ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग १)
त्याचे झाले असे की १९८९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना २५ सप्टेंबर १९८९ रोजी काँग्रेसविरोधी राजकारणातील एक महत्वाचे नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री देवीलाल यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत बोट क्लबवर विरोधी पक्षांची विराट सभा झाली होती. त्या सभेसाठी जगदीप धनकड यांनी राजस्थानातील त्यांच्या झुनझुनू या ठिकाणाहून ७५ ट्रकभरून लोक आणले होते. त्या सभेत ७ लाख लोक हजर होते असे मी अन्यत्र वाचले आहे. एका ट्रकमध्ये कितीसे लोक मावत असतील? मला नाही वाटत ५०-६० पेक्षा जास्त लोक एका ट्रकमध्ये मावत असतील. अगदी १०० लोक एका ट्रकमध्ये कोंबले असे धरले तरी एकूण सभेला उपस्थित असलेल्या लोकांच्या तुलनेत १% हून थोडे जास्त लोक धनकड यांनी आणले होते. खुद्द देवीलालांच्या लक्षात जगदीप धनकड यावेत असे त्यात काय होते कल्पना नाही. पण ते आले. त्यावेळी धनकड ३८ वर्षाचे होते. 'ये छोरा होनहार है' असे म्हणत देवीलालांनी त्यांना जनता दलाची झुनझुनूमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यापूर्वीचे १० वर्षे ते जयपूरला राजस्थान उच्च न्यायालयात वकीली करत होते. ते झुनझूनूमधून जिंकून लोकसभेत गेले आणि मग वि.प्र.सिंग यांच्या सरकारांमध्ये उपमंत्री होते.
पुढे १९९१ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या दोनेक महिन्यात त्यांनी राजीव गांधींचा विश्वास संपादन केला. त्यावेळेसही धनकड यांना झुनझुनूमधूनच उमेदवारी हवी होती पण १९८९ मध्ये स्वतः धनकड यांनी ज्यांना पराभूत केले ते काँग्रेस उमेदवार कॅप्टन अयुबखान यांची १९६५ च्या युध्दात वीरचक्र मिळाल्यामुळे असलेली ओळख आणि तसेच ते अल्पसंख्य समुदायातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारून धनकड यांना उमेदवार बनवायला राजीव गांधी तयार नव्हते. म्हणून शेवटी त्यांना अजमेरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्यासाठी राजीव गांधींनी स्वतः प्रचारसभा घेऊनही त्यांचा भाजप उमेदवाराने पराभव केला. पुढे १९९३ ते १९९८ या काळात धनकड राजस्थान विधानसभेत काँग्रेस पक्षाकडून आमदार होते. १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी परत एकदा झुनझुनूमधून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणुक लढवली. त्यावेळी त्यांच्यासमोर ज्येष्ठ नेते शीशराम ओला (तिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता त्याचे ते उमेदवार होते) आणि भाजपचे मदनलाल सैनी होते. त्या निवडणुकीत धनकड यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. धनकड यांचे त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले अशोक गेहलोत यांच्याशी जमायचे नाही. १९९८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत ८-९ महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही हा नियम काढून गेहलोत यांनी जगदीप धनकड यांचे तिकीट कापले. त्यानंतर धनकड १९९९ मध्ये काही महिने राष्ट्रवादीत आणि २००० मध्ये भाजपत सामील झाले.
जवळपास २० वर्षे भाजपत काढूनही भाजपने त्यांना कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी दिली नाही की कोणते महत्वाचे पद दिले नाही. तरीही ते पक्षात राहिले आणि आपल्या वकिलीत रमले होते. २०१२ च्या सुमारास दोन वर्षांनी होणार्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप स्वतःच्या बहुमताने सत्तेत येईल याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. तरीही ते भाजपमध्येच राहिले. काँग्रेसमध्ये परत जायचा विचार त्यांनी केला नाही. अशोक गेहलोत यांच्याशी त्यांचे जमायचे नाही हे एक कारण असू शकेल. म्हणजे १९८९ मध्ये देवीलालांच्या नजरेत ते भरणे जसे त्यांच्या पथ्यावर पडले त्याप्रमाणेच अशोक गेहलोत यांच्याशी न जमणेही त्यांच्या पथ्यावर पडले असे दिसते. हा त्यांच्या नशीबाचाच भाग म्हणायला हवा.
मधल्या वर्षांमध्ये जगदीप धनकड हे नाव विसरायलाच झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकींच्या वेळेस विकीपीडीया की अन्यत्र कुठे झुनझुनू लोकसभा मतदारसंघाविषयी वाचत असताना तिथे पूर्वी जिंकलेल्यांची नावे होती त्यात ते नाव वाचल्यावर 'अरे हे पण होते' हे आठवले. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे पक्षात कोणतेही पद न मिळता कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी न मिळताही जगदीप धनकड टिकून राहिले. गेल्या २० वर्षात रा.स्व.संघाशी त्यांनी जुळवून घेतले. लॉकडाऊनपूर्वी राजस्थानातील संघ पदाधिकार्यांची बैठक होती त्यासाठी मोहन भागवत राजस्थानात आले होते तेव्हा ते जगदीप धनकड यांच्या फार्महाऊसवरही आवर्जून गेले होते.वास्तविकपणे सर्वोच्च न्यायालयातील आघाडीचे वकील आहेत त्यांच्यात त्यांच्या नावाची गणना होते. पण कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, प्रशांत भूषण हे इतर त्याच लीगमधले वकील कोणत्या ना कोणत्या उचापात्या मधून मधून करत असतात. असे कशातही नाव धनकड यांचे सहसा येत नाही. तरी नाही म्हणायला त्यांच्या नावावर एक बट्टा म्हणजे काळवीट शिकारप्रकरणी त्यांनी सलमानखानचे वकीलपत्र घेतले होते ही एक वादग्रस्त केस त्यांच्या नावावर आहे. पण ती केस वगळता बातम्यांमध्ये यावी अशी कोणतीही केस त्यांनी लढवलेली नाही.
