हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ
आधीचा भाग : हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग २ : काही सागरी किनारे
आज सहलीचा तिसरा दिवस. लवकरच जाग आली आणि सहज म्हणून किनाऱ्यावर फिरायला बाहेर पडलो . आमचे हॉटेल पाळोळे किनार्याच्या अगदी दक्षिण टोकाला होते . काल संध्याकाळी ओंडक्यांवरून ढकलत आणलेल्या काही होड्या अजूनही किनाऱ्यावरच उभ्या होत्या .
समुद्राच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर वाहून आलेला हा स्टिंग रे/वाघळी मासा
पाळोळे बीच जेथे संपतो तेथे खडकांवरून पलीकडे जाण्यासाठी लाकडी ओंडके , फळ्यांचा जिना दिसला
त्या पार करून आम्ही बाजूच्याच एका छोट्या बीचवर दाखल झालो . येथेही हॉटेल आणि काही घरे दिसली . किनाऱ्यावर आणि समुद्रातही काही छोट्या होड्या दिसत होत्या .
एक होडीवाला जवळ आला आणि विचारू लागला , तुम्हाला समुद्र सफरीवर जायचे का? डॉल्फिन पॉईंट , मंकी पॉईंट, टर्टल रॉक , बटरफ्लाय बीच दाखवून आणतो . दर विचारला असता दहा आसनी बोट आहे, प्रत्येकी ५ ० ० /- घेईन असं सांगितलं . त्याला म्हटलं आम्ही बाजूलाच राहतो आहोत, तुझ्या बाकीच्या सीट भरल्या कि फोन कर, आम्ही येऊ . त्यावर त्याने लगेच सांगितले की सीट भरेपर्यंत वाट बघायची गरज नाही . दोन हजार द्या, तुम्हा चौघांना फिरवून आणतो . बटरफ्लाय बीच बद्दल आकर्षण होतेच . लगेच बोटीत बसलो व निघालो .
थोडेसे पुढे जाऊन अगोंदच्या दिशेने प्रवास सुरु झाला . बाजूलाच बेटासारखा एक डोंगर आला तो मंकी पॉईंट . दूरवरून माकडे दिसली नाहीतच . थोडे पुढे गेल्यावर आला डॉल्फिन पॉईंट . येथे मात्र नशीब जोरावर होते . दोन - तीन डॉल्फिन उसळी मारून जवळून गेलेले पाहायला मिळाले . आम्ही योग्य वेळी आलो होतो . सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसण्याची शक्यता जास्त असते असे समजले .
थोडे पुढे गेल्यावर आला टर्टल रॉक . अगदी कासवाचा आकार .
पलीकडच्या बाजूने हा खडक असा दिसतो .
जवळच एक उंच खडक होता. याचे नाव आठवत नाही . वर एक पक्षी बसला होता . बहुतेक गरुडच .
थोड्याच वेळात पंख पसरून त्याने भरारी घेतली.
आणि थोड्याच वेळात हा लपलेला बटरफ्लाय बीच दृष्टीपथात आला . दोन्ही बाजूने हिरवेगार डोंगर आणि मध्ये सोनेरी वाळूचा किनारा . याच्या आकारावरून याला बटरफ्लाय बीच नाव पडले असे नावाड्याने सांगितले .
हा लहानसा अर्धवर्तुळाकृती बीच आजूबाजूने खडकांनी वेढलेला आहे . अगोंद ते पाळोळे याच्या मध्यात हा किनारा असला तरी रस्त्याने येथे येणे सोईचे नाही . वाहन थेट किनाऱ्यापर्यंत पोहचू शकत नाही . पायी साधारण दोन किमीचा ट्रेक करावा लागतो आणि वेळही बराच जातो . अर्थात वेळ असल्यास जंगल वाटेने ट्रेक करून येथे येणेसुद्धा बऱ्याच जणांना आवडू शकते .
आम्ही किनाऱ्यावर दाखल झालो .
बाजूच्या खडकांवर काही लोक दिसत होते . आम्हीही तेथे चढून किनारा पाहण्याचे ठरवले . खूप सुंदर दृश्य होते ,
आता अगोंदा -पाळोळेहून येणाऱ्या अनेक बोटी दिसायला लागल्या .
निळसर / हिरवट स्वछ पाणी
आणि हा सोनेरी किनारा
बऱ्याच व्हिडिओत सांगतात कि येथे खूप फुलपाखरं आहेत म्हणून याला बटरफ्लाय बीच म्हणतात . ते खरे वाटत नाही कारण आम्हाला एकही फुलपाखरू दिसले नाहीत . याला हनिमून बीचही म्हणतात ते समजू शकते . आता येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली असली तरी पूर्वी युगलांना येथे चांगलाच एकांत मिळत असणार .
थोडावेळ थांबून परत फिरलो
आमचा नावाडी
परत येताना एका खडकावरून टिपलेला पाळोळे किनारा
रूमवर येऊन ताजेतवाने झालो . नाश्ता केला
दुपारी बाराच्या सुमारास बाहेर पडलो . आज लोलये -पैंगीणचे वेताळ आणि जमल्यास अजून एखाद्या समुद्र किनाऱ्याला भेट द्यायची होती . बाहेर कमी भावात मिळू शकल्या असत्या तरीही हॉटेलतर्फेच पाचशे रु .दराने दोन स्कूटर मागवल्या .
गाडीत एक लिटर पेट्रोल भरून दिलेले होते . अंदाजाने अजून एक लिटर पेट्रोल लागणार होते . गाडी आणून देणाऱ्याने आमच्याच मोबाईलने गाडीचा सर्व बाजूने व्हिडीओ घ्यायला लावला .
लग्नानंतर आठ-दहा वर्षे दुचाकीवर बरीच भटकंती केली होती पण त्यानंतर गेल्या तीस वर्षात आज भटकंतीसाठी प्रथमच स्कुटरवर बसणार होते . एकंदरीत आजची सफर रोमांचक होणार होती .
येथे लहानसहान दुकानांमध्ये एक लिटरच्या बाटलीत भरलेले पेट्रोल मिळते . (१ १ ० /-रु . लिटर ) दोन्ही स्कुटरला एक एक बाटली पाजली आणि निघालो .
अर्धा पाऊणतास हायवेने प्रवास केल्यावर लोलयेकडे डाव्या बाजूला वळलो. दाट झाडीतून जाणारा आणि जवळजवळ निर्मनुष्य असा सुंदर रस्ता. एकदोन ठिकाणी थोडीशी विचारणा केल्यावर आर्यादुर्गा मंदिर आणि वेताळ मूर्ती शोधायला फारसा वेळ लागला नाही .
आज जी वेताळ मंदिरे पाहणार होतो त्याची प्रेरणा श्री . प्रचेतस यांचा दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात हा लेख वाचून मिळाली होती . लेखात त्यांनी मंदिरांविषयी खूप चांगली माहिती दिली आहे .
आपण मात्र फोटोंमधूनच सद्यस्थिती समजावून घेऊया .
आर्यादुर्गा मंदिराची कमान
मंदिराचे प्रवेशद्वार बंद होते . आजूबाजूस विचारणा करावी तर कोणीही नाही
मंदिरास फेरी मारली . मागील बाजूने एक दरवाजा आहे तो ढकलून पाहिला आणि तो उघडलाही . आम्ही सभामंडपात दाखल झालो .
मंदिराचा
जीर्णोद्धार २ जून २ ० १ ९ रोजी झाला
आर्या दुर्गा देवी मंदिराच्या आसपास पोफळीची दाट जंगल आहे .
कमानी पुढून जाणारी वाट वेताळ मूर्तीकडे जाते . जास्त अंतर नाही .
भव्य वेताळ मूर्ती .
सुपारीच्या वृक्षांचा आधार घेऊन पसरलेली काळीमिरी
येथे साधारण अर्धा तास देऊन आम्ही निघालो पैंगिणकडे. प्रचेतस यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यालगतच आदिपुरुष मंदिर दिसले . त्यालगतच वेताळ मंदिरही . या दोन्ही मंदिरांनी कात टाकली आहे आणि आता अधिकच मोहक दिसतात .
