चपाती आंदोलनाचे गूढ
लेखनप्रकार
वाचने
6106
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
मनोरंजक आणि उत्कंठावर्धक लेख.
माहिती बद्दल धन्यवाद...
ऐकावे ते नवलच!
रोचक प्रकार. हो अशा पोळ्या गावोगावी पाठवून त्यातून क्रांतीचा संदेश पसरवला गेला असे वाचले आहे. पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते. नाहीतर नुसत्या पोळ्या दुसर्या गावातून आपल्या गावात आल्या तर त्यामुळे ब्रिटीशांविरोधात उठाव करावा असे इतक्या (म्हणजे अनेक लाख- कदाचित कोटीही) लोकांना वाटणे याची तर्कसंगती लावता येत नाही.
लेखाबद्दल धन्यवाद
In reply to धन्यवाद by चंद्रसूर्यकुमार
पण नुसत्या पोळ्या पाठविल्या जात नसाव्यात. त्याबरोबर आणखी कसलातरी (निदान तोंडी) संदेश तरी पाठविला जात असावा असे वाटते.हो, लेखात म्हंटल्याप्रमाणे लाल कमळ आणि बकऱ्याच्या मांसाचे लहान तुकडेही सहसा त्या पोळ्यांबरोबर असत, आणि "सब लाल हो गया हैं" असा एक गुढ तोंडी संदेशही त्या वस्तु एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोचवणारे धावपटु देत असत म्हणे. त्या चपात्या, कमळाचे फुल, बकऱ्याचे मांस आणि ह्या संदेशाचा नक्की काय परस्पर संबंध होता राम जाने!
हा पोळी/रोटी गूढ प्रवास इतकं अंतर झटपट होऊ शकला असेल तर तीही इंग्रजी/कंपनी सरकारचीच कृपा म्हटली पाहिजे. अन्यथा इतक्या झपाट्याने अशी हालचाल इंग्रजपूर्व (उत्तर) भारतात अशक्यच ठरली असती.
प्रथमच चपाती आंदोलना बद्दल वाचण्यात आले.
अ ति श य रोचक प्रकरण आहे असं दिसते.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
एकंदरीत हा प्रकार रहस्यमय आहे खरा! आणि इतक्या वर्षांनंतरही त्या मागचे गूढ उकलले नाही ह्याचे आश्चर्य वाटते!
त्यांनी त्यांच्या मेन्यू मध्ये चिकन टिक्का मसाला बरोबरीने "चपाती-ब्रेड" चा स्वीकार केला आहे परंतु हि द्विरुक्ती आहे ("चाय-टी" - अजून एक उदाहरण) हे कोणीतरी त्यांना सांगायला हवे आहे."चपाती-ब्रेड" हि द्विरुक्ती आहे पण 'चाय-टी' म्हणजे दुधाचा चहा आणि नुसता 'टी' म्हणजे कोरा चहा/ब्लॅक टी असे अर्थ त्यातुन अभिप्रेत असतात.
या निमित्ताने घडीच्या पोळ्या या आपल्या दैनंदिन आहारात कधी समाविष्ट झाल्या असाव्यात कोणी सांगू शकेल का? कारण सुमारे शंभरेक वर्षांपूर्वी पुण्यासारख्या शहरातही ब्राह्मणवर्गातही घरोघरी पोळ्यांपेक्षा भाकरीच केल्या जात असं ऐकून आहे. रोजच्या आहारात त्या तितक्याशा प्रचलित नव्हत्या.
In reply to या निमित्ताने घडीच्या पोळ्या by रामचंद्र
आंजावर शोधल्यावर हे सापडलं :
हजारो वर्षांपासून गहू पिकवला जात असल्याने रोटी बनवण्याची पाककला विकसित होत गेलेली दिसते. सोमेश्वराच्या ‘अभिलषितार्थ चिंतामणी’मध्ये तर याचे साद्यंत वर्णन येते. गव्हाचे पीठ केल्यावर त्यात थोडे तूप व मीठ घालून दूध व पाणी या दोन्हींच्या साहाय्याने कणीक भिजवावी, असे सोमेश्वर म्हणतो. याच कणकेत सारण भरून बनवलेल्या मांडय़ांना सोमेश्वराने पहलिका किंवा पोलिका म्हटले आहे. हीच आपली पोळी असावी. चपाती हा शब्द सगळ्या प्रांतात आढळतो. चपटना, चपटून, लाटून केलेला पदार्थ म्हणजे चपाती असा या शब्दाचा उगम असावा. पोळी हा शब्द मात्र सर्व प्रांतांमध्ये नाही. तो महाराष्ट्रात विशेषत्वाने आढळतो. सोमेश्वराच्या याच ग्रंथात कणकेचे गोळे हातावर पसरून विस्तवावर टाकून तांबूस होईपर्यंत भाजून ‘अंगारपोलिका’ करण्याची कृती सांगितली आहे. ही अंगारपोलिका म्हणजे आपला आजचा फुलका असावा. १६ व्या शतकातील ‘भावप्रकाश’नामक ग्रंथात रोटीका असा संस्कृत उल्लेख आहे. ती आजची रोटी. याच दरम्यानच्या ऐन-ए-अकबरीमध्ये चपातीचा उल्लेखही आढळतो.पण घडीची पोळी याबद्दल काही सापडलं नाही ! माझ्यामते पोळीचा शोध लागतानाच घडीची पोळी करण्याची कृती सापडली असावी.. व्याख्या साधी सोपी : जी मऊ आहे आणि घडी घालता येते अन प्रवासात न्यायला सुटसुटीत अन टिकाऊ !
In reply to आंजावर शोधल्यावर हे सापडलं : by चौथा कोनाडा
घडीची पोळी म्हणजेच आपण रोज खातो ती पोळी. शंका एवढीच आहे, की हा प्रकार महाराष्ट्रात किमान काही शतके नक्कीच माहीत असावा पण रोजच्या आहारात त्याचा समावेश या शतकभरातलाच असावा. यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील काय?
एकदम नविन व वेगळीच माहिती.
मी असेही ऐकले आहे कि फुगलेल्या पोळीत/भाकरीत संदेश लिहिलेला कागद सरकाऊन पुन्हा पोळी/भाकरीचे तोंड बंद करुन ती पाठवली जात असे.
In reply to मी असेही ऐकले आहे कि by कानडाऊ योगेशु
अच्छा!
ही पद्धत एकदा तरी वापरून पाहते ;)
In reply to अच्छा! by Bhakti
वाजवा रे वाजवा चित्रपट आठवला.
In reply to वाजवा रे वाजवा चित्रपट आठवला. by गवि
एवढस काय? . . वांग. त्याला काय? देठ. तुमची आमची कायमची भेट.
https://youtu.be/gNmbChjJ3HQ?si=c2S5dskupoXkmI1b
नुसतं नॉस्टॅल्जिया..ते रविवारचे सिनेमे...ती निखळ धमाल..ओह मिसिंग.
हो कोणता डबा कोणासाठी हे सांगत जा, चिठ्ठी काय पाठवता...आठवतेय ;)
In reply to एवढस काय? . . वांग. त्याला by Bhakti
:-))
चिठ्ठी खाता आली असती का? भाजी वाचता आली असती का?
चित्रगुप्त, मुक्त विहारि, वामन देशमुख - तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार
चंद्रसूर्यकुमार - खरे आहे, तर्काच्या कसोटीवर असे नुसत्या चपात्या वितरित करण्याने क्रांती होईल हे पटत नाही
टर्मीनेटर - 'सब लाल हो गया हैं' म्हणजे काय किंवा कमळ, बकऱ्याचे मांस ह्याचा काय संबंध असावा हे कळत नाही.
रामचंद्र - आजकाल वाहतुकीची सर्व साधने उपलब्ध असल्याने ३०० किमी चा प्रवास एका रात्रीत शक्य आहे परंतु तो तेव्हा कसा जमत असेल?
चौथा कोनाडा - हो, हे रोचक प्रकरण आहे खरे. ह्याला क्रमशः नाही.
टर्मीनेटर - हो खरंच गूढ आणि रहस्यमय आहे हे आंदोलन
रामचंद्र - माझ्यामते पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत्वे ज्वारी, बाजरी नाचणी इत्यादींच्या भाकरीच खात असत. पुराणपोळी सणासुदीला करत असावेत. तेव्हा खपली गहू असे, असे ऐकले आहे
यश राज - प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
कानडाऊ योगेशु - इंग्रजांनी नक्कीच ह्या पोळ्या उघडून बघितल्या असतील परंतु त्यांना काहीही सापडले नाही.