अशा जगदीप धनकड यांची निवड जुलै २०१९ मध्ये अचानक बंगालच्या राज्यपालपदावर झाली. नियमावर बोट ठेऊन ममता सरकारला ते व्यवस्थित नडले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ममता सरकारने बंगाल विधानसभेचे अधिवेशन ७ मार्चला बोलावायची शिफारस राज्यपालांकडे केली. पण राज्यपालांकडे शिफारस गेली त्यात एक घोळ होता. नेहमी सभागृहाची बैठक सकाळी ११ ला भरते (११ ए.एम) त्याऐवजी काही कारणांनी ती दुपारी २ ला भरवावी (२ पी.एम) अशी शिफारस ममता सरकारला करायची होती. पण ए.एम आणि पी.एम मध्ये घोळ झाला आणि राज्यपालांना गेलेल्या शिफारसीत विधानसभेची बैठक ७ मार्चला रात्री २ वाजता (२ ए.एम) बोलवावी अशी शिफारस गेली. ती शिफारस बघून राज्यपालांनी सरकारच्या मुख्य सचिवांना राजभवनावर बोलावून घेतले. पण ममता सरकार आणि राज्यपाल यांच्यातून विस्तव जात नसल्याने मुख्य सचिव तिथे गेलेच नाहीत. मग राज्यपालांनी सरकारने केलेल्या शिफारशीप्रमाणे ७ मार्चला रात्री २ वाजता विधानसभेची बैठक बोलावली. राज्यपाल मंत्रीमंडळाने केलेल्या शिफारशीला बांधील असतात आणि मला विधानसभेचे सत्र रात्री दोनला बोलवायची शिफारस आली त्याला मी काय करू असे त्यांनी म्हटले. मग पळापळ झाली. मुख्य सचिव राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी पी.एम च्या ऐवजी ए.एम लिहिणे ही चूक आहे हे राज्यपालांना सांगितले. त्यावर मग नियमावर बोट ठेऊन मंत्रीमंडळाच्या शिफारसीला आय.ए.एस अधिकारी कोणत्या आधारात चूक म्हणत आहेत हा प्रश्न विचारला. मग परत मंत्रीमंडळाने सुधारीत शिफारस राज्यपालांकडे पाठवली आणि विधानसभेची बैठक दुपारी २ ला बोलावण्यात आली. कलकत्त्याजवळचे जादवपूर विद्यापीठ हे दिल्लीतील जे.एन.युची कनिष्ठ आवृत्ती शोभावी असे आहे. तिथे तत्कालीन केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो गेलेले असताना सी.ए.ए च्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो की काय अशी परिस्थिती आली. हे कळल्यावर राज्यपाल जगदीप धनकड स्वतः तिथे गेले आणि आपल्या सुरक्षारक्षकांचा वापर करून त्यांनी बाबूल सुप्रियोंची सुटका केली.
भाजपने आतापर्यंत भैरोसिंग शेखावत आणि वैंकय्या नायडू या वरीष्ठ नेत्यांना उपराष्ट्रपतीपदाची संधी दिली आहे. शेखावत तर पक्षाचे खूपच मोठे नेते होते- वाजपेयी- अडवाणींच्या बरोबरचे. वैंकय्या नायडू तितके ज्येष्ठ नसले तरी बर्यापैकी वरीष्ठ होते. त्यामानाने जगदीप धनकड हे नाव एकदम किरकोळ दिसते. असे म्हटले जात आहे की शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने जाट समाज भाजपपासून दुरावला आहे त्याला एका जाटाला उपराष्ट्रपती करून परत जवळ करायचा प्रयत्न आहे. तसेच जगदीप धनकड हे सुध्दा शेतकरी कुटुंबातील आहेत. पण शेतकरी आंदोलनाचा राजस्थानात फारसा प्रभाव नव्हता. जो काही होता तो पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात. तसेच हरियाणा-पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट राजस्थानातील जाटांना आपल्या बरोबरचे मानतात का हा एक प्रश्न आहे. त्याहूनही मोठा प्रश्न म्हणजे असे कोणाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवून त्याचा निवडणुकांच्या राजकारणावर किती फरक पडतो? फार नसावा. नाहीतर प्रणव मुखर्जींना राष्ट्रपती केल्यावर काँग्रेसने बंगालमध्ये मोठे यश मिळवायला हवे होते. तसे झाले नव्हते.
असो. जगदीप धनकड यांना शुभेच्छा.In reply to आज सकाळी राऊत यांना ईडी ने by विजुभाऊ
" उठा" हे राउतंप्रमाणे वाचाळ नाहीतखरं सांगायचं तर उठाही राऊतांइतकेच बेताल बडबड करू शकतात/ करतात. फक्त फाटक्या तोंडाचे म्हणून राऊतांचा चेहरा पुढे दिसतो. स्वतः ठाकरेही तसलेच आहेत. २०२१ मध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री म्हणून उठांनी दिलेले उत्तर म्हणजे कोणाही मुख्यमंत्र्याने कोणत्याही विधानसभेत केलेले सगळ्यात अशोभनीय भाषण असेल. त्या भाषणात राज्याची एकूण स्थिती, सरकार पुढे काय करणार आहे, आतापर्यंत काय केले आहे वगैरे बोलणे अपेक्षित असते. त्याचा दुरूनदुरून पर्यंत संबंध उठांच्या भाषणात नव्हता. आणि 'शेतकर्यांना खिळे आणि चीनपुढे पळे' असले विधान त्यांनी केले होते. ते कितपत बरोबर होते चूक होते यात मी जातच नाही पण या दोन्ही गोष्टींचा महाराष्ट्राच्या स्थितीशी आणि सरकारशी काहीही संबंध नव्हता. सैनिक बिचारे सीमेवर लढत होते आणि शेतकरी आंदोलन का म्हणतात ते जे काही चालू होते ते उत्तर भारतात. मग महाराष्ट्र सरकार काय करणार याविषयी अवाक्षर न बोलता नुसता विरोधी पक्ष कसा वाईट, महाराष्ट्राचा अपमान वगैरे नेहमीची गंजकी टेप आणि असली विधाने करणे मुख्यमंत्र्यांना शोभणारे नक्कीच नव्हते. तेव्हा स्वतः ठाकरे जरी शिवसेनेचे प्रवक्ते झाले तरी आता जे काही चालू आहे त्यात कसलाही फरक पडणार नाही. तशीच निरर्थक आणि शिवराळ बडबड चालू राहिल.
