आज मी पेढे केले
आज सकाळी फोन वर यूट्यूबवर पेढ्यांची रेसिपी बघत होतो. सौ. मागे येऊन केंव्हा उभी राहिली मला कळले नाही. रेसिपी पाहून झाल्यावर मी मोबाइल बंद केला. सौ. समोर येऊन म्हणाली, "काय हुकूम आहे, महाराज". मी म्हणालो, हुकूम कसला. फक्त रेसिपी बघत होतो. त्यावर सौ, उद्गारली, "मला तुमची सवय माहीत आहे, थोड्या वेळानेच म्हणाल, "आज हा पदार्थ बनवशिल का? उद्या तो पदार्थ बनविणार का? बाकी आजकाल हुकूम देण्याशिवाय तुम्हाला दुसरे काम काय". तिचे खोचक बोलणे मला कळले, म्हणजे मी रिकामटेकडा आहे आणि रोज तिला कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देतो. आपण पण काही कमी नाही, मी उत्तर दिले, ही रेसिपी मी बनविणार, बघच तू. सौ. "मी मुळीच मदत करणार नाही, लक्षात ठेवा". आता चॅलेंज स्वीकार करणे भाग होते. या आधी पेढा सोडा, कधी साधा शिरा ही बनविला नव्हता.
पण म्हणतात ना, "जहाँ चाह, वहाँ राह". दोनशे ग्राम दुधाचे पावडर, 100 एमएल दूध, चार चमचे गायीचे तूप, अर्धी वाटी साखर घेतली. अर्धा चमचा वेलची पूड तैयार करून ठेवली. स्टीलची कढई गॅस वर ठेवली. गॅस सुरू करण्यापूर्वी, दोन चमचे तूप, साखर आणि दूध कढई टाकून व्यवस्थित ढळवून घेतले. त्यानंतर 200 ग्राम गायीच्या दूधाचे पावडर त्यात मिसळून व्यवस्थित ढळवून मिश्रण एकजीव करून घेतले. नंतर गॅस सुरू केला. गॅस स्लो ठेवला. किमान पाच ते सात मिनिटे मिश्रण सतत ढळवत राहिलो. सौ.ची मागून कामेन्ट्री सुरू होती, व्यवस्थित ढळवत रहा, नाही तर खालून जळून जाईल. मला काम करताना पाहून, निश्चित तिला आनंद होत होता. एकदाचे न जळता मिश्रण घट्ट झाले. आता त्यात वेलची पूड टाकली आणि मिश्रण एका ताटात काढून ठेवले.
मिश्रण थोडे थंड झाल्यावर दोन चमचे तूप त्यावर घातले आणि हाताला ही लावले. पण या कामासाठी सौ.ची मदत घ्यावीच लागली. सौ, मी आणि चिरंजीवाने पेढे टेस्ट करून बघितले. चिरंजीवने आंगठा वर करून पेढे स्वादिष्ट झाल्याची ग्वाही दिली. मनातल्या मनात विचार केला, काहीही म्हणा आज, सौ.ची चांगली जिरवली. मनात असा विचार करत होतो, तेवढ्यात सौ. म्हणाली, रक्षाबंधनसाठी किलो भर बेसनाचे लाडू करायचे म्हणते. लाडू मी वळून देईल, बाकी काम तुम्ही करू शकता. आता डोक्याची फ्यूज लाइट पेटली. सौ.ने टाकलेल्या जाळ्यात मी अलगद अटकलो होतो. शेवटी तिने रिकामटेकड्या माणसाला कामावर लावले.


वाचने
19260
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
छान!
पेढे पाहून तोंडाला पाणी सुटले.
तोंपासू
वाह काका
चांगले दिसताहेत. पण . . .
In reply to चांगले दिसताहेत. पण . . . by कंजूस
पावडरी पेढे बाजारात भरपूर आहेत.
In reply to पावडरी पेढे बाजारात भरपूर आहेत. by धर्मराजमुटके
आता, त्यांना पण प्रश्र्न पडला असेल की ...
