माझा कोविड अनुभव
लेखनप्रकार
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत. या लोकल डॉक्टर कड़े ३-४ वेळा जाण झाल होत. त्यांनी एंटीबायोटिक्स लिहून दिल आणि इंजेक्शन पण दिले. घरी आल्यावर घाम येऊन ताप उतरला आणि त्याला फ्रेश पण वाटायला लागल. शनिवारी सकाळी तो ठीक होता. नेहमी प्रमाणे त्याने व्यायाम पण केला. त्याला अजिबात थकवा न्हवता. राहिलेला दिवस त्याने असाच झोपुन होता. ताप चढत उतरत होता.
गुरुवारी जसा ताप(९९) यायला लागला तस त्याने स्वता:ला आमच्या पासून वेगळ केले होते. फक्त जेवण्यापुरत तो खाली येत होता. आमच रो हाउस आहे अणि आमची बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. डॉक्टर म्हणाले होते की जर ताप नाही उतरला तर आपण डेंगू मलेरिया टेस्ट करू. त्याला तापा शिवाय अजुन काही लक्षणे नव्हती. आम्हाला वाटत होत नार्मल फ्लू आहे. रविवारी सकाळी त्याला ९९ ताप होता आणि मलाही. मग मात्र आम्हाला शंका आली. माझ्या नवऱ्याला अजुन तापा शिवाय काहीही नव्हत. मग मात्र डॉक्टर म्हणाले की आपण टेस्ट करू. आमच्या घरी जावेच १० महिन्याच बाळ आहे अणि सासुबाई ज्यांना दम्याचा त्रास आहे म्हणून आम्हाला कोणतीच रिस्क नको होती अणि आम्ही लगेच टेस्ट करायला गेलो.
आमच्या या डॉक्टर ची सह्याद्रि हॉस्पिटल ला ओळख होती त्यांनी कॉल करून सगळ अरेंज केले होते. दुपारी १२ च्या आसपास सैम्पल घेतला गेला आणि इथून आमची परीक्षा सुरु झाली. रविवारी सकाळी माझ्या नवऱ्याने ब्लड सैंपल पण दिला होता डेंगू अणि बाकि टेस्टसाठी. संध्याकाळ पर्यन्त ब्लड रिपोर्ट आले ते सगळे नार्मल होते. मला जास्त समजत नाही पण टेस्ट असते ज्याने समजत की काही इन्फेक्शन आहे का ते(CRP टेस्ट बहुदा. येथील डॉक्टर जास्त सांगू शकतील). हे पण नॉर्मल होता. आमच्या डॉक्टरच्या मताप्रमाणे ही टेस्ट नेगेटिव आहे तर covid ची टेस्ट पण नेगेटिव येण्याचे चान्सेस ४०-५०% आहेत. आमचे रिपोर्ट संध्याकाळ पर्यन्त येणार होते पण नाही आले. हे सगळे अपडेट आम्हाला आमचे डॉक्टरच सांगत होते. सोमवारी आम्ही आमच्या बेडरूम मधेच काम करायला सुरवात केली. दोघेही नार्मल होतो. तो एंटीबायोटिक्स घेत होता अणि मी फक्त परसटोमोल. ताप येत जात होता. थकवा वैगरे काही न्हवता. आम्ही घरच्यांपासून पूर्ण isolate होतो अणि दुपारी डॉक्टरचा कॉल आला की तुमचा इन्शुरन्स आहे का? या एका वाक्यात सगळ होता. आम्ही दोघेही Covid 19 पॉजिटिव होतो. आमच्या आरोग्य सेतु ऐप वर पण पॉजिटिवची नोंद झाली होती.
डॉक्टरांच्या मताप्रमाणे आम्ही लगेच एडमिट व्हायला पाहिजे अणि ते आमच्यासाठी बेड अरेंज करायला तयार होते. आमची लक्षणे अजुन स्ट्रांग नव्हती आणि म्हणुन बेड occupie करायची तर अजिबात इच्छा नव्हती. दोनच दिवासपूर्वी PMC ने सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी होम क्वारंटाइनच्या गाइडलाइन्स दिल्या होत्या. सायली राजाध्यक्ष यांची होम क्वारंटाइनची फेसबुक पोस्ट वाचलेली होती अणि त्यांनी त्याना अनुभव प्रत्येक दिवसानुसार खुप छान सांगितलेले आहे म्हणून मग कुठेतरी वाटत होता की नको एडमिट व्हायला. या दरम्यान आमच्या डॉक्टरच मत अस होता की लक्षणे वाढू शकतात तुम्ही एडमिट व्हा. याधीचा सहयाद्रिचा अनुभव खुप चांगला नाहीये. म्हणून मग घरचे सगळेच दीनानाथला जायला सांगू लागले. आम्हाला माहित होता की बेड नाही मिळणार तिकडे. तरी आम्ही तिकडे गेलो अणि सांगितला की पॉजिटिव आहोत. त्यानी फीवर ओपीडी तयार केली आहे. तिकडे सगळे पैरामीटर चेक केले अणि सांगितला की बेड नाहीये पण तुम्ही होम क्वारंटाइनच कंसलटेशन घेऊ शकता.
आम्ही थोड़ा विचार करून अणि घरी बोलुन हा ऑप्शन घ्यायच ठरवल. तिकडे दोघांचे २००० घेऊन त्यांनी कंसलटेशन केले अणि घरी असतना कशी काळजी घायची याची सगळी माहिती दिली. या दरम्यान आमचा दोघांचा ताप पूर्ण उतरलेला होता अणि बाकि काही लक्षणे नव्हती. त्यांच्याच फार्मेसी मधे एक किट आहे ज्यामधे, सर्जिकल मास्क, डिसइंफेक्टर, गार्बेज बैग्स, थर्मामीटर अणि ऑक्सीमिटेर आहे. याची किंमत ३००० आहे. इथल्या डॉक्टरांनी आम्हाला झिंक,HCQ,परसटोमोल असे मेडिसिन दिले. त्यांनी आम्हाला वेगळया रूम मधे रहा हे पण सजेस्ट केले. आम्ही या गोष्टीला नाही म्हणालो. आम्हाला सोबत राहण्याची जास्त गरज होती अस आम्हाला वाटल. तरी माझ्या नवऱ्याने एक्स्ट्रा गादी जमिनीवर टाकली अणि मी बेड वापरत होते.
मंगळवारी (७ जुलै) आम्ही सुट्टी घेतली. पूर्ण दिवस झोपुनच होतो. प्रत्येक २ तासाला आम्ही टेम्प्रेचर अणि ऑक्सीजन लेवल चेक होतो. ऑक्सीजन लेवल की ९५ च्या वर असणे खुप गरजेचे होते. कधी कधी रात्री जाग आल्यावर पण आम्ही हे चेक करायचो.दिवसातून एकदा थोड़ा रूम मधेच ३ मि पेक्षा जास्त वॉक नंतर पण चेक करायचो. ऑक्सीजन साचुरेशन हे वॉक नंतर पण ९५ च्या वर असत. आम्ही गरम पानी रूम मधेच करून पीत होतो. वाफ घेत होतो. इंडक्शन आम्ही वर मागवाला होता. घरचे सगळे फक्त खालचा मजला वापरत होते. आम्ही ताट रूम च्या बाहेर ठेवायचो अणि निघून गेले की मग जेवण आत घ्यायचो. पहिला पूर्ण आठवडा आम्हाला सगळ जेवण हे विचित्र लागत होते. कधी खुप खारट कधी अजिबात चव नव्हती. जेवणाची इच्छा नसायची. आम्ही पाणी भरपूर प्यायचो. दिवसातून २ वेळा काढा करून पीत होतो. १ काढा जो आयुर्वेदिक डॉक्टरने बनवाला आहे आणि दूसरा ज्या मधे गुलवेल, हळद, आल, दालचीनी,मीरे, लवंग, तूळस अणि थोड़ा गुळ असा पानी अर्ध होई पर्यंत गरम करून पीत होतो. बुधवार नंतर मला कफ आणि खोकला सुरु झाला. पण अगदीच थोड्या प्रमाणात. १-२ तासामधे एखादी उबळ येत असे. यासाठी आम्ही दीनानाथ मधे डॉक्टरांना कॉल करूँ विचारणा केली होती अणि त्यांनी फक्त ऑक्सीजन साचुरेशन वर लक्ष ठेवायला सांगितले. कॉल करण्याचे अजुन एक कारण होते की आम्हाला बघायचे होते की किती वेळामधे आम्हाला रिस्पांस मिळत आहे.
