नाते प्लेटॉनिक
सकाळी सकाळी एक सुंदर कन्या कॅफे मधे आली. संगणकाबरोबर फोन पण चालु होते, कॅफेत आम्ही दोघेच असल्याने माझे कान सहजच तिकडे लागले होते. अंदाजे ४ थ्या कॉलला एक वाक्य कानावर पडले, "शट अप मॅन, माझे आणि त्याचे नाते प्लेटॉनिक आहे".
आता ही काय भानगड आहे ते कळेना. क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला.
दोन मुनीवर्य नजरसमोर होते.
१. अवलिया. अवलिया ऑन लाईन नव्हते.
२.गुर्जी. हे पण गायब होते पण भ्रमणध्वनी उपलब्ध होता.
म्हणजे गुर्जीना विचारण्याशिवाय पर्याय नव्हता, एरवी मी व्यनी वगैरे करुन उत्तराची वाट बघतो पण आज फारच उतावीळपणा आला होता. लावला फोन.
गुर्जीचा तिसराच प्रश्न " तु मुळचा निपाणीचा का रे?"
आता हे नविन क्रिप्टिक काय मला कळेना.
"हो मी तिथला तंबाखुचा व्यापारी आहे, उत्तर सांगा आता." असे शब्द अगदी तोंडावर आले होते.
शेवटी "नाही हो मी पक्का पुणेकर" ह्यावर भागवले.
गुर्जी म्हणाले , काय योगायोग बघ, आज सकाळी माझ्या बायकोने हाच प्रश्न विचारला.(च्यायला काकुंनी कोणाचे बोलणे ऐकले असेल?) आणि मी सुद्धा ह्या विषयावर मिपा सदस्यांबरोबर(कोणाकोणाच्या डोक्याची मंडई केली यांनी?) चर्चा केली.
तुझ्या प्रश्नाचे उत्तरः विशुद्ध मैत्री
मी म्हणालो : अशुद्ध मैत्री पण असते काय? नीट समजवा की जरा गुर्जी.
गुर्जी म्हणाले, सुरुवातीला मैत्री प्लेटॉनिकच असते. हळु हळु प्लेटॉनिक म्हणता म्हणता कधी टॉनिक बरोबर खेळ (प्ले) होतो ते कळत नाही आणि मैत्री टेमकाग्रस्त (मदन बाण झिंदाबाद) होण्याची शक्यता असते.
"ह्याचा विदा काय?" मी विचारले (हा प्रश्न विचारला की मिपावरचे आपले श्रेष्ठत्व आणी जेष्ठत्व सिद्ध होते म्हणे.)
"ते डेमोग्राफी वर अवलंबवुन असते. " इती प्रभु गुर्जी.
आता ही काय नविन भानगड असते गुर्जी ? च्यायला पण शब्द आहे भारी, नको नको त्या ग्राफी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
"ठाणे, पुणे, मुंबई त हे प्रमाण वेगळे असण्याची शक्यता असते.पण माझ्या अनुभवानुसार १०% मैत्री प्लेटॉनिक असतात." गुर्जींच्या एकुण टोनींगवरुन आता शाळा संपली हे मी ओळखले आणी फोन ठेवला.
गुर्जीची शाळा संपली आणि मी विचार करु लागलो...
आजपर्यंत माझी सर्व मैत्री प्लेटॉनिकच की. खरच काय सुंदर शब्द आहे आणी शब्दाचा अर्थ देखील. पण मी काय कींवा आणी दुसर्या कोणी काय असे नुसते सांगुन लोकांचा विश्वास बसतो ? शिकल्या सवरलेल्या समाजाला सुद्धा 'मैत्री' ह्या नावाचे एक नाते असते हे पटते ?
प्रत्येक ओळखीला एक नात्याचे नाव खरच गरजेचे आहे ? "हि माझी मैत्रीण आहे, माझी सहकारी आहे किंवा ही माझ्या बरोबर शिकत आहे" येव्हडे उत्तर पुरेसे नाही ?
"हा माझ्या बरोबर ऑफिस मध्ये आहे किंवा आमचा बसरुट एकच आहे" हि कारणे कधी एकमेकांसमोर आल्यास बोलायला किंवा मनमोकळे पणानी वेळ घालवायला पुरेशी नाहीत ? ह्या सगळ्याला कायम नात्याची गरज का ? शेवटी समाज समाज म्हणुन आपण तरी कोणत्या नात्यानी एकत्र आलेलो असतो ?
येव्हडा सगळा विचार केल्यावर मग मला आपण फार मोठे कर्तुत्व गाजवल्या सारखे वाटायला लागले, भले प्रश्नांनी उत्तरे मिळाली नाहीत तरी. त्याच मुड मध्ये असताना अचानक एक प्रश्न सणकनी डोक्यात घुसला , काय रे "हा माझ्या बायकोचा मित्र" अशी बायकोच्या सहकार्याची ओळख एखाद्या पार्टीत मित्र परिवाराला करुन देशील काय?
वाचने
7232
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
खी खी खी लै
In reply to खी खी खी लै by अवलिया
नाना
In reply to नाना by नितिन थत्ते
फोन
In reply to फोन by विनायक प्रभू
हाणा
In reply to हाणा by अवलिया
मास्तरांच
असते निखळ मैत्री.
परा मस्तच
मस्तच
बास्स
शिकल्या
काही म्हणा
फरक
In reply to फरक by विनायक प्रभू
पण परवा
In reply to पण परवा by अवलिया
हो
In reply to हो by विनायक प्रभू
निष्पाप
मस्त धागा आणि विषय ...
In reply to मस्त धागा आणि विषय ... by छोटा डॉन
उत्तम
In reply to मस्त धागा आणि विषय ... by छोटा डॉन
उत्तम प्रतिसाद
गुर्जी
लय
डॉनरावांच
प्लेटॉनिक शब्दाला अनेक छटा आहेत
प्रपंच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
निखळ
In reply to निखळ by शितल
सहमत.. असा
निखळ
प्रतिसादही जोरदार.
गुरुभगिनी
नकार मिळाल्यानंतर
In reply to नकार मिळाल्यानंतर by ब्रिटिश टिंग्या
मेलो !!
In reply to नकार मिळाल्यानंतर by ब्रिटिश टिंग्या
१+
मग कधी कधी
In reply to मग कधी कधी by वैदेहीजी
हाथ से छु के इसे रिश्तों का ईल्जाम ना दो ...
In reply to हाथ से छु के इसे रिश्तों का ईल्जाम ना दो ... by वाहीदा
+१
To, परीकथेतल