पंजाबी मटण करी आणि तवा गार्लिक नान

केडी's picture
केडी in पाककृती
4 Jun 2020 - 10:47 pm

1

मटण करी हि रणवीर ब्रार च्या पाककृतीवरून केली. (त्या पाककृतीच मी तंतोतंत अनुकरण केलं ) त्याचा दुवा देतोय. तवा गार्लिक बटर नान मागे कसा करायचे ते दिलेला, यंदा एक जराशी वेगळी पाककृती केली. ह्यात दूध वापरल्या मुळे ते नांन अतिशय मऊसूद राहिले. अगदी नंतर १ तासाने जेवायला बसलो तरीही.

त्या नान ची पाककृती इथे देतोय. ह्याने साधारण १६ मध्यम आकाराचे नांन होतील). हि पद्धत वापरून रोटी, किंवा लच्छा पराठा सुद्धा करता येतील.

साहित्य
२ कप गव्हाचे पीठ
२ कप मैदा
१ मोठी चिमूट मीठ
१ मोठी चिमूट साखर
१ कप दूध (शक्यतो फुल्ल क्रीम म्हशीचे)
२ मोठे चमचे तूप
१ कप पाणी

१५ ते २० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
१ मोठा चमचा कलोंजी (ऐच्छिक)
१ अमूल बटर छोटा पॅक, वितळून

कृती

दोन्ही पिठं , साखर, मीठ, तूप हे एकत्र करावे. ह्यात दूध घालून थोडेसे एकजीव करावे. आता ह्यात हळू हळू पाणी टाकून हे पीठ साधारण १५ ते २० मिनिटे मळावे. कणकेच्या गोळ्याला बोटाने तेल लावून किमान १ तास झाकून ठेवावे.
कणकेचे १६ समान गोळे करावे. गोळ्याला शक्यतो पीठ न लावता नांन च्या आकारात लाटून घ्यावा. हलक्या हाताने पाणी लावून त्यावर लसूण कोथिंबीर कलोंजी चे मिश्रण पसरवून, पुन्हा हलक्या हाताने ते लाटून घ्यावे. आता नान च्या दुसऱ्या बाजूस पाणी लावून, आधीच तापत ठेवलेल्या तव्यावर नान ठेवावा. नान थोडासा फुगला, कि तवा उलटा करून, लसूण लावलेली बाजू गॅस वर भाजून घ्यावी.

नांन तव्यावरून काढून त्यावर ब्रश अथवा चमच्याने बटर लावावे. तयार नांन एका फडक्यात गुंडाळून ठेवून द्यावेत. हे नांन अतिशय मऊ राहतील, आणि हॉटेल सारखे चामट होत नाहीत त्यामुळे नंतर खाल्ले तरी चालतात.

2

प्रतिक्रिया

प्रशांत's picture

4 Jun 2020 - 11:10 pm | प्रशांत

पाकृ मस्त.

फोटो कमी का टाकले?

वीणा३'s picture

5 Jun 2020 - 10:09 pm | वीणा३

मस्त फोटो आणि रेसिपी

तुषार काळभोर's picture

6 Jun 2020 - 6:39 pm | तुषार काळभोर

नान करायचा लई वर्षांचा मनसुबा आहे. अवघड प्रकरण आहे, पण घरात बनवलेला नान खायचायच.
मटण करीचा कलर - सुभानाल्लाह!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Jun 2020 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तोंडाला पाणी सुटतं ना भौ असे फोटू पाहून. नंबर एक पाककृती.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

6 Jun 2020 - 6:51 pm | अभ्या..

बेस्ट नान केडी
फटु कातिल

मीअपर्णा's picture

8 Jun 2020 - 10:02 am | मीअपर्णा

नानची रेसिपी दिल्याबद्दल खूप आभार. फोटो छान आहेच. बैजवार फोटो दिसले असते तर आमच्यासारख्या होतकरूंची जास्त सोय झाली असती. नक्की करून पाहिन. :)

धन्यवाद.