वेश्याव्यवसायाची नैतिकता
या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती.
समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे?
कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो. दरोड्याने मिळालेल्या संपत्तीचे दान स्वीकारणेही आपल्याला मान्य होणार नाही. वेश्याव्यवसायाच्या जवळ राहून प्रगत झालेल्या कलांबाबत मात्र आपण तसे म्हणत नाही. अंग विकणारी कलावंतीण आणि अंग विक्षेपणारी कलावंतीण या दोघी पुष्कळदा एकच असू शकतात. पुण्यात नाट्योपयोगी वस्तूंची दुकाने बुधवार पेठेत, वेश्यावस्तीशेजारी आहेत, हे पूर्णतया योगायोगाचे नव्हे. लावणी रसिकतेने ऐकणारा आणि गाणारीशी चाळे करणारा रसिक एकच असू शकतो. अशा प्रकारे वेश्याव्यवसाय ज्याला शिवतो त्याला ओवळे करत नाही, हे त्याचे वेगळेपण.
(स्मृतिग्रंथादी धर्मशास्त्रांत वेश्याव्यवसायाविरुद्ध फार कडक धर्मनियम नाहीत. शिवाय पुरुषांना एका स्त्रीशी निष्ठावान राहाण्याचे बंधनही नाही. वेश्या हा कुलस्त्रिया नसल्यामुळे त्यांच्यावरही काही बंधन नाही. त्यामुळे या नैतिकतेच्या चर्चेत आपल्या जुन्या परंपरांचा फारसा संदर्भ देता येत नाही.)
(वेश्या व्यवसायात रोगांची लागण होऊ शकते, हे खरे आहे. पण त्याच प्रमाणे टाक्यात न्हायल्याने नारूची लागण होऊ शकते. लागण होऊ नये अशी काळजी घेणे हा स्वच्छतेचा विचार आहे, नैतिकतेचा नव्हे. त्यामुळे वैद्यकीय विचार या चर्चेत अगदीच अप्रस्तुत नसला तरी गौण आहे.)
नीती-अनीतीबद्दल मला सुचणारी काही कारणे अशी :
१. अविवाहित व्यक्तींच्या ब्रह्मचर्यास धोका : पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. ब्रह्मचर्य हे बर्यापैकी कठिण आहे, इतकेतरी मानण्यास जागा आहे. इतकेच नव्हे तर भोग हा स्थायीभाव आहे, आणि ब्रह्मचर्य अपवादात्मक आहे, असे मानण्यास जागा आहे. (ज्यांना भोगच नको असे संन्यासी प्रसिद्ध आहेत, ते वेगळे.) मग त्या अविवाहित व्यक्तीने लग्न का न करावे? काही कारणाने लग्न झाले नसणार, नाही का? ज्याचे लग्न तोंडावर आले आहे, त्यांच्या ब्रह्मचर्याला वेश्या फारसा धोका पोचवू शकणार नाही असे वाटते. आणि ज्याचे मनच ब्रह्मचर्यात नाही, तो कुणा दुसर्या व्यक्तीबरोबरही शरीरभोग घेऊ शकेल. त्यामुळे हे कारण मला पूर्णपणे ग्राह्य वाटत नाही, पण यात काही तथ्य असेल असे मानण्यास मी थोडाफार तयार आहे. तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? काही म्हटले तरी हा त्या अविवाहित व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न जास्त आहे, व्यवसायाचा कमी.
२. विवाहित व्यक्तींच्या एकनिष्ठतेस धोका : हा प्रकार मला तितकासा समजत नाही. वेश्यांकडे जाणे हे तर पूर्णपणे वैकल्पिक आहे. विवाहित व्यक्तीला कोणी तिथे जाण्याची बळजबरी तर करत नाही. मग ही गिर्हाइकाची अनैतिकता म्हणायला पाहिजे, व्यवसायाची का म्हणावी? आणि म्हणूया (हे तरी का म्हणूया?) की घरच्या सुखापेक्षा विकतचे सुख अधिक असते, तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही.
३. वेश्यांची स्वतःची नैतिक मूल्ये ढळलेली असतात : या विचारपद्धतीत काही दम आहे. पण पुष्कळदा सत्य नाही. (याच संकेतस्थळावर "विसोबा खेचर" यांनी लिहिलेली "रौशनी" कथा वाचावी.) मुळात अनेकांशी शरीरसंबंध ठेवणे (त्यांना न फसवता) हे अनैतिक का, हे जोपर्यंत पटवता येत नाही, तोवर "हे आपोआप अनैतिक" असे म्हणता येत नाही. नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे.
४. हा व्यापार स्वतंत्रपणे झालेला नाही : (हे मला सर्वात जास्त पटलेले कारण आहे.)
४अ. वेश्याव्यवसायात पुष्कळ देशांत अपहरण केलेल्या, विकत घेतलेल्या मुलामुलींना कामाला लावतात. लहान मुला-मुलींना सारासार विचार करून निर्णय घ्यायची योग्यता आलेली नसते. त्यांच्याकडून काम करून घेणे हे त्यांच्या स्वातंत्र्यास घातकच आहे. शिवाय कोणाचेही अपहरण त्याचे स्वातंत्र्यहरण आहे, ते अनैतिक आहे. आणि कुठल्याही व्यक्तीचा दुसर्या मनुष्यव्यक्तीवर मालकी हक्क असणे, तो हस्तांतरित करणे अनैतिक आहे. (येथे प्रत्येकास स्वातंत्र्य असावे, आणि प्रत्येक मनुष्याचे मूल्य समानच आहे, ही तत्त्वे नैतिक गृहीतके म्हणून घेतली आहेत. तुम्हाला ती मान्य नसल्यास चर्चेत त्यांचे खंडन करावे.)
४आ. शिवाय या "बालविक्रय" तथ्यातून माझे बाजारशास्त्रीय निष्कर्ष निघतात. एक तर स्वखुषीने या व्यवसायात उतरणार्या लोकांची संख्या मागणीच्या मानाने कमी असली पाहिजे. अर्थातच शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत स्वतंत्र व्यक्ती मागेल त्यापेक्षा कमी दिले जाते. बाजारात मूल्य सरासरीने लावले जाते (कारण या बाजारात "उत्तम कौशल्या"ची यादी प्रसिद्ध होत नाही, सहज उपलब्ध होत नाही.) त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी.
तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)
पण हा असमतोल दूर केल्यास, बालकांचा उपयोग कडकपणे बंद केल्यास वेश्याव्यवसाय नैतिक होईल काय. माझे मत काय आहे? युरोपातील काही देशांत, अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात, हा अभ्यास करण्यासारखा आहे. त्या देशांत, राज्यांत वावर करण्याइतपतही मला चक्षुर्वै ज्ञान नाही.
पण त्याच्या जवळपासचे ज्ञान इतपत आहे - (पैशांच्यासाठी) देहप्रदर्शन करणार्यांचे. यांची थोडीफार वैयक्तिक ओळख आहे. हेदेखील बहुतेक समाजांत अनैतिक मानले जाते - का ते मला माहीत नाही. हे आमच्या राज्यात कायदेशीर आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी अर्ज खुल्या बाजारात होतात. बाजार ठरवतो ती किंमत "नाचा"साठी मिळते. किंमत न पटल्यास त्या बारमध्ये कंत्राट न स्वीकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. काही कॉलेजमध्ये जाणारी गरीब (प्रौढ) मुले-मुली हा व्यवसाय काही काळासाठी स्वखुषीने स्वीकारतात.
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
वाचने
86159
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
विषय आवडला...
नीतीमत्तेचे काही मुद्दे
खरे तर..
एका सर्वात जुन्या विषयाला हात
अनैतिकच
In reply to अनैतिकच by आनंदयात्री
अनैतिक व्यवसाय..?
In reply to अनैतिक व्यवसाय..? by मनस्वी
माफ
In reply to माफ by आनंदयात्री
माफ केले
In reply to माफ केले by मनस्वी
हा हा हा
In reply to हा हा हा by आनंदयात्री
ही ही ही
माझे मत
In reply to माझे मत by चित्तरंजन भट
अनैतिक
In reply to अनैतिक by कोलबेर
शोषण तिथेही आहेच!
In reply to शोषण तिथेही आहेच! by चित्तरंजन भट
बरोबर...
वेश्या व्यवसाय
माझेही मत..
प्रतिष्ठा मिळेल का ?
ग्राहक नाकारण्याचा हक्क?
चर्चेत वेगवेगळे विषय
उत्तम गोळाबेरीज
चर्चा उत्तम
In reply to चर्चा उत्तम by विसुनाना
समांतर चर्चा
In reply to समांतर चर्चा by प्रकाश घाटपांडे
खरे आहे -
In reply to चर्चा उत्तम by विसुनाना
स्त्री/पुरुष/क्लीबसाठी एकच नैतिक नियम असावा
क्लायंट ९
आणखी अवांतर/समांतर
गणिका
अ डे इन द लाईफ ऑफ धंदेवाली
नजरा बदला दृष्य बदलेल
व्यवसाय की नोकरी?
मित्रांनो हा लेख व त्यावरील
अप्रतिम काथ्याकुट !
In reply to अप्रतिम काथ्याकुट ! by प्रसाद गोडबोले
(No subject)
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
In reply to उत्तम निकाल आणि उत्तम लेख by Trump
उत्तम निकाल !
In reply to उत्तम निकाल ! by प्रसाद गोडबोले
व्हिक्टोरिय नैतिकता
निकाल योग्य की अयोग्य हा नंतर चा प्रश्न
लोकसत्ता लेखाची link
लेख आवडला
भीती ? कसली भीती !
In reply to भीती ? कसली भीती ! by गामा पैलवान
कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास
In reply to कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास by प्रसाद गोडबोले
दुरुस्तीशी सहमत
In reply to भीती ? कसली भीती ! by गामा पैलवान
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरेल ही भीती.
पुरुष सत्तेला हादरा
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच
नैतिकता हा प्रश्नच नाही नियोजन हा प्रश्न आहे
In reply to नैतिकता हा प्रश्नच नाही नियोजन हा प्रश्न आहे by sunil kachure
२)म्हाडा,सिडको.
In reply to २)म्हाडा,सिडको. by सुबोध खरे
खरे साहेब
In reply to खरे साहेब by sunil kachure
मी परफेक्ट solution दिले आहे.
लोण ची
सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.गंमत वाटली.
नियोजन केले तर
मला वाटतं
भारतात
बार गर्ल्स
कामनियमांचा उगम
In reply to कामनियमांचा उगम by चलत मुसाफिर
आपल्या प्रतिसादातील काही
मानवी इतिहासात
कळीचा मुद्दा
In reply to कळीचा मुद्दा by गामा पैलवान
ठाम असहमत
In reply to ठाम असहमत by चलत मुसाफिर
नीती आणि चारित्र्य विहीन संगोपन .... ?
पुन्हा चंमतग वाटली
In reply to पुन्हा चंमतग वाटली by चलत मुसाफिर
फक्त स्त्री शी संबंधित प्रश्न नाही.
समाज स्वास्थ्य
वेश्यांचे आयुष्य
In reply to वेश्यांचे आयुष्य by प्रकाश घाटपांडे
धन्स.
राजमार्गाने करण्याचाही सोय
युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स
एमपी: हिंदूंचे धार्मिक
युपी मधील अत्याचारी कोण होते....
प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