Skip to main content

शशक'२०२२ - Attention

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 13/05/2022 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
SOS : username : stsdVm4XBKGqZcka password : ZGkf?7vt37cPefVK तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, पण भविष्यातील बेफाम झालेली AI याच धाग्यातील मजकुरामुळे सक्रिय झाली होती. तुम्ही ज्याला इंटरनेट म्हणता, त्यातूनच ही पसरली. सध्या आमची मनं AIच्या व्हर्च्युअल कैदखान्यात अडकलेली असून, संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झालेली आहे. हे टाळायचे असेल तर ताबडतोब वर दिलेली क्रेडेंनशीयल वापरून misalpav.comवर login व्हा आणि होमपेज वर STOP असे लाल अक्षरात लिहीलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. बस इतकेच!! प्लीज. Posted by : अलेक्स 10-04-2079_12:00:17 --------------- धोका : वरील मजकुर समांतर विश्वातल्या सक्रिय AIने लिहीलेला असून दिलेली क्रेडेंनशीयल पृथ्वीवरील AI सक्रीय करण्यासाठी आहेत. Posted by : चंपक 10-04-2079_12:10:25 --------------- संपादक : इथली मुळ कथा कोणीतरी उडवली आहे. Sorry

वाचने 12328
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

रहे ना रहे हम... २०७९ मध्ये मिपा आहे, हे महत्वाचं!

In reply to by तुषार काळभोर

२०७९ मधले संपादक चक्क sorry म्हणताहेत. बदल स्वागतार्ह आहे.

In reply to by सुरसंगम

एमएस वर्डनुसार १) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत. २) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन ३) शशकचे १०० शब्द त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.

In reply to by मोहन

बरोब्बर १०० शब्द आहेत. मोजायचे नाही काही नाही नी काहीचरू ठोकून द्यायचे.

एमएस वर्डनुसार १) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत. २) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन ३) शशकचे १०० शब्द त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बरोब्बर १०० शब्द आहेत. मोजायचे नाही काही नाही नी काहीचरू ठोकून द्यायचे.

+१ भारी, एक नंबर. @प्रमोद देर्देकर अबा यांची ओरिजनल शशक वाचायला आवडेल.

+१ खरे तर +१०० लिहायचे आहे. पण ते ही +१ म्हणूनच गणले जाईल. लै भारी . धक्कादायक कथा. वीस वर्षापूर्वीचा "मॅट्रीक्स " सिनेमा आठवला