✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घडामोडी डिसेंबर २०२०

ख
खेडूत यांनी
Tue, 12/01/2020 - 10:24  ·  लेख
लेख
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे. या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत. कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील? मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
64759 वाचन

💬 प्रतिसाद (210)

प्रतिक्रिया

@Rajesh188

सुबोध खरे
Wed, 12/02/2020 - 18:02 नवीन
@Rajesh188 स्वच्छ भारत अभियान चालू होते. आपण आपल्या घरात केर काढून लादी पुसता का? पुरवणी प्रश्न आपले घर स्वच्छ झाले असेल तर दुसऱ्या दिवशी परत केर काढून लादी का पुसता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अरे देवा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/22/2020 - 19:18 नवीन
असे प्रश्न विचारायचे नसतात. बाकी ते पेट्रोल डीझेलच्या भावाचा मुद्दा अ‍ॅड करा हो त्यात. आता त्या विकासाच्या नादात ते दर काही स्थीर होईना. देशद्रोही आहात आपण...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

विकास फुकट येतोय का?

सुबोध खरे
Tue, 12/22/2020 - 20:02 नवीन
विकास फुकट येतोय का? रस्ते रेल्वे मार्ग आपोआप बांधले जात आहेत? पायाभूत सुविधा, लष्कराचे अद्ययावतीकरण, सीमाभागात बांधले जाणारे रस्ते धरणे इ ला पैसे लागत नाही का? उद्योगधंद्यांना आता पिळणे सरकारला शक्य नाही. ते केले तर रोज ५०० व्यवसाय बंद होतात हे मोदिरुग्ण उच्च रवात रडगाणे गातच आहेत. गरीब मजुरांना सरकारने रोकड पैसे द्यायला पाहिजेत हि रडारड येथेच कुणी केली होती? सरकारी शाळा कॉलेजात शिक्षक प्राध्यापकांना सरकारी नोकरांना पूर्ण पगार सरकारने द्यायलाच हवाय. उद्योगपतींकडून कर्ज वसुली करा हे पालुपद चालूच आहे.पण ती घाण केली कुणी हे विसरायचे. तरी बरं समर्थाघरचे भाट चुकून सत्य बोलले It all began under UPA: Raghuram Rajan gives Modi ammunition against Congress on bad loans https://theprint.in/economy/it-all-began-under-upa-raghuram-rajan-gives-modi-ammunition-against-congress-on-bad-loans/116108/ मग कर संकलन कसे होते ते विचारायचे नाही. पैसा आणायचा कुठून ते एकदा सांगा, मग हे पेट्रोलचे भाव वाढले याचे रडगाणे गा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

https://www.facebook.com

श्रीगुरुजी
Wed, 12/02/2020 - 14:18 नवीन
https://www.facebook.com/story.php?story_fbid=1052106328638997&id=100015189194593&scmts=scwspsdd https://maharashtratimes.com/india-news/farmers-protest-punjab-olympians-arjuna-padma-awardees-threaten-to-return-awards/articleshow/79526629.cms
  • Log in or register to post comments

शेतकरी फक्त पंजाब आणि

पुष्करिणी
Wed, 12/02/2020 - 15:58 नवीन
शेतकरी फक्त पंजाब आणि हरयाणातच आहेत का असा प्रश्न पडतोय . देशभरातले इतर शेतकर्‍यांना आवडलेलं दिसतय नविन बिल
  • Log in or register to post comments

बरं ते एक

इरसाल
Wed, 12/02/2020 - 17:36 नवीन
आंदोलनवाले शेतकरी एके ४७ रायफलचा फोटो आणी खलिस्तान जिंदाबाद अस पेंट केलेले ट्रॅक्टर घेवुन मोर्चाला आलेले आहेत. एकंदरीत खलिस्तानी शेतकरी सुद्धा पाठिंबा देवुन आहेत अस दिसतय.
  • Log in or register to post comments

बकि चलुदे फल्तुच्य वक्यवरुन चलुदेत बस..........