In reply to सवतः ठाकरेही by क्लिंटन
तेव्हा स्वतः ठाकरे जरी शिवसेनेचे प्रवक्ते झाले तरी आता जे काही चालू आहे त्यात कसलाही फरक पडणार नाही. तशीच निरर्थक आणि शिवराळ बडबड चालू राहिल.एक फरक राहिल. संजय राऊत कितीही नाही म्हटले तरी तळागाळातुन आपल्या हिंमतीवर व कुवतीवर वर आलेले आहेत व लिखाणावर हुकुमत आहे. उध्द्वजी सोन्याचा चमचा तोंडात धरुन आलेले राजकारणी आहे. अजुनपर्यंत तरी त्यांच्या वकृत्वाचा अथवा लेखनाचा कस लागण्याचा कधी प्रसंग आला नाही. जे काही चार दोन मुलाखती होत्या त्यात टोमणे मारण्यपेक्षा जास्त काही करु शकलेले नाहीत.राऊतांच्या अनुपस्थितीत उध्द्वजींचा खरा कस लागेल.
In reply to तेव्हा स्वतः ठाकरे जरी by कानडाऊ योगेशु
राऊतांच्या अनुपस्थितीत उध्द्वजींचा खरा कस लागेल.कस लागेल असे वाटत नाही. त्यासाठी व्यक्तिमत्वात खमकेपणा असावा लागतो. लोकांशी नाळ जोडलेली असावी लागते. पाठीशी कोणत्याही वेळेस उभे रहाणारी कार्यकर्त्यांची फौज मॅनेज करायची तयारी असावी लागते.
In reply to धनकड यांचा हा इतिहास माहित नव्हता by वामन देशमुख
हेमंत बिस्वा यांच्याशी समांतर वाटचाल दिसते.हेमंत बिस्व सर्मा कधीकाळी कॉंग्रेसमध्ये होते हे खरे वाटणार नाही इतके भाजपत एकरूप झाले आहेत. जगदीप धनकड यांचे वर म्हटल्याप्रमाणे नशीब चांगले दिसतेच. त्यांच्या नशीबाने अजून एक घटक त्यांना अनुकूल दिसतो तो म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू बर्यापैकी सौम्य आहेत. ते समोरच्याला नडू शकत नाहीत. धनकड यांनी बंगालमध्ये राज्यपालपदावर असताना नियमावर बोट ठेऊन समोरच्याला चांगलेच नडायची क्षमता दाखवून दिली आहे. राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून तो गुण म्हणा की अवगुण म्हणा की जे काही असेल ते चांगलेच उपयोगी पडू शकेल. बहुतेक म्हणून नायडूंना दुसरी टर्म न देता धनकड यांना उपराष्ट्रपती बनविले जात आहे.
In reply to आणखी एक by क्लिंटन
ते समोरच्याला नडू शकत नाहीत.आप च्या गुप्तानी एका स्विस एन जि ओ चा भारतात कसे वाईट चालले आहे असा काहीतरी अहवाल संसदेच्या पटलावर ठेवायची विनंती केली तेव्हा उपराष्ट्रपती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी गुप्ताला अक्षरश: हाकलून दिले होते. ते हाकलून देणे भारी होते आणि गुप्ताला याची अपेक्षाच नव्हती. आव्वाक होऊन तो तिथेच उभा राहिला. मग तर त्यालाच सुनावले की त्या देशाने आपल्या देशात आणि युरोपात कसे चालले आहे ते पहावे भारताच्या बाबतीत नाक खुपसू नये. गुप्ताची हवाच गेली होती! त्यामुळे आवश्यक तेथे तेथे कडक भूमिका घेणारे व्यंकय्या नायडू आवडून गेले होते.
In reply to https://www.esakal.com/amp by गणेशा
In reply to सातवा टप्पा तयारी करणे आणि by रात्रीचे चांदणे
In reply to सातवा टप्पा तयारी करणे आणि by रात्रीचे चांदणे
In reply to ६ टप्पा missing आहे की by सुखी
In reply to सातवा टप्पा तयारी करणे आणि by रात्रीचे चांदणे
In reply to https://www.esakal.com/amp by गणेशा
In reply to https://www.esakal.com/amp by गणेशा
In reply to माध्यमातून तिरस्कार आणि राग by निनाद
In reply to संदर्भ बहुतेक येथे आहे. by Trump
In reply to चमत्कारिक म्हणायला हवं by जेम्स वांड
In reply to पाठिंबा घेण्यासाठी फडणवीस या by श्रीगुरुजी
In reply to कळत नाही by जेम्स वांड
१. फडणवीस बेभरवशाचे आहेत ?
हो आणि नाही.
हो यासाठी की ते कोणाचाही (अगदी आपल्या कट्टर समर्थकांचा सुद्धा) आणि केव्हाही विश्वासघात करू शकतात आणि केलेला आहे.
