कागदी गणेशमुर्ती आणि प्रदुषण
लेखनप्रकार
गणेश उत्सव म्हटलं की प्लॅस्टरऑफ पॅरिसच्या मुर्ती आणि पाणीप्रदुषणाची चर्चा सुरु होतेच. पर्यावरणवादी प्रदूषणाच्या नावाने बोंब सुरु करतात आणि त्याला तेव्हढेच जोरदार समर्थन उत्सववादी सुरु करतात. मागील कोरोनावर्ष सोडले हा शिमगा दरवर्षी सुरु असतो. काही स्वयंसेवी संघटनांनी मुर्तीदान चळवळ राबवली आणि पाण्याच्या प्रदुषणाचा काही प्रमाणात अटकाव केला. काही लोकांनी शाडूमातीच्या मूर्ती वापर करून पर्यावरणाला आधारच दिला.
काही लोकांनी कागदी गणेशमुर्ती तयार करून इकोफ्रेंडली गणेशोत्सव अश्या हाळ्या द्यायला सुरुवात केली. (एका पंथाने त्यांच्या अनुयायांकडून नामजपाच्या वह्या भरून घ्यायला सुरुवात केली आणि हाताने नामजप लिहिलेल्या वह्या परत जमा करून घेऊन त्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवून " हा इकोफ्रेंडली गणेशोत्सव" असे सांगत अनुयायांना विकायला सुरुवात केली असे ऐकण्यात आले) या वर्षी पुण्याच्या हॅण्डमेड पेपर इन्स्टिट्यूटने व्यापारी तत्वावर आशय मूर्ती विक्रीसाठी बाजारात आणलेल्या आहेत. कागदी गणेशमुर्ती वजनाने हलक्या असल्यामुळे ९ इंचापेक्षा उंच मुर्ती घरगुती सजावटीत वापरता येतात त्यामुळे अश्या मुर्तीना ग्राहकांकडून पसंती मिळेल. कदाचित पुढे अशाच गणेशमुर्तीचा ट्रेण्ड येईल.
कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा ९० % + माती १०% पासून बनवलेल्या) च्या विसर्जनासाठी "मुर्ती मोठ्या पात्रात पाणी घेऊन विसर्जित करा १०-१२ तासानंतर पात्रातील राहिलेला कागदी लगदा वाळवून जवळच्या रद्दी वाल्याला द्या जेणे करून पाणीप्रदूषण टाळलं जाईल"अश्या विल्हेवाटीच्या सूचना आहेत. यामुळे असं कुणी करत असेल असं वाटत नाही.
कागदी मुर्ती (अर्थात पेपर मॅशे (कागदी लगदा-९० % + माती - १०% पासून बनवलेल्या) पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातकच आहेत. कागदी मुर्ती पाण्यात विसर्जित केल्यावर वर मिथेन नावाचा विषारी वायू तयार होतो. तो पाण्यातील जलचरांसाठी अत्यंत घातक असतो. कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकतो आणि ते मरतात. पाण्यातील ऑक्सिजन अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. यामुळे कागदी मुर्ती पर्यावरणस्नेही नाहीत असे काही लोकांचे म्हणणे आहे. एकूण घनकचऱ्यापैकी २६% कचरा हा कागदी असतो आणि हा जमिनीत जिरवल्यास विषारी रंग, शाई आणि काही प्लास्टिक घटक जमिनीत मुरतात ज्यामुळे प्रदूषण होते. कागद रिसायकलिंग मुळे या प्रदूषणाचे प्रमाण कमी होते पण ते फारच थोड्या प्रमाणात. कागद रिसायकलिंग जास्त ऊर्जा खाऊन इतर प्रकारचे प्रदुषण करतेच.
दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे.
आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो.
मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?
दिवसेंदिवस कागदाचा वाढता वापर पर्यावरणाच्या मुळाशी उठत आहे (एकूण कागद उत्पादनासाठी लागणारा ९३% लगदा वृक्षांपासून तयार केला जातो. एका ए४ मापाचा कागद तयार करण्यासाठी सुमारे १० लिटर पाणी लागते) कागद-रिसायकलिंगसाठी प्लास्टिक रिसायकलिंगपेक्षा जास्त ऊर्जा लागत असल्याने तो प्लास्टिकपेक्षा कमी पर्यावरणस्नेही आहे.
आम्ही इतकी वर्षे उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची स्थापना करत होतो. आणि उत्सव संपल्यावर मूर्ती मनपा तलावात विसर्जन करत होतो. मनपा कर्मचारी/ सेवक नंतर त्या विसर्जित मुर्ती पाण्यातून बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावायचे (म्हणजे नक्की काय करायचे माहीत नाही) आता गेल्या वर्षीपासून शाडूची मुर्ती स्थापित करतो आणि विसर्जनानंतर कुंडीत माती टाकतो.