रंगीला रतन
Wed, 12/02/2020 - 18:23 नवीन
बकि चलुदे फल्तुच्य वक्यवरुन चलुदेत बस..........
  • Log in or register to post comments

प्रकाश आमटे यांची पुतणी - डॉ.

बाप्पू
Wed, 12/02/2020 - 19:51 नवीन
प्रकाश आमटे यांची पुतणी - डॉ. शितल आमटे यांची आत्महत्या. आमटे कुटुंबीय त्यांच्या सामाजिक योगदानामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रसिद्ध कुटुंब आहे. अशा कुटुंबात देखील कोणीतरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू शकतो हे थोडेसे धक्कादायक आहे.
  • Log in or register to post comments

शीतल आमटेंच्या सासुबाई

उपयोजक
गुरुवार, 12/03/2020 - 00:17 नवीन
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/vidarbha/sheetal-mother-law-wrote-letter-amte-family-case-sheetal-amte-suicide-379918%3famp
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

ही लिंक

उपयोजक
गुरुवार, 12/03/2020 - 00:27 नवीन
https://www.google.com/amp/s/www.esakal.com/vidarbha/sheetal-mother-law-wrote-letter-amte-family-case-sheetal-amte-suicide-379918%3famp
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

दुवा उघडंत नाहीये म्हणून ....

गामा पैलवान
गुरुवार, 12/03/2020 - 20:12 नवीन
उपयोजक, दुव्याबद्दल धन्यवाद. :-) मात्र सकाळने सदर लेख तत्परतेने हटवला आहे. पण तो गुग्गुळाचार्यांच्या गोदामात (cache) सापडला. गोदामाचा दुवा : https://webcache.googleusercontent.com/search?q=cache:oUsDCUPcuegJ:https://www.esakal.com/vidarbha/sheetal-mother-law-wrote-letter-amte-family-case-sheetal-amte-suicide-379918+ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

आमटे कुटुंबीय त्यांच्या

डीप डाईव्हर
Wed, 12/02/2020 - 20:09 नवीन
आमटे कुटुंबीय त्यांच्या सामाजिक योगदानामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रसिद्ध कुटुंब आहे. अशा कुटुंबात देखील कोणीतरी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू शकतो हे थोडेसे धक्कादायक आहे.
त्यात काहीच धक्कादायक नसते ... फक्त व्यवहार आणि व्यक्तिगत स्वार्थ असतो. होईल तुम्हालाही सवय हळूहळू... आधी असे प्रकार झाकले जायचे...
  • Log in or register to post comments

खरच ऐकावे ते नवलच!!

Bhakti
Wed, 12/02/2020 - 20:46 नवीन
खरच ऐकावे ते नवलच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डीप डाईव्हर

निरो मोदी

कपिलमुनी
Wed, 12/02/2020 - 21:51 नवीन
रोम जळत असताना फिडल वाजवणारा 'निरो' काय मी बघितला नव्हता पण, देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात असताना, देशात शतकातली सर्वाधिक बेरोजगारी असताना, जीडिपी निगेटिव्ह असताना,कोरोनाचे संकट वर्षभरापासून आ वासून उभे असताना, देशातला शेतकरी रस्त्यांवर उतरलेला असताना वाराणसीत बोटीच्या डेकवर चमचमणार्‍या लिऑन लेझर लाईट्स अन् डिजेच्या तालावर तबला वाजवणारा 'झिरो' मात्र आज मी पाहिलाय,
  • Log in or register to post comments

हे सगळं ऑटोमेटिक होतं की

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 08:46 नवीन
हे सगळं ऑटोमेटिक होतं की कुंथावं लागतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हे सगळं ऑटोमेटिक होतं की

सुबोध खरे
गुरुवार, 12/03/2020 - 12:13 नवीन
हे सगळं ऑटोमेटिक होतं की कुंथावं लागतं? ह ह पु वा चालू द्या हो आत्म कुंथन. काही लोकांचे सकाळी सकाळी श्री मोदींना शिव्या दिल्याशिवाय पोट साफच होत नाही याला ते तरी काय करणार? परत काही काळाने गुडगुड झालं कि परत एक रतीब टाकावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