नाही यासाठी की ते कोणत्या प्रसंगात कसे वागतील हे नक्की सांगता येते. खुर्चीसाठी ते कोणत्या तडजोडी करतील, कोणाशी तडजोडी करतील या गोष्टी छातीठोकपणे सांगता येतात.
२. का फडणवीस ruthless राजकारणी आहेत ?
होय व त्यापेक्षा ते जास्त विश्वासघातकी आहेत. मोदी सुद्धा रूथलेस आहेत, पण ते आपल्या खुर्चीसाठी सर्व तत्वे बासनात गुंडाळून समर्थकांचा विश्वासघात करीत नाहीत व खुर्चीसाठी देशाचे नुकसान करीत नाहीत. तसेच ते दिवसाचे २४ तास फक्त आपली खुर्ची व बाकी इतर गोष्टी गेल्या खड्ड्यात एवढाच विचार करीत नाहीत.
३. का फडणवीसांच्या खेळींचे काही फारसे बरे मत नाही तुमचे ?
या व्यक्तीने राज्याचे, पक्षाचे व माझ्यासारख्या कट्टर भाजप समर्थकांचे अतोनात नुकसान केले आहे. अश्या व्यक्तीविषयी काय मत असणार?
In reply to १. फडणवीस बेभरवशाचे आहेत ? by श्रीगुरुजी
In reply to पटण्या सारखेच आहे by जेम्स वांड
In reply to ह्याचे एक कारण हे असावे कि by कानडाऊ योगेशु
ह्याचे एक कारण हे असावे कि महाराष्ट्रामध्ये फडणवीसांसारखा कार्यक्षम नेता दुसरा कुणी नसावा.किंवा किमान तसे भासवणारा, पण असे म्हणल्यास मोदी शहांना महाराष्ट्रातील राजकारणाची चाड अन् जाण नाही म्हणावे लागेल ते मला वाटते फारच साहसी विधान असेल. पहिल्या पाळीत महाराष्ट्रात जलयुक्त शिवार सारख्या योजना राबविणारे फडणवीस मराठा आरक्षणावर इतके ठाम होते की बोलता सोय नाही. मराठे मागास आहेत का नाहीत ह्यावर माझे मत राजकीय वाटेल म्हणून इथे टाळतो देणे, पण त्यांना आरक्षण देण्यात फडणवीसांना काय राजकीय फायदा दिसला ते अनाकलनीय आहे.
चंद्रकांत पाटील तर स्वत;च्याच मतदारसंघातुन पळालेले नेते आहे. पंकजाताई पराभूत झाल्यात. आणि तसेही शरद पवारांच्या समोर उभा राहायला तसाच धूर्त व प्रसंगी कपटी नेता हवा .चंद्रकांत पाटील पळून गेल्यावर त्यांचे कोथरूड सारख्या ब्राह्मण आमदार असणाऱ्या मतदारसंघात पुनर्वसन भाजप पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय अन् त्यांच्या नॉलेजमध्ये असल्याशिवाय होईल का ? पंकजा तसेही रेसमध्ये टिकणार नव्हत्या मागील पराक्रम पाहता फडणवीसांनी एखाद ओबीसी नेता आयात पण केला असता, उरता उरला तो शरद पवारांना टक्कर देणारा नेता वगैरे वगैरे तर हे विशफुल थिंकिंग झाले, पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे. राजकारणात सोयीच्या सगळ्या युती कायम दिसून येतीलच असे नाही.
गडकरी सज्जन नेते आहेत. हे गुण फडणवीसांमध्ये असल्याने दिल्ली हायकमांडने त्यांच्यावर जबाबदारी दिली असावी.माफ करा पण इथे तुमचे गडकरींचे असेसमेंट पूर्णतः चुकले आहे जरी नाही तरी ऑफ द मार्क असल्याचे नमूद करू इच्छितो. हे त्याचे लेटेस्ट उदाहरण
In reply to हम्म्म माझे चार शब्द खालीलप्रमाणे by जेम्स वांड
फडणवीस मराठा आरक्षणावर इतके ठाम होते की बोलता सोय नाही. मराठे मागास आहेत का नाहीत ह्यावर माझे मत राजकीय वाटेल म्हणून इथे टाळतो देणे, पण त्यांना आरक्षण देण्यात फडणवीसांना काय राजकीय फायदा दिसला ते अनाकलनीय आहे.
२०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा देण्याचा अध्यादेश काढला होता. त्याचे कायद्यात रूपांतर करताना फेब्रुवारी २०१५ मध्ये फडणवीसांनी फक्त मराठ्यांना १६% राखीव जागा देण्याचा कायदा दोन्ही सभागृहात मान्य करून घेतला. या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला.
अश्या वेळी सर्वोत्तम राजकीय निर्णय म्हणजे या निर्णयाविरूद्ध फडणवीसांनी सर्वोच्च न्यायालयात जायला हवे होते. २-३ वर्षे खटला चालून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हा कायदा नाकारला असता. त्यामुळे आपल्या ब्राह्मण समर्थकांना न दुखावता फडणवीस त्यातून सुखरूप सुटले असते.