आदीपुरुष मंदिर
मूर्तीच्या ऐवजी त्या जागी असलेला स्तंभ
जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचा फलक
काही पायऱ्या उतरल्यावर आहे ते वेताळ मंदिर
मंदिराची कमान
वेताळमूर्तीची प्राणप्रतिष्ठा १ मे २ ० २ ४ ला संपन्न झाली .
वेताळमूर्ती
मुखवटे
लाकडी छत
वेताळदेवाचा नैवद्य व दक्षिणा यादी
एकाच फोटोत आदिपुरुष व वेताळ देव मंदिर
पैंगीणला अजून एक मंदिर पाहीले ते म्हणजे श्री परशुराम मंदिर . गुगलने दाखविलेल्या रस्त्याने थोड्याच वेळात या मंदिरास पोहचलो .
पैंगीण येथे दोन परशुराम मंदिरे आहेत हे नंतर कळले . एक वेलवाडा येथे तर दुसरे महालवाडा येथे . महालवाडा यथील मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून तेथे परशुरामाच्या बरोबरीने नृसिंह हे दैवत आहे . (वेताळ मंदिरही महालवाड्यतच आहे असे वाचले )
आम्ही पोहचलो होतो वेलवड्यात .
येथील मंदिरात परशुरामाच्या बरोबरीने पुरुषोत्तम हे दैवत आहे . मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त मूर्ती मुख्य मंदिरातून बाजूस आणून ठेवल्या आहेत . फोटो घेऊ दिला नाही जुने मंदिर आतून पाहता आले .
मागील बाजूस पुष्करणी आहे .
दुपारचे साडेतीन वाजले . आता परत जाता जाता एक-दोन समुद्र किनाऱ्यांना ओझरती भेट द्यायचे ठरले .
गाल्जीबाग समुद्रकिनारा /टर्टल नेस्टिंग बीच ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननाच्या जागेसाठी संरक्षित बीच . अतिशय स्वच्छ आणि शांत किनाऱ्यावर कुठेही शॅक्स नाहीत
येथून पुढे पाटणे बीच
किनाऱ्यावर पोहचण्या आधी दोन्ही बाजूस दुकाने असलेला बाजार रस्ता लागला . दुचाकीमुळे बरेच आतपर्यंत जाता आले . संध्याकाळची वेळ होत आल्याने किनाराही बराचसा गजबजलेला दिसला .
येथे थांबण्या ऐवजी आपल्या रिसॉर्टला जाऊन सनसेट पाहू असे ठरवून लगेच निघालो . येऊन काउंटरला स्कुटरच्या चाव्या जमा केल्या . पैसे आगाऊ दिलेलेच होते . रूमवर येऊन लगेच किनाऱ्याकडील दरवाजा उघडून बाहेर येऊन बसलो .
सूर्य अस्ताला जात होता
आज दिवसभराच्या धावपळीत दुपारचे जेवणही झाले नाही. नाही म्हणायला लोलयेच्या मंदिरात दानपेटीत पैसे टाकून तेथीलच एक नारळ उचलला होता व बाजूला ठेवलेल्या कोयत्याने फोडून देवाला प्रसादही अर्पण केला व आम्हीही खाल्ला होता
आजही जेवण कालच्यासारखे किनाऱ्यावरच. आज आम्हा दोघींसाठी 'ब्लू लगून ' आले . (मॉकटेल का कॉकटेल ते नका विचारू) चव आवडली .
सहलीचा तिसरा दिवस संपला . प्रत्येक दिवसाचा अनुभव वेगळा. कोणता दिवस जास्त चांगला ते ठरवणे कठीण होतंय . सहलीतली रंगत वाढत चालली हे मात्र निश्चित .
क्रमश :
पुढील भाग
हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग ४ : परतीच्या प्रवासातील मंदिरे आणि कॅसिनो
वाचने
19278
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच
In reply to खूपच छान. लोलयेचा वेताळ खरेच by गवि
सूचनेबद्दल आभार
हा पण भाग आवडला
छान सुरुय लेखमाला आवडतंय
मस्त
समुद्रकिनारे, देवळे सगळंच भारी!
आवडला हाही भाग.
संपादकांना विनंती
नेहमीप्रमाणेच हा भागही
बोलकी चित्रे.
छान झालाय हा भाग! पुभाप्र!!
व्वा ... एक नंबर,
हा भागही खूप आवडला, पाळोळे
गोव्यातील पर्यटन
In reply to गोव्यातील पर्यटन by चंद्रसूर्यकुमार
कठीण आहे....
In reply to गोव्यातील पर्यटन by चंद्रसूर्यकुमार
दर वर्षी किमान एकदा तरी
In reply to गोव्यातील पर्यटन by चंद्रसूर्यकुमार
भांगरभूय किंवा गोवंश न्यूज
In reply to भांगरभूय किंवा गोवंश न्यूज by कंजूस
दुरुस्ती *गोवन न्यूज पेपर*
Wittyspace channel ( https:/
In reply to Wittyspace channel ( https:/ by कंजूस
तिने मलेशिया पण कव्हर केले
In reply to तिने मलेशिया पण कव्हर केले by गवि
कमीतकमी किती जाता येईल हे
In reply to कमीतकमी किती जाता येईल हे by कंजूस
अगदी रास्त सुचवणी !
In reply to कमीतकमी किती जाता येईल हे by कंजूस
उत्तम प्रतिसाद कंकाका..
हॉटेलच्या आणि टॅक्सी च्या
In reply to हॉटेलच्या आणि टॅक्सी च्या by रात्रीचे चांदणे
गोव्याच्या लोकांचा मजुरडेपणा...
१९८९ पासून गोव्यात जात आलो
कोकण
In reply to कोकण by चंद्रसूर्यकुमार
कोकणात पर्यटक हे
In reply to कोकणात पर्यटक हे by कंजूस
काहीही नवीन बदलास विरोध हा
In reply to कोकण by चंद्रसूर्यकुमार
चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व
In reply to चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व by टर्मीनेटर
.
In reply to चंद्रसूर्यकुमार, दुर्दैवाने तुम्ही उपस्थित केलेल्या जवळपास सर्व by टर्मीनेटर
कोकण
In reply to कोकण by चंद्रसूर्यकुमार
देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह
In reply to देवस्थानजवळ दारू नको हा आग्रह by टर्मीनेटर
धन्यवाद
In reply to कोकण by चंद्रसूर्यकुमार
छे छे,
In reply to छे छे, by सुबोध खरे
धन्यवाद
चर्चा करून काय होणार?
In reply to चर्चा करून काय होणार? by कंजूस
"चर्चा करून काय होणार?"
"मज्जा करायला आलेले, पिणारे, विविध प्रकारचे खाणं खाणारे, वाटेल तसे कपडे घालून फिरणारे पर्यटक चालवून घेण्याची मानसिकता स्थानिक कोकणवासियांकडे नाही. विषय संपला"असे जाहीर करण्यापेक्षा प्रत्यक्षात परिस्थिती तेवढीही निराशाजनक नाही हे चर्चेद्वारे स्पष्ट करून त्यांच्या मनात जर काही पूर्वग्रह असल्यास ते दूर होऊन त्यांनीही तळकोकणातल्या अफाट निसर्गसौंदर्याचा मनोसोक्त आनंद घ्यावा असे मनापासून वाटले म्हणून... बाकी काही नाही!In reply to चर्चा करून काय होणार? by कंजूस
आपण कोकण कन्या एक्सप्रेस
वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा
In reply to वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा by गवि
+१
In reply to वर काही ठिकाणी स्वस्त दारूचा by गवि
सहमत आहे ...
क्लिंटन, कोंकणात रत्नागिरीत
In reply to क्लिंटन, कोंकणात रत्नागिरीत by गवि
कोकण
In reply to कोकण by चंद्रसूर्यकुमार
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग,
In reply to तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला
In reply to तळकोकणात मालवण, सिंधुदुर्ग, देवबागला by टर्मीनेटर
आतुरतेने वाट बघतोय
In reply to आतुरतेने वाट बघतोय by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
युवर टाईम स्टार्ट्स नाउ :)
धाग्यावर गोव्याच्या अधिक-उणे मुद्द्यांवर बरीच चर्चा सुरु आहे .
खुप सुंदर फोटो आणि माहिती.
सर्व वाचकांचे आभार