हिरव्या हरभऱ्याची आमटी म्हणजेच सोलाण्याची आमटी हो! असे हरभाऱ्याचे घाटे भरभरून शेतात आले की कोवळे उपटून आणून मस्त आमटी असा दर आठवडी बेत झालाय होता बघा.बर गंमत अशी की सोललेल्या घाट्यापासून नुसते खाता येतात,चटपटीत तिखट (आमच्या ह्यांना असे आवडते ते पण कधीतरी;()करता येतात.मला बाई आमटीच आवडते मस्त हिरवी आणि त्याच्यावर लाल तर्री..
तर फावल्या वेळेत बातम्या बघत बघत दोन वाट्या हिरवे कोवळे लुसलुशीत हरभरे सोलायचे.
-मसाला:
साहित्य :एक कांदा,एक टमाटे,५-६ मिरच्या,७-८ लसूण पाकळ्या,खोबरे गरजेनुसार,जिरे,कोथिंबीर.
कृती:पापड भाजायच्या जाळीवर कांदा आणि टमाटे दोन भागात चिरून दहा मिनिटे भाजून घ्यायचे... मिक्सर मधून वाटण काढतांना त्यात तेलात परतून घेतलेले खोबरे,लसूण,मिरची,जिरे आणि कोथिंबीर टाकून मग हा कच्चा मसाला बनवायचा.
-मुख्य नायक हिरवे हरभरे यांना लोखंडी कढईत ओतायचं मस्त खरपूस भाजून घ्यायचं.(लक्ष द्या जाळू नका)
आणि ओबड धोबड वाटून घ्यायचं.
-आमटी कृती
आता कुकर घ्यायचा ,हो कढई मध्ये हरभरा जरी कोवळा असला तरी नीट शिजत नाही (तो जरा पचायला जड असतो)
२ चमचे तेल घ्यायचे ,मोहरी ,हळद,कडीपत्ता,हिंग फोडणी तडतडली कि तयार कच्चा मसाला वाटण टाकायचे.तेल सुटू पर्यंत परतून घ्यायचे. आता मुख्य नायक हरभरेबुवा यांना यात ओतायच..परतून घ्यायचे आई ,मावशी,सासू ह्यांनी त्यांनी दिलेले घरगुती दोन चमचे मसाले घालायचे...असे मसाले नाही ..काही गोष्ट नाही..एव्हरेस्टचा भाजी मसाला वापरा.
-सरप्राईज इलेमेंट
कैरीताई ..हो आता कैरीबाई सहज मिळतेय .तेव्हा छोटी वाटी साल वगैरे काढलेली मध्यम आकारात चिरलेली कैरी टाकायची ..मस्त चव आणि इसेन्स येतो आमटीला(सध्या अशा पद्धतीने कैरी इतर आमटीतही वापरू शकता)थोडेच पाणी घालून दोन-तीईन शिट्या होऊ द्यायच्या.
-गरम भाकरी आणि कांद्याच्या फोडी बरोबर आणि आमटीवर लिंबू पिळून ही वरपायची आमटी...अहाहा.
-भक्ती
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोंडाला पाणी सुटले...
कशी बोलावतांय?
सध्या हरभरे वाळले आहेत
In reply to तोंडाला पाणी सुटले... by मुक्त विहारि
सध्या हरभरे वाळले आहेत ,पुढच्या वर्षी पुन्हा लावले तर नक्की बोलवेन.
फोटो दे कि भक्ती...
फोटो दे कि भक्ती...
गणेशाचा या वेळी जेन्युईन
In reply to फोटो दे कि भक्ती... by गणेशा
गणेशाचा या वेळी जेन्युईन गणेशा झालाय =))
:)
In reply to गणेशाचा या वेळी जेन्युईन by गणपा
वाह! गणपा तुम्हाला पाहून आनंद वाटला!
अरे व्वा ...
In reply to गणेशाचा या वेळी जेन्युईन by गणपा
मस्तच ....
ह्यापुढे, तुझी आठवण आली की, पाककृती टाकत जाईन ....
जातीचा खव्वय्या आहेस हो, इतर वेळी कुठे का असेनास, पाककृती दिसली की, येतोस बरोबर ....
किती दिवसांनी?
In reply to गणेशाचा या वेळी जेन्युईन by गणपा
किती दिवसांनी?
काय चालू आहे :-)
येऊद्या पाककृती तुमच्या
हा घ्या फोटो...
दस्तूरखूद्द, गणपाने
In reply to हा घ्या फोटो... by Bhakti
हजेरी लावली आहे...
सौ सोनार की, एक लोहार की...
पाककृतीवर, गणपाने प्रतिसाद दिला, म्हणजे 1000 प्रतिसाद मिळाले ....
खल्लास आहे.
In reply to हा घ्या फोटो... by Bhakti
खल्लास आहे.
:-) एकदम खल्लास!!
In reply to खल्लास आहे. by प्रचेतस
:-) एकदम खल्लास!!
पाकॄ आवडली
पाककृती आवडली.
या आमटीमुळे ताज्या तुरीच्या दाण्यांच्या आमटीची आठवण झाली :-).
धन्यवाद
In reply to पाकॄ आवडली by श्रीरंग_जोशी
हो मी करणार आहे एकदा ताज्या तुरीच्या दाण्यांच्या आमटी
अरेच्या ही पाककृती कशी सुटली !
ताई, कैरी नसेल तर काय घालता येईल पर्यायी ? आमचूर चालेल का ? घातलं तर किती प्रमाणात ?
जेम्स दादा
In reply to अरेच्या ही पाककृती कशी सुटली ! by जेम्स वांड
जेम्स दादा
कैरी उन्हाळ्यात होती म्हणून वापरली.आमचूर नाही वापरला कधी,चिंचेचे किंवा आमसूल एक बुटूक भिजवून कोळ वापरू शकता.
संक्रांत जवळ आली की बाजारात
संक्रांत जवळ आली की बाजारात घाटे मिळतात... कोवळे घाटे खायला मस्त लागतात. :)
हरभर्याची उसळ माहित होती, आमटी पहिल्यांदाच कळली.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pucho Na Yaar Kya Hua... :- Zamaane Ko Dikhana Hai
छान.
पण वर्ज्य.
धन्यवाद:)
धन्यवाद:)
हिरव्या मुगाचे विविध पदार्थ लिहिणे विचाराधीन आहे.बघते केव्हा जमतं.
गुजराती ओसामण
In reply to धन्यवाद:) by Bhakti
हे हिरवे मूग तुपावर परतून पाणी घालून शिजवतात. पातळ ठेवायचे. ते आजाऱ्यास देतात. 'मगनो ओसामण'
सुपसारखा पदार्थ आहे.छान!
In reply to गुजराती ओसामण by कंजूस
सुपसारखा पदार्थ आहे.छान!
भक्ती, छान,
भक्ती, छान,
ताजे कोवळे हरबरे मिळतात = " अहो भाग्यम" ... येथे ते सुख नाही ( चिकू पण नाही , हापूस नाही .. काय हे जिण .. असो )
३ प्रश्न
१) यातील हरबरे पिवळे का दिसत आहेत ? हळदी मुळे ?
२) यात तांबडा मसाल्याच्या ऐवजी "हिरवा मसाला - कोथिंबीर + हिरवी मिरची लसूण + आलं ) असा घातला तर ? जणू मटार ऊसळी सारखे
३) हरबर्याचं पाल्याची भाजी आठवते ती करत का तुम्ही ? त्यावर लसणाची फोडणी