मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठेपणा.....

कर्नलतपस्वी · · जे न देखे रवी...
भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला जाता जाता रवीने,कांचन ठेवा सांडला काही डोळ्यांनी टिपला,काही नदीने लुटला डोळ्याच्या कडांनी,मनाच्या तळी तो पोचला नदीने मात्र, मुक्तहस्ते नभाला देऊनी टाकला श्यामश्वेत मेघांनी,तो गिरी कंदरी वाटला चाखला डोलणाऱ्या बकांनी,ठाव सोनेरी जाहला पच्छीमेच्या मंद वाऱ्यांनी, त्यातला,थोडा किनारी आणला मोठेपणा नदीचा पाहूनी जीव माझा भारावला.

वाचने 3302 वाचनखूण प्रतिक्रिया 7

चित्रगुप्त Tue, 05/30/2023 - 19:53
मस्त हो भौ. 'भादव्याची सांज होती, शृंगार संध्येचा मांडला' यातल्या पहिल्याच शब्दावर जरा अडखळलो..ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.. . Cole Thomas : The Oxbow (The Connecticut River near Northampton 1836) . LEVITAN . GEORGE INNESS . GEORGE INNESS . GEORGE INNESS . ALBERT BIERSTADT, ESTES PARK, COLORADO, 1867.

कर्नलतपस्वी Wed, 05/31/2023 - 08:18
सुंदर प्रतिसाद. धन्यवाद. बादवे, फोरेन मधेपण भादवा असतो काय? सहज शंका आली म्हणून विचारलं.

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/01/2023 - 19:37
आणि त्यावर कहर चित्रे. मजा आली. --मात्र "भादव्याची सांज"- का बरे? "श्रावणाची" पण चालले असते. (भादव्याचा संबंध जरा "वेगळ्या" विषयाशी जुळतो म्हणुन--बाकी काही नाही)