दिवाळी अंक २०२२ - मंगळावर स्थलांतर
आपल्या सर्वांना माहीत आहे की स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्माण करणे या एकाच ध्येयासाठी काम करत आहेत.
२०५० सालापर्यंत १० लाख लोकांची वस्ती मंगळ ग्रहावर वसविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. अगदी १० लाख नाही, पण किमान मंगळ हा ग्रह मनुष्यासाठी राहण्यायोग्य होईल आणि काही हजार लोक तिथे स्थायिक होतील, अशी आशा करू या.
मंगळावर मानवाचे हे स्थलांतर का केले जात आहे? याची गरज काय आहे? हे स्वप्न कसे प्रत्यक्षात येईल? यात सर्वांना संधी असेल काय? राजकीय हेतू काय असतील? कोणकोणते देश यात सहभागी असतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भविष्यकाळात मिळतीलच, पण तरीही यातल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण या लेखाद्वारे प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी मंगळ ग्रह आणि तेथे मानवाचे वास्तव्य करण्यासंदर्भात जी माहिती उपलब्ध आहे आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलोन मस्क जे काम करत आहेत, त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
मंगळावर मानवाला स्थलांतर करण्याची गरज का आहे, हे आधी पाहू या. आपल्या सूर्यमालेत 'हॅबिटॅबल झोन'मध्ये केवळ दोनच ग्रह येतात - एक म्हणजे पृथ्वी आणि दुसरा ग्रह म्हणजे मंगळ. हॅबिटेबल झोन म्हणजे ताऱ्यापासूनचे असे क्षेत्र, ज्या अंतरावर सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी पुरेसे सुरक्षित वातावरण आणि परिस्थिती उपलब्ध आहे.
भविष्यात एक वेळ अशी नक्की येणार आहे की ग्रीन हाउस इफेक्टमुळे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आज उपलब्ध असलेले द्रव पाणी राहणार नाही. आणखी द्रव पाणी नाही म्हणजे आणखी जीवन नाही. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरील सजीव प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी हॅबिटेबल झोनमधील दुसर्या ग्रहावर स्थलांतरित होणे भाग आहे. आणि हीच मंगळावर स्थलांतर या मोहिमेची गरज आहे.मार्स उर्फ मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सर्वसाधारणपणे १४ कोटी मैल अर्थात २२.५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर आहे. पृथ्वीपासून मंगळ या ग्रहावर यात्रा करण्यासाठी कमीत कमी ८ महिने लागतात. आणि ही यात्रा २६ महिन्यांतून केवळ एकदाच करता येऊ शकते. मंगळ ग्रहाचे आपल्यापासूनचे किमान अंतर केवळ ३.३९ कोटी मैल अर्थात ५.४५ कोटी किलोमीटर एवढे कमी असते आणि अधिकतम (कमाल) अंतर २५ कोटी मैल अर्थात ४० कोटी किलोमीटरपेक्षा जास्त असते. याचे प्रमुख कारण आपली पृथ्वी सूर्याभोवती जवळपास गोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरते, तर त्या तुलनेत मंगळ ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. म्हणूनच आपल्याला मंगळावर जाण्यासाठी २६ महिन्यांतून एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येण्याची वाट बघावी लागते.
यासाठी स्पेस एक्सने खास तयार केलेल्या अत्याधुनिक रॉकेट 'स्टारशिप'चा वापर करावा लागेल, हे उघड आहे. स्पेस एक्सने फाल्कन अग्निबाणाच्या शेकडो चाचण्या घेतल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचल्या असतीलच. भविष्यकाळात दुसऱ्या ग्रहावर मनुष्यवस्ती निर्माण करण्यासाठी आपण आता सज्ज आहोत. तर २०१८पासून या स्टारशिप रॉकेटची निर्मिती सुरु आहे आणि पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी या परतीच्या प्रवासासाठी या रॉकेटचा अनेक वेळावापर होणार आहे. अनेक वेळा प्रवास करण्याची क्षमता बाळगून असणाऱ्या या स्टारशिप रॉकेटचे दोन भाग आहेत. यातला एक भाग सुपर हेवी बूस्टर आहे, जो पृथ्वीच्या तीव्र गुरुत्वाकर्षण शक्तीशी संघर्ष करून रॉकेटला अवकाशात नेऊन स्थापित करेल. त्यानंतर हा बूस्टर वेगळा केला जाईल आणि मंगळ ग्रहाच्या प्रवासासाठी त्याच्या जागी या रॉकेटला दुसरा बूस्टर लावला जाईल.
