शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
लेखनविषय:
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
सायबीन सवंगाचं काम
बिलकुल नाही पडलं
चकरभुंग्यापायी पीक
खुमसूखुमसू रडलं
घरी धन आणासाठी
करु का रे गांजा-तस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
औंदाच्या पावसापायी
भलतंच ईपरीत घडलं
कापसाचं अख्खं बोंड
बुडापासून सडलं
आता काय तुह्याच घरी
म्या करावी का चोरी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
साल पह्यलेच नापिकीचं
पुन्हा बोंडअळी वरून
बोंडअळ्याच विकाव्या का
आता पोत्यामधी भरून?
खाणार काय आमटी करून
सांग इतकं तरी!
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
तुह्यं "धन-लाभ भवतु"
सांग फलन कसं?
शेतीत कुठं हाय बापू
तुले वाटते तसं?
जरी तुले रुचत नाय
पण गंमत हाये खरी
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
तुले जसं देते अभय,
तसं मले कोण देते?
सरकार फक्त शेतीलेच,
पार नोचू नोचू खाते
कांदा मारला, कापूस मारला
उद्या मारणार तुरी
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
- गंगाधर मुटे "अभय"
============
२०/११/२०२०
============

वाचने
14700
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
वरील दोन ऑप्शन पैकी दुसरा निवडतो
In reply to वरील दोन ऑप्शन पैकी दुसरा निवडतो by ज्ञानोबाचे पैजार
आपले मत शिरोधार्य
अखंड रडरड सप्ताहाच्या
In reply to अखंड रडरड सप्ताहाच्या by प्रसाद गोडबोले
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला
रोजचे मढे त्याला कोण रडे.
In reply to रोजचे मढे त्याला कोण रडे. by बाप्पू
तथास्तू
In reply to तथास्तू by गंगाधर मुटे
चांगलेच आहे कि शेती सोडून जात
In reply to चांगलेच आहे कि शेती सोडून जात by बाप्पू
शेतकरी शेती सोडून
In reply to चांगलेच आहे कि शेती सोडून जात by बाप्पू
आणि तुम्ही?
In reply to आणि तुम्ही? by गंगाधर मुटे
वा आलात वैयक्तिक टीका
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय
In reply to दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय by वामन देशमुख
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by गंगाधर मुटे
हा प्रतिसाद
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार सर
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती
In reply to पहिली गोष्टा भारत अजुनही शेती by आंबट चिंच
भारत हा कृषी प्रधान देश आहे..