आप की बदमाशियोंके....
"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
वाचने
122850
वाचनखूण
प्रतिक्रिया
590
In reply to इमानदार मुख्यमंत्री हेच by कांदा लिंबू
इथे महाराष्ट्राच्या
In reply to इथे महाराष्ट्राच्या by अमरेंद्र बाहुबली
का? तुमचे मुख्यमंत्री भाजपचे
In reply to स्वाती मालीवाल भाजप एजंट आहे. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
मालीवाल का मारपीट केस के बाद पहला इंटरव्यू:कहा- बिभव ने थप्पड़ और
'केजरीवाल को पाई-पाई की खबर थी' सुखपाल सिंह खैरा ने 'विदेशी फंडि
'जब मुझ पर हमला हुआ था तो CM केजरीवाल अपने घर पर थे मौजूद', स्वा
पलटूराम, केजरीवाल...
स्वाति मालीवाल और अरविंद केजरीवाल की बातों में नहीं, 7 सवालों के
पलटूराम "पार्टी महत्वपूर्ण नहीं है, देश को बचाना जरुरी है."
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या,
दिल्ली सीएम के PA की जमानत याचिका खारिज:मालीवाल ने कहा था- बि
In reply to दिल्ली सीएम के PA की जमानत याचिका खारिज:मालीवाल ने कहा था- बि by मुक्त विहारि
home/National/Swati Maliwal Case Arvind Kejriwal Pa Bibhav Kumar
In reply to home/National/Swati Maliwal Case Arvind Kejriwal Pa Bibhav Kumar by मुक्त विहारि
लिंक देत आहे ...
अमिरी और गरीबी...
दिल्ली में जल संकट को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची केजरीवाल सरकार,
अरविंद केजरीवाल के खिलाफ दिल्ली की महिलाओं का हल्ला बोल, मांगे 1
पानी पर हाहाकार! दिल्ली सरकार से सुप्रीम कोर्ट नाराज, पूछा- आपने
In reply to पानी पर हाहाकार! दिल्ली सरकार से सुप्रीम कोर्ट नाराज, पूछा- आपने by मुक्त विहारि
ह्याच घटने संदर्भात, अजून एक बातमी....
In reply to पानी पर हाहाकार! दिल्ली सरकार से सुप्रीम कोर्ट नाराज, पूछा- आपने by मुक्त विहारि
'हमें हल्के में न लें, नहीं तो हम...', केजरीवाल सरकार से सुप्री
केजरीवाल को अदालत से झटका, सीबीआई मामले में 12 जुलाई तक न्यायिक
In reply to केजरीवाल को अदालत से झटका, सीबीआई मामले में 12 जुलाई तक न्यायिक by मुक्त विहारि
भारतात लोकशाहीचा गळा दाबला
In reply to भारतात लोकशाहीचा गळा दाबला by पॅट्रीक जेड
म्हणजे तसाच का जसा नेहरू,
In reply to म्हणजे तसाच का जसा नेहरू, by टीपीके
ते मनोरंजन करत आहेत....
In reply to म्हणजे तसाच का जसा नेहरू, by टीपीके
किती दिवस नेहरूंच्या नावाने
In reply to किती दिवस नेहरूंच्या नावाने by पॅट्रीक जेड
चला नेहरू सोडा, पण 2004 ला
In reply to चला नेहरू सोडा, पण 2004 ला by टीपीके
काढा काढा पळ काढा शेटच्या
In reply to काढा काढा पळ काढा शेटच्या by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to काढा काढा पळ काढा शेटच्या by पॅट्रीक जेड
अहो आमचे सोडा, पण तुमचे काय?
In reply to अहो आमचे सोडा, पण तुमचे काय? by टीपीके
मग कधी बोलताय शेटच्या
In reply to मग कधी बोलताय शेटच्या by पॅट्रीक जेड
किती ती जळजळ केजरीवालांवर?
In reply to किती ती जळजळ केजरीवालांवर? by मुक्त विहारि
त्यांच्या बाजुने निकाल आला
In reply to भारतात लोकशाहीचा गळा दाबला by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
अरविंद केजरीवाल की बढ़ेगी और मुसीबत, अब इस मामले में एलजी ने कें
स्वाति मालीवाल ने केजरीवाल को लिखा 4 पेज का लेटर, दिल्ली सरकार प
home/Rajya/Swati Maliwal Attacks Arvind Kejriwal Government Says
परमपूज्य, राहुल गांधी यांनी पण केजरीवाल यांची तळी उचलली..
In reply to परमपूज्य, राहुल गांधी यांनी पण केजरीवाल यांची तळी उचलली.. by मुक्त विहारि
काहीच कळत नाही, म्हणजे
In reply to काहीच कळत नाही, म्हणजे by टीपीके
खरंच काही कळत नाही.
In reply to खरंच काही कळत नाही. by आग्या१९९०
अगदी अगदी
आपला तो बाबू दुसऱ्याच ते