स्पेस एक्स नेतृत्व करत असलेल्या मंगळावर स्थलांतर मोहिमेचे काही ठळक टप्पे असे आहेत -
एप्रिल २०२५ - ५ स्टारशिप रॉकेट्स मार्सवर उतरवण्याची स्पेस एक्सची योजना आहे. ही रॉकेट्स उतरल्याबरोबर ७ फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढ्या क्षेत्रात मंगळावर सोलर पॅनेल्सचे जाळे उभारले जाईल. त्यासाठी रोबोट्स आणि स्वयंचलित वाहने वापरून मंगळावरची जमीन सपाट करून तयार ठेवली जाईल, म्हणजे भविष्यकाळात मंगळावर जेवढी रॉकेट्स येतील, त्यांना अडचण होणार नाही.
जून २०२७ - दोन स्टारशिप रॉकेट्स मंगळावर उतरतील, तेव्हा मंगळाची लोकसंख्या ३० होईल. थोडक्यात या दोन स्पेसशिप्समधून ३० मानव मंगळ ग्रहावर वास्तव्यासाठी येणार आहेत. त्यांच्यामागोमाग आणखी दहा स्टारशिप रॉकेट्स असतील, ज्यात या ३० लोकांच्या उपयोगाचे सर्व सामान असेल. या सामानापैकी मुख्य भाग अर्थातच या ३० लोकांच्या जेवणाचा असणार आहे, जेणेकरून त्यांना दीर्घ काळ मंगळावर वास्तव्य करता येईल. या ३० लोकांत डॉक्टर्स, वैज्ञानिक, इंजीनिअर्स आणि सैन्यातील काही लोक असतील. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर असलेले गुरुत्वाकर्षण ७०% कमी आहे. त्यामुळे या सर्व ३० लोकांना (कमी गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेल्या) मंगळावरील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ तर लागेलच. पण याचा दुसरा फायदा हा आहे की पृथ्वीवरून मंगळावर आणलेले जड सामान एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेणे सोपेही होणार आहे. या चमूतील काही वैज्ञानिक लगोलग मिथेन गॅसची निर्मिती सुरू करण्यासाठी काम सुरू करतील, ज्यामुळे स्टारशिप रॉकेट्समधील इंधनाच्या टाक्या ते पुन्हा भरू शकतील आणि ही रॉकेट्स अवकाशात पुन्हा झेप घेऊन पृथ्वीच्या दिशेने प्रवास करू शकतील. तर काही जीवशास्रज्ञ पृथ्वीवरून आणलेल्या काही रोपट्यांना मंगळावरच्या लाल मातीत वाढवण्याचा प्रयोग सुरू करतील, ज्यात टोमॅटो, बीन्स, मुळा, गाजर, बटाटा यासारखी जवळपास कोणत्याही वातावरणात वाढणारी कंदमुळे किंवा भाज्या प्रामुख्याने असतील. यांचा उपयोग मंगळावर खाण्यासाठीदेखील पुढे केला जाणार आहे. २०१५ साली मंगळावरील वास्तव्याचा वेध घेणारा एक सुंदर चित्रपट आला होता - 'The Martian'. या चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच जवळपास भाज्या आणि रोपटी मंगळावर वाढवली जाणार आहेत. उतरलेल्या चमूच्या सदस्यांची विष्ठा गोळा करून ते खत म्हणून वापरून या भाज्या आणि कंदमुळे उगवली जाणार आहेत. जुलै २०२९ - मंगळावरची लोकसंख्या आता ७६ने वाढलेली असेल. या प्रवासातदेखील अतिशय कुशल बॉटॅनिस्ट, वैज्ञानिक, इंजीनिअर्स इत्यादींना आणले जाईल. पण या हा चमू एका गोष्टीसाठी खास असेल. कारण पहिल्यांदा ४ सामान्य माणसेदेखील या चमूसोबत आलेली असतील. अर्थात हे ४ लोक तिकीट विकत घेऊन आलेले असणार आहेत. आता मंगळाची एकूण लोकसंख्या ३०+७६ म्हणजेच १०६ झालेली असेल. मानवासाठी निर्मित वस्तीमध्ये ग्रीन हाउस तयार केले जातील, जेणेकरून सूर्यप्रकाशाचा वापर करून भाज्या पिकवणे सोपे होईल आणि मंगळावरील सर्व रहिवाशांसाठी तिथेच अन्नाची सोय केली जाईल. ऑगस्ट २०३१ - मंगळावरची लोकसंख्या आता १६६ झालेली असेल. मंगळावर आता खोदकाम सुरु झालेले असेन. मंगळावरील जमिनीखाली मानवासाठी सुरक्षित वसाहत निर्माण करता येते का हे बघणे या खोदकामाचे प्रमुख मिशन आहे. एलोन मस्कची बोअरिंग कंपनी यासाठी अनेक वर्षांपासून तयारी करत आहे.सप्टेंबर २०३३ - मंगळाची लोकसंख्या आता ३५४ झालेली असेल.
