सोसायटी आणि बॅचलर
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.
घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???
मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.
घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.
मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.
घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा
माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला. ह्या फोन मधे झालेला संवाद खालील प्रमाणे
मी:- नमस्कार सर, आताच घरी आलो, तुम्हाला करणारच होतो फोन
घरमालक:- ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुमच्याशी थोडे बोलायचे आहे.
मी: कशा संदर्भात???बोला ना???
घरमालकः- सोसायटी मधे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ५२ नं मध्ये काहि मुले रात्री मुलींना घेउन आले होते आणि त्यांना नको ते चाळे करताना पकडले गेले.
मी:- अच्छा (स्वगत :- आता बहुतेक हा घर सोडायला सांगणार)
घरमालक:- तुमच्या खाली राहाणार्या लोकांनी सांगितले आहे की काल तुमच्या कडे पण मुली आल्या होत्या.
मी:- तुमच्याशी मी ह्या विषयावर सोमवारी आल्या नंतर बोललेले चालेल का??? ह्या गोष्टी फोन वर बोलण्या पेक्षा प्रत्यक्ष बोललेले चांगले असे मला वाटते.
घरमालकः- ठीक आहे.
खरे तर मी कधिच माझ्या कुठल्याही मैत्रीणिला माझ्या रुमवर घेउन गेलो नाहिये. माझ्या रुममेट च्या मैत्रिणि येतात हे मला माहित होते. त्यामुळे वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी त्याला फोन लावला असता कळले. काल त्याची होणारी बायको दुपारी चार वाजता येवुन साधरणता सहा वाजेच्या सुमारास दोघेही बाहेर गेले होते. त्यावर मित्राला मी घरमालकांसोबत झालेले बोलणे सांगितले. त्यानंतर तो आमच्या घरमालकांना भेटायला गेला. तेव्हा त्याने सर्व परिस्थीती त्यांना समजावुन सांगितली.
माझा ह्या मित्राचे लग्न ठरले आहे, रीतसर घरच्यांनी साखरपुडा करुन दिलेला आहे. आता त्याची होणारी बायको आमच्या घरापासुन जवळच राहते. त्यामुळे सहाजिकच शनिवार्-रविवार ते बराच वेळ सोबतच घालवतात. कधी तिच्या रुमवर तर कधी आमच्या. बरेच वेळेस मी पण घरी असतो. मला त्यांच्या वागण्यात काहिच वावगे वाटत नाही. साधारणता सर्वसाधारण सभ्यतेचे नियम पाळुन तो किंवा ती कधिच एकमेकांकडे रात्री ९ नंतर थांबत नाहित. आता वस्तुस्थीति जाणुन घेतल्यावर आमच्या मालकांचे म्हणने पडले पहा जर टाळता आले तुम्हाला तर टाळा.
ह्या सगळ्यावर विचार करत असताना मला आठवले मि पा वरचा परा चा प्लेटॉनिक मैत्रीचा धागा. अजुनही समाज एका मुलिची आणी मुलाची विशुद्ध मैत्री असते असे मानत नाही का??? एक बॅचलर मुलगा आणि एक मुलगी सोबत आल्यावर नेहमी नको ते चाळेच करतात का??? आता माझ्या मित्राने काय करावे??? नेहमी भेटायला बाहेर कुठेतरी जाणे हे शक्य होत नाही. सार्वजनिक ठिकाणी ह्यांना प्रेमीयुगुल म्हणुन पोलिस त्रास देणार नाही कश्यावरुन??? एका व्यक्तिच्या बेजवाबदार वागण्यामुळे सर्वांना त्रास का???
असो तर आज रात्री मालकांना भेटायला जात आहे. त्यांना वरिल व अजुन काही प्रश्न विचारायची इच्छा आहे. बघा तुम्हाला काय वाटते. मी फक्त हे प्रश्न विचारुन घर बदलावे लागणार नाही अशी आशा करतो.
वाचने
15602
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
नाही
In reply to नाही by चिरोटा
आजूबाजूच्या लोकांचा काय संबंध?
In reply to आजूबाजूच्या लोकांचा काय संबंध? by चतुरंग
संपूर्ण
In reply to संपूर्ण by मेघना भुस्कुटे
असेच म्हणतो ...
In reply to नाही by चिरोटा
हे या
मस्त धागा आणि विषय ...
In reply to मस्त धागा आणि विषय ... by छोटा डॉन
डान्रावां
In reply to डान्रावां by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ सहमत!
In reply to +१ सहमत! by चतुरंग
सत्तेपुढे
In reply to मस्त धागा आणि विषय ... by छोटा डॉन
तुम्ही
मानतो पण
पालकांना
In reply to पालकांना by नितिन थत्ते
उद्या
In reply to उद्या by परिकथेतील राजकुमार
बरोबर ....
In reply to उद्या by परिकथेतील राजकुमार
असहमत
In reply to असहमत by चिरोटा
का बरे ????
In reply to का बरे ???? by छोटा डॉन
सर्व
In reply to सर्व by लिखाळ
करेक्ट ...
In reply to करेक्ट ... by छोटा डॉन
यावरुन एक
In reply to यावरुन एक by लिखाळ
झकास आहे!