आपण काहीही केलं तरी ब्राह्मण मतदार आपल्या विरोधात जाणारच नाहीत (हे गृहीतक बरेचसे बरोबर आहे कारण अराखीव जागांचे प्रमाण कमी झाल्याने आपले नुकसान झाले आहे हेच बऱ्याच ब्राह्मणांना अजून समजलेच नाही. मिपावरील बहुसंख्य ब्राह्मणांचे मत पहा.), समजा विरोधात गेले तरी त्यांच्या ३-४ टक्के मतांनी जे काही थोडे नुकसान होईल व ते नुकसान अधिकच्या मराठा मतातून भरून निघेल, जे पृथ्वीराज चव्हाण, पवार यांना उभ्या हयातीत जमले नाही ते मी करून दाखविणार जेणेकरून मराठ्यांची बहुसंख्य मते मला मिळतील या समजूतीतून फडणवीसांनी काहीही करून पुढील निवडणुकीपूर्वी मराठ्यांना राखीव जागा देण्यासाठी कंबर कसली. मराठ्यांना कायदेशीर मार्गाने मागास ठरविण्यासाठी एक मागासवर्गीय आयोग नेमला ज्यात बहुसंख्य मराठा सदस्य होते व अध्यक्षही मराठा होते. आधीच ठरविल्याप्रमाणे या आयोगाने सर्वेक्षण वगैरे करण्याचा देखावा करून मराठे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत वगैरे निष्कर्ष काढलेला अहवाल तयार करून दिला. त्या अहवालाआधारे फडणवीसांनी मराठ्यांना शैक्षणिक संस्थां मध्ये व सरकारी नोकऱ्यात तब्बल १६% टक्के राखीव जागा देण्याचा कायदा दोन्ही विधीमंडळात कोणतीही चर्चा न करता अवघ्या काही सेकंदात मान्य करून घेतला. त्यामुळे राखीव जागांचे प्रमाण ७८% झाले व राऊडिंगमुळे हेच प्रमाण ८५-९०% तर काही ठिकाणी १००% झाले. परंतु त्यामुळे अराखीव वर्गातून प्रवेश मिळणाऱ्या ब्राह्मण विद्यार्थ्यांची संधी खूप कमी होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले. हा कायदा होण्यापूर्वी फडणवीसांनी सारथी नावाची संस्था स्थापन करून त्या संस्थेद्वारे मराठा विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारच्या सवलतींचा व शिष्यवृत्तींचा वर्षाव केला.
दुर्दैवाने फडणवीसांचे सर्व अंदाज चुकले. काही ब्राह्मण मते विरोधात गेलीच, परंतु सर्व सवलती व राखीव जागा मिळूनही अधिकची मराठा मते न मिळता २०१४ पेक्षा कमी मराठा मते भाजपला मिळून जागा कमी होऊन सत्ता गेली. मराठा मते कमी होण्याचे कारण उघड आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये हा राखीव जागांचा कायदा रद्द केला आहे. ते करताना मराठा मागास आहेत हा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सुद्धा अस्वीकृत करून नाकारला आहे.
फडणवीस परंतु मुख्यमंत्री झाले तर पुन्हा एकदा अश्याच काहीतरी लांड्यालबाड्या करून मराठ्यांना राखीव जागा द्यायचा प्रयत्न करतील.
चंद्रकांत पाटील तर स्वत;च्याच मतदारसंघातुन पळालेले नेते आहे. पंकजाताई पराभूत झाल्यात. आणि तसेही शरद पवारांच्या समोर उभा राहायला तसाच धूर्त व प्रसंगी कपटी नेता हवा .
चंद्रकांत पाटील पळून गेल्यावर त्यांचे कोथरूड सारख्या ब्राह्मण आमदार असणाऱ्या मतदारसंघात पुनर्वसन भाजप पक्षश्रेष्ठींच्या आज्ञेशिवाय अन् त्यांच्या नॉलेजमध्ये असल्याशिवाय होईल का ? पंकजा तसेही रेसमध्ये टिकणार नव्हत्या मागील पराक्रम पाहता फडणवीसांनी एखाद ओबीसी नेता आयात पण केला असता, उरता उरला तो शरद पवारांना टक्कर देणारा नेता वगैरे वगैरे तर हे विशफुल थिंकिंग झाले, पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे. राजकारणात सोयीच्या सगळ्या युती कायम दिसून येतीलच असे नाही.
पाटलांनी लबाडी करून सर्वात सुरक्षित मतदारसंघावर डल्ला मारला. पंकजा मुंडे व खडसेंच्या सुनेला फडणवीसांनीच पाडले. बावनकुळेंना व तावडेंना उमेदवारी नाकारली कारण हे सर्वजण आपले प्रतिस्पर्धी आहेत असे फडणवीसांना वाटते. यातील तावडे वगळता उरलेले इतर मागासवर्गीय समाजातील असल्याने काही इतर मागासवर्गीय मते सुद्धा भाजप विरोधात गेली. परिणामी भाजपला विदर्मात १५ व एकूण १९ जागांचा फटका बसला. खरं तर जवळपास ४० जागांचा फटका होता, परंतु आयारामांमुळे २० जागा वाढल्या.
फडणवीस भविष्यात पवार, शिंदे, उद्धव अश्या कोणाबरोबरही युती करू शकतात. In reply to बऱ्याच मुद्द्यांशी सहमत. by श्रीगुरुजी
पण फडणवीस हे पवारांच्या समोर उभे राहण्यापेक्षा पवारांच्या सोबत उभे राहण्यास उत्सुक असल्याचे कायमच दिसून आले आहे.काय वाट्टेल त्या तडजोडी करून, आपल्या विचारसरणीशी पूर्णपणे विरोधी पक्षाशी संगनमत करून, घरे फोडून, अगदी काहिही करून सत्तेत वा सत्तेच्या परिघात रहायचे. आपल्या पाळीव संपादकांकडून त्याला बेरजेचे राजकारण असे नाव द्यायचे, ही महाराष्ट्राची पुलोद परंपरा. आणि आता हीच राजकिय संस्कृति. ती लवकरात लवकर विलयाला जावो.
