मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट कप केक्स

नागनिका · · पाककृती
साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट . कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा. झटपट कप केक्स तयार मिनी कप केक्स केक उकलल्यावर आत melted चोकोलेट असल्याने याला मिनी चोको लावा केक सुद्धा म्हणू शकता.  चोको लावा केक

वाचने 8301 वाचनखूण प्रतिक्रिया 16

टर्मीनेटर Sat, 08/19/2023 - 21:46
झक्कास! एक प्रामाणिक शंका…
कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.
इथे कॅडबरी चॅाकलेट किंवा डार्क चॅाकलेट ऐवजी लिकर चॅाकलेटचा वापर केला तर चालेल का?

सौंदाळा Mon, 08/21/2023 - 13:16
भारीच खूप दिवसांनी नविन पाककृती आली आणि ती पण आवडणारी आणि सोप्पी वाटतेय.

Bhakti Wed, 08/23/2023 - 11:11
अभिनंदन छान केक्स बनवलेत. हा पदार्थ मी दोनदा केलाय, चांगला फसला.मग मी अप्पेपात्र निकृष्ट आहे हे ठरवून याच्या नादी लागले नाही :)

जुइ Wed, 08/23/2023 - 22:31
सोपा प्रकार दिसत आहे. एकदा करायला हवा!

स्नेहा.K. Sat, 08/26/2023 - 16:10
लॉकडाऊन मध्ये ओरिओ आणि बर्बनचे केक बऱ्याचदा व्हायचे. एकदा इडली पात्रामध्ये तयार करून चॉको इडल्या बनवल्या होत्या. 😀 पण चॉको चिप्स टाकून चॉको लावा केक तयार करायची आयडिया मस्त आहे.

In reply to by चौकस२१२

नागनिका Fri, 09/15/2023 - 18:14
बिस्किटे आधीच भाजलेली असतात मग असे परत भाजले गेल्याने हा "केक" कडवट नाही का होत? नाही होत. आपण ती भिजवतो ना.

झटपट टायटल पाहून धागा उघडला आणि आपण टायटल चुकीचे वाचले असल्याची जाणीव होऊन तोंड कडू झाले. परंतु धागा मात्र गोड आहे हे वे. सां न. ल.