या मधे PMC कडून वरचेवर कॉल येत होते अणि तब्बेतीची चौकशी केली जात होती. एकदा त्याचे लोक येऊन पार्किंग मधे फवारणी करून गेले. दुसऱ्या आठवड्यात खुपच बरे वाटत होते. पहिल्या आठवड्यात नवऱ्याला एकदाच थोडा(99) ताप आला होता. आम्ही रोज सकाळी पूर्ण रूम सानिटाइझ करत होते. योगा करायला पण सुरवात केली. वाशरूम यूज़ नंतर पण सगळे नॉब पण स्प्रै करत होते. जेवढे लांब रहता येईल एकमेकांन पासून तेवढा प्रयन्त करत होतो.
या सगळ्या मधे मानसिक उतार चढाव पहिल्या ४-५ दिवसात खुप झाले. आपल्यामुळे बाळाला आईला त्रास होईल याची भीति वाटत होती. या सगळ्यामधे आम्ही पूर्ण वेळ काम केला. सुट्टी घेऊन आम्ही पूर्ण वेळ फक्त या बद्दल वचत होतो म्हणून एका दिवसाच्या सुट्टी नंतर आम्ही काम करायचे ठरवले. ऑफिसमधे कल्पना असल्यामुळे आमचे काम थोडे कमीच होते. दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी ठीक वाटत होते. आता हा तिसरा आठवडा आहे. आमच आइसोलेशन संपले आहे. आम्ही अजुनपण घरात मास्क वापरतो आहे. आता आरोग्य सेतु ऐप वर पण स्टेटस चेंज झाले आहे.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो. पण आम्ही दुसरे कुणालाही इन्फेक्ट नाही केला. जसा ताप यायला सुरवात झाली तस आइसोलेट झालो. इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो.
शेवटी मी एवढच म्हणेल आहे की घाबरू नका. शांत रहा. आम्हाला जास्त त्रास नाही झाला. पण आता पूर्ण काळजी घ्यायची ठरवल आहे. आधी किराणा अणि भाजीसाठी बाहेर जात होतो आता तेहि ऑनलाइन बघणार आहे.
हा माझा पहिलाच लेख आहे. काही चूका असतील तर समजून घ्या.
वाचने
37077
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
तुमचे अनुभव
अनुभव मार्गदर्शक.
In reply to अनुभव मार्गदर्शक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद
In reply to अनुभव मार्गदर्शक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.... 'तुमचा इन्शुरन्स आहे का?
लेख वाचून मनावर ताण आला.
अभिनंदन आणि थोडे प्रश्न
का? असेल तर त्यांच्याशी तुमचे
In reply to का? असेल तर त्यांच्याशी तुमचे by अश्विनी मेमाणे
आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल
In reply to आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल by माहितगार
मार्चपासून कुणिच आले नाही
प्रत्येकाने वाचावे अन बोध
In reply to प्रत्येकाने वाचावे अन बोध by चौथा कोनाडा
पहिलाच प्रयन्त
In reply to प्रत्येकाने वाचावे अन बोध by चौथा कोनाडा
@
कोविडमुक्त झाल्यानंतर
In reply to कोविडमुक्त झाल्यानंतर by अनन्त्_यात्री
स्वॅबटेस्ट
In reply to स्वॅबटेस्ट by अश्विनी मेमाणे
सुखरुप बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !
In reply to सुखरुप बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन ! by संजय क्षीरसागर
श्वास घ्यायला त्रास व्हायला
In reply to श्वास घ्यायला त्रास व्हायला by सुबोध खरे
कोणत्या स्टेजला किंवा निकषावर
In reply to श्वास घ्यायला त्रास व्हायला by सुबोध खरे
@ सुबोध खरे : हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे ?
In reply to @ सुबोध खरे : हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे ? by संजय क्षीरसागर
हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि
In reply to हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुम्हाला मुद्दा कळेल तेंव्हा खरं !
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला मुद्दा कळेल तेंव्हा खरं ! by संजय क्षीरसागर
उगाच या बोटाची थुंकी त्या
In reply to उगाच या बोटाची थुंकी त्या by सुबोध खरे
@ सुबोध खरे : मुद्दा तोच रहातो !