पंजाब

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 12/02/2020 - 22:38 नवीन
गेल्या तासाभराचा आमचा 'अभ्यास'- सरकारने ३ कृषीविषयक कायदे आणले आहेत. दोन कायद्याना विरोध नाही पण एकाला आहे- Essential Commodities Act विरोध नाही Farmers Agreement on Price Assurance and farm services विरोध नाही FPTC Act, for short – which is a bone of contention. It permits sale and purchase of farm produce outside the premises of APMC mandis. Such trades (including on electronic platforms) shall attract no market fee, cess or levy “under any State APMC Act or any other State law समजलेला अर्थ असा की ह्या अ‍ॅक्टनुसार शेतकरी आपला माल राज्याबाहेर विकू शकतो. ह्यासाठी ए.पी.एम.सी.च्या परवानगीची गरज नाही. ए पी एम सी शेतकर्यांकडून हमीभावात माल घेतात. मध्यस्थी करणारे दलालांपासुन मुक्तता करण्यासाठी हा कायदा आहे असे सरकार म्हणते. व ते योग्यही वाटते. पण ह्याने मध्यस्थी करणारे दलाल्/अडते जातील व मोठ्या कंपन्या पिळवणूक करतील असे शेतकर्यांंना वाटते. हमीभावात २२ शेती पीके येतात. पंजाब/हरयाणात ह्यातली जास्त पीके असल्याने तेथील शेतकरी विरोध करत आहेत कारण कालांतराने हमीभाव पण मिलणार नाही. मोठ्या कंपन्या सांगतील त्या भावाने पीक विकावे लागेल ही भीती आहे. पण हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही असे सरकारने आश्वासन दिले आहे. आता न्या धागा पुढे- साधक बाधक का काय म्हणतात तशी चर्चा व्हावी ही अपेक्षा.(म्हणजे शेतकरी खलिस्तानी किंवा मोदींची वाराणसी पूजा असले मुद्दे नकोत)
  • Log in or register to post comments

हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही

कपिलमुनी
गुरुवार, 12/03/2020 - 00:20 नवीन
हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही >> हा कायदा बदल्ला आहे कि आश्वासन आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

Apmc

शा वि कु
गुरुवार, 12/03/2020 - 07:04 नवीन
Apmc राहणार याचा अर्थच हमीभाव राहणार. Apmc जाईल अशी तरतूद कायद्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बिहार

शा वि कु
गुरुवार, 12/03/2020 - 07:12 नवीन
बिहार मध्ये apmc पूर्ण रद्द केल्यावर शेती आणि शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाला होता. महाराष्ट्रात हे कायदे आधीच अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात तरी शेतकऱ्यांचे आक्षेप (हमीभाव न मिळण्याचे) सत्यात उतरल्याने ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

नक्की कोणता?

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 09:00 नवीन
बिहार मध्ये apmc पूर्ण रद्द केल्यावर शेती आणि शेतकऱ्यांवर वाईट परिणाम झाला होता.
नक्की कोणता आणि कसा वाईट परिणाम शेतकर्‍यांवर झाला होता? बिहारमध्ये एपीएमसी गेल्या २००६ मध्ये म्हणजे नितीशकुमार मुख्यमंत्री असताना. तरी त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये नितीशकुमार-भाजप युतीला २४३ पैकी २०६ जागा मिळाल्या होत्या. जर शेतकर्‍यांवर वाईट परिणाम झाला असता तर इतक्या जागा मिळाल्या असत्या? उगीच काहीही काल्पनिक गोष्टी लिहू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

दु आयडी,

शा वि कु
गुरुवार, 12/03/2020 - 15:01 नवीन
इतका आवेश बरा नव्हे. मी सध्याच्या कायद्याचे समर्थन करतोय. विरोधक म्हणून भुई तुम्ही धोपटत आहात. कोण निवडून आलं त्याच्यावरून कायद्याचे परिणाम ठरवत नाही. बिहार आणि apmc असे दोन शब्द गुगलून पाहा. काय मिळतंय ते वाचा. आत्ता जो कायदा केला आहे तो आणि बिहार मधले बदल हे वेगळे आहेत. Apmc abolish केलेला बिहारमध्ये. किती भक्तिरसात रममाण व्हावं ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

नक्की प्रॉब्लेम काय आहे?