मित्रांनो आपण कुठल्या प्रकारच्या गणेशमुर्तीची स्थापना करता ? कागदी मुर्ती मुळे प्रदुषण वाढते की कमी होते असे आपल्याला वाटते ? कागदी मुर्ती स्थापित करता का ? असाल तर त्या मूर्तीचे विसर्जन कसे करता ?
वाचने
22991
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
छान माहीती चौको ...
In reply to छान माहीती चौको ... by बबन ताम्बे
हो. .मनपा कर्मचारी गोळा
पेंग्वीनपर्यटन मंत्री यांची अश्या समस्यांबाबत कामगिरी उठून दिसत नाही ! (मागच्या वर्षी पर्यटन मंत्र्यांच्या पुढाकारातून मोटॉहोम नावाची कॅम्पर व्हॅन एमटीडीसी तर्फे पर्यटकांना भाड्याने देण्यासाठी विकत घेतली होती. पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सदरची व्हॅन विकत घेतली होती असे सांगितले गेले. व्हॅनचा पुढे काय "विकास" झाला ते कळले नाही ! ) खरंतर उत्तरपुजा झाल्यानंतर मुर्ती पुन्हा पार्थिव होते, त्यातले देवत्व संपून जाते तेंव्हा त्याची नियमित कचरा म्हणून नियमानुसार विल्हेवाट लावायला काय हरकत आहे. उलट बांधकाम साहित्य / इतर सामुग्री म्हणून याचा उत्तम उपयोग होऊ शकतो.In reply to हो. .मनपा कर्मचारी गोळा by चौथा कोनाडा
हाहाहा
पर्यावरणाच्या दृष्टीने खर्या
धातूची मूर्ती
In reply to धातूची मूर्ती by सरनौबत
झक्कास!
In reply to धातूची मूर्ती by सरनौबत
उत्तम
In reply to धातूची मूर्ती by सरनौबत
धातूची मूर्ती
In reply to धातूची मूर्ती by प्रसाद गोडबोले
ओह,
अगदी ठरवलंच तर बरेच चांगले सोपे उपाय असतात.
तमिळ लोक गणपती मूर्ती नेतात त्या छापाच्या असतात.
In reply to तमिळ लोक गणपती मूर्ती नेतात त्या छापाच्या असतात. by कंजूस
आपल्याही इथे ज्या लालमातीच्या
थोडेफार प्रदुषण तर होणारच
In reply to थोडेफार प्रदुषण तर होणारच by गॉडजिला
आपण प्रत्येक वेळेला बोलतो, लिहितो
In reply to आपण प्रत्येक वेळेला बोलतो, लिहितो by सर टोबी
आपण प्रत्येक वेळेला बोलतो,
In reply to आपण प्रत्येक वेळेला बोलतो, by गॉडजिला
खरे आहे हे,
In reply to खरे आहे हे, by ज्ञानोबाचे पैजार
खारे आहे पैजारबुवा.
In reply to खारे आहे पैजारबुवा. by चौथा कोनाडा
कोनाला पटो न पटो
गेल्या काही वर्षांपासून आम्ही
गेल्या काही वर्षांपासून आम्ही
In reply to गेल्या काही वर्षांपासून आम्ही by जानु
नीटसे आठवत नाही
In reply to गेल्या काही वर्षांपासून आम्ही by जानु
माझ्या माहितीनुसार शाडूमाती
In reply to गेल्या काही वर्षांपासून आम्ही by जानु
+१
वर्षात एकदा गणेश मूर्तीचे
गणेश मूर्ती ह्या मातीच्याच योग्य आहेत
अल हबीब्बी
In reply to अल हबीब्बी by सुरिया
सुरिया
In reply to सुरिया by Rajesh188
आता corona मुळे शरीराची
In reply to आता corona मुळे शरीराची by गॉडजिला
गणपती --> शाडु ची मुर्ती -->
In reply to गणपती --> शाडु ची मुर्ती --> by सुक्या
मी तिसरीत होतो तेंव्हां माझ्याकडे हे होतं
In reply to मी तिसरीत होतो तेंव्हां माझ्याकडे हे होतं by गॉडजिला
कॉमिक रिलीफ
In reply to अल हबीब्बी by सुरिया
प्रॉब्लेम मूर्ती हा नाही तर
मूर्ती स्वतः बनवतो
In reply to मूर्ती स्वतः बनवतो by कासव
मी गेल्या २ वर्षा पासून गणेश
हाही उपाय काही ठिकाणी उदयास
In reply to हाही उपाय काही ठिकाणी उदयास by Bhakti
व्वा, खुप छान पर्यात दिसतो
In reply to व्वा, खुप छान पर्यात दिसतो by चौथा कोनाडा
मुळात मुद्दा मूर्तीसाठी
In reply to मुळात मुद्दा मूर्तीसाठी by सुबोध खरे
रंगांमुळे होणारे प्रदुषण हा
In reply to रंगांमुळे होणारे प्रदुषण हा by चौथा कोनाडा
नैसर्गिक रंग ,मी फक्त सहजच
@ चौथा कोनाडा,
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
सुंदर!
