माझाही उखाणा

निशिगंध's picture
निशिगंध in जनातलं, मनातलं
17 Apr 2009 - 9:52 pm

माझाही उखाणा,

आम्ही सर्व वर्गबंधू नी ठरविले आहे की, स्वतःहाच्या लग्नात हा उखाणा घ्यायचा.

फोल्डरात फोल्डर, फोल्डरात फोल्डर
___ चे नाव घेतो, मी M.Tech होल्डर....

_निशिगंध

उखाणे

प्रतिक्रिया

दशानन's picture

17 Apr 2009 - 9:55 pm | दशानन

लै भारी !
=))

फोल्डरात फोल्डर, मल्टिपल फोल्डर
***चे नाव घेतो मी डबल बॅरेल बिरुटेसर ;)

सर दिस ईज फॉर यु बडी ;)

अवलिया's picture

17 Apr 2009 - 10:00 pm | अवलिया

फोल्डरात फोल्डर, मल्टिपल फोल्डर
***चे नाव घेतो मी राजे, दि रनर ;)

राजे दिस ईज फॉर यु बा** ;)

--अवलिया

दशानन's picture

17 Apr 2009 - 10:04 pm | दशानन

सर्च कमांड दिली तर
रन कमांड कावलोया
ह्या सिस्टम ला तु
झपाटलायस अवलिया

=))

(कावलोया = वैतागलो आहे. कावलो आहे = वैतागलो आहे = कोल्हापुरी)

तिमा's picture

18 Apr 2009 - 6:29 pm | तिमा

फोल्डरात फोल्डर
जिम् मधे बिल्डर
--चा बल्ब लावताच
गरम झालाय होल्डर

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

सँडी's picture

19 Apr 2009 - 6:29 am | सँडी

लै भारी!
=))

-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

आपला अभिजित's picture

17 Apr 2009 - 10:08 pm | आपला अभिजित

हर्षदा स्वप्नं रंगवतेय,
अभिजितराव हनीमूनला हिमाचलला नेतील...
तरीही कुणीतरी म्हणालं,
`सर्व विधी कार्यालयातच होतील!'

अवलिया's picture

17 Apr 2009 - 10:09 pm | अवलिया

सांगा ना मग पुढे काय काय झाले ?
8}

--अवलिया

दशानन's picture

17 Apr 2009 - 10:13 pm | दशानन

सिस्टमला दिला ऍन्टीव्हायरस
नेटला लावला फायरवाल
*** रावाच्या सिस्टमला घेतला
मुठीत आज

प्राजु's picture

19 Apr 2009 - 7:46 am | प्राजु

पु. लं. च्या ..
समोरच्या कोपर्‍यात उभी हिंदमाता.. आणि बेमटे रावांचं नाव घेण्यात माझा नंबर पहिला..
अशापैकीच झाला. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

19 Apr 2009 - 5:05 am | संदीप चित्रे

=D> =D>

धमाल मुलगा's picture

20 Apr 2009 - 5:39 pm | धमाल मुलगा

अरे तू टाळ्या काय वाजवतोयस?????

=)) =)) =))

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

निशिगंध's picture

17 Apr 2009 - 10:13 pm | निशिगंध

`सर्व विधी कार्यालयातच होतील!'
=)) =)) =)) =))

_______ निशिगंध_________

मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!

पर्नल नेने मराठे's picture

18 Apr 2009 - 5:39 pm | पर्नल नेने मराठे

खोक्यात खोका.....टीव्हिचा खोका
खोक्यात खोका.....टीव्हिचा खोका
मी तुझि माउ....न तु माझा बोका ;)

चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2009 - 6:10 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय
सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय
***** अजुन घरी आले नाहित
कुठे पिउन पडलेत की काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सँडी's picture

19 Apr 2009 - 6:31 am | सँडी

मस्त!
=))
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.

क्रान्ति's picture

19 Apr 2009 - 4:08 pm | क्रान्ति

परा आणि चुचुचे उखाणे खास!
जुन्या पद्धतीच्या गावरान उखाण्याची ही एक झलक [हे उखाणे मालगाडीसारखे लांबलचक असतात, त्यात नव-याच नाव कधी येत हे कळतच नाही!]
वसाडगावात ग्येले व्हते लग्नाला
म्हुर्ताच्या येळीच बामन पळाला
बामनाला आनल धरून तवत घोड ग्येल मरून
नवर्द्येवाची पाय्-पाय वरात
नवरी रुसून बस्ली घरात
म्हने माज्या नव-याला चालिवल काऊन?
समजुत काडायला माय आली धाऊन
नवरी पटली त वरमाय रुसली
मांडवाच्या कोन्ट्यात जाउन बसली
समद्या व्हराडान नाकदु-या काडल्या
हातपाय जोडले, उटाबशा काडल्या
सम्द्या तमाशात म्हूर्त टळला
भांडन तंट्यातच दिवस बी सरला
थकुन भागुन समद्यांनी हात पाय पसरले
अगो बाय, मी त नव-याच नावच इसरले!
अवांतर : हा उखाणाच आहे, माझी कविता नाहीय! @)
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

टिउ's picture

20 Apr 2009 - 8:14 pm | टिउ

भारी आहे!

उदय सप्रे's picture

20 Apr 2009 - 2:12 pm | उदय सप्रे

सागर मित्राची क्षमा मागून.....

सर्च इंजिनात मोठं सर्च इंजिन म्हणजे "गुगल" !
----- ला घास देतो , आहे त्याच्या डबल फुगंल !

सालोमालो's picture

20 Apr 2009 - 2:32 pm | सालोमालो

पहिल्याच रात्री लोड शेडींगमुळे दिवे गेले कलून
...राव पहायला गेले चुकुन माझा परकर घालून

पर्नल नेने मराठे's picture

20 Apr 2009 - 6:05 pm | पर्नल नेने मराठे

=)) शि बाइ
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

20 Apr 2009 - 6:17 pm | पर्नल नेने मराठे

स्टुलात स्टुल ....रन्गीत स्टुल
______आम्ची ब्युटिफुल

स्टुल (लाकडी).... :& ते नव्हे...

चुचु

मराठमोळा's picture

20 Apr 2009 - 8:51 pm | मराठमोळा

उखाणे लै भारी...

सोन्याच्या ताटात चांदीचं तुकडं
सोन्याच्या ताटात चांदीचं तुकडं
घास भरवते.........रावाला मेल्या त्वांड कर हिकडं

सोन्याच ताट अन चांदीचा पेला
सोन्याच ताट अन चांदीचा पेला
गणपतराव मेला मग सदाशिवराव केला ;)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!