चैत्री पाडवा....
चैत्री पाडवा....
नवी पालवी चैत्राची ती,
रंग तिचा हिरवा..
पारंब्यांवर झोके घेई,
एक वेडा पारवा...
पानोपानी फुलली जाई,
दरवळे अंगणी मरवा..
मुदित सृष्टी बहरून जाई,
वसंत ऋतु हा बरवा..
मंदिरातला मृदुंग बोले,
सुमधुर तो केरवा..
संध्यासमयी कानी येई,
दूर कुठे मारवा..
सजतील सदने, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा..
नववर्षाची नवीन स्वप्ने,
संकल्प मनी ठरवा.....!
जयगंधा..
११-४-२०२१.
वा !
मरवा
आभार.
असे पाठवून देतो. लागली लॉटरी
हे राम...!
अगदी खरं!
=))
स्वतःचे मेसेज स्वतःला का
स्वतःचे मेसेज स्वतःला का
मस्त..
सुरेख
सर्व रसिकांना, मनापासून