Bhakti - चिनी मंडळींच्या फॉर्च्युन कूकीज मध्ये संदेश लिहिलेला कागद असतो तशी तुमची फॉर्च्युन चपाती/पोळी होईल.
गवि - त्या 'वाजवा रे वाजवा' चित्रपटात चपातीसंदर्भात काही होते का?
उगीच गंमत म्हणून गप्पीष्ट-गणपतीला (Chat-GPT) चपाती आंदोलनावर कविता कर अशी आज्ञा केली तर त्याने लगेच एक कविता प्रसवली.
थोड्या व्याकरणाच्या चुका सुधारून -
चपाती आंदोलनाचे गूढ
चपाती फिरत होती गावोगावी,
गूढ तिचं होतं, कथा अनोखी दावी।
कधी कुणी नेली, कधी कुणी दिली,
शब्दांशिवाय संदेशाची तीच शैली।
साध्या कणकेच्या त्या गरम पोळ्या,
झाल्या उठावाचे मूक शस्त्र ज्या।
नाही राजा, नाही सेनापती,
जनतेच्या मनात पेटल्या ज्योती नव्या।
घरोघरी फिरली ती अद्भुत कहाणी,
ओळख पटेना, का चालली ही चालेवाणी।
द्रोणासारखी पसरली ती जाळं,
ब्रिटिशांचे मन हरवले, झाले बेजार।
कधी ती असहकार, कधी ती बंड,
चपातीचं गूढ राहिलं अनंत।
भारतीयांची एकता, एक लढाईची आस,
त्या चपातीने बांधली साऱ्यांना एकत्र खास।
आजही विचारतो इतिहास,
कोण होतं ते सूत्रधार खास?
चपाती आंदोलनाचं गूढ अजूनही उलगडलं नाही,
पण स्वातंत्र्याच्या लढ्यात त्याचं स्थान कमी नाही।
धन्य ती पोळी, धन्य ती भावना,
जनतेच्या मनात उठली जळून जाणारी ज्वाला।
चपाती आंदोलनाचा हा इतिहास,
राहील सदा प्रेरणादायी, भारतीय श्वास।
हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. Chat-GPT वापरून कविता लिहीणे म्हणजे फॉर्म्युला वन घेऊन कोपर्यावरच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यासारखे आहे
In reply to हा Chat-GPT चा दुरूपयोगआहे. by विजुभाऊ
तसे झाले तर The Monk Who Sold His Ferrari प्रमाणे "The Man Who Drove His F-१ To टपरी For च्या" प्रसिद्ध होईल !!
:)
माझ्या वाचनात असे आले आहे की सर्वप्रथम ज्याने TEA हा शब्द इंग्रजीत आणला, त्याने चाय - चा- च्या अश्या कानावर पडलेल्या ध्वनीचे स्पेलिंग TEA असे केले.
-- जसे NATURE, CAPTURE, ARCHITECTURE या शब्दांमधे 'T' चा उच्चार 'च' होतो, तसे.
https://www.youtube.com/watch?v=E-Ld8pIruV0
हा व्हीडीओ व खालील काही कमेन्ट्स वाचा.......
पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते, नवनवीन विषयांची माहिती मिळते.
जेव्हा कुंभमेळा चालू होता तेव्हा कायप्पा वर एक व्हीडिओ आला होता. Lifebuoy ने एक शिक्का बनवून घेतला आणि कुंभमेळ्यातील स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या प्रत्येक चपाती वर मारला.
"तुम्ही जेवायच्या आधी लाईफबॉय ने हात धुतले आहेत का?" अशा आशयाचा तो शिक्का होता.
म्हणजे एक क्लुप्ती लढवून, कमी खर्चात प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी मार्केटिंग केले.
तो व्हीडिओ इथे कसा अपलोड करायचा माहीत नाही.
In reply to पलकी शर्मा उपाध्याय ची "शोध पत्रकारिता" चांगली असते by चामुंडराय
https://youtu.be/rj_qn6ILA10?si=SbyIss52FrClJYkk
मनोरंजक आणि उत्कंठावर्धक.