✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गाण्यास पावसाच्या...

स — सत्यजित..., Mon, 06/01/2020 - 18:22
गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! होतील बघ सुरंगी लाजून गाल हे भेटीत पावसाच्या हाती मशाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! शिणतीलही जराश्या गजर्‍यातल्या कळ्या तेंव्हा उश्यास माझ्या दुमडून शाल दे! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
15882 वाचन

💬 प्रतिसाद (18)

नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती

गणेशा
Mon, 06/01/2020 - 19:21 नवीन
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! वाह.. निव्वळ अप्रतिम
  • Log in or register to post comments

थेंबास ओघळाया हलकेच गाल दे!

वीणा३
Tue, 06/02/2020 - 01:46 नवीन
थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! वा वा, खूप छान.
  • Log in or register to post comments

वाह! क्या बात है!

मन्या ऽ
Tue, 06/02/2020 - 09:45 नवीन
वाह! क्या बात है!
  • Log in or register to post comments

आवडली

आंबट चिंच
Tue, 06/02/2020 - 09:46 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

भारी!!

रातराणी
Tue, 06/02/2020 - 10:19 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments

सुंदर !

सस्नेह
Tue, 06/02/2020 - 12:14 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

आवडली

अनन्त्_यात्री
Tue, 06/02/2020 - 17:43 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

सुरेख!

चांदणे संदीप
Tue, 06/02/2020 - 17:54 नवीन
आवडली रचना. सं - दी - प
  • Log in or register to post comments

पाऊस दाटलेला...

चांदणे संदीप
Wed, 06/03/2020 - 11:53 नवीन
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा... ह्या सांज गारवा अल्बमधल्या गाण्याची चाल याही रचनेला फिट्ट बसतेय. मस्त वाटतेय गुणगुणायला. :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

होतील बघ सुरंगी लाजून गाल हे

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/03/2020 - 01:13 नवीन
होतील बघ सुरंगी लाजून गाल हे भेटीत पावसाच्या हाती मशाल दे! मस्त
  • Log in or register to post comments

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/03/2020 - 11:41 नवीन
क्या बात है. रचना एकदम खास, आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर

अनुस्वार
गुरुवार, 06/04/2020 - 19:30 नवीन
चिंब भिजलो वाचून. व्वा!
  • Log in or register to post comments

मस्त

कौस्तुभ भोसले
Fri, 06/05/2020 - 03:33 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments

वर्षभराहून अधीक वेळ लेखन

सत्यजित...
Fri, 06/05/2020 - 07:52 नवीन
वर्षभराहून अधीक वेळ लेखन-विश्रांतीनंतर पोस्टलेलं हे नवखंच लेखन! आपण सर्वानी भरपूर दाद दिली,त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

कुर्निसात !

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/07/2020 - 16:25 नवीन
कुर्निसात !
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Mon, 06/08/2020 - 02:34 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वाह! ब-याच कालानंतर वाचायला

प्राची अश्विनी
गुरुवार, 06/11/2020 - 22:14 नवीन
वाह! ब-याच कालानंतर वाचायला मिळाली तुमची कविता!
  • Log in or register to post comments

_/\_

सत्यजित...
गुरुवार, 06/18/2020 - 12:27 नवीन
धन्यवाद प्राची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा