विस्मृतीत गेलेले पदार्थ १ - छिबा ढोकली
नमस्कार मिपाकर्स ..
आपण सर्व जाणतोच की भारतीय खाद्यसंस्कृती ही विविधतने नटलेली व प्रचंड मोठी आहे. प्रत्येक राज्यात, प्रान्तात, जिल्ह्यात एवढेच काय प्रत्येक गावा गावात खाण्या पिण्याचे असंख्य व वेगळे वेगळे प्रकार पहायला मिळतात. जे पिढी दर पिढी पुढे सुपुर्द केले जातात पण काळाच्या ओघात त्यातले काही पदार्थ नामशेष होत जातात.
मला स्वत:ला या सर्व पारंपारीक व विस्मृतीत जात असलेल्या रेसिपिज चे खुप म्हणजे खुप अप्रुप आहे व हे सर्व पदार्थ टिकले पाहीजे आणि त्याच बरोबर आजच्या पिढीला या पदार्थांची ओळख व्हावी असे मला मनापासुन वाटते. कारण त्यातल्या बरयाचश्या पदार्थांमागे काही ना काही लोककथा/संकल्पना असतात.
आज मी आपल्यासाठी घेवुन आलो आहे अशाच विस्मृतीत गेलेल्या किंवा नामशेष होत असलेल्या पाककृतींसाठी एक खास सदर. सांगण्यासारखं खुप आहे पण टायपण्याचा टंकाळा असल्याकारणाने जसे जमेल तसे सर्व पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करेन.
आजचा पहिला पदार्थ आहे छिबा ढोकली
छिबा ढोकली हा पदार्थ साधारणतः १५ वर्षांपुर्वी सर्व प्रथम मी माझ्या कच्छी मित्राकडे खाल्ला होता. मी घाईत असलया कारणाने मित्राच्या आजीने अक्षरशः १५ मिनिटा मध्ये हा पदार्थ बनवला होता. गरम चहा व व आजीच्या हातच्या छिबा ढोकलीची चव मला अजुन ही स्पष्ट आठवते.
छिबा ढोकली हा कच्छ , गुजरात मधील पारंपारीक पदार्थ आहे. हा एक झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. जो गरमा गरम मसालेदार चहा बरोबर वाढला जातो. कच्छ मध्ये पुर्वी किंवा काही दशकांपुर्वी घरी पाहुणे आले तर छिबा ढोकली व मसालेदार चहा हमखास दिला जायचा पण आता हा प्रकार बनवणं खुप कमी झालं आहे.
ढोबळ्मानाने हा थोडाफार सुरळीच्या वड्यांसारखा प्रकार आहे पण फरक हा आहे की सुरळीच्या वड्याचे पीठ खुप पातळ असते व ते अगोदर शिजवुन घ्यावे लागते मग पालथ्या ताटावर शिजवलेले पिठ थापुन मग आपण वड्या करतो.
याऊलट छिबा ढोकलीचे पीठ सरबरीत असते , मग ते पीठ सुलट्या ताटावर पातळसर पसरवुन ताट उलटे ठेवुन वाफवुन घ्यावे लागते. मग त्याच्या रिबिनी सारख्या पटृया कापुन घ्याव्या लागतात.
चला बघुया साहित्य आणि कृती.
साहित्य
अर्धा कप बेसन
१ बारिक चिरलेली मिरची
१ चमचा कसुरी मेथी
पाव चमचा हींग
चिमुट्भर हळद
१ चमचा साखर
१ चमचा लिम्बाचा रस
मीठ चवीपुरता
कोथिंबिर
लाल मिरची पावडर(कच्छ मध्ये मेथिया पावडर अर्थात लोणच्याचा मसाला वापरतात पण लाल तिखट हि वापरु शकतात.)
पाणी
तडक्यासाठी --
१ चमचा तेल
१ चमचा मोहरी
१ चमचा तीळ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, चिरलेली मिरची, कसुरी मेथी,हिंग, हळद, साखर एकत्र करुन घ्या
आता अगदी सावकाश थोडे थोडे पाणी टाकुन सर्व साहीत्य परत एकदा मिक्स करुन घ्या. पाणी जास्त टाकु नये. पीठ सरबरीत असायला हवे.
आता लिंबाचा रस व चवीपुरता मीठ टाकुन मिश्रण परत एकदा ढवळुन घ्या.
आता एक ताट घेवुन चमच्याने थोडे थोडे मिश्रण ताटात टाकावे व दुस-या चमचा वा सरोट्याने ते मिश्रण गोलाकार आकारात व अगदी पातळ्सर थर असेल असे पसरवुन घ्यावे. जास्त जाडसर थर नसावा.(ताटाला तेल लावण्याची गरज नाहिये.)
मिश्रण पसरवलेले ताट जर उलटे केले तर मिश्रण खाली पडता कामा नये.
आता ताट वर बसेल अशा आकाराचे भांडे घेवुन पाणी ऊकळुन घ्यावे.
त्यावर आता ढोकलीचे मिश्रण पसरलेले ताट उलटे ठेवुन ४ ते ५ मिनिटे दणद्णीत वाफेत शिजवुन घ्यावे.
५ मिनिटांनतर ताट उतरवुन घ्यावे, व ढोकलीच्या कडा सोडवुन घ्याव्यात व सुरिने सरळ काप द्यावेत.
त्यावर ब्रश ने थोडे तेल पसरवुन घ्यावे.
वर चिमुटभर मेथिया पावडर किंवा लाल तिखट पसरवावे.
सरोट्याने छिबा ढोकलीच्या लांबसर पट्ट्या काढुन घ्याव्यात.
आता गरम तेलात मोहरी व तिळ टाकुन तडतडुन घ्यावी व तयार तडका छिबा ढोकलीच्या गुंडाळिवर सोडावा.
गरमा गरम मसालेदार चहा बरोबर छिबा ढोकली वाढावी.
छिबा ढोकली ची रेसिपी अस्मादिकांच्या तुनळि चॅनलवर.
https://www.youtube.com/watch?v=upM3Ro76mXA&t=49s
(आम्ही अलिकडेच आमचे स्वतःचे तुनळीवर चॅनल सुरु केले आहे त्यामध्ये हे सर्व पारंपारिक व अनवट कींवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पदार्थ दाखवतो. हे सर्व प्रकार टिकावेत यासाठीच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. तुमचा अभिप्राय नक्कि कळवा)
मिश्रण पसरवलेले ताट जर उलटे केले तर मिश्रण खाली पडता कामा नये.
आता ताट वर बसेल अशा आकाराचे भांडे घेवुन पाणी ऊकळुन घ्यावे.
त्यावर आता ढोकलीचे मिश्रण पसरलेले ताट उलटे ठेवुन ४ ते ५ मिनिटे दणद्णीत वाफेत शिजवुन घ्यावे.
५ मिनिटांनतर ताट उतरवुन घ्यावे, व ढोकलीच्या कडा सोडवुन घ्याव्यात व सुरिने सरळ काप द्यावेत.
त्यावर ब्रश ने थोडे तेल पसरवुन घ्यावे.
वर चिमुटभर मेथिया पावडर किंवा लाल तिखट पसरवावे.
सरोट्याने छिबा ढोकलीच्या लांबसर पट्ट्या काढुन घ्याव्यात.
आता गरम तेलात मोहरी व तिळ टाकुन तडतडुन घ्यावी व तयार तडका छिबा ढोकलीच्या गुंडाळिवर सोडावा.
गरमा गरम मसालेदार चहा बरोबर छिबा ढोकली वाढावी.
छिबा ढोकली ची रेसिपी अस्मादिकांच्या तुनळि चॅनलवर.
https://www.youtube.com/watch?v=upM3Ro76mXA&t=49s
(आम्ही अलिकडेच आमचे स्वतःचे तुनळीवर चॅनल सुरु केले आहे त्यामध्ये हे सर्व पारंपारिक व अनवट कींवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पदार्थ दाखवतो. हे सर्व प्रकार टिकावेत यासाठीच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. तुमचा अभिप्राय नक्कि कळवा)
वाचने
18447
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
एक नंबर !
In reply to एक नंबर ! by जेम्स वांड
धन्यवाद
सोपे दिसताहेत.
In reply to सोपे दिसताहेत. by कंजूस
धन्यवाद
वॉव
In reply to वॉव by सस्नेह
धन्यवाद
मने छिबा ढोकली रेसिपि गमी.
In reply to मने छिबा ढोकली रेसिपि गमी. by वामन देशमुख
धन्यवाद वामनजी
अनवट पाककृती बद्दल धन्यवाद
In reply to अनवट पाककृती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by यश राज
मुविजी..... ???????
In reply to मुविजी..... ??????? by मुक्त विहारि
नाही हो काका , मी माबो वर नाही
हा पदार्थ आजेसासूबाईंनी
In reply to हा पदार्थ आजेसासूबाईंनी by श्वेता व्यास
धन्यवाद
वाह मस्त आणि बनवायला ही सोपी
धन्यवाद भक्ती ताई
छिबा ढोकली रेसिपी फर्स्ट
In reply to छिबा ढोकली रेसिपी फर्स्ट by अनिंद्य
धन्यवाद अनिंद्यजी
छान
In reply to छान by सरिता बांदेकर
धन्यवाद सरिताजी
असाच खानदेशी साटोरी हा पदार्थ
In reply to असाच खानदेशी साटोरी हा पदार्थ by nutanm
धन्यवाद
क्या बात!
In reply to क्या बात! by टर्मीनेटर
धन्यवाद
In reply to क्या बात! by टर्मीनेटर
सुरळीच्या वड्यांना गुजराती खास शब्द
खांडवी
In reply to सुरळीच्या वड्यांना गुजराती खास शब्द by जेम्स वांड
थ्री इडियट मधला गुजराती
In reply to थ्री इडियट मधला गुजराती by Bhakti
हम्म
In reply to हम्म by जेम्स वांड
अय्यो ,माफ करा.
In reply to सुरळीच्या वड्यांना गुजराती खास शब्द by जेम्स वांड
येस्स! प्रतिसाद लिहिताना हेच नाव आठवत होतो
खूपच सुंदर आणि सोपी रेसिपी .
In reply to खूपच सुंदर आणि सोपी रेसिपी . by सौ मृदुला धनंज…
धन्यवाद
अरे वाह !
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
उत्तम. अशा अनवट पदार्थांच्या
In reply to उत्तम. अशा अनवट पदार्थांच्या by गवि
धन्यवाद
अ रे वा... भारी प्रकार दिसतोय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️ParamparaIn reply to अ रे वा... भारी प्रकार दिसतोय by मदनबाण
धन्यवाद
मासवडी,पाटवडी
In reply to मासवडी,पाटवडी by कर्नलतपस्वी
धन्यवाद सर
चुकभूल
साधी, सोपी रेसिपी
In reply to साधी, सोपी रेसिपी by गोरगावलेकर
खूप धन्यवाद
मध्यप्रदेशात ह्याला खांडवी
In reply to मध्यप्रदेशात ह्याला खांडवी by कानडाऊ योगेशु
नाही