घर पाहावे बांधून: २
लेखनप्रकार
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे.
१. कुठे?
आधी घर कुठे बांधावे हा एक यक्षप्रश्न छळत होता. त्या प्रश्नाचे नीट उत्तर सापडत नव्हते. आधी ठरवले होते की तालुक्याच्या ठिकाणी बांधावे. त्यासाठी एक दोन गुंठे जागाही घेतली १० लाखांना. पण तो विचार गळू लागला.
२००० नंतर भारत झपाट्याने बदलला आहे. एकिकडे पुणे हे एक जबरदस्त मोठे खेडेगाव झाले आहे आणि गावं सुद्धा बरीच बदलली आहेत.
तालुक्याच्या गावाच्या जत्रेला मी ५ वर्षांनी गेलो होतो. जत्रा तशी प्रचंड मोठी भरते.
आमचे शेत तालुक्याच्या गावापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. मी शेतावर आपल्या नव्या लुनावर चाललो होतो. (काय मस्त बाइक आहे). जत्रेला आलेल्या एका शाळकरी मुलाने लिफ्ट मागितली. आमच्या शेताला जवळच्या एका वाडीवर त्याला जायचे होते. म्हणालो, "बस! मी तिथेच चाललो आहे."
त्याला विचारले "तुझे नाव काय बाळा? कितवीला आहेस?"
तो म्हणाला "एक्स. सिक्स्थ स्टँडर्ड"
मी चमकलोच. पुढचा संवाद मी चक्क इंग्रजीत सुरू केला. पोराने अगदी व्यवस्थित इंग्लिश मधे उत्तरे दिली. अगदी आपले लोक "वन ऑफ" या शब्दप्रयोगानंतर नामाचे प्लुरल करण्याऐवजी सिंगुलर नाम वापरून अर्थाचा अनर्थ जसा करतात तसेही त्याने केले नाही. "वन ऑफ दि फार्म्स" असे म्हणाला बोलता बोलता.
म्हंटलं, याच्या घरापर्यंत जायला नीट रस्ताही नाही आणि याची ही प्रगती?
तसे बघायला गेले तर आमचा भाग प्रचंड दुष्काळी आहे. पाणी नसूनही परंतु आमचं शेत जिथे आहे तिथे लोकांनी द्राक्षबागा लावल्या आहेत त्यामुळे तो भाग जरासा आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही. अर्थातच जेमतेम. त्याचा परिणाम म्हणून तिथून मुले पंधरा वर्षांपूर्वी तालुक्याच्या गावी सुरू झालेल्या कॉन्वेंट शाळेत मुलांना पाठवतात. मुलाच्या हातामध्ये सगळे जग आलेले आहे. याच गावच्या रस्त्यावर मी इ कार्टच्या चार vehicles पहिल्या. म्हणजे कंज्युमेरिझम सुद्धा इथवर चांगलाच झिरपला आहे. आणि हे म्हणजे महाराष्ट्राचे रिमोट गाव!!!
आमचे शेत एन्सेस्ट्रल आहे. २ एकर. मी जरा मॅप्स आणि शेती पाहायला सुरुवात केली. जवळच एका जागी दोन तळ्यांच्या मधे कुणीतरी पाच एकर शेती विकायला काढली आहे असे कळले. भाव सांगत होता एकरी १० लाख. निगोशियेट करून साडे सहा आणि सात वर भाव आणला. कारण जागा डेव्हलप केलेली नव्हती. खालील नकाशा पाहा.
यथावकाश व्यवहार ठरला. मी जागा घ्यायचीच असे मनावर घेतले होते. याचे कारण म्हणजे जागा जवळ जवळ हद्दीत होती. (गावाची लोकसंख्या १००० पण नसेल) दुसरे म्हणजे शेत दोन तळ्यांच्या मधे होते. आणि शेतातून एक ओढा जात होता. हे फीचर मला फारच आवडले कारण आमचे सध्याचे शेत अगदी असेच होते.
व्यवहार झाल्यावर मी प्रचंड आनंदी झालो. कारण घर कुठे बांधावे या प्रश्नाचे उत्तर सुटू लागले होते.
२. का?
का चे उत्तर मी मागच्या भागात दिले आहे. आता त्याचा जरा विस्तार करतो.
मला गोंगाट अजिबात आवडत नाही. कसलाच गोंगाट आवडत नाही. त्यामुळे मला दूर कुठेतरी खोपच्यात राहणे भाग आहे नाहीतर माझे मानसिक स्वास्थ मी हरवून बसेन.
वयाच्या चाळीसाव्या वर्षानंतर मला नोकरी करायची नाही. आनंदासाठी काम करायचे आहे. त्यासाठी आधि फायर (FIRE) व्हावे लागेल. FIRE होण्याची मुख्य अट एकच.
माझ्या कॅल्क्युलेशन नुसार सध्याच्या वार्षिक खर्चाच्या २५ ते ३० पट रक्कम असेल तर भारतात फायर होता येते अर्थातच तुमच्या लाइफस्टाईल मधे एकदम टोकाचा बदल होणार नाही हे गृहीत धरले आहे. (या रकमेत राहत्या घराची रक्कम अंतर्भूत नाही. तिची किंमत एक्स्ट्रा धरावी लागेल) सध्या माझे वय ३५ असल्याने मला अजून पाचच वर्षे आहेत. आता पाच वर्षांत मी किती कमवेन हे ध्यानात घेतले असता माझा वार्षिक खर्च कमी होईल अशा ठिकाणी मला राहणे क्रमप्राप्त आहे. तुम्हा लोकांना आश्चर्य वाटेल पण मला वाटते की मी जर या शेतावर राहिलो तर माझा आणि कुटुंबाचा वार्षिक खर्च ३ लाखांच्या आसपास येईल. कदाचित त्याहूनही कमी. म्हणजे फायरचे कॉर्पस कमी करता येईल.
३. कसे?
आता शेतावर रहायचे म्हणजे कॉम्प्रोमाइज प्रचंड करावे लागणार. घर रस्त्याच्या बाजूने म्हणजे ओढ्याच्या उजवीकडे बांधावे लागणार. एका चांगल्या आर्किटेक्टच्या शोधात आहे तो पूर्ण झाला की पायाभरणी वगैरे जमीन पाहून करावी असे मनात आहे. सध्या डोक्यात घराचा एक ले आउट तयार आहे तो मध्यंतरी चितारण्याचा प्रयत्न केला.
सध्या काही बेसिक गोष्टीच डोक्यात आहेत :
१. घर एकाच मजल्याचे करावे. त्यामुळे बिम्स आणि कॉलम्स नकोत. लोड बेअरिंग घर असावे. लॅटराइट जांभ्या दगडांचा वापर करावा. ५
२. घरावर स्लॅब असावे. पाऊस किंचित असल्याने उतरते स्लैब असण्याची गरज नाही. शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर पॅनेल + सोलर हीटर + पाण्याची टाकी बसवले जातील त्यामुळे उन्हाळ्यात घर फार तापणार नाही.
३. घराच्या पुढील भागामधे भरपूर झाडे लावली जातील. त्याची सुरुवात आधीच झालेली आहे. घराला लागून मियावकी जंगल केले आहे. झाडांची वाढ बरीच चांगली आहे. जवळ जवळ १२० स्पीसिज (सगळे नेटिव्ह) झाडे लावली आहेत.
४. घराचा हॉल काचेचा किंवा मोकळा असे दोन्ही पर्याय ओपन आहेत त्यामुळे एका कोपऱ्यावर कॉलम टाकावा लागेल.
५. जिन्याखालचा भाग लहान खोलीत कपाटांसाठी वापरता येईल. जिन्याला वर निमूळते सोडून वरती मोठे दार करावे असा विचार आहे.
६. पार्किंग वगैरे बाहेरच झाडाखाली करायला स्पेस तयार करतो.
७. घराची आणि सामानसुमानाची किंमत ३० लाखांपर्यंत मर्यादित ठेवावी असा विचार आहे. त्यासाठी कुठे कंप्रोमाईज करता येईल ते पाहत आहे.
तर आहे हे इथवर आहे. आता पुढचा अपडेट कधी हे काहीच सांगता येत नाही. पण प्रगती तर आहे. देखेंगे.

वाचने
4956
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
एक दुरुस्ती
शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर
In reply to शिवाय सगळ्या स्लॅबवर सोलर by आग्या१९९०
घर पूर्णपणे ऑफ ग्रिड करत आहे.
वाह !
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लंबी रेस का घोडा
अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि
In reply to अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि by Bhakti
फार्म हाऊस हेच मुख्य रेसिडेन्स
In reply to अय्यो तुमचं वय केवळ ३५ आणि by Bhakti
फार्म हाऊस की नुसतीच हौस... हा वेगळा विषय आहे...
In reply to फार्म हाऊस की नुसतीच हौस... हा वेगळा विषय आहे... by मुक्त विहारि
शेती व नफा
In reply to शेती व नफा by हणमंतअण्णा शंक…
हौसेला मोल नाही...
In reply to हौसेला मोल नाही... by मुक्त विहारि
केवळ हौस म्हणून नाही
उत्तम निर्णय आहे...
In reply to उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
मी येत्या तीन वर्षात शेतात
In reply to मी येत्या तीन वर्षात शेतात by आग्या१९९०
स्वतः ची जागा असेल तर...
In reply to मी येत्या तीन वर्षात शेतात by आग्या१९९०
घरघर
In reply to घरघर by हणमंतअण्णा शंक…
पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना.....
In reply to पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना..... by मुक्त विहारि
तापमान
In reply to उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
लॉरी बेकर
टॉयलेट दोन्ही खोल्यांच्या मधे घेतल्यास बरे.
In reply to टॉयलेट दोन्ही खोल्यांच्या मधे घेतल्यास बरे. by चित्रगुप्त
सहमत आहे ...
In reply to टॉयलेट दोन्ही खोल्यांच्या मधे घेतल्यास बरे. by चित्रगुप्त
attached टॉयलेट
चाचणी घ्या
In reply to चाचणी घ्या by स्वधर्म
द्राक्षशेती
In reply to द्राक्षशेती by हणमंतअण्णा शंक…
मुद्दा द्राक्षे नसून
In reply to मुद्दा द्राक्षे नसून by स्वधर्म
रास्त
In reply to चाचणी घ्या by स्वधर्म
तुमच्या सूचना
हणमंतअण्णा,