अनुवादित पुस्तकं
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे.
हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..
पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे.. कारण त्यापूर्वी एकदा असंच चुकून दोस्तोव्हस्कीला इंग्रजीतून हात घालून, होता नव्हता तेवढा आत्मविश्वास खच्ची करून घेतलेला होता, हे एक बॅकमाईंडला होतं...
तर मग तडजोड म्हणून अनुवादित पुस्तकांकडं सरकत गेलो..
पण दुर्दैवानं त्याच सुमारास झालं असं की..
डिटेक्टीव्ह/थ्रिलर टाईपच्या कादंबऱ्या ज्यातले नायक हमखास तैलबुद्धीचे वकील, पत्रकार वगैरे असतात आणि एफबीआय-सीआयएवाले एकजात बिनकामाचे, फुकटपगारखाऊ वगैरे असतात.. आणि जगभरातील भाबड्या मानवजातीला, अटळ विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी, लेखकाने शेवटी एखाद्या अज्ञात जागी राहणाऱ्या नायकांवरच नेऊन टाकलेली असते वगैरे..
हे कमी म्हणून की काय, पाच-सहाशे वर्षांपूर्वींची मढी उकरत, उदाहरणार्थ रोम वगैरे शहरांतली भुयारे धुंडाळत कुठलीतरी गूढ कोडी सोडवत बसणाऱ्या..
तसेच भरल्या पोटी जगभर उंडारत उंडारत हरप्रकारची मजा मारणाऱ्या आणि पुन्हा तो सगळा सेक्शुअल मसाला 'आत्मशोधा'च्या नावाखाली दणकावून छापणाऱ्या वगैरे..
असल्या इंग्रजीतल्या कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून, तो मराठीत आणून फेकायची जबरदस्त लाट आली होती, तिच्या तडाख्यात मी आपसूकच सापडलो होतो..!
पण नंतर मग असंच कधीतरी गटांगळ्या खात खात किनाऱ्याला लागल्यावर लक्षात आलं की आपल्याला 'गि-हाईक' बनवण्यात आलेलं आहे, त्याचंही दु:ख समजा एक वेळ सहन केलं तरीही, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये फुकटचा वेळ जाऊन पैशांचीही बरबादी झालेली, हे त्याहून वाईट..
आणि म्हणून विचार केला की, त्यावेळी माझा जो प्रॉब्लेम होता, सेम तशाच प्रॉब्लेममधून कुणी जात असेल, आणि शोधाशोध करत असेल, तर त्यांच्यासाठी आपल्याकडच्या शहाण्या लोकांनी, जगभरातल्या काही दर्जेदार पुस्तकांचे मराठीमध्ये सुंदर अनुवाद करून ठेवलेले आहेत...
ज्यातलं एखादं वाचून समजा एखाद्या वाचकाला, काहीतरी सणसणीत वाचल्याचा आनंद वैयक्तिक पातळीवर मिळाला तर चांगलंच आहे की.. म्हणून ही यादी;
वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड- गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु.केशव सद्रे)
सीन्स फ्रॉम प्रोव्हिन्शियल लाईफ- जे. एम कोएत्झी
(अनु. 'गावातील जीवनदृश्ये',अवधूत डोंगरे)
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
(अनु. जयंत धुपकर)
द सेन्स ऑफ ॲन एंडींग- ज्यूलियन बार्न्स