आता जगभरातल्या अंतराळ क्षेत्रातील कंपन्या एव्हाना मंगळावर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पाठवण्यासाठी तयार झालेल्या असतील. जेफ बेजोस यांची अमेझॉन कंपनी ही आत्तापासूनच पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी अशी डिलिव्हरी सेवा देण्याच्या मॉडेलवर काम करत आहे. जेफ बेजोस यांनी ब्लू ओरिजिन ही कंपनी भलेही एलोन मस्क यांना व्यावसायिक स्पर्धा निर्माण करण्यासाठी निर्माण केली आहे. पण पुढे अॅमेझॉनच्या सर्व डिलिव्हरी याच कंपनीमार्फत केल्या जातील, यात काही शंका नाही. आता माशांनादेखील या यात्रेत मंगळावर वाढवून प्रयोग केले जातील.नोव्हेंबर २०३५ - मंगळाची लोकसंख्या ७४८ झालेली असेल.
हे वर्ष विशेष असणार आहे. कारण या काळात मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असेल. त्यामुळे नेहमी लागते त्या ७ किंवा ८ महिन्यांऐवजी मंगळावरून येणारे यान पृथ्वीवर केवळ ५ महिन्यांतच पोहोचेल. आतापर्यंत मानवासाठी राहण्यायोग्य अशा वसाहतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले असेल आणि मंगळावरचे पहिले हॉस्पिटलसुद्धा बांधायचे काम सुरू झालेले असेल. सप्टेंबर २०४० : या वर्षी मंगळाची लोकसंख्या झालेली असेल ३,३३१. स्पेस एक्सची सहकारी कंपनी बोअरिंग जमिनीखाली मेट्रोचे जाळे निर्माण करण्याच्या कामात व्यग्र असेल आणि मंगळावर वस्ती करण्यासाठी जगातील जवळपास सर्वच देशांना या वेळी संधी दिली जाईल. मंगळावर जन्म घेणारे पहिले बालकदेखील याच सुमारास आपल्याला बघायला मिळेल. जून २०४२ - मंगळावरची लोकसंख्या आता ७,०४० एवढी झालेली असेल. मंगळावर लोकसंख्या वाढल्यामुळे आणि ती वाढतच जाणार असल्यामुळे राजकीय धोरणे निश्चित केली जातील. कायदे निर्माण केले जातील आणि मंगळावरील नागरिक त्यांच्या समस्यांची उत्तरे तिथेच शोधू शकतील. पृथ्वीवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे पहिले पाऊल असेल. याच वेळी मंगळावरचे सर्वात पहिले रेस्टोरंट सुरु झालेले बघायला मिळेल. इथे बायो तंत्रज्ञानाने उगवल्या गेलेल्या भाज्यांचे खाद्यपदार्थ या रेस्टोरंटमध्ये मिळतील. ऑगस्ट २०४४ - स्टारशिप रॉकेटद्वारे पृथ्वीवरून मंगळावर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पाठवली जातील. नवीन जन्मलेल्या अर्भकांची काळजी घेतली जाईल. मार्सचे स्वतःचे एक मोठे पॉवर स्टेशन बांधण्याचे काम सुरू झालेले असेल, जेणेकरून सारखे सारखे पृथ्वीवरून सोलर पॅनल मागवण्याची गरज संपेल. ऑक्टोबर २०४६ - या वर्षात मंगळ ग्रहावरचे उंच शिखर माउंट ऑलम्पस - जे माउंट एव्हरेस्टपेक्षा अडीच पटीने मोठे आहे, यावर चढाई करण्यासाठी मंगळवासी प्रयत्न करतील. अर्थात मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याचा फायदा गिर्यारोहकांना मिळेल आणि ही चढाई यशस्वी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आतापर्यंत मंगळावर शिकण्यासाठी युनिव्हर्सिटी तयार होऊन तिचे काम सुरूदेखील झालेले असेल. शिवाय सोलर पॅनेल्स तयार करण्याची फॅक्टरी निर्माण झालेली असेल. बॅटरी रिसायकल करून मंगळावर चालवता येतील अशा गाड्यांची निर्मिती केली जाईल, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसर्या दूरच्या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल. फेब्रुवारी २०५१ - मंगळावरची लोकसंख्या आता १,४०,०००पेक्षाही जास्त झालेली असेल. या वर्षी देखील मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ आला असल्यामुळे खूप लोक मंगळावर येतील. पृथ्वीच्या जवळ आल्यावर आता २०,०००पेक्षाही जास्त प्रवासी प्रत्येक वेळी मंगळावर जायला सुरुवात झाली असेल. बोअरिंग कंपनीने मंगळाच्या जमिनीच्या आत मानवाला राहण्यास योग्य आणि एकमेकांना जोडलेली अनेक मार्गांची जाळी निर्माण केलेली असतील. आता यापुढील प्रगती वेगवान होईल. मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळवून झरे, नद्या निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल. मंगळावरील मुलांना पृथ्वीवर आणले जाईल. किंबहुना त्या वेळचे अनेक फोटो बघून कोणता फोटो पृथ्वीवरचा आणि कोणता मंगळावरचा हेही ठरवणे कदाचित अवघड होईल तर मानवाच्या मंगळ ग्रहावरील या स्थलांतराला शुभेच्छा आणि आपण सर्व लवकरच या सर्व अद्भुत इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करण्यासाठी या लेखाचा उपयोग झाला तरी पुरेसे आहे. धन्यवाद, सागर
जबरदस्त ! उत्तम डिटेलिंग .
जबरदस्त!!!!
In reply to जबरदस्त!!!! by मार्गी
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कितीही योजना आखल्या तरी
In reply to कितीही योजना आखल्या तरी by श्रीगुरुजी
हे होणारच
In reply to हे होणारच by सागर
ह्या मोहीमेमध्ये गुंतवलेल्या
In reply to ह्या मोहीमेमध्ये गुंतवलेल्या by कानडाऊ योगेशु
पैशांची वसुली हा मंगळ स्वारीचा मुद्दा गौण आहे.
लेख आवडला.
वाहवा ! बर्याच वर्षांंनी ..
In reply to वाहवा ! बर्याच वर्षांंनी .. by सुधीर कांदळकर
सौदी मध्ये आहे हा प्रोजेक्ट
प्रतिसादा बद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
छान माहिती!२०२५ दूर नाही.
मानव अकल्पित कल्पना...
In reply to मानव अकल्पित कल्पना... by कर्नलतपस्वी
संदर्भ हवाय
In reply to संदर्भ हवाय by सागर
सागरभौ,
In reply to सागरभौ, by कर्नलतपस्वी
माहितीबद्दल धन्यवाद
मार्स उर्फ मंगळ हा ग्रह
In reply to मार्स उर्फ मंगळ हा ग्रह by अमेरिकन त्रिशंकू
धन्यवाद
लेखात दिलेले अधिकतम अंतर
लेख आवडला ...
एकदम भारी लिहिलंय मित्रा. हे
In reply to एकदम भारी लिहिलंय मित्रा. हे by प्रचेतस
झकास माहिती दिलीस मित्रा :)
मस्त. अगदी पाच-दहा वर्षांनी
In reply to मस्त. अगदी पाच-दहा वर्षांनी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>> मंगळावर पोचल्यावर काही(शे
In reply to >>> मंगळावर पोचल्यावर काही(शे by प्रचेतस
+१ हेच म्हणतो
फारच उत्तम रोचक विषय आणि लेख.
In reply to फारच उत्तम रोचक विषय आणि लेख. by गवि
विषम परिस्थिती आहेच . पण इतकी वाईट नक्कीच नाहीये
In reply to विषम परिस्थिती आहेच . पण इतकी वाईट नक्कीच नाहीये by सागर
एका आकृतीत छान फिट केले आहेत
In reply to एका आकृतीत छान फिट केले आहेत by गवि
नासा ची किमया
In reply to विषम परिस्थिती आहेच . पण इतकी वाईट नक्कीच नाहीये by सागर
भन्नाट लेख! वरची Illustrative
In reply to विषम परिस्थिती आहेच . पण इतकी वाईट नक्कीच नाहीये by सागर
अगदीच गुरुत्वाकर्षण आणि
In reply to अगदीच गुरुत्वाकर्षण आणि by गवि
सहमत आहे
Sci-Fi चित्रपटाची पटकथा शोभावी असा मस्त
In reply to Sci-Fi चित्रपटाची पटकथा शोभावी असा मस्त by टर्मीनेटर
+१
रंजक माहिती
मस्त माहीती :)
In reply to मस्त माहीती :) by विनिता००२
अवश्य
मस्त माहीती :)
मस्त माहीती :)
मस्त माहीती :)
नेट प्रॉब्लेम :(
लेख आवडला, भविष्यात या
सविस्तर लेख आवडला.
फारच भन्नाट लेख आहे.
मी म्हणतो मंगळच का ?
In reply to मी म्हणतो मंगळच का ? by शेर भाई
मंगळच शक्य आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही.
In reply to मंगळच शक्य आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही. by सागर
अगदी योग्य मुद्दा अंतराचा.
In reply to अगदी योग्य मुद्दा अंतराचा. by गवि
मैने ऐसा तो नही कहा था.............
In reply to मैने ऐसा तो नही कहा था............. by शेर भाई
अजिबात नसावी. नष्ट होणे
अत्यंत रोचक