ब्लिडींग हार्ट....
लेखनविषय:
काव्यरस
खुप दिवस मनात होते की "रक्तस्त्राव हृदय फुले" दिसावीत. अंतरजालावर एका राजकुमाराची प्रेमकहाणी वाचली म्हणूनच कुतूहल वाढले होते.सकाळची फिरण्याची सवय आज कामाला आली.ज्या झुडूपवर्गीय वनस्पतीला रक्तस्त्राव हृदया फुले येतात ते झुडूप एके ठिकाणी दिसले. जवळच "रडणार्या चेरी चे झाड (विपींग चेरी)",बघुन काय वाटले ते लिहीण्याचा प्रयत्न.
भेटता रक्तस्त्राव हृदय फुले
कळाली अमर प्रेम कहाणी
"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
गात आहेत विरह गाणी
वेदना त्याच्या जीवाच्या
तेव्हांच मला कळाल्या
भंगून हृदय जेंव्हा
रक्त पाकळ्या गळाल्या
घालून मान खाली,
वृक्ष (विपींग चेरी)अश्रु ढाळीत होते
जणू जखमेवरी तयांच्या
फुंकर घालीत होते
लेवूनी पुष्पे भग्न दिलाची
झुरते आपुल्या मनाशी
आजुनही जपत आहे
कहाणी भंगल्या दिलाची
अपसूक मी वदलो,
ऐक बोल अनुभवाचे
दु:खात असते का कधी
कोण कुणी कुणाचे?
ऐशा किती कहाण्या
आणी किती विराण्या
जगतास काय त्याचे
मग अर्थ काय झुरण्याला!!!!....
वाचने
4371
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
"ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे
In reply to "ब्लिडींग हार्ट" नाव त्यांचे by श्रीगणेशा
श्रीगणेशा तुला रे बाबा काळजी
In reply to श्रीगणेशा तुला रे बाबा काळजी by कर्नलतपस्वी
प्रेमाची रडगाणी,भंगलेली हृदयं
छान.
धन्यवाद
आमच्या बागेतील " ब्लिडींग हार्ट "
Bleeding heart flowers
मी पण फोटो काढलेत
वरील माहिती अंतरजालावर आहे.