मतदार कुरकुरत का होईना काँग्रेसलाच मत देतात. भविष्यात इंदिरा गांधींसारखा कोणी नेता मिळाला तर त्यांना नको असणार आहे असे थोडीच आहे? पण रागाच्या अंगात दम नाही म्हणून ते मतदार भाजपला मत देत नाहीत किंवा तसा विचारही करत नाहीत. कणखर नेता मिळेपर्यंत ते वाट बघत आहेत. तीच गोष्ट उबाठा समर्थकांची. उबाठांनी कशी सगळी पक्षाची वाट लावली आहे हे समोर दिसत असूनही त्यांचे (उरलेसुरले) मतदार अगदी कट्टरपणे त्यांच्याच मागे उभे असतात- ते दुसर्या पक्षाला मत द्यायचा विचार करत नाहीत. पण आपलेच मतदार- मोदी समजा २०% अपेक्षाच पूर्ण करत आहेत म्हणून ०% अपेक्षा पूर्ण करायची १००% खात्री असलेल्यांना मते द्यायचा विचार करतात.