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 08:57 नवीन
ह्या अ‍ॅक्टनुसार शेतकरी आपला माल राज्याबाहेर विकू शकतो. ह्यासाठी ए.पी.एम.सी.च्या परवानगीची गरज नाही. ए पी एम सी शेतकर्यांकडून हमीभावात माल घेतात. मध्यस्थी करणारे दलालांपासुन मुक्तता करण्यासाठी हा कायदा आहे असे सरकार म्हणते. व ते योग्यही वाटते.
मग आक्षेप कशाला आहे?
पण ह्याने मध्यस्थी करणारे दलाल्/अडते जातील व मोठ्या कंपन्या पिळवणूक करतील असे शेतकर्यांंना वाटते.
इतकी वर्षे मध्यस्थांकडून पिळवणूक व्हायची इतकी सवय झाली शेतकर्‍यांना?
मोठ्या कंपन्या सांगतील त्या भावाने पीक विकावे लागेल ही भीती आहे.
असे म्हणणार्‍यांना कॉम्पिटिशन म्हणजे काय माहित आहे का? एक कंपनी कमी भाव देत असेल तर दुसरी कंपनी जास्त भाव देणारी येत असेल तर त्या कंपनीकडे शेतकरी माल विकतील.
पण हमीभाव्/ए पी एम सी जाणार नाही असे सरकारने आश्वासन दिले आहे.
एपीएमसी काढायची तरतूद कायद्यात आहे का? नसेल तर एपीएमसी राहणार. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? उगीच साप म्हणून भुई धोपटणे चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हमीभाव गेला तर चांगलेच आहे.

साहना
Fri, 12/04/2020 - 07:28 नवीन
हमीभाव गेला तर चांगलेच आहे. ज्या शेतीमालाला मुळांत किंमतच नाही तो पिकवून कशाला वेळ आणि शक्ती दवडायची ? कंपन्या पिळवणूक करतील हे थोथांड वाटते. APMC चे दलाल सुद्धा कंपनी प्रमाणेच आहे. वरून होईना सरकारप्राप्त मोनोपॉली आहे. सर्व बाजार खुले केले तर स्पर्धेने शेतीमालाला जास्त भाव येईल हेच सामान्य अर्थशास्त्र सांगते तसेच सर्व क्षेत्रांतील अनुभव तसाच आहे BSNL मुळे दूरध्वनी स्वस्त होता काय ? डझनावारी टेलिकॉम कंपन्यांनी आमची पिळवणूक केली काय ? DTH ने आमची पिळवणूक केली कि केबल वाल्याने ? नेटलफिक्स चे महिन्याचे सब एका मल्टिप्लेक्सच्या तिकिटापेक्षा कमीच आहे. ५ एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्याने दुसऱ्या पिढीत शेती करू नये आणि दुसरा काही तरी उद्योग शोधावा हे शेवटी होणारच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 00:36 नवीन
पूर्ण कायदा काय आहे ह्याची पूर्ण माहिती नसेल तर शेतकऱ्यांना व्हिलन आणि सरकार कसे योग्य आहे असेल युक्तिवाद करू नका फक्त हमी भाव ,आणि apmc इतपर्यंत च कायदा बदलला गेलेला नाही तर. कॉर्पोरेट शेती करण्यास सरकार नी हिरवा कंदील दिलेला आहे ह्याचा फायदा घेवून मोदी चे लाडके अदानी आणि अंबानी लोकांच्या जमिनी बळकावू शकतात . त्या साठी पैसा,गुंड,सरकारी यंत्रणा ह्याचा वापर होण्याची शक्यता खूप आहे. मोदी चा इतिहास बघितला तर त्यांच्या शब्दा वर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. अविश्वासू पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल.
  • Log in or register to post comments