पेढे
लेखही छान आणि पेढेही छान
In reply to लेखही छान आणि पेढेही छान by गवि
ता.क. (गायीचे)
In reply to लेखही छान आणि पेढेही छान by गवि
ऑ!
In reply to ऑ! by जेम्स वांड
फक्त पावशेर पेढे?
In reply to फक्त पावशेर पेढे? by गवि
आणखी एक. कोंकणात लहानपण
In reply to आणखी एक. कोंकणात लहानपण by गवि
सर किलोभर घ्या
In reply to सर किलोभर घ्या by जेम्स वांड
गोडमिट्ट, ब्राऊन, जिभेवर
In reply to गोडमिट्ट, ब्राऊन, जिभेवर by चौकस२१२
कोय=नंतर चाय मागे काडी
In reply to फक्त पावशेर पेढे? by गवि
गोकुळ खाल्ले आहेत की नाही?
In reply to गोकुळ खाल्ले आहेत की नाही? by आनन्दा
कोयना डेअरी
In reply to कोयना डेअरी by ज्ञानोबाचे पैजार
बरीच वर्षे रत्नागिरीस अजिबात
In reply to बरीच वर्षे रत्नागिरीस अजिबात by गवि
कुंथलगिरी देखील आहे :)
विवेकजी, छान प्रयत्न !!
छान. आता मथुरा पेढा करून बघा.
पुणे, ठाणे अनि मुम्बै येथे
In reply to पुणे, ठाणे अनि मुम्बै येथे by चौकस२१२
फिक्या पेढ्यांबद्दल माहीती नाही पण...
In reply to फिक्या पेढ्यांबद्दल माहीती नाही पण... by मिसळपाव
मी गुगल मराठी वर टंकलेखन करतो
In reply to मी गुगल मराठी वर टंकलेखन करतो by चौकस२१२
विनंती
In reply to विनंती by जेम्स वांड
मान्य पण गुगल टन्कन सोपे कसे
In reply to मान्य पण गुगल टन्कन सोपे कसे by चौकस२१२
बॅकस्पेस दाबून नको असलेले
In reply to मी गुगल मराठी वर टंकलेखन करतो by चौकस२१२
छे हो, तुमच्या लिखाणाबद्दल टिप्पण्णी करायची नव्हती.
छान खुसखुशीत लेख.
प्रतिसादसाठी सर्वांना धन्यवाद
In reply to प्रतिसादसाठी सर्वांना धन्यवाद by विवेकपटाईत
देख रहे हो ना (गवि) बिनोद ?
In reply to देख रहे हो ना (गवि) बिनोद ? by धर्मराजमुटके
मान गये.. चाराच नही उरा.
In reply to प्रतिसादसाठी सर्वांना धन्यवाद by विवेकपटाईत
छानच!
वा! मस्त
व्वा! छान दिसत आहेत पेढे.
वाह मस्तच
एकदम बढिया !
पेढे म्हणजे फक्त आमच्या
In reply to पेढे म्हणजे फक्त आमच्या by विजुभाऊ
या धाग्यावरही मोदी आणणे
In reply to पेढे म्हणजे फक्त आमच्या by विजुभाऊ
स्वतः सातारी असूनही
In reply to स्वतः सातारी असूनही by जेम्स वांड
द्या टाळी. कंदी पेढे हा
In reply to द्या टाळी. कंदी पेढे हा by गवि
हे हे हे हे
In reply to हे हे हे हे by जेम्स वांड
ये डर बना रहना चाहिए वरणा तुम
In reply to ये डर बना रहना चाहिए वरणा तुम by राघव
हम्म
In reply to द्या टाळी. कंदी पेढे हा by गवि
जगप्रसिद्ध मिठाई शास्त्रज्ञ आहेत का हे?
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022पेढे आवडले हो काका.
प्रतिसाद देणार्या सर्वांचे
दूध पावडर
औरंगाबाद
बडोदा येथील दुलीरामचे पेढे