विस्मृतीत गेलेले पदार्थ २ - लशुन पायसम अर्थात लसणाची खीर
विस्मृतीत गेलेल्या पदार्थाच्या अनुशंगाने आजची पाककृती आहे लशुन पायसम अर्थात लसणाची खीर.
असे म्हणतात की पुरुष हे उत्तम बल्लवाचार्य असतात (माफ करा माझा स्त्री पुरुषांमध्ये भेद करण्याचा कोणताही हेतु नाही, ही फक्त म्हण किंवा धारणा आहे). मी २ पुरातन काळातील व्यक्तींची नावे सांगतो त्यामुळे या धारणेला पुष्टी मिळु शकेल
१. पांडवांपैकी एक असलेला भीम - विजनवासात असताना भीमाने विराट राजाच्या महाली बल्लवाचार्य म्हणुन काम केले होते. आता प्रचलीत असलेल्या श्रीखंडाचा जनक म्हणजे भीमच.(याबद्द्ल पुढच्या लेखात)
२. नल राजा : निषाद राजा नल म्हणजेच महाभारतातील प्रसिद्ध नल दमयंती या जोडीतील राजा. आज आपण बघत असलेल्या पाककृतीची व्युत्पत्ती राजा नलानेच केली आहे.
लसणाच्या खीरीकडे वळण्याअगोदर राजा नलाबद्द्ल थोडेसे.
निषाद राजा नल हा सर्वगुण सम्पन्न होता, त्याच्या तावडीत सापडलेल्या एका हंसाने त्याला विदर्भ (महाराष्ट्रातील) देशाच्या राजा भीम याची राजकन्या दमयंती बद्दल सांगितले . राजा तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकुन दमयंतीच्या प्रेमात पडला व तसेच त्याच हंसाने दमयंतीला राजा नलाबद्द्ल सांगितले. दमयंती पण मनोमन नलावर प्रेम करु लागली व दोघेही एकमेकांसाठी झुरु लागले.
पुढे भीमराजाने दमयंतीसाठी स्वयंवर ठेवले व त्यात देशोदेशींच्या राजांना निमंत्रण पाठवले. दमयंती च्या सौंदर्यामुळे मोहुन जाऊन ईन्द्र, वरुण्,यम , अग्नी इत्यादी देवताना तिच्या बरोबर विवाह करावासा वाटला. पण त्यांना दमयंतीचा संकल्प ठाऊक होता की ती नलराजालाच वरेल. त्यांनी नलराजाला गाठुन त्यांचा दुत म्हणुन दमयंती कडे जाउन या देवतांना निवडण्याचा प्रस्ताव दिला. पण राज नलाने त्यांना विनम्रपणे नकार दिला व म्हणाला की दमयंती फक्त आणि फक्त मलाच वरेल .
आता या देवतांनी ठरवले की आपण सर्व जण राजा नलाचे रुप घेवुन स्वयंवरामध्ये जावुया व नल व दमयंती ची परिक्षा घेवुया.
नल राजा व इतर सर्व जण राजा नलाचे रुप घेवुन स्वयंवरामध्ये पोहोचले पण दमयंतीने बरोबर ख-या नल राजाच्या गळ्यातच वरमाला टाकली. त्यामुळे बरेचसे देव नाराज झाले व काही नल व दमयंती परीक्षेला सफल झाले म्हणुन संतृष्ट झाले व त्यांनी दोघांना अनेक आशिर्वाद व वर दिले.
त्यातला एक वर यमराजाने नल राजाला दिला तो म्हणजे की "तु सुपशास्त्रात(म्हणजेच पाकशास्त्र) प्रविण हो "
पुढे उभयंतासमोर खुप अडिअडचणी आल्या व दोघांची ताटातुट झाली. त्या काळात कफल्ल्क झालेल्या नल राजाने अयोध्येच्या राजा त्रुतुपर्ण च्या दरबारी बल्लवाचार्य म्हणुन काम करायला सुरुवात केली.
तेथे त्याने पाकशास्त्रामध्ये असंख्य प्रयोग केले , नव नविन पाककृतींचे निर्माण केले. या सर्व पाककृतींचा व तसेच आहार व त्रूतुबद्द्ल व पाक गृहातील निगडीत असलेल्या अनेक गोष्टींसाठी एक विस्त्रुत ग्रंथ लिहिला तो म्हणजे "पाक दर्पणम" . हा ग्रंथ पुढे जावुन नलपाकदर्पणम म्हणुन प्रसिद्ध झाला.
संस्कृत मध्ये लिहिलेल्या या ग्रंथामध्ये अनेक शाकाहारी व मांसाहारी पदार्थान्ची रेलचेल आहे.या ग्रंथात साधारणतः ११ प्रकरणे आहेत व ७६१ संस्कृत श्लोक आहेत .
त्यातील चौथे प्रकरण हे अनेक प्रकारच्या पायसम साठी लिहिलेले आहे त्यात पहिली पाककृती जी आहे ती म्हणजे विचीत्र लशुन पायसम अर्थात लसणाची खीर.
आपल्या सुदैवाने जवळपास ५००० वर्षांपुर्वी लिहिलेल्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत ही आजही वाराणसीतील संपुर्णांनंद संस्कृत विद्यापीठात उपलब्ध आहे. व अनेक पाक विशारदांनी या ग्रंथाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद केला आहे. त्यातील एक प्रसिध्द मराठी अनुवाद हा १८९३ साली गोदावरी पंडित यांनी केला आहे. माझ्याकडे त्या पुस्तकाची प्रत आहे पण न जाणो का या लसणाच्या खीरिचा त्यात समावेश केला गेला नाही.
साहीत्य
सोलुन घेतलेल्या लसणाच्या १० पाकळ्या
दुध - १ लिटर
साखर - १ कप
वेलची पुड
बदाम काप, पिस्ता काप
सजावटी साठी - सुक्या गुलाबाच्या पाकळ्या
कृती:
सर्वप्रथम लसणाचा कच्चा वास जाण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेवुन त्यात लसणाच्या पाकळ्या टाकुन ५ ते ७ मिनीटे उकळवुन घ्यावे.
व गरम पाणी फेकुन देवुन त्या पाकळ्या थंड पाण्याने धुवुन बाजुला काढुन ठेवाव्यात.
दुसर्या पातेल्यात १ लिटर दुध घेवुन ते अर्धा लिटर होईस्तवर आटवुन घ्यावे. त्यात आता उकडलेले लसुण, साखर घालावी , वेलची पूड व थोडे बदाम/पिस्ता काप टाकावेत.
एका स्मॅशर ने दुधातले लसुण दाबुन घ्यावेत. दुध आता पुढ्चे १५ ते २० मिनिटे उकळवुन घ्यावे.
आता १५/२० मिनिटांनंतर खीर तयार आहे. व त्यात गुलाबाच्या पाकळ्या पेरुन खायला द्यावी.
आमच्या रेसिपी ची लिन्क
https://www.youtube.com/watch?v=vjad6dSmUYw&t=106s
आयुर्वेदानुसार या खीरीचे महत्व असे की हि पित्तशामक व व्याधीनाशाक आहे.
थोडे अवांतरः या खीरीला उत्तरेकडे बेनामी खीर पण म्हणतात , कारण यासाठी की बर्याच जणांना खीरीत लसुण ही कल्पनाच सहन होणार नाही म्हणुन हे नाव. माहीत नसताना खीर खाल्यावर लोकांना कळतच नाही की त्यात लसुण आहे म्हणुन. माझ्या लेकीला कच्च लसुण आवडत नाही पण माहीत नसल्याने तीने ही खीर गट्ट्म केली.

वाचने
12631
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मस्त . करून पहातो
भन्नाट लागणार हे. लसूण आवडत
धन्यवाद
मस्तच
जबरदस्त
लसुण आणि दुध एकत्र?
धन्यवाद
सुरवातीच्या माहितीबद्दल आभार.
वेगळीच पाककॄती
अजून एक अनवट पाककृती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by यश राज
पायसम मनापासून आवडते ओणमला
In reply to पायसम मनापासून आवडते ओणमला by टर्मीनेटर
धन्यवाद सर
In reply to पायसम मनापासून आवडते ओणमला by टर्मीनेटर
धन्यवाद सर
In reply to पायसम मनापासून आवडते ओणमला by टर्मीनेटर
खूप धन्यवाद
In reply to पायसम मनापासून आवडते ओणमला by टर्मीनेटर
खूप धन्यवाद
In reply to पायसम मनापासून आवडते ओणमला by टर्मीनेटर
खूप धन्यवाद
छान पाकृ. पित्तशामक आहे तर
पुरुष हे उत्तम बल्लवाचार्य असतात- सहमत!In reply to छान पाकृ. पित्तशामक आहे तर by श्वेता व्यास
धन्यवाद
मस्तच! फोटो खुपचं सुंदर.
In reply to मस्तच! फोटो खुपचं सुंदर. by Bhakti
धन्यवाद
आयुर्वेदानुसार या खीरीचे महत्व असे की हि पित्तशामक व व्याधीनाशाक
In reply to आयुर्वेदानुसार या खीरीचे महत्व असे की हि पित्तशामक व व्याधीनाशाक by धर्मराजमुटके
:)
करुन पहिली!
In reply to करुन पहिली! by आनंद
खूप धन्यवाद
जबरदस्त
In reply to जबरदस्त by जेम्स वांड
खूप धन्यवाद
एपिक channel वर Lost Recepies