शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174618
वाचनखूण
प्रतिक्रिया
559
In reply to दोन वेळा bjp सरकार का आले by Rajesh188
राजेश बाबु ... असा
कुठल्याही शेतकरी वर्गाला, इतका वेळ मिळत नाही
दिल्लीतील आंदोलकांनी दिवसभर
In reply to दिल्लीतील आंदोलकांनी दिवसभर by श्रीगुरुजी
खरंय
सत्ताधारी पक्षाने
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
तुम्ही डोक्यावर पडलाय याची
In reply to तुम्ही डोक्यावर पडलाय याची by अमर विश्वास
+ १
In reply to तुम्ही डोक्यावर पडलाय याची by अमर विश्वास
+१८८
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
धन्यवाद!
In reply to सत्ताधारी पक्षाने by Rajesh188
"Nishan साहिब" का?
बारामती Agro लिमिटेड
In reply to बारामती Agro लिमिटेड by मुक्त विहारि
https://www.baramatiagro.com/leadership
In reply to बारामती Agro लिमिटेड by मुक्त विहारि
सोयीचे राजकारण करणे यात
In reply to सोयीचे राजकारण करणे यात by सुक्या
अशा धरंधर राजकारणी लोकांच्या मागे...
अडाणी (अदानी) लोक
In reply to अडाणी (अदानी) लोक by Rajesh188
बरीच आहेत...
In reply to बरीच आहेत... by मुक्त विहारि
ही सर्व सामान्य माणसाला पटणारी कार्ये आहेत ...
In reply to ही सर्व सामान्य माणसाला पटणारी कार्ये आहेत ... by मुक्त विहारि
मुवि जी,
In reply to मुवि जी, by सुक्या
तुमचेही बरोबर आहे ....
In reply to तुमचेही बरोबर आहे .... by मुक्त विहारि
सहमत आहे ....
हाच फरक आहे
In reply to हाच फरक आहे by Rajesh188
खरे हिटलर छाप नेतृत्व तर....
सरकार जबरदस्ती नी शेतकऱ्या च्या कथित हिताचे कायदे का करत आहे
In reply to सरकार जबरदस्ती नी शेतकऱ्या च्या कथित हिताचे कायदे का करत आहे by Rajesh188
सर, कृपया मराठीत सांगाल काय?
In reply to सर, कृपया मराठीत सांगाल काय? by खेडूत
सहमत आहे
In reply to सर, कृपया मराठीत सांगाल काय? by खेडूत
एवढी अक्कल ते लावत नसतात..
In reply to एवढी अक्कल ते लावत नसतात.. by बाप्पू
+11
सरकार माझ्या मनासारखे निर्णय
In reply to सरकार माझ्या मनासारखे निर्णय by जानु
सर्वसामान्य शेतकरी, ह्या आंदोलनात सहभागी नाही...
बरेच लोक म्हणतात की
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
एक साधा प्रश्र्न आहे.
In reply to एक साधा प्रश्र्न आहे. by मुक्त विहारि
संधी दिल्याशिवाय कसे कळणार?
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
आपल्याला कोणी मसीहा हुकूमशहा
In reply to आपल्याला कोणी मसीहा हुकूमशहा by प्रसाद_१९८२
वा! आणि आता परिस्थिती
In reply to वा! आणि आता परिस्थिती by नगरीनिरंजन
नक्कीच....
In reply to वा! आणि आता परिस्थिती by नगरीनिरंजन
बहुसंख्य जनतेला तसे वाटत नाही
In reply to बहुसंख्य जनतेला तसे वाटत नाही by श्रीगुरुजी
काय सांगताय?
In reply to काय सांगताय? by सुबोध खरे
सहमत आहे...