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा तोच रहातो ! by संजय क्षीरसागर
लक्षणं आली तर टेस्ट करा '
In reply to लक्षणं आली तर टेस्ट करा ' by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आता अध्यात्मिक झोल केलात !
In reply to @ सुबोध खरे : आता अध्यात्मिक झोल केलात ! by संजय क्षीरसागर
उगाच या बोटाची थुंकी त्या
In reply to उगाच या बोटाची थुंकी त्या by सुबोध खरे
आपण "गौतम बुद्धा" चे अवतार
In reply to आपण "गौतम बुद्धा" चे अवतार by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुम्हाला विषय काये आणि प्रतिसाद काय देतायं
In reply to @ सुबोध खरे : तुम्हाला विषय काये आणि प्रतिसाद काय देतायं by संजय क्षीरसागर
आता वाफेचं तापमान, तुमच्या
In reply to आता वाफेचं तापमान, तुमच्या by सुबोध खरे
@ सुबोध खरे : काय लिहिता आणि प्रत्येक वेळी किती पल्टी मारता ?
In reply to @ सुबोध खरे : काय लिहिता आणि प्रत्येक वेळी किती पल्टी मारता ? by संजय क्षीरसागर
विषाणू शरीराच्या पेशीत आत
In reply to विषाणू शरीराच्या पेशीत आत by सुबोध खरे
@ सुबोध खरे : मुद्दा हुकला की निरुपयोगी मेडीकल फेकाफेक सुरु !
In reply to @ सुबोध खरे : मुद्दा हुकला की निरुपयोगी मेडीकल फेकाफेक सुरु ! by संजय क्षीरसागर
ते Ig A वाचून आणि समजून घ्या
In reply to ते Ig A वाचून आणि समजून घ्या by सुबोध खरे
@ सुबोध खरे : तुम्ही ज्या विषयावर लेख लिहिलेत
In reply to @ सुबोध खरे : तुम्ही ज्या विषयावर लेख लिहिलेत by संजय क्षीरसागर
मला नक्की माहिती आहे पण
In reply to मला नक्की माहिती आहे पण by सुबोध खरे
@ सुबोध खरे : एकूणात असा प्रकार आहे तर !
In reply to @ सुबोध खरे : एकूणात असा प्रकार आहे तर ! by संजय क्षीरसागर
भंपक प्रतिसाद
In reply to भंपक प्रतिसाद by सुबोध खरे
@ सुबोध खरे : उत्तर देण्यासारखं आता आहे काय तुमच्याकडे ?
In reply to @ सुबोध खरे : उत्तर देण्यासारखं आता आहे काय तुमच्याकडे ? by संजय क्षीरसागर
तुम्हाला साधं मराठी कळत नाही
In reply to तुम्हाला साधं मराठी कळत नाही by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आता काल लिहिलेलं आज आठवेनासं होतंय !
In reply to @ सुबोध खरे : आता काल लिहिलेलं आज आठवेनासं होतंय ! by संजय क्षीरसागर
प्रतिसाद उत्तर देण्याच्या
In reply to हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि by सुबोध खरे
सल्ला आणि ट्रेण्ड
अभिनंदन
छान !
इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी
In reply to इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी by कोहंसोहं१०
आहार
अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद
इन्शुरन्स
अनुभव मांडल्याबद्दल आभार
हे ऐकण्यासारखं आहे
In reply to हे ऐकण्यासारखं आहे by संजय क्षीरसागर
इन्शुरन्स
महत्वाचा अनुभव
संजय क्षीरसागर,
आजारातनं बाहेर पाडल्याबद्दल अभिनंदन
भीतीदायक आहे अनुभव. इतके दिवस
ताप
In reply to ताप by हणमंतअण्णा शंक…
ताप
जबरदस्त!!!!
रोगांसाथींचा मुकाबला
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.....
In reply to माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..... by मुक्त विहारि
वादा वादातून सत्याची माहिती
In reply to वादा वादातून सत्याची माहिती by माहितगार
तिन्ही मुद्दे योग्य आहेत...
लक्षण असल्या शिवाय covid19 ची टेस्ट नाही
In reply to लक्षण असल्या शिवाय covid19 ची टेस्ट नाही by Rajesh188
आकडेवारी कमी दाखवणे आणि
हे वैद्यकीय दृष्ट्या अजून समजून घेता येईल?
लेखिकेचा अनुभव रोचक आणि