कॉर्पोरेट शेती करण्यास सरकार

बाप्पू
गुरुवार, 12/03/2020 - 00:45 नवीन
कॉर्पोरेट शेती करण्यास सरकार नी हिरवा कंदील दिलेला आहे ह्याचा फायदा घेवून मोदी चे लाडके अदानी आणि अंबानी लोकांच्या जमिनी बळकावू शकतात . त्या साठी पैसा,गुंड,सरकारी यंत्रणा ह्याचा वापर होण्याची शक्यता खूप आहे.
कायच्या काय. म्हणजे कोर्पोरेट क्षेत्र फक्त लोकांना लुबाडण्याचे काम करते का?? प्रत्येक प्रतिसादात ambani अदानी ला शिव्या घातल्या कि झाले आपले काम.. मुलगा मोठा झाला कि मग तो वाईट मार्गाला जाऊन बलात्कार, चोरी, दरोडे करण्याची शक्यता आहे म्हणून मुलगा जन्माला घालणेच चुकीचे आहे. वरील वाक्यात जेवढे "लॉजिक" आहे तेवढेच राजेश भाऊ यांच्या प्रतिसादात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/24/2020 - 11:47 नवीन
मोदी चा इतिहास बघितला तर त्यांच्या शब्दा वर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे.अविश्वासू पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल.
खरंय ! सध्याचा एक व्हायरल संदेश. ''जिंदगी में तीन चीजों पे कभी भरोसा मत कीजिए - बाबा रामदेव का सामान , मोदी जी की जुबान और अंधभक्तों का ज्ञान'' =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोदी चा इतिहास बघितला तर

वामन देशमुख
Sat, 12/26/2020 - 12:14 नवीन
मोदी चा इतिहास बघितला तर त्यांच्या शब्दा वर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. अविश्वासू पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नक्कीच नोंद होईल.
अगदी बरोबर ! नमोंपेक्षा ममो खूपच विश्वसनीय आहेत / होते नाही का? देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा असावा असे केवळ विधानच करून ते थांबले नाहीत तर त्या दृष्टीने अभ्यास, नियोजन आणि अंमलबजावणी देखील त्यांनी केली. अर्थात, मुसलमानांच्या दृष्टीने संपत्तीमध्ये म्हणजे काफ़िर बायका मुली यांचीही गणना होते हेही त्यांना ठाऊक असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

विश्वास ठेवण्यास बिलकुल पात्र नसलेला पंतप्रधान

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 00:42 नवीन
हे वाक्य नक्कीच मोदी खरे ठरवतील. त्यांच्या मन की बात ह्या कार्यक्रमाला यूट्यूब वर लाईक पेक्षा unlike हा शेरा जास्त प्रमाणात मारला जातो. लोकांना अनुभवातून सद्बुद्धी सुचली आहे. मोदी सरकार च्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृती करण्यात बराच फरक आहे.
  • Log in or register to post comments

कांद्याच्या बाबतीत आताच

आग्या१९९०
गुरुवार, 12/03/2020 - 08:08 नवीन
कांद्याच्या बाबतीत आताच केंद्र सरकारने घेतलला निर्णय ताजा असताना शेतकऱ्यांनी सरकारवर का विश्वास ठेवावा ?
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/03/2020 - 08:41 नवीन
"मोदी सरकार कसे चुकत आहे" हे सांगण्यासाठी परदेशातल्या अर्थत्ज्ञांचा नेहमी हवाला देण्यात येतो. मनमोहन सिंगांचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद वीरमणी ह्यांनी ह्या सुधारणांचे स्वागत केले आहे. This is a #revolutionary #reform of the #agriculture #sector, which will help farmers and hurt middle men & their political partners who share in monopoly rents. I have observed hints of this rent seeking in decision process of the Committee of Secretaries on prices! राजेशा, मुद्द्द्यांवर बोलावेस ही अपेक्षा. नुसतेच "अंबानी-अडानी" करून काही फरक पडणार नाही. https://twitter.com/dravirmani/status/1307690845710307329?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1307690845710307329%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Ftimesofindia.indiatimes.com%2Findia%2Feconomists-sought-these-reforms-for-decades-says-arvind-panagariya-on-passage-of-farm-bills%2Farticleshow%2F78221311.cms
  • Log in or register to post comments

आय थॉट हि वॉज इमोर्टल

महासंग्राम
गुरुवार, 12/03/2020 - 09:52 नवीन
मसाला किंग आणि MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
  • Log in or register to post comments

९८ वर्षे!

खेडूत
गुरुवार, 12/03/2020 - 10:07 नवीन
९८ वर्षे! श्रद्धांजली. स्वतःच्या उत्पादनाची स्वतः जाहिरात ते करत होते...असे अलीकडे त्रिवागो कंपनीच्या मालकाने केले आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

MDH

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 11:05 नवीन
पाहिले तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. MDH चा long-form आता च बीबीसी न्यूज मध्ये वाचला. महाशय द हट्टी. बाकी त्यांची संघर्ष यात्रा खूप मोठी आहे . सियालकोट मध्ये जन्म त्यांचा जन्म झालेला होता. आणि शिक्षण फक्त 5 वी. आताच्या पाकिस्तान मध्ये घरोघरी मसाले विकण्या पासून फाळणी नंतर दिल्ली मध्ये आल्यावर टांगा चालवण्याचे काम पण त्यांनी केले होते. आणि आयुष्याच्या शेवटी करोडो रुपयांचा व्यवसाय उभा होता सर्वात जास्त पगार घेणारे CEO म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अशा लोकांचे चरित्र मुलांना शाळेतून खरोखर शिकवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

म्हणजे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/03/2020 - 11:53 नवीन
म्हणजे "पाचवी नंतर शिकायचे तरी कशासाठी?" असा प्रश्न मुले पालकाना विचारतील. ह.घे. रे राजेशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

प्रश्न योग्य आहे माई.

विजुभाऊ
गुरुवार, 12/03/2020 - 13:02 नवीन
प्रश्न योग्य आहे माई. बारावी नापास तेंडुलकर ४०० कोटींची मालमत्ता उभारू शकतो. कॉलेजचे तोंड न पाहिलेले धीरुभाई हजार कोटींचा व्यवसाय उभारू शकतात. ड्यूक युनिव्हर्सिटीत जाऊन ही काहीच डिग्री न मिळवलेला यशस्वी उओद्योग पती ललीत मोदी दहाबारा देशात स्वतःचा उद्योग पसरवू शकतो. शाळे कॉलेजात जाऊन शिक्षण पूर्न करणारे लोक यांच्या हाताखाली नोकरी करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हो

सॅगी
गुरुवार, 12/03/2020 - 15:12 नवीन
पण म्हणून सगळ्यांनीच शिक्षण सोडून द्यावे का? शिक्षण सोडुन दिलेले असे कितीसे तेंडूलकर, धीरूभाई बनतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

योग्य

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/03/2020 - 16:53 नवीन
योग्य बोललास रे सागरा. पैसा व शि़क्षण ह्याचा जास्त संबंध लावू नये. उपग्रह बनवायला व अवकाशात सोडायला धीरूभाई/तेंडुलकर कामाला येणार नाहीत. फ्लाय ओवर, इंजिन्स,यंत्रे सामुग्री बनवायला अभियांत्रीकीचे शिक्षणच लागेल. धीरूभाईंची ह्रुदय शत्रक्रिया वा सचिनच्या हातावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकशास्त्राचे पदवीधरच होते. पाचवीत शाळ सोडुन देणारे हे करू शकणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

कंपाऊंडर

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 17:06 नवीन
धीरूभाईंची ह्रुदय शत्रक्रिया वा सचिनच्या हातावर शस्त्रक्रिया करणारे वैद्यकशास्त्राचे पदवीधरच होते. पाचवीत शाळ सोडुन देणारे हे करू शकणार नाहीत.
का? डॉक्टरांना काय कळते? डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते असे कोणीतरी बोलले होते हे विसरातला का माईसाहेब?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हॉस्पिटल चे मालक कोण आहेत

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 17:22 नवीन
हॉस्पिटल चे मालक कोण? तर परत त्याचे उत्तर येते तुलनेने कमी शिक्षण असलेले उद्योगपती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

ठीक आहे

सॅगी
गुरुवार, 12/03/2020 - 17:34 नवीन
हॉस्पिटल च्या मालकांनाच सांगा मग शस्त्रक्रिया करायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तुमचे शिक्षण काय?? तुम्ही

बाप्पू
गुरुवार, 12/03/2020 - 17:35 नवीन
तुमचे शिक्षण काय?? तुम्ही देखील 5 वी नापास होऊन असले उद्योगधंदे करून मालक व्हयला कोणी अडवले होते का? आत्ताही प्रयत्न करा. तसेही तुमचे मानसिक वय 5 वी नापास एवढेच वाटते. तुम्हाला मुले -मुली असल्यास त्यांनाही 5 वी नंतर शकवू नका. शक्यतो पाचवीतच नापास कशी होतील त्याकडे लक्ष दया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बापू

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 17:40 नवीन
मुलांना शिकवू नका असे मी कुठेच म्हटलेलं नाही. शिक्षण महत्वाचे नाही असे मी कुठेच म्हटले नाही. मसाला किंग गुलाटी 5 वी पर्यंत च शिकले होते तरी त्यांनी खूप मोठी झेप घेतली ही त्यांची माहिती दिली होती. तुम्ही का कसे लहान मुला सारखे भडकत आहात. भारतातील मोठं मोठ्या हॉस्पिटल चे मालक उद्योग पती च आहेत . हे पण सत्य आहे. चुकीचं काय आहे त्या मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

हो

सॅगी
गुरुवार, 12/03/2020 - 17:37 नवीन
पण तेच कोणीतरी "डॉक्टरांकडूनच" अँजीओप्लास्टी करून घेणार आहेत. कंपाऊंडर कडुन नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

माई साहेब

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 18:05 नवीन
फक्त 5 वी शिकून जर एवढे मोठे यश एकदा व्यक्ती मिळवू शकतो तर उच्च शिक्षण घेवून तुम्ही किती तरी मोठे यश मिळवू शकता असा संदेश पण मुलांकडे जावू शकतो ना. आणि दुसरे महत्वाचे ज्यांना शिक्षणात यश मिळत नाही ते निराश होवून आत्महत्या पण करतात . त्यांना प्रेरणा सुद्धा मिळू शकते. आणि ते निराश पण होणार नाहीत. हे पण घडू शकते ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

शेती विषयक कायदा

Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 10:41 नवीन
ह्या मध्ये साखळी पद्धतींनी उद्योगपती ना मोकळी वाट करून दिलेली आहे आणि शेतकरी कसा अडचणीत येईल ह्याची काळजी घेतली आहे. 1) एपीएमसी च्या बाहेर शेती मालाची खरेदी विक्री करता येईल 2) राज्यांतर्गत शेतमालाची वाहतूक करण्यास कोणतीच बंधन नसतील. 3) शेतमालाचा साठा करता येईल. 4) कॉन्ट्रॅक्ट पद्धती नी कंपन्या शेती करू शकतील. 5) शेतमालाला जीवन आवश्यक श्रेणी मधून वागळेले आहे. ह्या चढ्या नियमाचा अभ्यास केला तर कोणाच्या ही लक्षात येईल उद्योगपती ह्या क्षेत्रात उतरलेलं तर त्यांच्या वर कोणतेच निर्बंध नाहीत. ते हवा तेवढं माल साठवून ठेवू शकतो आणि हवा तेवढा नभा कमवू शकतो. देशात कुठे ही तो माल viku शकतो. कोणतेच निर्बंध नाहीत. कॉन्ट्रॅक्ट शेती जेव्हा कॉर्पोरेट कंपन्या करतील तेव्हा कंपन्या ज्या अटी टाकतील त्याच शेतकऱ्यांना मान्य करण्या शिवाय पर्याय नसेल. विक्री किमतीच्या ठराविक टक्के किमांत ही खरेदी करताना किंवा कॉन्ट्रॅक्ट करताना शेतकऱ्यांना दिलीच पाहिजे अशी अट मात्र कायद्यात बिलकुल नाही. ह्या वरून सरकार चा हेतू साफ होतो . Msp त्या साठीच कायद्याने रद्द केली आहे . विक्री किमती वर आधारित खरेदी किमतीची हमी सरकार नी का दिली नाही तशी अट कॉन्ट्रॅक्ट शेती करणाऱ्या भावी कंपन्यांना का घातली नाही. जे कॉन्ट्रॅक्ट शेती करणार नाहीत तसे मान्य करणार नाहीत . त्यांचा माल विकत घेणारी ही दुसरी यंत्रणा हवी तीच नेस्तनाबूत करून ठेवली ती म्हणजे . APMC मार्केट. जाळ लावलं आहे शेतकऱ्यांची शिकार करण्यासाठी . आणि शिकारी म्हणत आहे काही नाही शेतकऱ्या चा फायदा ह्या मध्ये . प्रतेक वाक्य न वाक्य कायद्या मध्ये असे आहे की उद्योगपती ना मनमानी पद्धती नी शेती व्यवसाय करायला कोणताच अडथळा आला नाही पाहिजे.
  • Log in or register to post comments

संदर्भ

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 10:47 नवीन
Msp त्या साठीच कायद्याने रद्द केली आहे .
एम.एस.पी रद्द केली आहे याचा संदर्भ मिळू शकेल का? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

वस्तुस्थीती ही आहे की पंजाब

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/03/2020 - 11:50 नवीन
वस्तुस्थीती ही आहे की पंजाब-हरयाणा वगळता अनेक राज्यांमध्ये शेतकरी एम एस पी पेक्षाही कमी दराने शेतीमाल विकत होते/विकतात. https://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/no-middlemen-yet-farmers-still-sell-produce-below-msp/articleshow/75468415.cms?from=mdr म्हणजे एम एस पी मुळे फक्त काही शेतकर्यांचाच फायदा होतो. पंजाब-हरयाणामध्ये शेतकरी जवळपास १००% शेतीमाल एम एस पी ने विकतात. ए पी एम सी राहणार हे सरकारने स्पष्ट केले आहे. https://www.businessinsider.in/india/news/apmc-and-msp-will-continue-under-new-farm-bills-2020/slidelist/78230172.cms#slideid=78230334 मात्र चिदंबरम ह्यांनी केलेली सूचना चांगली आहे. खाजगी कंपन्यांनी शेतीमाल विकत घेताना कमीत कमी एम एस पीच्या दराने विकत घेतलाच पाहिजे अशी तरतूद हवी. पण मुक्त बाजार्पेठेत हे सरकारला करणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी

काय पोरखेळ आहे?

महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 11:55 नवीन
मात्र चिदंबरम ह्यांनी केलेली सूचना चांगली आहे. खाजगी कंपन्यांनी शेतीमाल विकत घेताना कमीत कमी एम एस पीच्या दराने विकत घेतलाच पाहिजे अशी तरतूद हवी.
हा काय पोरखेळ आहे? चिदंबरम देशाचे अर्थमंत्रीच होते ना? एम.एस.पी १० रूपये असेल आणि एक कंपनी ८ रूपये द्यायला तयार असेल तर दुसरी कंपनी १२ रूपये द्यायला तयार असेल तर शेतकरी कोणत्या कंपनीला आपला माल विकतील? मग एवढे चिदंबरमना कळत नाही? सध्याची व्यवस्था कायम राहून जर दुसरा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार असेल तर कोणाला आक्षेप असायचे कारण समजत नाही. जर पर्यायी व्यवस्था सध्याच्या व्यवस्थेपेक्षा वाईट असेल असे शेतकर्‍यांना वाटले तर ते सध्याच्या व्यवस्थेतच आपला माल विकतील. मग इतके आकाशपाताळ एक करायची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

भाव कोण ठरवणार?

विजुभाऊ
गुरुवार, 12/03/2020 - 13:03 नवीन
भाव कोण ठरवणार? बहुतेकदा दलाल कारटेल करून भाव पाडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्रसिंग साथी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा