✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मोकळ्या करा पखाली

च — चांदणे संदीप, Fri, 12/03/2021 - 19:33
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

प्रतिक्रिया द्या
7437 वाचन

💬 प्रतिसाद (14)

कवितेविषयी काही...

चांदणे संदीप
Fri, 12/03/2021 - 19:36 नवीन
खूप आधीच ही कविता लिहीली होती. पण प्रकाशित करायला मनच होत नव्हते. का हे असे शब्द मनावर घिरट्या घालून मला लिहायला भाग पाडतात असेही वाटते कधीकधी. अतिशय दु:खद अशी पार्श्वभूमी या कवितेला आहे ही सल आयुष्यभर बोचत राहणार आहे. पण शेवटी, एक समाज म्हणून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करू शकतो हेही न विसरणे तितकेच आवश्यक आहे म्हणून हा कविता प्रकाशनाचा प्रपंच. - सं - दी - प
  • Log in or register to post comments

खरंय.

राघव
Fri, 12/03/2021 - 19:48 नवीन
काय बोलणार. भावनांशी सहमत. दुसर्‍या लाटेत काय काय झाले हे वळून बघतांना देखील त्रास होतो, इतके ओळखीतले गेलेत. :-( अवांतरः अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

++++++++++++1111111111111

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/08/2021 - 14:31 नवीन
++++++++++++1111111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

+ १

तुषार काळभोर
गुरुवार, 12/09/2021 - 18:08 नवीन
अर्थाला जेव्हा आपोआप शब्द स्फुरतात, तेव्हा जे लेखन होते ते नेहमीच खास असते. >> वा!! याला पण +१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

आपल्या काळजाचे आपणच माळी ,छान

Bhakti
Fri, 12/03/2021 - 20:56 नवीन
आपल्या काळजाचे आपणच माळी ,छान रुजलीय कविता!
  • Log in or register to post comments

कविता आवडली

अनन्त्_यात्री
Fri, 12/03/2021 - 21:48 नवीन
"रूजवात करा फुटव्यांची" ऐवजी "रुजवणी करा फुटव्यांची" योग्य वाटते (रुजवात = समक्ष भेट/वार्तालाप घडवून आणणे)
  • Log in or register to post comments

सुरेख एकदम

प्रचेतस
Sat, 12/04/2021 - 07:15 नवीन
सुरेख एकदम
  • Log in or register to post comments

भावना पोचल्या

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/04/2021 - 13:25 नवीन
त्या अर्थाने कविता आवडली, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

भारी...

गणेशा
गुरुवार, 12/09/2021 - 19:28 नवीन
भारी... ------- दुःख नाही.. खंत नाही.. स्पुर्ती साठी प्रवास असतो केंव्हा तरी मिटण्यासाठीच काळजामधील श्वास असतो.. - वि. वा.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

ॲबसेंट माइंडेड…
Sat, 12/11/2021 - 16:42 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Sat, 12/11/2021 - 20:53 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

रूजणाऱ्या अंकुरांना

श्रीगणेशा
Sun, 12/12/2021 - 01:29 नवीन
रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली
खूप छान! कविता आवडली.
  • Log in or register to post comments

चांदणे ते चांदणे कविता

माहितगार
Sun, 12/19/2021 - 10:28 नवीन
चांदणे ते चांदणे कविता त्यांच्या भारी आम्हा सुचती केवळ विडंबने तरी
  • Log in or register to post comments

विशिष्ट पार्श्वभूमि असलेली कविता भावली.

चित्रगुप्त
Wed, 07/12/2023 - 18:33 नवीन
'विशिष्ट पार्श्वभूमि असलेली' कविता - ती पार्श्वभूमि नेमकी काय हे ठाऊक नसूनही भावली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा