

उकडलेल्या बटाट्याचं तव्यावर कमी तेलात भाजून घेतलेलं म्हणजे शॅलो फ्राय केलेलं उपवासाचं सोपं पॅटिस खूपदा केलं होतं. ते इथे एका धाग्यात प्रतिसाद म्हणून शेअरही केलं होतं. आज उकडलेल्या बटाट्यात उपवासाची भाजणी घालून तळून पॅटिस करण्याचा पराक्रम केला आहे. पराक्रम अशासाठी की "ते तेलात फुटणार मग डोक्याला ताप होणार, नकोच ते!!" असं म्हणून कित्येकदा ठरवूनही रद्द केला गेलेला हा पदार्थ आहे.
दोन मध्यम मोठ्या बटाट्यांचे मध्यम आकाराचे दहा पॅटिस झाले.
विशेष सूचना : बटाटा बेताचा शिजवून घ्यावा म्हणजे साले काढून खिसणीवर खिसला तरी चिकट होत नाही.
१) पहिल्या फोटोतले बटाटे उकडून खिसलेले व दुसर्या फोटोतील चार चमचे उपवासाची भाजणी व चवीपुरते मीठ घालून पारी (कव्हर) साठी गोळा करून घ्यावा. आज दोन बटाट्यांसाठी चार चमचे भाजणी लागली. हे प्रमाण बटाट्याच्या प्रकारानुसार, प्रमाणानुसार बदलू शकते.
२) आता पहिल्या डिशमधले बाकीचे पदार्थ ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची व कोथिंबीर, किसलेलं आलं व चवीपूरतं मीठ व साखर आणि थोडा लिंबाचा रस घालून एकत्र करून सारण करावं. थोडे बेदाणे, काजू तुकडे घालावेत म्हणजे आणखी मजा व रेसिपीचे स्टार्सही वाढतील. (आज घरात नव्हते म्हणून यात नाहीत. काजूबेदाणे नसतील तरी चवीत फरक पडत नाही.)
३) आता तळण्यासाठी तूप/ तेल बारीक गॅसवर तापवायला ठेवा. कव्हरसाठीचा गोळा तेलपाण्याचा हात लावून चांगला मऊ मळून घ्या. पारी करून त्यात थोडे सारण भरून बंद करा. हे करताना लागलं तर हाताला थोडं पाणी लावून घ्या. सारण भरलेला तयार गोळा एका प्लेटमधे थोडी उपवासाची भाजणी घेऊन त्यात घोळवा. तेल तापले असेल त्यात हा गोळा मंद गॅसवर तळून पहा. फुटला तर गॅस बंद करा. बटाट्याच्या गोळ्यात आणखी थोडी उपवास भाजणी मिसळा व मळा. चेक करा. न फुटता नीट तळले गेले पाहिजे.
गोळा फुटला नाही तरीही गॅस बंद करा. ;) :D उरलेले पॅटिस तयार करून भाजणीत घोळवून घ्या. गॅस चालू करून हे सर्व पॅटिस मंद गॅसवरच तळून घ्या. खोबर्याची चटणी अगर दह्यात मीठ व साखर घालून त्याबरोबरही मस्त लागतात .
मिसळपाव
प्रतिक्रिया
1नंबर! अट्यंट आवडता पदार्थ
1नंबर! अट्यंट आवडता पदार्थ हाये!
कसल भारी झालंय पॅटीस
फोटो एकदम आवडला. करुन बघेन
व्वा, भारीच झालंय.
व्वा, भारीच झालंय.
धन्यवाद! पॅटिस आवडलेले कळवले
धन्यवाद! पॅटिस आवडलेले कळवले ते आवडले.
https://misalpav.com/comment/687097#comment-687097 इथे कमी तेलात तव्यावर परतून केलेली कृती फोटोंसह पहायला मिळेल.
वा! मस्तच!
वा! मस्तच!
मस्तच
मस्तच
धन्यवाद!!
धन्यवाद!!
वाह!
पाकृ आवडली. नक्कीच करुन बघेन.