In reply to सत्तेचा परिघ by अनन्त अवधुत
In reply to काहीही by शाम भागवत
In reply to काहीही by शाम भागवत
In reply to त्याचं काय आहे शामराव... by जेम्स वांड
In reply to आपले स्पष्ट मत मांडल्याबद्दल by शाम भागवत
In reply to आपले श्रम कारणी लागल्याबद्दल by श्रीगुरुजी
In reply to पैसे न खाणारा मंत्री योग्यच by कानडाऊ योगेशु
In reply to आपले स्पष्ट मत मांडल्याबद्दल by शाम भागवत
In reply to मध्यमवर्ग किंवा उच्चमध्यमवर्ग by कॉमी
In reply to मध्यमवर्ग किंवा उच्चमध्यमवर्ग by कॉमी
In reply to मध्यमवर्ग किंवा उच्चमध्यमवर्ग by कॉमी
In reply to मध्यमवर्ग किंवा उच्चमध्यमवर्ग by कॉमी
पॉलिसी लेव्हलवर कोण काय करते ह्याबद्दल ममव मतदारवर्गाला ना फारशी माहिती असते ना फिकीर.पॉलिसी मेकर्स नेता मिळणे ही मुश्किल आहे. इन फॅक्ट बर्याच बाजारबुणग्यांच्या भाऊ गर्दीत एखादाच नेता अशी धमक दाखवतो. त्यामुळे सत्तेवर जो आला आहे /येणार आहे तो स्वतःची तुंबडी आधी भरणार हे माहीती असताना ह्या मध्यम वा उच्च मध्यम वर्गीयाने देखील त्या त्या वर्गाचे अनुनय करणार्या पक्षाला प्राथमिकता दिली तर बिघडले कुठे.
In reply to काहीही by शाम भागवत
In reply to ऑं?? by अनन्त अवधुत
In reply to पटण्या सारखेच आहे by जेम्स वांड
In reply to परत एकदा रघुराम राजन by क्लिंटन
In reply to रघुराम राजन यांनी स्वतःचे हसु by सुक्या
In reply to ह्याला काहीच अर्थ नाही by जेम्स वांड
In reply to श्री क्लिंटन यांचे आम्ही by सुक्या
प्रश्न आहे तो चड्डीत राहण्याचाअसं लोकांच्या चड्डीची मापं अन् त्यांनी त्यात राहावं अशी अपेक्षा आम्ही तरी ठेवत नाही, किंवा इतक्या दिव्य सणसणीत लेव्हलला जाऊन चर्चाही करू शकत नाही, त्यामुळे विषयानुरूप अन् नीट भाषेत प्रतिसाद असल्यासच काहीतरी बोलता येईल, इतके म्हणून खाली बसतो सरजी. - (नाडा चड्डी अन् इज्जत घट्ट आवळून घाबराघुबरा बसलेला) वांडो
In reply to ह्याला काहीच अर्थ नाही by जेम्स वांड
In reply to नाही by क्लिंटन
In reply to मी by जेम्स वांड
In reply to रघुराम राजन यांनी स्वतःचे हसु by सुक्या
In reply to परत एकदा रघुराम राजन by क्लिंटन
In reply to दोन प्रकारचे अर्थशास्त्री by विवेकपटाईत
In reply to आपले पंत प्रधान हे दुसर्या by आग्या१९९०
In reply to देशाच्या अर्थव्यवस्थेचा by चौकस२१२
In reply to आपले पंत प्रधान हे दुसर्या by आग्या१९९०
In reply to अज्ञानी आणि अर्थशास्त्राचे by विवेकपटाईत
In reply to अज्ञानी आणि अर्थशास्त्राचे by विवेकपटाईत
बँकांचा हातात तरल पैश्यांची कमतारता होती. जनधन खाते आणि नोट बंदी, ह्यांनी बँकांना संजीवनी दिली.हायला. आमच्या अडाणी अर्थशास्त्रात बँकांना 'तरल पैसे' (liquidity) पुरवायला CRR आणि SLR रेट कमी जास्त करतात, मनी मार्केट ऑपरेशन्स करतात... पण विंटरनॅशनल इकॉनॉमिक्स शिकलेले तद्न्य डायरेक्ट नोटबंदी करतात. हहपुवा
In reply to बँकांचा हातात तरल पैश्यांची by कॉमी
In reply to दोन प्रकारचे अर्थशास्त्री by विवेकपटाईत
In reply to भारी आवडलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to दोन प्रकारचे अर्थशास्त्री by विवेकपटाईत
In reply to आपले पंतप्रधान हे दुसऱ्या कोटीतील अर्थशास्त्री आहेत. by Nitin Palkar
In reply to अगदी याच पध्दतीने नोटाबंदीची by शाम भागवत
In reply to परमीट राज रद्द करण्याचा by आग्या१९९०
In reply to परत एकदा रघुराम राजन by क्लिंटन
In reply to राजन यांना आर्थिक सल्लागार by मनो
In reply to १. राजन हे सप्टेंबर २०१३ ते by शाम भागवत
In reply to सौदी अरेबियात ८ हजार वर्ष जुन्या शहराचा शोध.... by मुक्त विहारि
In reply to काहीही असो, संजय राऊत यांच्या by उगा काहितरीच
काहीही असो, संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याला ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे.हो. ना. आणि ईडी कधीही आपल्या घरी पायधूळ झाडू शकते हे माहित असूनही ११-१२ लाख घरात ठेवण्याइतका आत्मविश्वास कुठून पैदा झाला हे देखील नवलच आहे.
In reply to ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे by धर्मराजमुटके
संजय राऊत यांच्या सारख्या नेत्याला ११-१२ लाखासाठी अटक झाली हे जरा अती वाटत आहे.त्यांना त्यासाठी अटक झालेलीच नाहि. त्यांच्या घराची झडती घेताना ती रक्कम सापडली इतकेच.