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
काय मस्त दिसतो आहे
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
काय सुरेख मूर्ती आहे.
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
व्वा अनिंद्य, कसला क्युट आहे
💖
आता हे टेरीकोट्टा म्हंजे लालमातीची मुर्ती बनवुन ज्वालेत भाजलेली ना ? हे बायोडिग्रेडेबल नसते ना ? मातीत मिसळायला किती वर्षे लागतात ?In reply to व्वा अनिंद्य, कसला क्युट आहे by चौथा कोनाडा
हेहेहेहे
In reply to व्वा अनिंद्य, कसला क्युट आहे by चौथा कोनाडा
'त्यातल्या त्यात' वाचले नाही
In reply to 'त्यातल्या त्यात' वाचले नाही by अनिंद्य
अर्रर्र .... आत्ता वाचला
In reply to @ चौथा कोनाडा, by अनिंद्य
सुंदर मूर्ती
In reply to सुंदर मूर्ती by आजानुकर्ण
व्वा, खुपच सुरेख ! रंगसंगती
🌷
अनिंद्य,
मूर्तीची स्थापनाच न करणे हा
In reply to मूर्तीची स्थापनाच न करणे हा by प्रचेतस
या न्यायाने पांढरेच कपडे
In reply to मूर्तीची स्थापनाच न करणे हा by प्रचेतस
उत्तम सुचना पण
In reply to उत्तम सुचना पण by प्रसाद गोडबोले
सुरेख...
In reply to सुरेख... by गॉडजिला
यातुन अजुनही
In reply to यातुन अजुनही by गॉडजिला
आपण गट क्रमांक २ मधील असुन
In reply to आपण गट क्रमांक २ मधील असुन by प्रसाद गोडबोले
शेवटी सत्य एकच एकच आहे
In reply to शेवटी सत्य एकच एकच आहे by Rajesh188
चर्चा धर्मावर न्हवे
In reply to आपण गट क्रमांक २ मधील असुन by प्रसाद गोडबोले
आम्हाला आमचा जो काही क्रमांक आहे त्याचा गर्व आहे
In reply to आम्हाला आमचा जो काही क्रमांक आहे त्याचा गर्व आहे by गॉडजिला
परफेक्ट २ !
In reply to उत्तम सुचना पण by प्रसाद गोडबोले
अशारीतीने मुर्ती स्थापन
In reply to अशारीतीने मुर्ती स्थापन by सुबोध खरे
बेक्कर हसतोय =))))
In reply to अशारीतीने मुर्ती स्थापन by सुबोध खरे
सुबोध खरे साहेब .... हा ... हा .... हा .....
😂
मातीत लगेच न मिसळणारे
गणेश मुर्ती मातीच्या असाव्यात असे माझे वैयक्तिक मत!
जर मातीच्या मुर्ती इतक्या सुंदर बनत असतील तर पी.ओ.पी किंवा कागदाच्या लगद्या पासुन बनवलेल्या मुर्त्या घ्यायची गरजच काय?
In reply to गणेश मुर्ती मातीच्या असाव्यात असे माझे वैयक्तिक मत! by टर्मीनेटर
व्वा, किती सुंदर मूर्ती!
In reply to गणेश मुर्ती मातीच्या असाव्यात असे माझे वैयक्तिक मत! by टर्मीनेटर
मी तर कित्येक वर्षांपासुन
एकंदरीत इथं कुणी कागदी
माझा मित्र निलेश आणि
In reply to माझा मित्र निलेश आणि by Bhakti
माहितीसाठी धन्यवाद, भक्ती.
In reply to माहितीसाठी धन्यवाद, भक्ती. by चौथा कोनाडा
https://youtu.be/NDkXsIu9NCM
In reply to https://youtu.be/NDkXsIu9NCM by Bhakti
फारच छान केलेत या मंडळींनी !