मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - तेच तेच पुन्हा पुन्हा

साहित्य संपादक · · स्पर्धा
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं. मागच्या खेपेला कंदिल होता. अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळं नशिबी आलं. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलंबाळं, हगेरीमुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं... ओ, शिट! रडू आवरेना. “काय पण वेडं विद्रूप टकलू माकड.” “अगं, अस का बोलतेस...” “अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट .. देवानं पदरात टाकलेय...” “पहा, गुलाम हसतोय कसा.” मातोश्री, हसू नाही तर काय करू? म्हणे देवाने पदरात टाकलेय! तुम्ही करणार मजा आणि आम्ही जगतो तेच तेच पुन्हा पुन्हा.

वाचने 9467 वाचनखूण प्रतिक्रिया 18

सौंदाळा Mon, 05/09/2022 - 12:25
+१

चांदणे संदीप Mon, 05/09/2022 - 17:11
+१ अशाच आशयाचं काहीतरी मिपावर आधी वाचल्यासारखं वाटतंय. पण, हेही शशक म्हणून आवडलंय. सं - दी - प

कॉमी Mon, 05/09/2022 - 19:06
एक असाच जोक आहे. बाळ जन्मल्या जन्मल्या नर्सला विचारतं- आज नाष्ट्याला काय आहे ? - पोहे - च्यायला परत पुण्यातच आलो वाटतं.

ब़जरबट्टू Mon, 05/09/2022 - 19:33
कथा म्हणुन ठिक आहे पण बाकी ते अनपेक्षित धक्कातन्त्र वापरायला हवे होते.

डाम्बिस बोका Fri, 05/13/2022 - 18:36
शेवटचे वाक्य आवडले, आई -बाबा ची मजा. म्हातार्यानं नातवंडांची हौस आणी सजा बाळाला