In reply to संजय राऊत यांच्या सारख्या by विजुभाऊ
In reply to ते मान्य आहे. by धर्मराजमुटके
In reply to संजय राऊत यांच्या सारख्या by विजुभाऊ
In reply to ११-१२ लाख रुपयांमुळे by कानडाऊ योगेशु
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal SongIn reply to खानावळीतील २ खानांची होलसेल by मदनबाण
''महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देतील, असा विश्वास बाळगतो,'यापुढे, आपण घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपण्याचा आणि संवैधानिक जवाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न कराल त्याचबरोबर कमी, महत्वाचे, आणि योग्य ते बोलाल अशी अपेक्षा व्यक्त करून एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपणास क्षमा करतो. काळजी घ्या. तब्येतीला जपा. शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (महाराष्ट्रीयन)
In reply to राज्यपालांची माफ़ी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काहीही चुकीचे बोलले नसतानाही by श्रीगुरुजी
In reply to राज्यपालांची माफ़ी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राज्यपालांची माफ़ी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राज्यपालांची माफ़ी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पत्राचाळ घोटाळा व त्यात संजय by श्रीगुरुजी
In reply to पुरावे कुठे आहेत? मी संजय by आग्या१९९०
In reply to दिलेली बातमी संपूर्ण वाचावी. by श्रीगुरुजी
In reply to पुरावे म्हणजे कागदपत्र by आग्या१९९०
In reply to म्हणजेचं संजय राऊतांचे वाधवान by रात्रीचे चांदणे
म्हणजेचं संजय राऊतांचे वाधवान कुटूंबाबरोबर फार जुने संबंध आहेत.वाधवान कुटुंबिय पी.एम.सी बँक आणि येस बँक घोटाळ्यात आहेत. पी.एम.सी बँकेला बुडविले एच.डी.आय.एल कंपनीने आणि येस बँकेला बुडविण्यात डी.एच.एफ.एल (दिवाण हाऊसिंग फायनान्स) ही एक कंपनी होती. एच.डी.आय.एल चे प्रवर्तक आहेत राकेश आणि सारंग वाधवान हे दोन भाऊ तर डी.एच.एफ.एल चे प्रवर्तक आहेत कपिल आणि धीरज वाधवान हे भाऊ. राकेश आणि सारंग हे कपिल आणि धीरजचे चुलतभाऊ आहेत. राकेश आणि सारंग वाधवाननी पी.एम.सी बँकेला अगदी पध्दतशीरपणे धुतले. त्यांना उंची गाड्याचा शौक होता. फेरारी- लॅम्बॉर्गिनी वगैरे घ्यायची असेल तर सरळ पी.एम.सी बँकेच्या चेअरमनला फोन करून 'दे दो पैसा' अशी ऑर्डर जायची. मग पी.एम.सी बँकेकडून वाधवान बंधूंना गाडी विकत घ्यायला कार लोन दिले न जाता एच.डी.आय.एल कंपनीच्या बॅलन्स शीटवर पी.एम.सी बँकेकडून कर्ज दिले जायचे आणि तिथून 'मनी लाँडरींग' करून हे वाधवान बंधू कंपनीतून पैसे आपल्या खिशात टाकायचे. पी.एम.सी बँकेच्या एकूण लोन बुकच्या बराच मोठा भाग एकट्या एच.डी.आय.एल ला दिलेल्या कर्जाचा होता. एच.डी.आय.एल मधून मनी लाँडरींग झाल्याने पी.एम.सी बँकेला कर्जाची परतफेड होणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये पी.एम.सी बँक अडचणीत आली. येस बँकेची कथा वेगळीच आहे. पूर्ण भारतीय बँकिंगमधील सगळे एन.पी.ए येस बँकेच्या लोन बुकमध्ये होते असे म्हटले तरी चालेल. पण सी.ई.ओ राणा कपूर ज्या कारणाने जवळपास दोन वर्षे तुरूंगात होता ती केस डी.एच.एफ.एल ची. डी.एच.एफ.एल कंपनी बाँड विकून पैसे उभे करायची आणि ते पैसे गृहकर्जासाठी द्यायची. मधला व्याजातील फरक हे त्या कंपनीचे उत्पन्न होते. डिमॅट अकाऊंटमधून पूर्वी 'कॉर्पोरेट बाँड' मध्ये डी.एच.एफ.एल च्या बाँडना अर्ज करा अशाप्रकारच्या एन्ट्री २०१८ पूर्वी बघितल्याचे माझ्या लक्षात आहे. तशा जाहिराती अनेकांनी बघितल्या असतीलच. तर डी.एच.एफ.एल च्या वाधवाननी आपल्या एच.डी.आय.एल च्या चुलतभावांप्रमाणे 'मनी लाँडरींग' केले आणि बाँड विकून उभे केलेले पैसे कंपनीतून काढून स्वतःच्या खिशात घालायला सुरवात केली. या डी.एच.एफ.एल चे ३७०० कोटींचे बाँड विकत घ्यायला येस बँकेच्या राणा कपूरांनी मान्यता दिली. क्रेडीट रिस्क टिमने हे बाँड अजिबात घेऊ नयेत अशी शिफारस केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करून राणा कपूरांनी ते बाँड येस बँक विकत घेईल असा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसातच राणा कपूरांच्या पत्नीच्या बँक खात्यात आणि मुलींच्या कंपनीत काही कोटी रूपये अचानक आले. हे पैसे डी.एच.एफ.एल च्या वाधवानने दिले होते. म्हणजे वाधवानला मनी लाँडरींग करायला राणा कपूरांनी मदत केली आणि त्या बदल्यात स्वतः 'कट' घेतला. खातेदारांचे पैसे राणा कपूर वाधवानांच्या खिशात टाकणार आणि त्याबद्दल स्वतः 'कट' घेणार अशी सगळी रचना होती. तर हे वाधवानांचे असे सगळे किळसवाणे रॅकेट आहे. येस बँक त्यामानाने मोठी असल्याने रिझर्व्ह बँक आणि सरकारने धावपळ करून ती बँक वाचवली आणि काही दिवसात खातेदारांना पैसे काढायची परवानगी मिळाली. पण पी.एम.सी बँक लहान असल्याने त्या बँकेला वाचवायला इतकी धावपळ झाली नाही त्या बँकेच्या खातेदारांचे अतोनात हाल झाले. शेवटी जानेवारी २०२२ मध्ये युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत पी.एम.सी बँकेचे विलीनीकरण होणार अशी बातमी आली. विलीनीकरण खरोखरच झाले की नाही काय माहिती. त्या बँकेचे खातेदार दोन वर्षांपेक्षा जास्त काळ अडचणींना तोंड देत होते. आपली सगळी आयुष्यभरची पुंजी गेली म्हणून अनेकांनी आत्महत्या केल्या. अशा वाधवानांबरोबर संजय राऊतांचे संबंध असतील तर ते नक्कीच धक्कादायक आहे. पी.एम.सी बँक बुडविण्यातही त्यांचा वाटा होता का याचीही चौकशी व्हायला हवी. पत्रा चाळीतील ६५० मराठी कुटूंबांना रस्त्यावर आणण्याबरोबरच हे पी.एम.सी बँकेला धुवायचे पापही त्यांच्या माथी आहे का याचीही चौकशी व्हावी.