In reply to झकास आहे! by मेघना भुस्कुटे
अजुन एक
In reply to अजुन एक by परिकथेतील राजकुमार
लिखाळची
In reply to यावरुन एक by लिखाळ
हा हा हा! म्हण झक्कास आहे!! :)
In reply to हा हा हा! म्हण झक्कास आहे!! :) by चतुरंग
हा हा हा ..
In reply to असहमत by चिरोटा
विचारु
In reply to उद्या by परिकथेतील राजकुमार
मान्य
In reply to मान्य by नितिन थत्ते
पण तुमचा
In reply to पालकांना by नितिन थत्ते
सहमत
In reply to सहमत by चिरोटा
बरोबर्.म्ह
In reply to बरोबर्.म्ह by निखिल देशपांडे
बिनतोड ...
In reply to बिनतोड ... by छोटा डॉन
+२
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगला
In reply to बरोबर्.म्ह by निखिल देशपांडे
मग
डॉन वगैरे
In reply to डॉन वगैरे by नितिन थत्ते
छे हो ...
In reply to छे हो ... by छोटा डॉन
बरोबर
In reply to बरोबर by नितिन थत्ते
मान्य आहे ...
अहो तो
मुलंच काय
In reply to मुलंच काय by क्रान्ति
क्रांतीता
कोणे एके काळी...
- वर उल्लेखलेले (तथाकथीत) संस्कृतीरक्षण ही त्यातील एक शक्यता आहे.
- पुर्वानुभवावरून जर रात्रीच्या वेळेस मोठमोठे आवाज करणार्या पार्ट्या झाल्या असल्यातर.
- स्वतःची मुले ही अडनिड्या वयात असताना त्यांना त्या वयाला न साजेसा "मेसेज" मिळू नये असे वाटणे.
बाकी माझ्या लेखी एखाद्या मुलाला जागा भाड्याने देताना संदर्भ आणि ओळख करून देणे हे कधिही चांगलेच. पण बर्याचदा ते दिसत नाही. तसे करण्याचा संबंध हा केवळ संस्कृतीशी नाही तर सुरक्षिततेशी पण आहे असे वाटते. उ.दा. मुंबई-पुणे विमानतळावरून येताना शेजारील तिशीच्या आसपासच्या तरूणाशी गप्पा मारत होतो. तो लंडनहून येऊन पुण्याला जात होता, मी बॉस्टनहून. त्याने आमच्या टॅक्सी ड्रायव्हरला नव्या मुंबईत थोडी वाकडी वाट करायला लावली. त्या अपरात्री दोन विद्यार्थीदशेतील मुले होती, त्यांना त्याने त्यांच्यासाठी लंडनहून आणलेले पार्सल दिले. नंतर पुढे रस्त्यावरून जाताना लक्षात आले की तो प्रथमच पुण्यात जात होता, ज्या घरात त्याने रुममेट म्हणून जागा घेतली होती ती त्याने नेटवरून शोधली होती, नक्की कुठे जात होता ते त्याला माहीत नव्हते आणि कदाचीत ज्यांच्याकडे जात होता त्यांना तोदेखील माहीत नव्हता... त्याने मला सांगताना तो बंगलोरचा आहे असे सांगितले. आता विचार करा, तो नक्की कुठला ते माहीत नाही, कुठतरी आडरस्त्यावर पार्सल देताना दिसतो (अर्थात याचा घरमालकाशी संबंध नाही), मग पुण्यात पोचल्यावर रस्ता शोधत आणि माणसांना शोधत तो ठरलेल्या ठिकाणी जातो. मला हे सर्व त्या घरमालकासाठीच नाही तर अगदी त्या मुलासाठीपण धोक्याचे वाटते... कारण जिथे राहणार आहे ते कसे आहेत याची कल्पना त्याला देखील नाही ही अवस्था... असो. वर थोडे विषयांतर झाले, पण घर भाड्याने देण्यात जसे संस्कृतीरक्षण वगैरे असू नये असे वाटते तसेच सुरक्षिततेचा मुद्दा असावा असे देखील वाटते. मात्र बर्याचदा नुसत्याच जागा विकत घेऊन भाड्याने देणारे, त्यांच्यावर पण जबाबदारी (लायाबिलीटी) असताना, "पैसे देणारी रिअल इस्टेट" व्यतिरीक्त यासर्व बाबींचा विचार करतात असे वाटत नाही.In reply to कोणे एके काळी... by विकास
सहमत
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
हाच मुद्दा...
In reply to कोणे एके काळी... by विकास
बाकी
चर्चा आणि
In reply to चर्चा आणि by अवलिया
आता
तुम्ही
काही विचार
वरील चर्चा
उत्तम चर्चा...
कफ परेड
In reply to कफ परेड by चिरोटा
थोडा खर्च
In reply to कफ परेड by चिरोटा
अतिशय
छान
काल ह्या
In reply to काल ह्या by निखिल देशपांडे
बरोबर
लवझोन हवाय
In reply to लवझोन हवाय by यन्ना _रास्कला
पेशल
अभंग
आत्तापर्य