मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

गणेशा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली.. अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे.. नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या.. आता डोळ्यासमोरून जात नाहीयेत. मिपावर पण मज्जा आली त्यांच्या मुळे.. अलीकडे संपर्क कमी झाला होता, नेमके करोनाच्या आधी त्यांना मी फोन केला होता, आणि काका भेटूयात पुन्हा असे ठरवले होते.. पुन्हा तसेच दिलखुलास बोलणे झाले, पण शेवटची भेट मात्र शेवटी राहिलीच.. नेमके, आत्ताच मी त्यांची कविता कुठल्याश्या कवितेवर दिली होती.. 'कारण लग्न करून तू सासरी गेली आहे.. 'ती त्यांची खरी कविता होती, कारण त्यांच्या बोलण्यातून मी कारखान्याचे, घाईचे वर्णन ऐकलेले होते.. आणखीन आता बोलू शकत नाही.. वाईट वाटले . देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. http://misalpav.com/user/2594

वाचने 29537 वाचनखूण प्रतिक्रिया 60

मिपावर अविकाकच्या लेखनाला नेहमी दाद देत राहीलो. फेबूवर पण ते मस्त पोष्ट करायचे. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

हेमंतकुमार Wed, 08/05/2020 - 15:31
सा सं यांना एक सूचना: आपले जे सभासद दिवंगत झालेत त्यांच्या खात्यात तशी नोंद करता येईल का?

योगी९०० Wed, 08/05/2020 - 15:45
भावपुर्ण श्रध्दांजली... त्यांच्या काही लिखाणावर अत्यंत वाईट कॉमेंट झाल्या होत्या त्याची आठवण आली. लिहायचे मात्र मनापासून आणि येणार्‍या टिकेची पर्वा करायचे नाहीत.

Bhakti Wed, 08/05/2020 - 16:41
मला ते पुण्यातल्या शरपंजरी कार्यक्रमात भेटले होते.कार्यक्रम संपल्यावर आमचं आस्थेने बोलणं झालं होतं.नगरशी त्यांचा संबंध होता.मिरीकर वाड्याजवळ ते राहायचे कधीतरी ,नगर महाविद्यालयात ते शिकले होते.छोट्याशा भेटीतच त्यांच्या मोकळ्या हसत खेळत गप्पांनी अजूनही घर केलं होतं.खुपच मनमुराद होते अविनाश काका.भावपूर्ण श्रद्धांजली

अभ्या.. Wed, 08/05/2020 - 16:50
अकुकाका एकदम कलंदर असामी होते. रंगीला रसिला माणूस. वाईट झाले

Rajesh188 Wed, 08/05/2020 - 16:50
मनापासून लिहायचे. टीका व्यायची लेखनावर पण कधीच प्रत्युत्तर देत नसतं. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो

खिलजि Wed, 08/05/2020 - 22:25
अत्यंत हृदयद्रावक अप्रिय घटना .. कसे झाले हे ? गुरुदेव ,, आपल्या आत्म्यास सद्गती मिळो ... आज भरपूर वाईट वाटले हे वाचून ...

समीरसूर गुरुवार, 08/06/2020 - 13:33
वाईट झाले. कशामुळे गेले काही कल्पना आहे कुणाला? मिपावरील एक अतिशय सक्रिय आणि चिरतरुण सभासद हरपला. माझा त्यांच्याशी कधी थेट संपर्क नव्हता पण त्यांचे लिखाण मात्र मी वाचत असे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! मिपावरील २-३ सभासद अकाली गेले. असं कुणी गेलं की हळहळ वाटते. आयुष्याच्या क्षणभंगूरपणाचा प्रत्यय येतो. काही वर्षांपूर्वी एक यकु म्हणून सभासद होते; ते अकाली गेले (चू. भू. दे. घे. - चूक असल्यास क्षमा करावी). नंतर वरुण मोहिते, बोका-ए-आझम, आणि आता अविनाश कुळकर्णी गेले...बहुतेक सगळे अकाली गेले. अर्थात, अविनाश कुळकर्णींचे वय मला माहित नाही. अजून कुणी गेले असल्यास कल्पना नाही.

बाप्पू गुरुवार, 08/06/2020 - 17:29
अकु नेहमीच लक्षात राहतील. मिपावर खूप छान लिहायचे.. काही जण त्यांच्या लेखनाची स्तुती करायचे तर बरेचसे टर देखील उडवायचे. पण कधीही खालच्या पातळीवर येऊन वयक्तिक प्रतिसाद दिला नाही किंवा कोणाला वाईट बोलले नाही. भावपुर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो.

चांदणे संदीप Fri, 08/07/2020 - 14:07
कोणी काहीही बोलले/लिहिले तरी त्यांच लेखन चालूच असायचं ते पाहून विशेष वाटायचं. अकुकाकांना श्रध्दांजली. सं - दी - प

चलत मुसाफिर Sun, 08/30/2020 - 19:31
अकुंच्या मूळ लेखाइतकेच मिपाकरांचे त्यावरील प्रतिसाद वाचनीय असायचे. मी प्रतिसादांच्या संख्येवर लक्ष ठेवुन असे. किमान 25-30 प्रतिसाद झाले की मगच लेख वाचायला घ्यायचा. एका अर्थाने वाचकाभिमुख लेखक! महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादकर्त्यांनी कितीही टांग खेचली तरी कुलकर्णी यांच्याकडून कधिही गैर शब्द आला नाही. माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांचे मिपावरील व्यक्तिमत्त्व हे अतिशय सरळमार्गी व आनंदी असे होते.