In reply to धक्कादायक by क्लिंटन
In reply to 2G स्पेक्ट्रम वाटपातील by आग्या१९९०
In reply to ?? by क्लिंटन
In reply to 2G स्पेक्ट्रम वाटपातील by आग्या१९९०
In reply to अमेरिका लोकसभेच्या सभापती by श्रीगुरुजी
कदाचित तैवान विरूद्ध चीन युद्ध सुरू होऊ शकते.चीनमधली अंतर्गत शांतता सांभाळणे अशक्य झाले तरच चीनचे सर्वेसर्वा अशा प्रकारचे निर्णय घेतील असे वाटते. मात्र यात भारतही ओढला जाईल हे नक्की.
In reply to त्यामुळे आपल्या ब्राह्मण by चौकस२१२
In reply to त्यामुळे आपल्या ब्राह्मण by चौकस२१२
In reply to सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी by क्लिंटन
In reply to आज आचार्य बाळकृष्ण यांचा by विवेकपटाईत
बेचर्या आयएमए वाल्यांना किती दुख झाले असेल)टेन्शन घेऊ नका काका. आयमए वाल्यांना काय दुःख बि:ख झाले नसेल. सगळ्यांना, आचार्य बाळकृषणांसकट सगळ्यांना शेवटी ऍलोपॅथी लागते. आयुर्वेदाची प्रगती झाली तर आयएमए चा धंदा बंद पडायला अजून चिक्कार अवकाश आहे.
In reply to आज आचार्य बाळकृष्ण यांचा by विवेकपटाईत
विश्व भेजस संहिता (World Herbal Encyclopaedia) चे 51 खंडांचे लोकार्पणऔषधी वनस्पतींची माहिती आणि लागवड हे रामदेव बाबांनी हे फार मोठे कार्य केले आहे यात शंका नाही. यासाठी मला पतंजलि चे कार्य फार भावते. सातत्याची टीका होत असूनही त्यांने आपले कार्य जिद्दीने चालू ठेवले आणि पूर्णत्वास नेले. पतंजलि आरोग्यासाठी कार्य करते औषधासाठी नाही हे पण त्यांचे एक वेगळेपण आहे.
In reply to औषधी वनस्पतींची माहिती by निनाद
In reply to राहुल गांधींनी लिंगायत पंथाची by श्रीगुरुजी
In reply to हे काय नवीन? by क्लिंटन
In reply to हा माणूस कोणत्या वेळी काय by श्रीगुरुजी
In reply to हे काय नवीन? by क्लिंटन
In reply to हे काय नवीन? by क्लिंटन
In reply to हे काय नवीन? by क्लिंटन
बाकी लिंगायतांमध्ये जानवे घालतात का?हो
In reply to ऐकावे ते नवलच !! by जेम्स वांड
In reply to नसेल विकलेला, आम्हाला by श्रीगुरुजी
In reply to नसेल विकलेला, आम्हाला by श्रीगुरुजी
In reply to अजून वाचा by जेम्स वांड
In reply to मोदी प्रचारात काय म्हणतात by श्रीगुरुजी
In reply to नक्कीच ! by जेम्स वांड
In reply to नक्कीच ! by जेम्स वांड
In reply to मोदींनी वापरण्यावर कोणी हरकत by डँबिस००७
In reply to ऐकावे ते नवलच !! by जेम्स वांड
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हण नका, उलट चहावाल्याचा मुलगा म्हणा. कारण चहा आमचे वडील विकत होते. त्यांनी इवल्याशा टपरीवर चहा विकून आम्हा सहा भावंडांना मोठं केलं आहे. तुम्ही पंतप्रधानांना चहावाला बोलून मोठी चूक करताय.”माझ्या आकलनानुसार मोदींच्या बंधुंचा उद्देश स्वतःच्या वडिलांना ग्लोरिफाय करण्याचा असावा. म्हणजे एका चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला आणि नरेंद्र मोदींनीही राजकारण करताना त्या त्या तत्सम वेळी स्वतःला चहावाला म्हणुन पोलिटिकली करेक्ट स्टँड घेतला असावा.
In reply to वांड साहेब .तुम्ही दिलेली by कानडाऊ योगेशु
In reply to मला वाटतंय by जेम्स वांड
In reply to मी वाचलेल्या माहिती नुसार by सुबोध खरे
In reply to असं म्हणता ! by जेम्स वांड
In reply to Modi's father sold tea at a by सुबोध खरे
In reply to The stories of how, as a kid, by सुबोध खरे
In reply to Prime Minister Narendra Modi by सुबोध खरे
आज सकाळी राऊत यांना ईडी ने