(अनु. विलास साळुंखे)
कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा-
गॅब्रिएल गार्सिया मार्केझ (अनु. रंगनाथ पठारे)
व्हेन वुई वेअर ऑरफन्स- काझुऒ इशिगुरो
(अनु.सुश्रुत कुलकर्णी)
रिमेन्स ऑफ द डे- काझुऒ इशिगुरो
(अनु. आश्लेषा गोरे)
क्रॉक ऑफ गोल्ड —जेम्स स्टीफन्स
(अनु.- 'सोन्याचे मडके'—जी ए कुलकर्णी)
द लॉर्ड ऑफ फ्लाईज-- विल्यम गोल्डींग
(अनु. जी ए कुलकर्णी)
शेविंग ऑफ शॅगपट- जॉर्ज मेरेडीथ
(अनु. 'एक अरबी कहाणी', जी ए कुलकर्णी)
द लाईट इन द फॉरेस्ट- कॉनराड रिक्टर
(अनु. 'रानातील प्रकाश, जी ए कुलकर्णी)
'गाव', 'शिवार'- कॉनराड रिक्टर (अनु. जी ए कुलकर्णी)
द फांऊटनहेड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
ॲटलास श्रग्ड- आयन रॅंड (अनु. मुग्धा कर्णिक)
द सेकंड सेक्स- सिमॉन द बोव्हुआर
(अनु. करुणा गोखले)
शब्द- जॉं पॉल सार्त्र (अनु. वा.द.दिवेकर)
द चिप्स आर डाऊन - जॉं पॉल सार्त्र
(अनु. 'तेथे चल राणी', वसंत कानेटकर)
मेटॅमॉर्फोसिस-- फ्रांझ काफ्का
(अनु. 'पिसुक', जयंत कुलकर्णी)
द ट्रायल- फ्रांझ काफ्का
(अनु. 'महाभियोग', जयंत कुलकर्णी)
निवडक काफ्का- अनु./संपादन नीती बडवे
ॲनिमल फार्म- जॉर्ज ऑरवेल (अनु. तुषार बापट)
नाईंटीन एटी फोर- जॉर्ज ऑरवेल (अनु. अशोक पाध्ये)
डार्कनेस ॲट नून-ऑर्थर कोसलर
(अनु.- 'भरदुपारच्या अंधारात'- वसंतराव नारगोलकर)
द ग्रेप्स ऑफ रॅथ- जॉन स्टाईनबेक
(अनु. मिलिंद चंपानेरकर)
मून इज डाऊन-- जॉन स्टाईनबेक
(अनु. गणेश जोशी)
अ टेल ऑफ टू सिटीज- चार्ल्स डिकन्स
(अनु. सुशील परभृत)
ब्लाईंडनेस-- जुझे सारामागु
(अनु. भास्कर भोळे)
माय नेम इज रेड-- ओरहान पामुक
(अनु. गणेश विसपुते)
द टाईम्स ऑफ असासीन्स - हेन्री मिलर
(अनु-'विनाशवेळा'- महेश एलकुंचवार)
द बुक थीफ - मार्कस झुसॅक
(अनु.'पुस्तकचोर', विनीता कुलकर्णी)
मॅन्स सर्च फॉर मिनींग- डॉ. व्हिक्टर फ्रॅंकल
(अनु.-'अर्थाच्या शोधात', डॉ. विजया बापट)
शांताराम- ग्रेगरी रॉबर्ट्स (अनु. अपर्णा वेलणकर)
सोल मांउटेन- गाओ झिंगजियान (अनु. मधु साबणे)
द प्रॉफेट- खलील जिब्रान (अनु. जे के जाधव)
रिल्केची दहा पत्रे - अनिल कुसुरकर
२१ व्या शतकासाठी २१ धडे- युवाल नोआ हरारी
(अनु. सुनील तांबे)
अ न्यू अर्थ - एकहार्ट टॉल
(अनु. 'एक अवनी नवी', नीलिमा जोशी)
द कॅचर इन द राय- जे डी सॅलिंजर (अनु. संजय जोशी)
कॉन्वेक्स्ट ऑफ हॅपिनेस- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'सुखी माणसाचा सदरा')
अनपॉप्युलर एस्सेज- बर्ट्रांड रसेल
(अनु. करुणा गोखले, 'नाही लोकप्रिय तरीही')
रीयुनियन- फ्रेड उल्मान (अनु. मुग्धा कर्णिक)
