राजस्थानी घेवर

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
27 Jul 2020 - 7:58 pm

राम राम मंडळी ,कसे आहात ?

मला यु ट्यूब वर नवनवीन रेसेपी पहायला न करून पाहायला पण आवडतात , असाच एकदा " राजस्थानी घेवर ची रेसेपी नजरेखालून गेली प्रकरण इंटरेस्टिंग वाटलं कारण हा पदार्थ मीच काय माझया घरच्यांनी हि पाहिला नाही खाणे तर लांबच म्हणून म्हणलं करून तर बघू अजून ३,४ व्हिडीओ बघितले तर काही जणांनी त्याला इतकं कठीण करून सांगितलं कि ,हिमालय चढणे सोप्प वाटू लागलं एक बया तर म्हणाली " भगवान ने चाहा तो आपके घेवर अच्छे बनेंगे और घेवर फ्राय करते सावधानी बरते नही तो आग लग सकती है , इतकं सगळं घाबरवल्यावर कुणाची हिम्मत होईल घेवर बनवायची ?म्हणून त्यावर घालण्यासाठी केलेली रबडी आम्ही बापड्यानी तशीच खाऊन टाकली , पण मन मानेना वाटलं बघू एक ट्राय मारून जे होईल ते होईल ,
खर सांगते लोकांनी या रेसिपीचा मोट्ठा बाऊ करून ठेवलाय , डोकं शांत ठेवून केलं ना तर लय भारी होतंय बघा !

पारंपरिक कृतीला फाटा देऊन इन्स्टंट मिश्रण तयार करता येत आणि आउटपुट तितकाच लाजवाब आहे
खाली दिलेलं हे प्रमाण माझया सारख्या नवशिक्या ना एकदम हिट झालं बघा

साहित्य :
१) मैदा - १ वाटी
२) तूप - २ चमचे ( मी साजूक घेतलय, नसेल तर वनस्पती पण वापरू शकता )
३)बेसन -१ चमचा
४) अर्ध्या लिंबाचा रस (गाळून )
५) तळण्यासाठीं तेल (किंवा तूप)
६)बर्फ़ाचे क्युब्स -२ ट्रे
७) थंड दूध अर्धी वाटी ( जी वाटी मैद्याला वापराल तीच )
८) थंड पाणी ( फ्रिज वॉटर )

कृती :
ज्यात आपण पातळ वाटण करतो न ते मिक्सर च भांड घेणं ,त्यात २ चमचे तूप न ४ बर्फ़ाचे क्युब्स टाकून १०-१५ सेकंद फिरवून घेणे , त्यामुळे तूप बटर सारखं होत , आता त्यात दूध ओतून पुन्हा फिरवून घेणे ,मिश्रण क्रिमी झालं कि त्यात २ चमचे मैदा न थोडं पाणी घालून फिरवून घेणे ,मैदया मध्ये गुठळी होता कामा नये , पुन्हा २ चमचे मैदा पुन्हा थोडं पाणी असं फिरवून घेणे , असा संपूर्ण मैदा थोडं थोडं पाणी घालून फिरवून घेणे , शेवटी एक चमचा बेसन घालून पुन्हा फिरवणे सर्वात शेवटी लिंबाचा रस घालून फिरवून घेणे.
ही सर्व प्रोसेस मिक्सर सलग न चालवता चालू बंद करून करावी आता यात किती पाणी लागेल ? मला २ छोटे ग्लास लागलेत आणि मिश्रण पातळ हवं चमच्याने सोडलं कि सुरक्कन खाली आलं पाहिजे
आता हे मिश्रण एका भांड्यात ओतुन ते भांड बर्फ घातलेल्या एखाद्या परातीत किंवा पातेल्यात ठेवा मिश्रण जितकं थंड राहील घेवर तितकेच छान होतात
पुढची स्टेप थोडी काळजी पूर्वक
घेवर तळताना भांड जस असेल तशी फ्लेम ठेवा , शकयतो कमी व्यासाचे भांडे वापरणं उत्तम , माझं पातेलं छोट होत म्हणून मी मध्यम आचेवर तळल मोठं जाड बुडाचं पातेलं असेल हाय फ्लेम लागेल .
१) माझ्याकडे एक छोटी पातेली होती मी तीच वापरली या साठी लोक शक्यतो निमुळती भांडी वापरतात
२) मी पातेलीत अर्ध्या पेक्षा कमी तेल घातल याच कारण जास्त तेल घातलं तर फेस होऊन मिश्रण बाहेर येऊ शकत म्हणून प्लिज अर्ध भांड च तेल घ्या
३) तेल कडक तापले की चमच्याने अगदी थोडं मिश्रण तेलात सोडावं , मिश्रण सोडल्यावर फेस न बुडबुडे येतात म्हणून थोडं थांबावं न ते कमी झालं कि पुन्हा थोडं मिश्रण सोडावं असं करत एक वर्तुळ तयार होत , त्याच्या मध्ये चमच्याने जागा करून मधोमध मिश्रण सोडत राहावं ,हि प्रोसेस करत राहावी तुम्हाला पाहिजे तो थिकनेस आला कि सुरीने हलकेच घेवर चे काठ किनाऱ्यापासून सोडवून घ्यावेत न वरून थोडं दाब देऊन वरची बाजू तेलात बुडवून खरपूस तळून घ्यावी न मग घेवर चमच्या न सुरीच्या साहाय्याने बाहेर काढून निथळत ठेवावा कारण यांच्या जाळीमध्ये तेल असत

पाक : १ वाटी साखर घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी , ह्याच उकळून मधासारखा मिश्रण झालं कि पाक रेडी
रबडी : १ लिटर दूध घेऊन मंद आचेवर आटवत राहावे , काठाचे मलाई काढून मिक्स करत राहाववी घट्ट होत आलं की त्यात आवडीनुसार साखर घालावी पुन्हा थोडं आटवून घ्यावं झाली रबडी ,

आता घेवर घेऊन त्यावर साखरेचा पाक घालावा न वरून थोडी रबडी घालावी , पिस्ते बादाम घालावेत बस्स !!!!
तुम्ही घेवर बनवून एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठऊ शकता , १५-२० दिवस सहज टिकतात जेव्हा वाटेल तेव्हा रबडी बनवून खाऊ शकता
a
पहिला घेवर देवाला ;)

b

अब देखो
d
g
f
k

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

27 Jul 2020 - 8:15 pm | श्वेता२४

पाहूनच तोंडाला पाणी सुटले! पण एवढं सगळं करण्याचे पेशन्स माझ्यात नाहीत. तुम्हाला दंडवत :)))

झेन's picture

27 Jul 2020 - 8:32 pm | झेन

फोटो कातील, रबडी घालून घेवर कधी ट्राय केलं नव्हतं. कुठे मिळेल.... डोकं खाजवणारा स्मायली

रुपी's picture

27 Jul 2020 - 8:36 pm | रुपी

लईच भारी झाला आहे!

घेवर फार आवडता पदार्थ. तरी घरी वगैरे बनवायचा विचार अजून मनात आला नाही ;)
नगरचा रामेश्र्वर चा छान असायचा.. अजूनही असेल. पण मागच्या काही भारतवारीत पुण्याच्या पुरोहितकडून ४-५ बरोबर घेऊन येते :)

Gk's picture

27 Jul 2020 - 10:40 pm | Gk

म्हैसूरपा चा नातेवाईक वाटतो

मैसूर पाक बेसन वापरून करतात इथे मैदा वापरतात न टेस्ट पण वेगळ्या आहेत दोन्हीचा

पियुशा..नेहमी प्रमाणे भारीच गं..

घेवर मारवाडी तर् म्हैसूरपाक मैसूर चा (बंगळुरू जवळील)

यश राज's picture

27 Jul 2020 - 11:59 pm | यश राज

घेवर मस्त जाळिदार जमलाय.
घेवर बनवण्यासाठी खुप मेहनत व पेशंस असावे लागतात.
माझे ४ प्रयोग फसले व ५व्या प्रयोगावेळी असा जाळिदार घेवर जमला.

जुइ's picture

28 Jul 2020 - 3:10 am | जुइ

अप्रतिम! कष्टाचे काम आहे हे!

कंजूस's picture

28 Jul 2020 - 5:31 am | कंजूस

जमलंय की!

राजस्थानच्या एका ट्रीपवरून परत येताना - राणकपूर - फलना रे स्टेशनला गाडी संध्याकाळी पाचला होती. मग जवळच्याच बाजारातून नेण्यासाठी खाण्याचे पदार्थ घ्यायला गेलो. त्या मिठाइवाल्याने घेवर सुचवले. कारण खव्याचे पदार्थ टिकत नाहीत. घरी आणून लोकांना देण्यात पाच दिवस जातात. दहा खोके घेतले. हलकेही होते आणि चांगला नवा पदार्थ सर्वांना आवडला.
( दीड तासाने अबूरोड स्टेशन आहे तिथे वीस मिनिटे गाडी थांबते तेव्हा { मटक्यातली } रबडी घेऊ असं ठरलं. पण गाडी चार तास उशिरा आली आणि अबूरोडला साडेदहा वाजल्याने रबडी स्टॉल्स बंद झाले. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2020 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो लैच जबरा. जीवघेणे. अनुक्रमांक वरुन तिसर्‍या पाचव्या सहावे जाळीदार फोटो पाहुन ते चवीला कुरकुरीत लागत असतील की कसे असा विचार करुन
जाळीदार फोटो लै वेळ टक लावून पाहात बसलो. घेवर लै म्हणजे लै आवडले.

-दिलीप बिरुटे

पियुशा's picture

28 Jul 2020 - 12:31 pm | पियुशा

हो दिलीप सर,घेवर कुरकुरित असतात न खरी पद्धत घेवर वर पाक घालून खाने ही आहे , कुरकुरित घेवर वर ही अशी मलमली रबडी पसरवून न त्यावर पिस्ते बादाम पेरून खान्या आधी कॅलरी चा विचार गाँठोडयात बाँधून ठेवणे आले ;) लोक श्रीखंड पेरून पण खातात पण चविला कसे असतील याची कल्पना नाही ,"थंड रबडी बरोबर खाने हे स्वर्गीय सुख हा माझा अनुभव "

सुबोध खरे's picture

28 Jul 2020 - 12:12 pm | सुबोध खरे

एकदम खतरनाक फोटो आहेत.

घेवर रबडी घालून थंडीमध्ये खावेत ( मी जोधपूरला खाल्ले आहेत)

एक तर भूक छान लागलेली असते आणि वजन कॅलरीचा विचार करावा लागत नाही.

चहात बुडवून खाल्ले तर वजन वाढणार नाही.

वीणा३'s picture

28 Jul 2020 - 9:20 pm | वीणा३

तों. पा. सु. करून अजिबात बघणार नाहीये, पण आता कुठे मिळतो का ते शोधणं आलं :)

प्रचेतस's picture

29 Jul 2020 - 9:51 am | प्रचेतस

मस्त.
फोटू तर जीवघेणे आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jul 2020 - 11:21 am | अत्रुप्त आत्मा

प्लश वन टू आगोबा !

जाणल्येवा फोटू!
https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/p720x720/116358256_1854009744738327_5512298465417013374_o.jpg?_nc_cat=106&_nc_sid=110474&_nc_ohc=Br9R2NOlj6cAX8Nr34U&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&_nc_tp=6&oh=6c2b289937da14a395fcdb4cee7ed193&oe=5F455EB9
........... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/big-drooling-smiley-emoticon.gif

जबरदस्त बेत - पेशन्स पाहिजे पण.

घेवर विदाउट रबडी आवडतात फार - आमच्याकडे रक्षाबंधन आणि मकर संक्रांतीला खास हीच मिठाई :-)

हा आमचा फोटू मात्र जुना आहे.

आहाहा... जिल्बुशा भारी रेसेपी बनवली आहेस ! :) शेवट्या फोटोत मी एक बाइट घेतला आहे असे समजुन घ्यावे ! ;)
मला राजस्थान मधील ब्यावरची तीळ पापडी आणि गजक हा प्रकार प्रचंड आवडतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Avrodh – The Siege Within | SonyLIV Originals |