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
मुळात अकार्यक्षमतेवर जनता
मुळात अकार्यक्षमतेवर जनता काहीच कारवाई करत नाही हे कळल्यास कोणीही नेता आत्मसंतुष्ट व मुजोर होऊ शकतो.अकार्यक्षम नेत्यांना जनता पदच्युत करते हे २००३ मध्ये दिग्विजयसिंह, २०११ मध्ये बुद्धदेव दासगुप्ता, २०१४ मध्ये मनमोहन सिंह व पृथ्वीराज चव्हाण यांना पदच्युत करून जनतेने दाखवून दिले आहे.काँग्रेसला जसा झटका दिला तसाच झटका जनता कोणालाही देऊ शकते हे नेत्यांच्या मनात सतत भय असले तरच काम नीट होते. /code> नीट काम करण्याची प्रामाणिक इच्छा असेल तरच काम नीट होते. २०१४ पासून हे दिसत आहे.उपग्रह सोडण्यापासून लस बनवण्यापर्यंत व करप्रणालीपासून परराष्ट्रधोरणापर्यंत सगळ्या गोष्टींचे श्रेय एकच माणूस लाटणार असेल तर हवे कशाला सरकार व मंत्रीमंडळ? /code> कोणत्या एकाच व्यक्तीने हे श्रेय लाटले हे पुराव्यासहीत सांगावे.“सेपरेशन ऑफ स्टेट अॅन्ड चर्च” ही पाश्चात्य बळकट लोकशाहींमधील महत्त्वाची पायरी होती. ती आपण गाठली पाहिजे. म्हणजे कोणाचेच फाजील लांगूलचालन होणार नाही.काही अपवाद वगळता २०१४ पर्यंत मशीद व स्टेट यांचे सेपरेशन नव्हते. मुल्ला बोले पंतप्रधान डोले अशीच परिस्थिती होती. मुस्लिम लांगूलचालनाने कळस गाठला होता. परंतु २०१४ पासून परिस्थिती पूर्ण बदलली आहे. कोणाचेही फाजील लांगूलचालन, धार्मिक नेत्यांचा हस्तक्षेप, विशिष्ट धर्मासाठी न्यायालयाचे निर्णय बदलून जनतेवर अन्याय करणे आता थांबले आहे.In reply to मुळात अकार्यक्षमतेवर जनता by श्रीगुरुजी
अकार्यक्षम नेत्यांना जनता
In reply to अकार्यक्षम नेत्यांना जनता by नगरीनिरंजन
संरक्षण दलाला मजबूती आणली..
In reply to अकार्यक्षम नेत्यांना जनता by नगरीनिरंजन
मोदी कार्यक्षम आहेत असेच
In reply to मोदी कार्यक्षम आहेत असेच by श्रीगुरुजी
गुरुजी कशाला वाद घालताय?
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
“सेपरेशन ऑफ स्टेट अॅन्ड चर्च
In reply to संधी दिल्याशिवाय कसे कळणार? by नगरीनिरंजन
उत्तम ...!
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
लै गडबड नको करायला, वाट पाहू
In reply to बरेच लोक म्हणतात की by नगरीनिरंजन
भारतीयांचा अपमान
- शेतकऱ्यांनी हे केले.
- खालिस्तान्यांनी हे केले.
- आंदोलकांनी हे केले.
- मूठभर समाजकंटकांनी हे केले.
- सरकारने हे होऊ दिले.
- सरकारचा हा एक फार मोठा डाव आहे.
यांपैकी जे काही सत्य असेल ते असेल पण अमित शाह (किंवा ज्या कोणाची जबाबदारी होती ते) ही विटंबना रोखण्यात अयशस्वी ठरले हे सत्य आहे. मतदारांनी ३००+ खासदारांना हे पाहण्यासाठी निवडून दिले नव्हते. त्या मतदारांचा (आणि इतर भारतीयांचा) हा थेट अपमान आहे. एक भारतीय नागरिक म्हणून या घटनेचा मी निषेध करतो. BTW, विटंबना / मोडतोड करणाऱ्यांना शिक्षा होईल की नाही ते पुढे पण... मागच्या वर्षीच्या दिल्ली दंगलखोरांना अजून शिक्षा झालीय का? जेंव्हा होईल तेंव्हा त्या शिक्षेचे गांभीर्य राहील का?In reply to भारतीयांचा अपमान by वामन देशमुख
दिल्लीत राज्य, केजरीवाल सरकारचे आहे...
In reply to दिल्लीत राज्य, केजरीवाल सरकारचे आहे... by मुक्त विहारि
म्हणजे मोदी निवडून आले तर
In reply to म्हणजे मोदी निवडून आले तर by गणेशा
बरोबर आहे ...