आफ्टर दि क्वेक- हारुकी मुराकामी
(अनु. निशिकांत ठकार) कथासंग्रह
लस्ट फॉर लाईफ- आयर्विंग स्टोन (अनु. माधवी पुरंदरे)
रावण आणि एडी, दि एक्स्ट्राज- किरण नगरकर
(अनु. रेखा सबनीस)
ककल्ड- किरण नगरकर
(अनु.- 'प्रतिस्पर्धी', रेखा सबनीस)
द ब्लाइंड लेडी'ज डिसेंडंट्स-अनीस सलीम
('आंधळ्या बाईचे वंशज', अनु. श्यामल चितळे)
व्हॅनिटी बाग- अनीस सलीम
(अनु. योगिनी वेंगुर्लेकर)
गुंटेरचा हिवाळा- ख्वान मॅन्युएल मार्कोस (अनु. मनोज पाठक)
द ब्लाइंड असॅसिन- मार्गारेट ॲटवूड (अनु. चारुता नानिवडेकर)
वॉल्डन- हेन्री डेव्हिड थोरो (अनु.जयंत कुलकर्णी)
द व्हाईट फॅन्ग- जॅक लंडन ('लांडगा', अनु. अनंत सामंत)
रिबेल सुलतान्स- मनु पिल्लई (अनु.तृप्ती कुलकर्णी)
रसेलचे निवडक लेख- भा. ज. कविमंडन
द स्टोरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी- विल ड्युरांट
(अनु. 'पाश्चात्य तत्वज्ञानाची कहाणी' अनु. साने गुरुजी)
डॉन क्विझोट(भाग १,२)- सरव्हॅंटीस
(अनु. दा. न. शिखरे)
आणि खालच्या मूळच्या रशियन कादंबऱ्या, ज्या दीडशे वर्षे मुरलेल्या व्होडक्यासारख्या जालीम असल्यामुळे, हळूहळू बेताबेतानं, निवांतपणे एकेक घोट रिचवत रिचवत वाचण्यासाठी आहेत... उदाहरणार्थ..
ॲना कॅरेनिना- लिओ टॉलस्टॉय
(अनु. कवली ललितागौरी)
ब्रदर्स करमाझोव- दोस्तोव्हस्की
(अनु.- करमाझफ बंधु', खंड १,२, भाऊ धर्माधिकारी')
द गॅंबलर - दोस्तोव्हस्की ('जुगारी'-अनु. जयंत दिक्षित)
नोट्स फ्रॉम अंडरग्राऊंड - दोस्तोव्हस्की
(अनु.अनिल आंबीकर 'भूमिगताची टिपणे')
क्राइम ॲंड पनिशमेंट- दोस्तोव्हस्की
('गुन्हा आणि प्रायश्चित्त', अनु.- काशिनाथ कोनकर)
द हाऊस ऑफ डेड्स- दोस्तोव्हस्की(अनु. 'मेलेल्यांची गढी',अनु.- विश्राम गुप्ते)
डॉ. झिवागो- बोरिस पास्तरनाक (अनु. आशा कर्दळे)
ॲंड क्वाएट फ्लोज द डॉन- मिखाईल शोलोखोव्ह
('डॉन संथ वाहतेच आहे',भाग१,२- अनु. नरेंद्र सिंदकर)
आणि शेवटी जाताजाता, हिंदीतून मराठीच्या अंगणात आलेली उदाहरणादाखल दोन :
हाक आणि प्रतिसाद- निदा फाझली
(अनु. इब्राहिम अफगाण)
राग दरबारी— श्रीलाल शुक्ल
(अनु. श्रीपाद जोशी)
वाचने
26886
वाचनखूण
प्रतिक्रिया
59
वा...
In reply to वा... by कॉमी
चौघीजणी' बद्दल ऐकलं आहे बरंच.
In reply to वा... by कॉमी
गजानन जी यांनी कथाच गुंफल्या आहेत
In reply to गजानन जी यांनी कथाच गुंफल्या आहेत by गॉडजिला
होय, बरोबर.
एकदम मस्त विचारमंथन...
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर
In reply to मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर by साहना
ती सायको माया मलाही फार आवडायची
यादी उपयुक्त.
