शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174618
वाचनखूण
प्रतिक्रिया
559
महंगे टमाटरों के पीछे थोक व्यापारियों की मोनोपॉली
In reply to महंगे टमाटरों के पीछे थोक व्यापारियों की मोनोपॉली by मुक्त विहारि
शेतकरी
अपेक्षे प्रमाणे...
In reply to अपेक्षे प्रमाणे... by मुक्त विहारि
या आंदोलनात बहुसंख्येने सरदार
In reply to या आंदोलनात बहुसंख्येने सरदार by चित्रगुप्त
'आप' ने बुलाया इसलिये ??
पुन्हा रस्त्यावर अडथळे, खिळे
In reply to पुन्हा रस्त्यावर अडथळे, खिळे by आग्या१९९०
मागण्या किती आणि कोणत्या आहेत ?
In reply to मागण्या किती आणि कोणत्या आहेत ? by चित्रगुप्त
मागण्या त्याच आहेत, सरकारने
In reply to मागण्या त्याच आहेत, सरकारने by आग्या१९९०
मागण्या त्याच आहेत
In reply to मागण्या त्याच आहेत by मुक्त विहारि
सध्या चालु असलेली 'नौटंकी' पाहुन 'बंटी और बबली'
In reply to मागण्या त्याच आहेत, सरकारने by आग्या१९९०
हे बघा.
In reply to हे बघा. by चित्रगुप्त
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to पुन्हा रस्त्यावर अडथळे, खिळे by आग्या१९९०
ईतके ऊपाय चीन बोर्डर वर केले
फ्रान्स, जर्मनी, बेल्जीयम,
In reply to फ्रान्स, जर्मनी, बेल्जीयम, by आग्या१९९०
भाव भर्पूर आहे जमीनीला तेव्हा
In reply to फ्रान्स, जर्मनी, बेल्जीयम, by आग्या१९९०
तिथल्या शेतकर्यांनाही
In reply to तिथल्या शेतकर्यांनाही by अमरेंद्र बाहुबली
तो तिथल्या सरकारचा प्रश्न आहे
ज्यांचा शेतकरी आंदोलनाला
In reply to ज्यांचा शेतकरी आंदोलनाला by अमरेंद्र बाहुबली
सहमत आहे. ज्यांचा भारत
In reply to सहमत आहे. ज्यांचा भारत by अहिरावण
सरकारी पाठबळाच्या नोटा?? हा
In reply to सरकारी पाठबळाच्या नोटा?? हा by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या अगाध ज्ञानापुढे
In reply to तुमच्या अगाध ज्ञानापुढे by अहिरावण
मिपावर महान अर्थशास्त्रींची
In reply to मिपावर महान अर्थशास्त्रींची by अथांग आकाश
ते उडाले...
In reply to तुमच्या अगाध ज्ञानापुढे by अहिरावण
पळ काढण्याचा हा प्रकार थोडा
In reply to पळ काढण्याचा हा प्रकार थोडा by अमरेंद्र बाहुबली
असे का मग घ्या काढा !
In reply to असे का मग घ्या काढा ! by अहिरावण
सरकार म्हणजे पक्ष नाही हो.
In reply to सरकार म्हणजे पक्ष नाही हो. by अमरेंद्र बाहुबली
>>>सरकारात परिक्षा देऊन
In reply to >>>सरकारात परिक्षा देऊन by अहिरावण
नोटा प्रशासनाच्याच असतात,
In reply to नोटा प्रशासनाच्याच असतात, by अमरेंद्र बाहुबली
आणि प्रशासनावर तुमचा राग नाही
In reply to आणि प्रशासनावर तुमचा राग नाही by अहिरावण
मी कुठे बोललो? सरकारच्या नोटा
In reply to ज्यांचा शेतकरी आंदोलनाला by अमरेंद्र बाहुबली
ज्यांचा भाजप ला विरोध आहे
In reply to ज्यांचा भाजप ला विरोध आहे by सुबोध खरे
मविआ काळात तुम्ही युपीत होतात
In reply to मविआ काळात तुम्ही युपीत होतात by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
गंमतच आहे....
In reply to गंमतच आहे.... by मुक्त विहारि
व्वा. ठकास महाछक बनूनच ऊत्तर
In reply to गंमतच आहे.... by मुक्त विहारि
व्वा. ठकास महाठक बनूनच ऊत्तर
In reply to व्वा. ठकास महाठक बनूनच ऊत्तर by अमरेंद्र बाहुबली
हेही बघा.
In reply to हेही बघा. by चित्रगुप्त
मस्त व्हिडिओ आहे, विक्रम सिंह रॉक्स...
In reply to मस्त व्हिडिओ आहे, विक्रम सिंह रॉक्स... by टर्मीनेटर
तो विक्रमसिंह शेतकरीद्वेष्टा
In reply to तो विक्रमसिंह शेतकरीद्वेष्टा by अमरेंद्र बाहुबली
स्वामिनाथनची मुलगी MSP चे
पतंग से मार गिराया लाखों का ड्रोन
In reply to पतंग से मार गिराया लाखों का ड्रोन by मुक्त विहारि
अरे वा. शेतकरीद्वेष्ट्यांचे
In reply to अरे वा. शेतकरीद्वेष्ट्यांचे by अमरेंद्र बाहुबली
अगदी बरोबर.
In reply to अगदी बरोबर. by चित्रगुप्त
खलिस्तानी झेंडा?? नक्की कुठला
हा पण व्हिडियो बघा.....
टोमॅटोच्या कंटेनरमधून आखाती
In reply to टोमॅटोच्या कंटेनरमधून आखाती by आग्या१९९०
कांडा निर्यात उठवली
In reply to कांडा निर्यात उठवली by अहिरावण
शेतकर्यांपुढे शेतकरीद्वेष्टे
In reply to कांडा निर्यात उठवली by अहिरावण
उन्हाळ कांद्याची आवक पुढील
In reply to उन्हाळ कांद्याची आवक पुढील by आग्या१९९०
निवडणूकांना चांगले चांगले