In reply to यादी उपयुक्त. by कंजूस
काईट रनर नक्कीच अनुवादलेलं
एक प्रश्न ( अवांतर)
डेझर्टर हे विजय देवधरांनी
In reply to डेझर्टर हे विजय देवधरांनी by रावसाहेब चिंगभूतकर
पॅपिलॉन +१
वाह
लेखाचा सुर डिटेक्टिव्ह,
In reply to लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, by प्रचेतस
+१
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचकत्यात चुकीचं काहीच नाही. वाचायला घेताच सरदर्दी सुरू होइल असे लेखन वाचायची प्रगल्भता दाखवतात ते दर्दी वाचक. नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोरांच्या लेवलचे दुसरे पकाउ लेखक जीए असे माझे प्रांजळ मत.सुशि वाचणारे उथळइथे उथळ शब्द जींदादिल अशा अर्थी अभिप्रेत असावा. क्युंकी मुर्दादिल क्या खाक सुशि पढेंगे.In reply to जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी by रंगीला रतन
वा लेखकांचे अपयश झाकायला
In reply to वा लेखकांचे अपयश झाकायला by गॉडजिला
टागोरांना पकाऊ
In reply to जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी by रंगीला रतन
अरेरे
In reply to जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी by रंगीला रतन
मला जी ए आणि सु शि दोघेही
In reply to मला जी ए आणि सु शि दोघेही by रावसाहेब चिंगभूतकर
आपण संतुलित वाचक आहात
In reply to जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी by रंगीला रतन
टागोरांनी उचललेलंही आहे
In reply to टागोरांनी उचललेलंही आहे by कंजूस
जिएंनी किती उचललं ?
In reply to जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी by रंगीला रतन
रवींद्रनाथांची गोरा हि अत्यंत
In reply to लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, by प्रचेतस
गन्स ऑफ नॅव्हरोन, वुदरींग
In reply to लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, by प्रचेतस
सिडने शेल्डनचे माझे सगळ्यात
वास्तविक इंग्रजी साहित्यात .......
द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स)
In reply to द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स) by चौथा कोनाडा
मुखपृष्ठ
In reply to मुखपृष्ठ by चौथा कोनाडा
हे पुस्तक वाचण्यात येईल!
In reply to हे पुस्तक वाचण्यात येईल! by टर्मीनेटर
टर्मीनेटर, त्या सिनेमा
In reply to टर्मीनेटर, त्या सिनेमा by चौथा कोनाडा
त्या सिनेमाचं
In reply to टर्मीनेटर, त्या सिनेमा by चौथा कोनाडा
@ चौथा कोनाडा
"थ्री कप्स ऑफ टी" हे ग्रेग
छान आहे यादी, ह्यातली फार
छान!
अनुवाद वाचलेले नाहीत.
In reply to अनुवाद वाचलेले नाहीत. by तुषार काळभोर
हो हो हेच नाव आठवत नव्हतं
In reply to अनुवाद वाचलेले नाहीत. by तुषार काळभोर
मी पण. इंग्लिश मध्येच वाचतो.
नॉट विदाउट माय डॉटर
कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून,
लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी
In reply to लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी by रावसाहेब चिंगभूतकर
लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप
In reply to लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप by पाटिल
सध्या स्कॅन करून अपलोड करणारे
विजय देवधर आणि लीना सोहोनी ही
तो थापाड्या हेन्री शेरीअर
In reply to तो थापाड्या हेन्री शेरीअर by गॉडजिला
कळलं नाही. थापाड्या म्हणजे?
In reply to कळलं नाही. थापाड्या म्हणजे? by रावसाहेब चिंगभूतकर
त्याने विविध लोकांच्या विविध
In reply to त्याने विविध लोकांच्या विविध by गॉडजिला
हे माहीत नव्हतं, पण असेल तर
In reply to हे माहीत नव्हतं, पण असेल तर by रावसाहेब चिंगभूतकर
Yeah
In reply to Yeah by गॉडजिला
ओह.. :-(
In reply to ओह.. :-( by राघव
बँको नाव होतं त्याचं
In reply to तो थापाड्या हेन्री शेरीअर by गॉडजिला
+१
वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या
माझीही थोडीशी भरः
कन्नड ते मराठी
In reply to कन्नड ते मराठी by ज्ञानोबाचे पैजार
पर्व आणि वंशवृक्ष उच्च आहेत
माझी यादि